Maharashtra Breaking News LIVE Updates : जेजुरी येथील टायर मोल्डिंग दुकानाला भीषण आग

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Dec 2021 09:45 PM
जेजुरी येथील टायर मोल्डींग दुकानाला भीषण आग

जेजुरी येथील टायर मोल्डींग दुकानाला भीषण आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज  आहे. अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. जवळपास दोन तास उलटूनही आग आटोक्यात नाही. टायरच्या दुकानाशेजारी पेट्रोल पंप असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीत कारकर यांचे 50 लाखांचं नुकसान झाले आहे.

बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 

केंद्र सरकारने अचानक सोयाबीन, सोयातेल, कच्चे पामतेल. हरभरा, मुंग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरी तेल या शेतीमालाच्या वायदेबाजारातील व्यवहारांवर बंदी आणल्याने, सोयाबीनच्या व इतर शेतीमालाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.

हसन मुश्रीफांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यातून नाव वगळण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी न्यायालयाने फेटाळली

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यातून नाव वगळण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. नाव वगळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता अर्ज. आज त्या अर्जावर सुनावणी झाली. किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या चिथावणीमुळेच किरीट सोमय्या यांनी आरोप केल्याचा मुश्रीफ यांच्या वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद केला आहे. 

लातूरच्या तांदूळजा येथे पन्नास एकर उसाला आग

लातूर जिल्ह्यातील उसाचा पट्टा असलेला भाग म्हणजे लातूर ग्रामीण. या भागातील तांदूळजा गावच्या शिवारातील सारसा मायनर या परिसरातील ऊस शेतीला साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान आग लागली.  काहीच कालावधीत आगीने पन्नास एकर उस शेतीला आपल्या कवेत घेतल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

नांदेडात दक्षिण आफ्रिकेतून आलेले तीनजण कोरोनाबाधित

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात दक्षिण आफ्रिकेतून आलेले तीनजण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे या तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. या तिन्ही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. 

नांदेडात दक्षिण आफ्रिकेतून आलेले तीनजण कोरोनाबाधित

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात दक्षिण आफ्रिकेतून आलेले तीनजण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे या तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. या तिन्ही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. 

अमरावतीत लाखोंचा अवैध गुटखा जप्त

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-बैतुल मार्गावर पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन यांनी गुप्त माहितीच्या आधारे एका ट्रकला अडवत त्यातून गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या गुटख्याची किंमत 41 लाख असून गुटखा दिल्लीहून अमरावतीला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींनाही अटक केली आहे.

पोलीस कस्टडीतून आरोपी फरार

नाशिकच्या द्वारका पोलीस चौकीतून चक्क पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार झाला आहे. चोरीच्या गुन्ह्यात अमोल उर्फ बंटी साळुंके याला मुंबई नाका पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले होते. तपास कामासाठी त्याला बाहेर काढले असता तो फरार झाला आहे.

नाशिकमध्ये पोलीस कस्टडीतून आरोपीने ठोकली धूम

नाशिकच्या द्वारका पोलीस चौकीतून पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार. चोरीच्या गुन्ह्यात अमोल उर्फ बंटी साळुंके याला मुंबई नाका पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलं होतं. तपास कामासाठी बाहेर काढले असता आरोपी झाला फरार

...तर राज्यातील शाळा पुन्हा बंद करणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

अहमदनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीत भाजपकडून मविआचा पराभव

अहमदनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. भाग क्रमांक 9 मधून भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांनी मविआ उमेदवार सुरेश तिवारी यांचा 517 मतांनी पराभव केला आहे. श्रीपाद छिंदम यांना अपात्र ठरवलेल्या प्रभागामध्येही पोटनिवडणूक झाली होती.


