Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
महापालिकेची थकबाकी थकवल्याने पुण्यातील सिंहगड कॉलेजला फटका
सिंहगड कॉलेजच्या मिळकती सील
पुण्यातील विविध परिसरात असलेल्या सिंहगड कॉलेजच्या ५० मिळकती जप्त
३४५ कोटींची सिंहगड कॉलेजकडे थकबाकी
वडगावबुद्रुक, कोंढवा, एरंडवणे या मिळकती सिल केल्या आहेत
सिंहगड कॉलेजच्या ऑफीसला महापालिकेने ताळे ठोकले आहे
शैक्षणिक वर्ष सुरु असल्याने कॉलेजमधील वर्ग सुरु ठेवले आहेत
एरंडवणे परिसरात असलेल्या सिंहगड कॉलेजची थकबाकी भरण्याची मुदत संपल्याने महापालिका त्या आस्थापनेची लिलाव करण्याची शक्यता
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट
केज जिल्हा व सत्र न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणात उद्या पहिली सुनावणी होणार आहे
या प्रकरणात हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार..
मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेले वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि जयराम चाटे यांचे जबाब 18 प्रमाणे घेण्यात आले आहे..
साक्षीदाराचे 164 प्रमाणे जवाब घेतले गेले आहेत मात्र ते अद्याप समोर आलेले नाहीत
साक्षीदारांचे कलम 18 चे जवाब उद्या कोर्टा समोर येतील
जे जबाब आरोप पत्राला जोडण्यात आलेले नाही
उद्या न्यायालयात बंद लिफाफ्यामध्ये आरोपींचे जबाब सादर होतील
तर खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
सुधीर साळवी
हा आपला एकत्रित लढा आहे
काही तांत्रिक बाबी आणि कायदेशीर बाबी असतील या लवकरात लवकर सोडवणं गरजेचं आहे
मूर्तिकारांचा पोट यावर चालतं पूर्ण परिवार यावर चालतं
वज्रमुठ आपली आहे कोण पण उठतो आणि जनहित याचिका दाखल करतो हे देखील चुकीचा आहे
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वतीने आम्ही एवढ सांगतो आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत
ब्रेकिंग
मुंबईत आज उष्णतेची तीव्र लाट
मुंबईतील सांताक्रुज हवामान केंद्रावर ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
कुलाब्यात देखील ३८ अंश सेल्सिअस तापमान
पुण्यात देखील ३६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले
वाल्मीक कराडने सहा वेळा खंडणी मागितल्याचे रेकॉर्डवर आहे त्यामुळे त्यांनी आणखी काय केलं हे लवकर समोर येईल - धनंजय देशमुख
खंडणी आणि खून ही कडी जुटलेली आहे - धनंजय देशमुख
आवादा एनर्जी प्रकल्प अधिकाऱ्याकडून एक दोन नव्हे तर तब्बल सहा वेळा वाल्मीक कराडने खंडणी मागितल्याचे आरोप पत्रातून समोर आले आहे. यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्या कार्यालयातून खंडणी मागणे हे सर्वश्रुत आहे. मात्र अशा प्रकारच्या खंडण्या जगमित्र कार्यालयावरून देखील गेल्याचे समोर आले आहे. सहा वेळा खंडणी मागितल्याचे रेकॉर्डवर आहे. त्यामुळे त्यांनी आणखी काय केलं हे लवकरच समोर येईल.. खंडणी आणि खून ही कडी जुटलेली असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
पाच लोकांनी एकास भर रस्त्यावर बेदम मारहाण केली....... सोशल मीडियावर वेगात व्हिडिओ व्हायरल..लातूर हादरले.. जखमी वर उपचार सुरू... प्रकृती गंभीर... लातूर शहरातील पोलीस आरोपीच्या शोधासाठी बाहेर....
लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजश्री बार जवळ आज थरार घडला... बार मधील भांडण रस्त्यावर आलं... पाच तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली... महाराणा करताना काठी दगड आणि बेल्ट वापर करण्यात आला... यामुळे लातूर आंबेजोगाई रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती... दिवसाढवळ्या अशा पद्धतीची हाणामारी लातूरसाठी नवीन आहे... तिथे हजर असणाऱ्या अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडिओ केले.... समाज माध्यमावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत...
घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले... जखमी व्यक्तीला तोपर्यंत लोकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं होतं... पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही आणि इतर माहिती गोळा केली आहे... ही पाच जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.. ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो व्यक्ती हरवाडी येथील असल्याची माहिती आहे....
लातूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत... शिवाजीनगर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे आणि गांधी चौक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आरोपीचा शोध घेत आहेत... पाच लोकांनी एका व्यक्तीला केलेली जबर मारहाण अतिशय भयानक होती... ज्या व्यक्तीला मार लागला आहे त्या व्यक्तीच्या डोक्यात लाथा घालून शिवीगाळ करण्यात आली होती.. पूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे...
आंबेजोगाई रोडवरील राजश्री बारमध्ये ही लोक दारू पीत बसली होती.. बारमध्ये भांडण सुरू झालं.. या भांडणात बिअरच्या बॉटल मारत भांडण वाढत गेलं... बिअर बारच्या बाहेर आल्यानंतर ही भांडण सुरूच होतं... त्यानंतर ही सर्व लोक लातूर आंबेजोगाई रोडवर आली... या ठिकाणी भांडण मोठ्या प्रमाणात वाढलं... पाच लोकांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली...
बीड हे प्रकरण आम्ही लावून धरलं जेव्हा पासुन या प्रकरणार धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तेव्हापासुन आमची कोणती ना कोणती जुनी प्रकरणे बाहेर काढली जात आहेत.
आम्ही गुंडगिरी करतोय हे दाखवल जातय.
सुशील सोळंके या एका गावच्या सरपंच आहेत. या सर्व सदस्या माहिला आहेत. बस करुन ते फिरायला गेले होते. मग विरोधकांनी तुम्ही तुमच्या बायका गोव्याला का पाठवल्या अर्ध् नग्न डान्स का केला अस सगळ झाल. नग जाब विचारायला सुशील सोळंकी गेला
अरे रावी झाली व मारहाण प्रकरण झाल. त्याच दिवशी गुन्हा दाखल होउन अंतरिम जामिन पण हायकोर्टाने दिला.
आता तहसीलदार प्रकरण जे आहे.
त्या वेळेच्या तहसिलदार शेतकर्यांच कनेक्शन तोडयाला गेल्या होत्या.
मग सर्व महिला व पुरुषांनी विरोध केला. माणसांनी त्यांना घेरल मी तिकडे गेलो आणि लोकांना बाजुला करुन तहसिलदारांची गाडी बाजुला करुन गावाबाहेर काढली.फोर्सचा वापर तहसिल दारांनी केला म्हणुन घेराव घालुन लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या भावना होत्या. निवडणुकीची परिस्थिती कशी आहे हे सांगत होतो. माझा आकडा चुकला हे मी मान्य केल
On पैसे
ते भाषणात बोललो होतो.
