Maharashtra Breaking News LIVE Updates : पालघर : तारापूर MIDC तील तारापूर फार्मा कंपनीला भीषण आग

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 23 Dec 2021 06:18 PM
अंबरनाथ शहरातील जुन्या डम्पिंग ग्राऊंडला लागली आग

अंबरनाथ शहरातील जुन्या डम्पिंग ग्राऊंडला लागली आग


मोरीवली पाड्याजवळील डम्पिंगला मोठी आग


सध्या हे डम्पिंग बंद आहे, मात्र तरीही आग लागल्यानं आग लावली गेल्याचा संशय


आगीमुळे डम्पिंग परिसरातून धुराचे मोठे लोट


अद्याप अग्निशमन दल घटनास्थळी दाखल नाही

सोलापुरात ड्रेनेजमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू, दोघे जखमी
सोलापुरात ड्रेनेज दुरुस्ती करत असताना झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झालाय. सोलापुरातल्या अक्कलकोट रोडवर अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरु आहे. या ड्रेनेज लाईनमध्ये ब्लॉक झाला होता. लाईन दुरुस्तीसाठी एक मजूर मॅनहोलमधून खाली उतरला. बराच वेळ हा मजूर बाहेर आला नाही म्हणून दुसरा व्यक्ती मदतीसाठी खाली गेला. शेजारीच राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील सुरू होते. रस्त्याचे कामगार देखील या ड्रेनेज कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून गेले..एका मागोमाग एक मदतीसाठी गेलेले 5 जण देखील या ड्रेनेजमध्ये उतरले.

घटनेत एकूण 6 व्यक्तींपैकी 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.तर दोघे जखमी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.  घटनेत समावेश असलेल्या जखमी आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ड्रेनेज लाईनच्या मॅनहोलमध्ये उतरत असताना सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असते. मात्र अशी कोणतीही काळीज घेण्यात आलेली नसल्याची माहिती घटनास्थळावरील मजुरांनी दिली. दरम्यान या संदर्भात संपूर्ण चौकशी केली जाईल असे आश्वासन पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. 
मुंबई लोहमार्ग पोलीस हेल्पलाईन क्र. 1512 पुढील सूचना येईपर्यंत बंद

काही तांत्रिक अडचणींमुळे मुंबई लोहमार्ग पोलीस हेल्पलाईन क्र. 1512 पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत 022-23759201 किंवा 9594899991 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

पालघर : तारापूर MIDC तील तारापूर फार्मा कंपनीला भीषण आग

पालघर : तारापूर MIDC तील तारापूर फार्मा कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे

नागपुरात ओमायक्रोन व्हेरीयंटचा आणखी एका बाधित रुग्णाची नोंद

नागपुरात ओमायक्रोन व्हेरीयंटचा आणखी एक बाधित रुग्ण आढळला आहे. 18 डिसेंबर रोजी दुबईवरून आलेला 21 वर्षांचा तरुण कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंटने  बाधित असल्याचे तपासणीत समोर आले आहे. हा तरुणाचे लसीकरण पूर्ण झाले असून सध्या त्याला कुठल्याही तीव्र स्वरूपाची लक्षणे नाहीत. त्याला नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वीजबिल न भरल्याने मराठवाड्यातील 1254 शाळांचा वीजपुरवठा खंडित

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे मराठवाड्यातील 1254 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज बिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

50 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाटला अटक 

50 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाटला अटक 


पोलिसांच्या विरोधात केलेल्या तक्रार अर्ज पाठीमागे घेण्याच्या बदल्यात तक्रारदार महिलेकडेच  50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती


 अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट याला गुन्हे शाखेने  रात्री उशीरा अटक केली. 


 याप्रकरणी सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे याच्यासह चौघांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 


 कोथरूड येथील एका 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली

कडाक्याच्या थंडीत दारुबंदी साठी सुरु असलेले महिलांचे उपोषण बुलढाणा जिल्हा प्रशासनाकडून बेदखल 

गावात असणारे दारु दुकान इतरत्र हलवावे, ग्रामपंचायतने दारुबंदीसाठी पुढाकार घ्यावा, ज्या दारू दुकानास परवानगी दिली ती रद्द करावी या मागणीसाठी लोणार तालुक्यातील बिबी येथील महिलांनी गेल्या 10 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणास बसल्या आहेत.. मात्र महिलांच्या दारूबंदीच्या मागणीला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने हे उपोषण बेदखल झाले येथील आहे. आज उपोषणाचा 11 वा दिवस असल्याने महिलांची प्रकृती खालावली आहे. जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत या उपोषणाची दखल न घेतल्याने महिलांमध्ये रोष वाढला आहे