 





'महाराष्ट्रावर उत्तर देण्याची वेळ येऊ देऊ नका', शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा कर्नाटक सरकारला इशारा

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर पुन्हा काही ठिकाणी पुतळ्यासमोर दारू पिऊन गोंधळ घालतानाचे व्हिडिओ येत आहेत. कर्नाटक सरकार कडक कारवाई करण्याऐवजी अशा गुंडांना विनवणी करताना दिसत आहे. यावेळी महाराष्ट्रावर उत्तर देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा अरविंद सावंत यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. 

MPSCकडून गट क संवर्गातील रिक्त असलेल्या 900 पदांसाठी MPSCची जाहिरात, रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

गट क संवर्गातील रिक्त असलेल्या 900 पदांसाठी MPSC ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये तांत्रिक सहायक (विमा संचालनालय) आणि उद्योग निरीक्षक या दोन पदांचाही नव्याने समावेश केला आहे. यामुळं अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळेल, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  राज्यमंत्री  दत्ता भरणे यांचे त्यांनी आभार मानले आहेत. शिवाय MPSC च्या मुलांचे इतर प्रश्नही आपण अशाचप्रकारे मार्गी लावाल, असा विश्वास आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या 22 दिवसांपासून पंतप्रधानांच्या मुखदर्शनाची आस, संजय राऊतांचा टोला

काही क्षण सोडले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत दिसले नाहीत. आम्हालाही पंतप्रधानांच्या मुखदर्शनाची आस असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.

पेपरफुटी प्रकरणी खळबळजनक माहिती; आरोपी सिद्ध झालेले 250 अधिकारी अद्यापही शासकीय सेवेत

पेपर फुटी प्रकरणी आज आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकार करून सेवेत आलेले सुमारे 250 'वर्ग ब'चे अधिकारी तपासात आरोपी ठरूनही शासकीय सेवेत आहेत. यांत तहसीलदार, विस्तार अधिकारी, पोलीस निरीक्षक, कर सहाय्यक, कर सल्लागार, विक्रीकर निरीक्षक असे अधिकारी आहेत. 

धुळे पोटनिवडणुकीत भाजपची सरशी

धुळे प्रभाग क्रमांक 5 ब पोटनिवडणुकीत भाजपच्या आरती अरुण पवार विजयी, माजी आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे यांनी राजीनामा दिल्याने झाली होती पोटनिवडणूक


 





पार्श्वभूमी

राज्यात थंडीचा कहर; नागपुरात दोन दिवसांत रस्त्यावर रात्र काढणाऱ्या दोघांचा मृत्यू


नागपूरमध्ये थंडीचा कडाका जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत रस्त्यावर रात्र काढणाऱ्या दोघांचा मृत्यू झालाय. दोघांचाही मृत्यू थंडीमुळे झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूरच्या कपिल नगर परिसरात 53 वर्षीय ट्रकचालक अशोक सोनटक्के यांचा ट्रकमध्येच मृत्यू झाला आहे. ते ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते आणि तिथेच ते मृतावस्थेत आढळले. तर जागनाथ बुधवारी परिसरात रस्त्यावरच 60 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा फुटपाथवर मृत्यू झाला आहे. 


देशभरात थंडीची लाट पसरली आहे. डिसेंबर महिना संपताना महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरात पारा 8.5 अंशांवर घसरला आहे. तर कोल्हापुरातही पारा घसरला असून 14 अंशांवर घसरला आहे. त्याचबरोबर जिल्हात काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे.


MHADA Exam: रद्द झालेली म्हाडा भरती परीक्षा फेब्रुवारीमध्ये, ऑनलाईन पद्धतीनं होणार परीक्षा


म्हाडाच्या भरती परीक्षेचं वेळापत्रक ठरलं असून 1 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत म्हाडाची सरळ सेवा भरती परीक्षा होणार आहे. म्हाडातील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे.  टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळं म्हाडाकडून ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. 


म्हाडाची  12 डिसेंबरला होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री ट्वीट करत ही परीक्षा पुढे ढकलली होती. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता.  म्हाडाची परीक्षा  सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.