विनोदातुन ते होत.
ते काय सत्य होत का
लाख बोलण्याऐवजी मी कोटी बोल लो
४० लालाख मला पाठवले होते २३ लाख खर्च झाले, जे उरले ते मी परत पाठवले. बाय चेक अकाउंटला दिले. मी प्रतिज्ञा पत्रात बरोबर उल्लेख केला आहे. कॅशचा मुद्दाच नाही
भाजपकडून विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली
भाजपकडून तीन उमेदवार परिषदेच्या रिंगणात असणार
भाजपकडून दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता
विधान परिषदेच्या ५ जागांपैकी ३ जागा भाजपच्या कोट्यातील
विश्वसनीय सूत्रांची माहिती
ब्रेकिंग..
वाल्मीक कराड जेलमध्ये असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्हीची धनंजय देशमुख यांच्याकडून मागणी
बीड शहर पोलीस ठाण्यात बालाजी तांदळे प्रमाणेच इतर कोणी आलं का ?
अशी शंका देशमुख कुटुंबाला असल्याने या सीसीटीव्हीची मागणी करण्यात आली आहे
माहितीच्या अधिकारात म्हणजे देशमुख यांनी ही मागणी केलीय
ज्या कालावधीत वाल्मीक कराड बीड शहर पोलीस ठाण्यात होता त्या कालावधीतील सीसीटीव्हीची मागणी स्वतः धनंजय देशमुख करत आहे
जालना -गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असलेला भोंदूबाबा अटकेत.
आत्महत्येनंतर सापडलेल्या चिठीमुळे पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.
भोकरदन पोलिसांनी वेळीच कारवाई करून नरबळीचा कट उधळला.
Jalna-जालना जिल्ह्यात गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असलेल्या एका भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केलय. बुलढाणा जिल्ह्यात धामणगाव येथे राहणाऱ्या गणेश लोखंडे या भोंदूबाबाला भोकरदन पोलिसांनी अटक केलय.
भोकरदन तालुक्यातील ज्ञानेश्वर आहेर यांनी 3 मार्च रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीत भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. तपासादरम्यान, पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली—गुप्तधनासाठी एका पाच वर्षीय मुलीचा नरबळी देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना आरोपीच्या चौकशी मधून मिळाली ,
त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव या गावात छापा टाकून आरोपी राहत असलेल्या घराची तपासणी केली यावेळी घरात 20 फूट खोल खड्डा आढळून आला, या प्रकरणी पोलीस अधिक सखोल तपास करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे.
बाईट -आयुष नोपणी -(अप्पर पोलीस अधीक्षक, जालना)
नांदेड महापालिकेच्या नविन विकास आराखड्यात जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले होते .. मात्र राज्य सरकारने जमिनीवरील आरक्षण रद्द केले .. महापालिकेने नविन हद्दवाढीसह विकास आराखडा मंजुरीसाठी पाठवला होता . मात्र त्याला दोन वर्षाचा कालावधी लागत असल्याने महापालिकेने मार्गदर्शन मागीतले होते .. महापालिकेच्या हद्दीपासुन दोन किलो मिटर पर्यंत विकास कामांना परवानगी देण्याचे आदेश राज्य सरकारने दीले .. त्यामुळे आरक्षणामुळे गुंठेवारीची कारवाई पालिकेला करता येणार आहे ....
Kolh prashant koratakar sunavani avb
Anchor - छत्रपती शिवरायांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला पूर्ण दिलासा मिळालेला नाही...कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कोरटकर यांच्या जामीन संदर्भात सुनावणी घेत कोर्टाने प्रशांत कोरटकर याला जामीन सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज आहे की नाही या संदर्भातील सुनावणी उद्या ठेवली आहे...प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनी तपासासाठी आवश्यक असणारा मोबाईल पोलिसांकडे जमा केला आहे.. त्यामुळे त्याला अटक करण्याची कोणतीच गरज नसल्याचा युक्तिवाद केलाय... त्याचबरोबर कोरटकर याला सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर न राहता ऑनलाईन उपस्थित राहण्यासंदर्भात कोर्टाला विनंती केली...इतिहास संशोधक इंद्रजित सावंत याचे वकील असीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकर याच्या अटकेची गरज असून त्याने पोलिसांना मोबाईल तपासासाठी दिला असला तरी तो मोबाईल फॉरमॅट मारून दिला आहे...त्याचबरोबर महापुरुषांसंदर्भात केलेलं विधान अत्यंत चुकीचे आहे..त्यामुळे मोबाईल मधील डेटा गोळा करण्यासाठी प्रशांत कोरटकर याची गरज आहे... त्यामुळे त्याने जुना राजवाडा पोलिसांकडे हजर होण्याची गरज असल्याचा युक्तिवाद केला. दरम्यान सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी कोरटकर याच्या कस्टडीची गरज असल्याचे कोर्टाला पटवून सांगितले. त्याच बरोबर जामीन अर्जावर सुनावणी घेत असताना त्याला प्रत्यक्षात उपस्थितीत ठेवावे असं कोर्टाला पटवून सांगितले. त्यावर कोर्टाने उद्या सुनावणी घेणार असून जामीन अर्जावर सुनावणी घेत असताना कोरटकर उपस्थित राहणे आवश्यक आहे की नाही याबाबत निकाल देणार आहे. या निकालानंतर कोरडकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार.
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अव्वलगावतील घटना. शेतीतून वाळू वाहतुकीस विरोध केल्यानं तीन व्यक्तीने गुलेरने मारहाण केल्याचा आरोप.गणेश उगले यांनी आज पोलीस विरगाव पोलीस ठाण्यात तक्रार. खंडाळा श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) च्या वाळू माफियाने मारहाण केल्याचा आरोप .शेतकऱ्यांचे टॅक्टर ही जाळले.
12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी दरम्यान घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले गेले मात्र दहशती खाली असल्यामुळे आम्ही यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली नाही असंही म्हटलं गेलंय खंडाळा श्रीरामपूर मधील संदीप वाघमारे सचिन गुंजाळ सादिक शेख आणि अन्य एका 2 व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप.आम्हाला बेथुन वाळु वाहतुक करायची आहे. तुम्ही इथे शेती करु नका म्हणत केली मारहाण. ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचं ही तक्रारीत म्हटलं
गौरव आहुजा याला न्यायालयीन कोठडी
पुणे सत्र न्यायालयाने सुनावली गौरव आहुजा याला न्यायालयीन कोठडी
आहुजा याचा वकिलांकडून न्यायालयाला केला जामीन अर्ज
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दिली आहुजा याला न्यायालयीन कोठडी
शनिवारी सकाळी गौरव आहुजा याने पुण्यातील येरवडा मधील शास्त्रीनगर चौकात सिग्नल वर लघुशंका आणि अश्लील वर्तवणूक केली होती
याप्रकरणात आहुजा याला पोलिसांनी कराड मधून ताब्यात घेतलं होतं
डॉ. जयंत गाडगीळ (शास्त्रज्ञ) 121
पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) हे पर्यावरणपूरक आहे आणि यामुळे कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही.
पीओपीचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्त्यांवर जे रंग चढवले जातात, तेच हानिकारक असतात. मग ती मूर्ती मातीची असो किंवा पीओपीची—जर त्यावर हानिकारक रंग वापरण्यात आला असेल, तर पर्यावरणाला धोका निर्माण होतोच.
माझ्या संशोधनानुसार, पीओपी पुनर्वापरयोग्य आहे आणि त्याचे पुनर्चक्रण करून त्याच पीओपीपासून पुन्हा गणपतीच्या मूर्त्या तयार करता येऊ शकतात. यासाठी महापालिकांनी विशेष हौद बांधावे आणि त्या हौदामध्येच सर्व मूर्तींचे विसर्जन करावे.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्याही प्रकारच्या मूर्ती जर नदीत किंवा समुद्रात विसर्जित केल्या, तर प्रदूषण होणारच, आणि ते कोणीही रोखू शकत नाही. मात्र, जर लोकांनी पीओपीच्या मूर्ती हौदामध्ये विसर्जित केल्या, तर त्या पीओपीचा पुनर्वापर करून नव्या मूर्त्या बनवता येतील. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि सर्वांनाच याचा फायदा मिळेल.
नाशिक ब्रेकिंग...
- छत्रपती संभाजीराजांबाबत विकिपीडियावर असलेला बदनामी व आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी मनसेचे आंदोलन...
- नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मनसेचे निदर्शने करत आंदोलन...
- शंभू राजेंचा बदनामीचा ऑनलाइन कट थांबवा अशी मनसेची मागणी...
- विभागीय कार्यालयासोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी ...
- मुख्यमंत्र्यांकडून विकिपीडिया वरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचा सूचना मात्र अंमलबजावणी नाही- मनसे
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा भडका उडाला असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसतेय. येत्या ४ ते ५ दिवसात मुंबई, पुण्यासह विदर्भ आणि राज्यातील काही जिल्ह्यात उष्माघाताची लाट येण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. यंदा उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. संभाव्य उष्णतेच्या लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. राज्यात पुढील काही दिवसात तापमान कसे राहणार आहे ते पुणे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
प्रशांत कोरटकर याला दिलासा नाहीच..
उद्या कोर्टात प्रशांत कोरटकर याला जमीन अर्ज सुनावणीसाठी उपस्थित रहावे की नाही यासंदर्भात होणार निर्णय..
प्रशांत कोरटकर याला अकरा तारखेपर्यंतच होता अंतरिम जामीन..
कोरटकर याच्यासमोरील अडचणी वाढल्या..
गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुदुकान
सुरु करण्यासाठी यापुढे, सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक
--उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
महानगरपालिका क्षेत्रात एखाद्या वॉर्डमध्ये सुरू असलेले मद्यविक्री दुकान
बंद करण्यासाठी झालेल्या मतदानापैकी 75 टक्के मतदान ज्या बाजूने होईल,
त्यानुसार बियर किंवा दारुचे दुकान सुरु किंवा बंद ठेवण्याचा निर्णय घेणार
--उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती
दारुबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची भूमिका;
अवैध दारुविक्री रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य
--उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्षवेधीवर विधानसभेत उत्तर
मुंबई, दि. 11 :- राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. अजित पवार यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील वातावरण कलहमुक्त राहण्यास, तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्यास प्रतिबंध होणार असून कायदा-सुव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. महापालिका वार्डमध्ये मद्यविक्रीचे दुकान बंद करायचे असेल नियमानुसार आलेल्या प्रस्तावावर झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने निर्णय होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या या घोषणेचे समाजाच्या सर्व थरातून स्वागत होत आहे.
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर आणि दारु दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा श्री. महेश लांडगे आणि अॅड. राहूल कूल आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चर्चेत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शासनाची भूमिका राज्यात दारुविक्री वाढावी अशी नसून दारुबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे. अनेक दशकांपासून राज्यात दारुविक्रीचे परवाने बंद आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दारुदुकानांना परवानगी नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारुदुकाने बंद करण्याचा कायदा आहे. त्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी दारुदुकान सुरु किंवा बंद करण्यासाठी महापालिका वार्डांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान हे ज्या बाजूने होईल, त्यानुसार निर्णय होईल. राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन न देता अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना स्पष्ट केले.
राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका नसून अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. दारुमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. यासंदर्भत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोखठोक आणि स्पष्ट उत्तराचे श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक सदस्यांनी कौतुक केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 65 इमारती बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे इमारत बांधकाम प्रकरणी सातबारा खोटे वापरले असल्याबाबत प्रांत अधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज केला होता या तक्रारी अर्जाचा तपास झाल्यानंतर तहसीलदारांनी डोंबिवली रामनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत
डोंबिवली आयरे गावातील सर्व्हे नंबर 29/5 हा सात बारा खोटा असल्याबाबत आणि खोटा सातबारा वापरून त्याठिकाणी जमिनीचा व्यवहार केल्या बाबत तक्रार प्राप्त झाली होती
या तक्रारीच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांच्याकडून चौकशी केली चौकशी केली असता सदर जमिनीच्या सातबारातील धरणा अधिकार बदललेला दिसून आला भोगवटा वर्ग दोन हा बदलून वर्ग एक बनवल्याचे निष्पन्न झाल्याने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार सचिन शेजळ यांनी दिले आहेत
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 65 इमारती बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे इमारत बांधकाम प्रकरणी सातबारा खोटे वापरले असल्याबाबत प्रांत अधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज केला होता या तक्रारी अर्जाचा तपास झाल्यानंतर तहसीलदारांनी डोंबिवली रामनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत
डोंबिवली आयरे गावातील सर्व्हे नंबर 29/5 हा सात बारा खोटा असल्याबाबत आणि खोटा सातबारा वापरून त्याठिकाणी जमिनीचा व्यवहार केल्या बाबत तक्रार प्राप्त झाली होती
या तक्रारीच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांच्याकडून चौकशी केली चौकशी केली असता सदर जमिनीच्या सातबारातील धरणा अधिकार बदललेला दिसून आला भोगवटा वर्ग दोन हा बदलून वर्ग एक बनवल्याचे निष्पन्न झाल्याने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार सचिन शेजळ यांनी दिले आहेत
सातारा:धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीने सोडण्यात आलेले पाणी तात्काळ बंद करावे, धोम धरण पाणी बचाओ समितीच्या वतीने सातारा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन....