मणेराजुरीमध्ये तिघांची विष पिऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

सांगली-: तासगाव तालुक्यातील मणेराजुरीमध्ये तिघांची विष पिऊन आत्महत्या केली. मणेराजुरी हद्दीतील एका डोंगरावर जाऊन यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्यांमध्ये एक तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

शिवसेनेच्या शालिनी भदाणे यांच्या निवासस्थानी दुसऱ्या दिवशीही इन्कमटॅक्सची चौकशी; अन्य दोन कंत्राटदारांची देखील चौकशी सुरू

धुळ्यातील जिल्हा परिषदेच्या बिनविरोध निवड झालेल्या शिवसेनेच्या शालिनी भदाणे यांच्या निवासस्थानी दुसऱ्या दिवशीही इन्कमटॅक्सची चौकशी सुरू झाली. तसेच अन्य दोन कंत्राटदारांची देखील चौकशी सुरू झाली आहे.  हे सर्व कंत्राटदार शिवसेनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतल्या वाकोल्यातील स्वागत रेस्टाॅरन्टमधील कॅशियरला पोलिसांकडून मारहाण

मुंबईतल्या वाकोल्यातील स्वागत रेस्टाॅरन्टमधील कॅशियरला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे. फुकटच्या जेवणाची मागणी पोलिसांकडून करण्यात आल्याचा रेस्टाॅरन्ट मालकाचा दावा. तर किचन बंद झाल्याने जेवण न दिल्याने पोलिसांनी मारहाण केल्याचं रेस्टाॅरन्ट मालकाचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आहार संघटनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

तामिळनाडूत 33 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज तामिळनाडूत 33 ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत आणखी एक गोळीबाराची घटना, अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत आणखी एक गोळीबाराची घटना समोर आलीये. तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आलीये. दशांत परदेशी असं 17 वर्षीय मुलाचे नाव होते. काल सायंकाळी 6 वाजता तो घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली, शोधकार्य सुरू असताना त्याचा मृतदेह आढळून आला. डोक्याला गोळी लागलेली होती. एका बंद पडलेल्या कंपनीसमोर तो मृतावस्थेत होता. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्याचा कोणाशी काही वाद नव्हता असं कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलेलं आहे. मग ही हत्या कोणी आणि का केली? हा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. शनिवारी पिंपळेगुरव परिसरात भरदिवसा गोळीबार झाला होता. तेंव्हा योगेश जगताप नावाच्या गुन्हेगाराची हत्या झाली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला होता. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांच्या राज्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Omicron Update : ओमायक्रॉनचं टेन्शन, पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक; देशात पुन्हा निर्बंध?


Covid-19 New Variant : देशात ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भर पडत आहे. देशात हा नवा व्हेरियंट वेगानं आपले हातपाय पसरताना दिसत आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येनं धाकधुक वाढवली आहे. देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक पार पडणार आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. बुस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मोदी काय निर्णय घेणार? पुन्हा निर्बंध लादणार का? याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जिनोम सिक्वेंसिंगमार्फत आतापर्यंत देशात ओमायक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत सर्वाधिक 57 ओमायक्रॉनबाधित आहेत. तर महाराष्ट्रात 54, तेलंगणात 24, कर्नाटकात 19, राजस्थानमध्ये 18, केरळात 15 आणि गुजरातमध्ये 14 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 15 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.


ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी 



New Delhi Covid Omicron guidelines : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका वाढत चालल्यानं केंद्रासह राज्य सरकारंही पावलं उचलताना दिसत आहे. मुंबईनंतर आता देशाची राजधानी दिल्लीतही नाताळ सेलिब्रेशन तसेच न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश काल जारी केला आहे.  दिल्लीत ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मंगळवारी पत्र पाठवून सतर्क केलं आहे. यात आवश्यकतेनुसार निर्बंध लावण्याची सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर डीडीएमएने आज एक आदेश जारी करत दिल्लीत गर्दी होईल अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई केली आहे.




 
दिल्लीमध्ये काय असणार निर्बंध
ख्रिसमस सणानिमित्त प्रमाणात सेलिब्रेशन होतं. त्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्साह असतो.  31 डिसेंबरच्या रात्री  इंडियागेटसह दिल्लीतील अनेक ठिकाणी नववर्ष स्वागतासाठी मोठी गर्दी होत असते. या सर्व बाबी लक्षात घेत संसर्गाचा फैलाव रोखण्यासठी दिल्ली सरकारने पावलं उचलली आहेत. डीडीएमएच्या आदेशानुसार दिल्लीत सर्व सामाजिक, राजकीय, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात आला आहे.



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.