सातारा: जिहे कटापूर योजनेसाठी वाई तालुक्यातील धोम धरणांमधून नियम बाह्य पद्धतीने पाणी सोडण्यात आले असून हे पाणी तात्काळ बंद करावे या मागणीसाठी धोम धरण पाणी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे वास्तविक जिहे कटापूर पाणी योजना ही चार माही योजना असून नियमबाह्य पद्धतीने या पाण्याचा वापर जिहे कटापूर योजनेसाठी केला जात असल्याचा आरोप धोम धरण पाणी बचाव समिती कार्याध्यक्ष रणजीत फाळके यांनी केला आहे.जोपर्यंत धोम धरणातून हे पाणी बंद होणार नाही तोपर्यंत हे ठिया आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे.
बुलढाणा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हप्तेखोरीमुळे शासनाच्या महसुलात घट.
बुलढाणा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्रीत मोठे वाढ.
अधिकृत दारू विक्रेत्यांनी दिल जिल्हाधिकार्यांना निवेदन.
बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्रास अवैध दारू विक्री सुरू आहे . जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे अवैध दारू विक्रेत्यांचा व्यवसाय फोफावला असून त्यामुळे अधिकृत दारू विक्रीवर परिणाम होत आहे. आणि यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अवैध दारू विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई करताना दिसून येत नाहीत .त्यामुळे आता या अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची वेळ आली असल्याचही अधिकृत दारू विक्रेत्या संघटनेने म्हटल आहे. आज यासंबंधी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल.
कोल्हापूर
इंद्रजित सावंत यांचे असीम सरोदे ऑनलाइन युक्तिवाद करत आहेत
मोबाईल इरेज करून सिम कार्ड आणि मोबाईल जमा केला
एक प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आहे
पहिल्यांदा त्याने माझा आवाज नाही आणि दुसरीकडे मोबाईल मधील डेटा डिलीट केला
आरोपी वकील :
जे काही होत किंवा आहे ते आजुन ही मोबाईल मध्ये आहे आणि तो मोबाईल आम्ही जमा केला आहे
नशा करण्यासाठी आईने पैसे दिले नाही म्हणून जाळल्या 13 दुचाकी
पुण्यातील गौरव आहुजा या विकृत आणि माथेफिरू तरुणाने केलेल्या कृत्याचे प्रकरण ताजे असनाच, आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आलाय
आईकडे नशा करण्यासाठी मागितलेले पैसे न मिळाल्याने एका 27 वर्षीय तरुणाने, सोसायटीतील रहिवाश्यांच्या 13 दुचाकी पेटवून दिल्याची ही धक्कादायक घटना आहे.
तरुणाकडून दुचाकी पेटविल्या जात असल्याचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने, ही घटना उघडकीस आली
पिंपरी शहरातील पिंपळे निलख या उच्चभ्रू परिसरात असलेल्या
मोरया क्षितिज बिल्डिंग, या सोसायटीमध्ये ही घटना घडली असून ,
हे कृत्य, याच सोसायटीतील रहिवाशी असलेल्या स्वप्नील शिवशरण पवार नामक तरुणाने केले असल्याची तक्रार , सोसायटीतील रहिवाश्यांनी दिल्यानंतर त्याला सांगवी पोलिसांनी अटक केलं आहे.
विशेष म्हणजे आपला मुलगा उच्चशिक्षित आहे मात्र तो व्यवसनाच्या आहारी गेला असल्याने असे कृत्य करतो आणि पैसे नाही दिले तर कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याची तक्रार स्वतः स्वप्नीलच्या आईनेच पोलिसांकडे केली आहे.
कोल्हापूर कोरटकर पॉईंट्स
वकील बाबा इंदुलकर, हस्तक्षेप याचिका
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आम्ही पूजतो, देव मानतो
या आमच्या देवाच्या अपमान आम्ही कसा सहन करायचा
आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत
म्हणून या प्रकरणात आमचं म्हणणं कोर्ट ऐकणार नसेल तर कोणच ऐकणार आहे
नाशिक ब्रेकिंग...
#नाशिक पोलिसांनी म्हस्के गँगचा मोरक्यास ठोकल्या बेड्या...
- नाशिक गुंडा विरोधी पथकाची मोठी कामगिरी, मस्के गॅंगचा मोरक्या जेरबंद
- जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील फरार असलेला सागर म्हस्के पोलिसांच्या ताब्यात...
- नाशिक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातून गुंडाविरोधी पथकाने सागर म्हस्केला घेतले ताब्यात...
- सागर म्हस्केचा तपास काढतजी असताना पोलिसांची चाहूल लागताच मस्केने केले होते पलायन...
- गुंडाविरुद्ध पथकाने पाठलाग करत सागर म्हस्केला अहिल्यानगर येथून मध्यरात्री घेतले ताब्यात...
- नाशिक शहरातील विविध गुन्हे या कारवाईमुळे उकल होणार असल्याचा अंदाज...
- सागर मस्केवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद...
ब्रेकिंग ( कोरटकर प्रकरण )
प्रशांत कोरटकर ने आपल्या जीविताशी धोका असल्याचे कारण देत वकिलामार्फत नागपूर पोलिसांनकडे केला सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी अर्ज ...
नागपूर पोलीस सुरक्षा पुरवण्या संदर्भात आढावा घेऊन घेणार निर्णय ...
प्रशांत कोरटकर ने नागपूर पोलिसांकडे आवाजाचे नमुने देण्याची देखील केली होती विनंती ...
मात्र गुन्हा कोल्हापूर मध्ये दाखल असल्याने नागपूर पोलीसांनी आवाजाच्या नमुण्यासंदर्भात प्रशांत कोरटकरच्या वकिलाला कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचा दिला सल्ला.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील खरेदीचा गोंधळ उघड
३५ कोटींच्या १०० शववाहिका धूळ खात पडून
राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना या शववाहिका देण्यात येणार होत्या
मात्र जानेवारी महिन्यापासून या शववाहिका धूळ खात पडून
एका शववाहिकेला साधारणता 36 लाख रुपयांपर्यंतचा खर्च
एवढ्या दिवसांपासून महिन्यांपासून या सगळ्या शववाहिका का वापराविना धुळखात पडून आहेत?
तत्कालीन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले..
आमच्या घराचा काम सुरू आहे
गावाला जाऊन राहणं गुन्हा आहे का?
मुंडे साहेब देखील तिथेच राहतात
धस यांचा जावई शोध पाहायचा आहे
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे त्या मुळे आम्ही बोलत नाही
सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे हे माहीत आहे
सुरेश धस खोक्या प्रकरणात सह आरोपी केले पाहिजे
आमच्यावर आता कौटुंबिक आरोप केले जात
मात्र त्याला काही अर्थ नाही
कोण्ही तरी बोलले पाहिजे म्हणून मी इथे बोलायला आलो आहे
आरोप पत्र आम्ही पूर्ण वाचले नाही
जे आरोपी त्यांना कडक शासन झाले पाहिजे
ही आमची मागणी
सुरेश धस यांनी पुरावे दिले पाहिजे
टिपर बाबत त्यांनी rc बुक ची मागणी केली पाहिजे
आज कुटुंबावर आले म्हणून पुढे येऊन बोलत आहोत
माझ्या मोठ्या बहीण भावा बद्दल बोलण सयुक्तिक वाटत नाही
अजय मुंडे -
सुरेश धस यांनी एका वृत्त वहिनी वर मुलाखत दिली.त्यात धनंजय मुंडे साहेबांची आई त्यांच्या सोबत राहत नाही असे चुकीचे. वक्तव्य केले.मागील दोन दिवसांपासून सुरेश धस यांची मुलाखत पहिली.त्यात धनंजय मुंडे यांच्या आई बद्दल बोलत आहेत
त्या परळीला आल्या नाही.त्यांचे चुलत भाऊ नाराज आहे .कौटुंबिक कलह असल्याचा आरोप केला .पण आमच्या बाई परळीत राहत होत्या .मात्र त्या गावी राहत आहे.धनंजय मुंडे त्यांच्या आई सोबतच राहतात.धस यांच्या आरोपाला अर्थ नाही.आमच्या बाई त्याच्या विषयी जे बोलले गेले.किती दिवस गप्प बसायचे.त्यांचे सर्व कार्यकर्ते गप्प बसणार
देशमुख यांच्या प्रकारात न्याय मिळाला पाहिजे
धनंजय मुंडे नेतृत्व व्हायला 20 वर्ष झाले
त्याच्या वर आरोप नसताना त्यांना बदनाम केलं जात आहे
दिव्यागर होणारे विविध उपचार आणि पायावरच्या दर्शनामुळे विठुरायाच्या मूर्तीची पुन्हा मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याचे समोर आले असून एक महिन्यापूर्वी पुरातत्त्व खात्याच्या रासायनिक विभागा कडून विठ्ठल मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. त्यांनी नुकताच अहवाल दिला असून देवाचे पाय कमरेचा मागचा भाग या ठिकाणी झाल्याचे समोर येत असल्याचे या अहवालात सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विठोबाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेप लावावा लागणार आहे. याबाबत आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा होऊन पुरातत्त्व विभागाचा अहवाल राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. राज्य शासनाकडून ज्या पद्धतीने परवानगी मिळेल यानंतर मंदिर समितीच्या बैठकीत विठ्ठल मूर्तीला लेप लावण्याचा दिवस ठरविण्यात येणार असल्याचेही कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. साधारण 2020 21 या कोरोना काळात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला एपॉक्सीचा लेप दिला होता. या काळात मंदिर बंदच असल्याने फारसा त्रास जाणवला नव्हता. आता पुन्हा एकदा एक महिन्यापूर्वी पुरातत्व विभागाने या पद्धतीने विठ्ठल मंदिराच्या मूर्तीला लेखन करण्याची सूचना केली आहे त्यानुसार आता विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला एपॉक्सी चा लेप द्यावा लागणार आहे. यापूर्वी केलेल्या लेखनाला आता साधारण चार वर्ष झाली असून यावेळी मुदतीपूर्वीच मूर्ती पुन्हा भिजल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने पुरातत्त्व विभागाला यावेळी विचारपूर्वक लेखनाची क्रिया करावी लागणार आहे.
विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या मंदिर जतन व संवर्धनाच्या कामांमध्ये विठ्ठल गाभाऱ्यातील दगडांनाही रासायनिक लेपन करावे लागणार आहे. यासाठी सुरुवातीला रासायनिक द्रव्याने दगड कसे साफ करावे लागणार असून ही यानंतर पाण्याने हे दगड धुवावे लागणार आहे. गाभाऱ्यातील हे दगड वाढल्यानंतर पुन्हा या दगडांना रासायनिक लेखन प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. यामुळे दगडातून विषारी वायू बाहेर पडण्याची शक्यता असल्याने लेखन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आठ ते दहा तास गाभाऱ्यात भाविकांना जाता येणार नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जी बैठक होईल त्या बैठकीत गाभाऱ्याला रासायनिक लेखन करण्याबाबतचा निर्णय होणार आहे. ही रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर साधारण सहा ते आठ तास गाभाऱ्यात कोणालाही जाता येणार नसल्याने दोन ते तीन दिवस विठुरायाचे दुरून मुखदर्शन चालू ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले
ब्रेकिंग..
आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक प्रश्नावर केलेल्या आरोपावर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे देणार प्रतिउत्तर
आज दुपारी दोन वाजता साधणार माध्यमांशी संवाद
:माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक बाबींवर भाजपा आमदार सुरेश धस यांनी भाष्य करत जोरदार हल्ला चढवला होता. यानंतर आता या विषयी उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे आज दुपारी दोन वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत... गत काही काळात धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते. यानंतर आता मुंडे कुटुंबातून या सर्व आरोपांना प्रथमच प्रत्युत्तर दिले जाणार आहे.. त्यामुळे अजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे
नागपूर मुंबई महामार्गावर एस. जे. एस. हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओ वाहन क्रमांक (MH 12 NZ 0057) कोपरगावच्या दिशेने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट साई जनार्दन हॉटेलजवळील गोदावरी जनरल स्टॉलमध्ये घुसली. या दुर्घटनेत तीन ते चार जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. याच चालकाने अपघाता आधी एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजमध्ये गाडी प्रचंड वेगाने येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन स्टॉलमध्ये घुसतानाचे दृश्य स्पष्ट दिसत आहे.
Kolh Breaking
कोल्हापूर जिल्हा न्यायालयात प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावर अडीच वाजता सुनावणी होणार
न्यायाधीश कश्यप यांच्या समोर सुनावणी होणार
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी देखील दाखल केली हस्तक्षेप याचिका..
छत्रपती शिवराय हे आमचे दैवत असल्याने आमचे देखील म्हणणे ऐकून घ्यावे
हस्तक्षेप याचिकेत सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांची भूमिका.
रत्नागिरी- मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे byte pointers
आज आम्ही सर्वजण संभाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी आलो आहोत
आम्ही इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन आलेलो नाही
शिवप्रेमी म्हणून आम्ही इथे आलो आहोत
हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारनं महाराजांचा स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे
भव्य अशी तरतूद या स्मारकासाठी केली गेली आहे
वाड्याचे मालक सरदेसाई यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे
सर्वांना विश्वासात घेऊन महाराजांचे भव्य दिव्य स्मारक इथे होणार
हिंदू समाज म्हणून आमची सर्वांची मागणी
हिंदूंच्या विरोधात काम करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का
त्यामुळे प्रत्येक हिंदू आम्हाला विचारतो आहे
हिंदू समाजाची ही भावना मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचली आहे
हिंदू समाजाच्या भावनांची योग्य ती कदर राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेईल
ऑन अविनाश जाधव
कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं या संदर्भातील एक क्रायटेरिया असतो
औरंगजेबचे स्टेट्स ठेवणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करा, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मागणी
अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावातील तरुण औरंगजेबचे स्टेट्स ठेवत असल्याची कल्याणशेट्टी यांची ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मशन‘ माध्यमातून विधानसभेत माहिती
औरंगजेबचे स्टेट्स ठेवणाऱ्या लोकांच्या नांग्या ठेचा, त्यांच्याबर देशद्रोहचा गुन्हा दाखल करता येईल का पाहा?
भाजपचे अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मागणी
आधुनिक महराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची बुधवार दि.12 मार्च, 2025 रोजी जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधत पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी यशवंतराव चव्हाण यांची स्टोन आर्टमधून अनोखी कलाकृती साकारली आहे .
"हिमालयाच्या संरक्षणासाठी सहयाद्री धावला" असे महटले जाते. त्यामुळे सहयाद्रीचा कणखरपणा चित्रातून व्यक्त करण्यासाठी डाॅ.डाकवे यांनी "स्टोन आर्ट"मधून यशवंतरावांचे अनोखे चित्र साकारले आहे. वेगळ्या शैलीतून डाॅ.संदीप डाकवे यांनी चित्र तयार करत आपल्या प्रतिभेलाही "चार चाॅंद" लावले आहेत.
Shivsena UBT Andolan
मुख्यमंत्री साहेब कॅलिफोर्नियातील अग्निशमन यंत्रणेचे वाभाडे काढण्यापेक्षा तुमच्या शहरातील अग्निशमन यंत्रणेकडे लक्ष द्या.. फक्त 127 फायरमॅनच्या भरवश्यावर नागपूरकरांची सुरक्षितता असणे दुर्दैवी... नागपूर महापालिकेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलं जोरदार आंदोलन...
नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात गेले अडीच वर्ष रखडलेली भरती प्रक्रिया त्वरित राबवावी अशी मागणी करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत जोरदार आंदोलन केले... एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये लागलेल्या आगीचा उल्लेख करत तिथल्या अग्निशमन यंत्रणेचा कमकुवतपणा सर्वांसमोर मांडतात... दुसऱ्या बाजूला त्यांच्याच शहरात महापालिकेची अग्निशमन यंत्रणा प्रचंड कमकुवत असून अवघ्या 127 फायरमॅनच्या भरवशावर उपराजधानी नागपूरची सुरक्षितता राखली जात असल्याचा आरोपही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे...
सप्टेंबर 2023 मध्ये नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलात 352 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि न्यायालयीन खटल्यामुळे आजवर ती भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही... उन्हाळ्यात दरवर्षी शहरात मोठ्या संख्येने आगी लागण्याच्या घटना घडतात.. नागपूरकरांची कोट्यवधींची संपत्ती त्यात भस्मसात होते, लोक जखमी होतात, अशा स्थितीत फक्त 127 फायरमॅनच्या भरवश्यावर नागपूरची अग्निशमन यंत्रणा राबविली जाणे दुर्दैवी आहे.. मुख्यमंत्र्यांनी कॅलिफोर्नियातील अग्निशमन यंत्रणेचे वाभाडे काढण्यापेक्षा त्यांच्या शहरातील अग्निशमन यंत्रणे संदर्भात लक्ष द्यावं अशी मागणी ही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे...
रत्नागिरी- मंत्री नितेश राणे भाषण पॉइंटर
संभाजी महाराजांनी धर्म रक्षणाचा इतिहास रचला आहे
व्यासपीठावर आम्ही सगळे केवळ हिंदू म्हणून
असं स्मारक निर्माण करू की जगभरातील लोक इथे येतील
कुठल्याही सरकारला जे जमत नाही ते महायुतीच्या सरकारनं करून दाखवलं
संभाजी महाराज नसते तर आपल्या आडनावाच्या समोर वेगळी नावे लागली असती
हिंदवी स्वराज्याची लढाई इस्लामिक विरुद्ध झाली आहे
आमच्यातले काही कारटे आहेत
शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीही मुसलमान नव्हते
महाराजांच्या काळातील लढाई मुसलमान विरुद्ध हिंदू वर्षीच होती
काहींचं दुकान चालावं म्हणून काही जण वेगळा इतिहास सांगतात
आमच पहिलं प्राधान्य हिंदू समाजाचे संरक्षण
आघाडीच्या काळात सगळे मुल्ले मोहल्ले फिरायचे
हिंदू समाजासाठी आपण तडजोड करत नाही
आम्ही तयारीत बसलो आहोत, कबर केव्हा काढणार
पत्रकारांना आम्ही उत्तर देणार नाही
हा बारसा नाही, पहिली सोडली आणि नंतर ब्रेकिंग न्यूज चालवले
कितीही दांडे घुसुदे एकदा कार्यक्रम होणारच
औरंगजेबची थडगं पाकिस्तानात घेऊन जा
आम्ही अजून पिचवर आलो आहोत
औरंगजेबच्या कबरीला संरक्षण वाढवल आहे
एवढी संरक्षण जास्ती तेवढी जास्ती मजा येईल
स्मारक नक्की बनेल, धर्माच्या रक्षणाची शपथ घेतली पाहिजे
भगवा आपला रक्ता रक्तात असला पाहिजे
हिंदूने असं केलं पाहिजे सगळे सल्ले आम्हाला
धन्य धर्माला पण बोलून दाखवा
त्यांच्या गोष्टी थांबवा, हिंदू धर्माच्या सण आम्ही अभिमानाने साजरा करणार
जेवढा निधी लागेल तेवढा देणार
कल्याण खडकपाडा परिसरातील धक्कादायक घटना
निर्मानाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील पार्किंगचा स्लॅब कोसळला ..
पार्किंगच्या स्लॅब चे काम सुरू असताना घडली घटना
थारवानी मॅजेस्टिक टॉवर या इमारतीचे सुरू आहे काम
चार ते पाच मजूर जखमी ...
सातारा : जिल्ह्यातील म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी कठोर पाऊल उचलले आहे. या अनुषंगाने म्हसवड हद्दीतील हिंगणी, राजेवाडी रोड, विरळी, त्याचबरोबर मासाळवाडी हद्दीत असणारे अवैध दारू विक्री आणि अवैध धंदे या प्रकरणी 6 ठिकाणी धाड टाकून तब्बल 12 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नाशिक शहरात GBS चा शिरकाव, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू...
- नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात साठ वर्षीय इसमाला GBS ची लागण...
- GBS रुग्णाची प्रकृती गंभीर, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती...
- GBS व्हायरस रुग्ण आढळून आल्याने नाशिक जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर...
ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सीकेपी समाजातर्फे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. साहित्यरत्न राम गणेश गडकरी यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत घोषणा बाजी करण्यात आली. अमोल मिटकरी यांनी लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सीकेपी समाजाने दिला आहे.
परभणी : वर्षभराचा कालावधी लोटला तरीही निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने परभणी जिल्ह्यात राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या तब्बल 215 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे यात जनतेतून निवडून आलेल्या 4 सरपंचांनाही आपले पद गमवावे लागले आहे. परभणी जिल्ह्यात दोन टप्प्यात झालेल्या 699 ग्राम पंचायतींमधील राखीव प्रवर्गातील सदस्यांना निवडणूक अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यास 12 महिन्यांच्या आत ते प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. मात्र हा कालावधी पूर्ण होवुनही या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी एकूण 215 ग्राम पंचायत सदस्यांना अपात्र केले आहे. ज्यात जनतेतून निवडून आलेल्या 4 सरपंचांचाही समावेश आहे.
- टोमॅटो विक्रीचे पैसे न मिळाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक...
- पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन....
- कांदा लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर शेतकऱ्यांचा ठिय्या...
- पैसे अडकल्याने जोरदार घोषणाबाजी करत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू...
- 294 टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे तीन कोटी रुपयांच्या जवळपास टोमॅटोचे पैसे अडकले...
- चार महिने उलटून गेल्यानंतर ही बाजार समितीकडून टोमॅटो व्यापाऱ्यावर कारवाई नाही...
अक्कलकोट दहावीचा गणिताच्या उत्तरपत्रिका चक्क रिक्षातून आणल्या?
दुपारी एक वाजता पेपर संपल्यानंतर रात्री पावणे नऊ वाजता उत्तर पत्रिका स्ट्रॉंगरूममध्ये जमा केल्याचा आरोप
या उत्तर पत्रिका इतक्या उशिरा स्ट्रॉंगरूममध्ये जमा करण्याचे कारण कोणाला फायदा पोहोचवणे आहे का? आरपीआय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आरोप
दहावीचा गणिताचा पेपर दुपारी एक वाजता संपलेला असताना पंचायत समितीला रात्री पावणे नऊ वाजता कसा पोहोचला? असा प्रश्न उपस्थित करत गडबड झाल्याचा केला आरोप
विद्यार्थ्यांनी लिहिलेला दहावीचा गणिताचा पेपर कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षाने आणल्याचा आरपीआय संघटनेचा आरोप
काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका पुन्हा एकदा लिहल्या गेल्यात का? आरपीआयला संशय
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
दरम्यान या प्रकारणी गटशिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची एबीपी माझाला फोनवरून माहिती
Amravati: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद येथे प्रॉपर्टीच्या वादातुन भाऊ बहिणीचा वाद चव्हाट्यावर आला आहे. सेवानिवृत्त आर्मी जवानाने चक्क रस्त्यावर येत बेनोडा पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखत आपली परवाना धारक बंदूक काढत बहिणीला धमकावलं. या व्हिडीओत चार पोलीस दिसत असून तरी देखील त्यांनी आपली बंदूक काढत बहिणीला धमकावलं आहे या प्रकरणी एकमेका विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
मारहाण प्रकरणात जामिनीसाठी सतीश उर्फ खोक्या भाईचा अटकपूर्व जामीन अर्ज
बीड जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन वकिलाच्या मार्फत दाखल
बीड जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी होणार अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके रवाना
- नाशिक शहरातील पुलांचे होणार ऑडिट,आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता महापालिका प्रशासनाकडून नियोजन सुरू...
- शहरातील छोट्या-मोठ्यांसह तब्बल ३६ पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट केले जाणार, ऑडिटद्वारे धोकेदायक पुलांची माहिती येणार समोर...
- कोट्यवधी भाविक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येण्याचा अंदाज असल्याने त्यादृष्टीनेच प्रशासनाची तयारी सुरू....
- मनपाच्या बांधकाम विभागाकडून शहरातील पुलांचे केले जाणार स्ट्रक्चर ऑडिट...
- नाशिकरोड येथील बिटको चौकातील उड्डाणपुलासह पंचवटीतील कन्नमवार पुलासह सर्व पुलांची तपासणार स्थिती...
Pune News : शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात आरटीईचा लाभ घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही तुमच्या पाल्यांना आरटीईद्वारे प्रवेश घेत असताना बनावट कागदपत्रे जोडणार असाल तर आता पालकांवर थेट गुन्हे दाखल केले जातायेत. पुण्यात अशा अठरा पालकांविरोधात बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवलेत. शिक्षण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत माताळवाडी भूगाव येथे घडला आहे. पालकांनी पाल्यांना ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून बनावट कागदपत्रे सादर केलीत. मात्र शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये या पालकांचे बिंग फुटले. त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी अन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस पुढील तपास करत आहेत.
Pune News : शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात आरटीईचा लाभ घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही तुमच्या पाल्यांना आरटीईद्वारे प्रवेश घेत असताना बनावट कागदपत्रे जोडणार असाल तर आता पालकांवर थेट गुन्हे दाखल केले जातायेत. पुण्यात अशा अठरा पालकांविरोधात बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवलेत. शिक्षण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत माताळवाडी भूगाव येथे घडला आहे. पालकांनी पाल्यांना ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून बनावट कागदपत्रे सादर केलीत. मात्र शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये या पालकांचे बिंग फुटले. त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी अन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस पुढील तपास करत आहेत.
जीबीएसचा धोका रोखण्यासाठी पालिका अलर्ट; पालिकेने चार ठिकाणी बसवले क्लोरिन मशीन
पुण्यात उन्हाचा तडाखा वाढणार; कोरेगाव पार्कमध्ये राज्यातील सर्वात कमाल तापमानाची नोंद
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; कोथरुड, चतुःश्रृंगी भागात घरफोडी, दोन लाख चाळीस हजारांचा ऐवज चोरीला
पुण्यात होणार देशातील पहिले संविधान संमेलन; प्रबुद्ध भारत आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
स्वारगेट बस स्थानक असुरक्षितच; कधी बलात्कार तर कधी महिलांचे दागिने चोरीला, ठोस उपाय योजनांची गरज
पुणे : विधानपरिषदेतील पाच आमदारांच्या जागांवर येत्या 27 मार्चला निवडणूक होणार आहे. यात अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा मिळणार आहे. या एका जागेवर अजित पवारांचे पिंपरी चिंचवडमधील खंदे समर्थक नाना काटेंनी दावा केलाय. चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना मला पुढं संधी दिली जाईल, असा शब्द अजित दादांनी दिला होता. हा शब्द अजित दादा या विधानपरिषद निवडणुकीत पाळतील अन मला उमेदवारी देतील, असं म्हणत काटेंनी या जागेवर दावा केलाय. तसेच मी बंडखोरी मागे घ्यावी यासाठी आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माझ्याशी संवाद साधला होता अन तुम्ही भाजपच्या शंकर जगतापांसाठी माघार घ्या, आम्ही भविष्यात तुमच्यासाठी कुठं तरी कामी येऊ. असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याची आठवण करुन देत, आता तो क्षण आणि तो दिवस या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आल्याचं काटे म्हणाले. तसेच यावेळी आमदार शंकर जगताप ही माझ्यासाठी शब्द टाकतील अन विधानसभेची परतफेड करतील अशी अपेक्षा ही काटेंनी बोलून दाखवली.
सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी बीड पोलिसांनी केली जप्त
रात्री अकराच्या सुमारास बीड पोलिसांनी केली गाडी जप्त
गुन्हा दाखल होऊन चार दिवस झाले तरी खोक्या मात्र फरारच
बीड पोलिसांच्या तपास पथकाकडून खोक्याचा शोध सुरूच
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मोठी माहिती समोर, आरोपी महिलेच्या बँक खात्यावरून पाच कोटींचे व्यवहार
पोलिसांकडून आरोपी महिला संगीता गोळेचे बँक खाते सील, पाव किलो सोने जप्त
ड्रग्जसाठी आर्थिक व्यवहार झाले का ? कोणाच्या माध्यमातून व्यवहार झाले, पोलीस तपास करणार
आरोपी महिलेच्या मुंबईसह लोणावळ्यात मालमत्ता असल्याचे उघड
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपी, पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू
ड्रग्ज प्रकरणातील अटकेत असणारा आरोपी पिंटू मुळेचे राजकीय नेत्यासोबत लागेबांदे असल्याची माहिती
Nanded : नांदेड जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकरी जोडप्याने अवघ्या दीड एकर शेतीत कलिंगडाचे 52 टन असे इतके विक्रमी उत्पादन घेतलंय. नायगांव तालुक्यातील शेळगांव छत्री इथल्या सागर दिलीप सालेगांवे असे या शेतकरी जोडप्याचे नाव आहे. या 52 टन कलिंगडाच्या विक्रीतून त्यांना सहा लाख रुपयांचे उत्पन्न झालंय. सालेगांवे ह्यांच्या या कलिंगडाची खरेदी महेबूब शेख या स्थानिक व्यापाऱ्याने केली असून हा माल व्यापाऱ्याने केरळ राज्यात निर्यात केला आहे. केरळ राज्यात महाराष्ट्राच्या कलिंगडाला अधिकची मागणी असून तिथे भाव देखील चांगला मिळत असतो. दरम्यान, नोकरी नाही व्यवसायाला भांडवल नाही असे रडगाऱ्हाणे न गाता या कुटुंबाने आहे त्या परिस्थितीत शेतीत भरघोस उत्पन्न काढलंय त्यामुळे पंचक्रोशीत या जोडप्याचे कौतुक होतंय.
Vidhanparishad Eelection: राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या 5 जागांसाठीची निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. त्यामुळे, आता विधानपरिषदेच्या या 5 जागांवर कोणाचा नंबर लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 27 मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. भाजपच्या 3, राष्ट्रवादी अजित पवार 1 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 1 आमदारांसाठी ही निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार केवळ आमदारांना असणार आहे. सध्या, राज्यात भाजप महायुतीला मोठं बहुमत असल्याने या जागांवर पुन्हा संबंधित पक्षाचेच उमेदवार विजयी होतील. मात्र, राजकीय पक्षांकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
Canada US Trade War न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्षपद दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमकपणे वाटचाल सुरु केली. ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीन या देशांना पहिल्यांदा टार्गेट करत त्यांच्यावर आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. याशिवाय भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ लावू असं ट्रम्प म्हणाले. कॅनडा आणि मेक्सिकोवर आयात शुल्क लावण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला त्या देशांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
Akshay Shinde Case : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरसाठी संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवायलाच हवा. कारण प्रथमदर्शनी हा एन्काउंटर बनावट असल्याचा निष्कर्ष न्यायालयीन चौकशीत अहवालात नोंदवण्यात आला आहे, असा दावा अमायकस क्युरी मंजुळा राव यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. हा एन्काउंटर खोटा असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याची पोलिसांत रितसर तक्रारही केलेली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवायला हवा होता, असंही राव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.
Latur News: विजेच्या धक्क्यानं शाळकरी मुलाचा मृत्यू. निलंगा तालुक्यातील गुंजरगा जिल्हा परिषद शाळेतील घटना. संमेलनाची तयारी सुरू असताना झालेली घटना. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लातूर जिल्ह्यातील गुंजरगा या गावातील जिल्हा परिषद शाळेत आज एक धक्कादायक घटना घडली आहे.कृष्णा दत्ता शिंदे वय 12 वर्षे आज शाळेमध्ये उत्साहाने दाखल झाला होता. आज शाळेत स्नेहसंमेलन होतं. स्नेहसंमेलनाची तयारी सुरू होती. लाईटची सोय करण्यासाठी वायरिंग करण्यात आली होती. चुकून लोखंडी खंबात वीज उतरली होती.. कृष्णा शिंदे या विद्यार्थ्यांचा त्या लोखंडी खांबाला हात लागला.. विजेचा जोरात झटका बसला. आजूबाजूला हजर असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. कृष्णा शिंदे ला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर कृष्णा शिंदे मृत असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती कळतच संपूर्ण गावावर शोक कळा पसरली आहे..
Nanded News: नांदेडमध्ये सोशल मीडियावर तलवार, खंजर, चाकू तसेच विविध प्रकारचे शस्त्र हातात घेऊन फोटो ठेवणाऱ्या विरोधात सायबर सेलने कारवाई केली आहे. समाजामध्ये दहशत पसरविणाऱ्या या टारगट युवकांकडून माफी मागणारे व्हीडिओ बनवत पोलिसांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांची स्टंटबाजी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढे देखील सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर नांदेड सायबर सेलची करडी नजर आहे. त्यामुळे युवकांनी मौजमस्ती करताना आपल्याकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा पोलिसांच्या कारवाईसह बदनामीला सामोरे जावे लागेल असा सज्जड इशाराच पोलिसांनी दिला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
राज्यात पारा वर चढला असून जवळपास सर्वच शहरांत सूर्यदेव आग ओकत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला समोर जावं लागत आहे. अशातच वैदर्भीय लोकांची काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) आज 11, 12 आणि 13 मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा(IMD Forecast) दिला आहे. 12 आणि 13 मार्चला चंद्रपूर जिल्ह्यात देखील हिट व्हेवचा इशारा हवामान विभागाने दिला असून संभाव्य उष्णतेच्या लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एकीकडे वातावरणातील उष्णता वाढली आहे, तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणंही तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवले होते. त्यात त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केल्याचे दिसून आले होते. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या स्टेट्समुळे ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर आज शिक्कामोर्तब झाले असून रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. तसेच, त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
इतर महत्त्वाच्या घडामोडींसाठी फॉलो करा एबीपी माझा...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -