Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स...

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 09 Mar 2025 05:37 PM
शास्त्रीनगर अश्लील चाळे प्रकरण; गौरव आहुजाला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

शास्त्रीनगर अश्लील चाळे प्रकरण.


गौरव आहुजाला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी.


भाग्येश ओसवालला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी.


दोन्ही आरोपींना न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची 2021 सालीच पक्षातून हाकालपट्टी; भाजपाकडून स्पष्टीकरण

सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याची 2021 सालीच भाजपातून हाकालपट्टी केल्याचं भाजपाने स्पष्ट केल आहे. सतीश भोसले ने नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भटक्या विमुक्त युवा आघाडी राज्य उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र घेतले होते. ही माहिती खोटी असल्याचे समजताच 2021 सालीच त्याची निवड रद्द करण्यात आली होती. मागील तीन दिवसांपासून पक्षाची प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपाने आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची 2021 सालीच पक्षातून हाकालपट्टी; भाजपाकडून स्पष्टीकरण

सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याची 2021 सालीच भाजपातून हाकालपट्टी केल्याचं भाजपाने स्पष्ट केल आहे. सतीश भोसले ने नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भटक्या विमुक्त युवा आघाडी राज्य उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र घेतले होते. ही माहिती खोटी असल्याचे समजताच 2021 सालीच त्याची निवड रद्द करण्यात आली होती. मागील तीन दिवसांपासून पक्षाची प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपाने आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

भंडारा पोलीस अधीक्षकांना फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केलं कौतुक 

भंडारा: पोलीसांच्या तकारींचं त्वरीत निवारण व्हावं, या उद्देशानं ई दरबार ही अनोखी संकल्पना राबवून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवणं, ऑनलाईल प्रणालीमध्ये दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावं, यासाठी सुरू केलेली ई दरबार प्रणाली प्रभावी ठरली आहे. भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी राबविलेली ही संकल्पना राज्यात राबविण्यात येतं आहे. याची दखल घेत नुरुल हसन यांना दिल्लीत फिक्कीचा स्मार्ट पोलिसींग पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराचं कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलं आहे. नुरुल हसन हे सध्या भंडाऱ्यात कार्यरत असून त्यांनी वर्धा इथं असतानाही याचं प्रकारे काम केलं. याची दखल घेत नुरुल हसन यांना पुरस्कृत करण्यात आलंय.

भंडारा पोलीस अधीक्षकांना फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केलं कौतुक 

भंडारा: पोलीसांच्या तकारींचं त्वरीत निवारण व्हावं, या उद्देशानं ई दरबार ही अनोखी संकल्पना राबवून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवणं, ऑनलाईल प्रणालीमध्ये दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावं, यासाठी सुरू केलेली ई दरबार प्रणाली प्रभावी ठरली आहे. भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी राबविलेली ही संकल्पना राज्यात राबविण्यात येतं आहे. याची दखल घेत नुरुल हसन यांना दिल्लीत फिक्कीचा स्मार्ट पोलिसींग पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराचं कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलं आहे. नुरुल हसन हे सध्या भंडाऱ्यात कार्यरत असून त्यांनी वर्धा इथं असतानाही याचं प्रकारे काम केलं. याची दखल घेत नुरुल हसन यांना पुरस्कृत करण्यात आलंय.

संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ सांगोला बंद

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशा विविध मागण्यांसाठी आज सांगोल्यात निषेध मोर्चा काढून कडकडीत सांगोला बंद पाळण्यात आला.  सांगोला शहर आणि परिसरातील बाजारपेठा सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवल्याने आज सांगोल्यात कडकडीत बंद दिसून आला. 

बदलापूर पाईपलाईन रोडवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

बदलापूर पाईपलाईन रोडवर भीषण अपघात अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बदलापूरच्या दिशेने मोटरसायकल, व्हॅगनार कार आणि ट्रक जात असताना अचानक विरुद्ध दिशेने व्हॅगनार समोर रिक्षा आली. या रिक्षाला वाचवण्यासाठी कारचालकाने कार उजव्या बाजूला घेतल्यामुळे पाठीमागे असलेला मोटर सायकल स्वार ट्रक आणि व्हॅगनार कारच्यामध्ये आल्याने ट्रकच्या मागच्या चाकाखाली अडकला. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केला आहे.

छगन भुजबळ सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीला 

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ परभणीत 


भुजबळ दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेटीला 


सोमनाथची आई दोन्ही भाऊ यांची घेतली भेट 

मनसे पदाधिकऱ्यांचा लेखाजोखा करणार, अन हकालपट्टी ही करणार - राज ठाकरे

आपल्या कामकाजाचा लेखाजोखा केला जाणार, प्रत्येक पंधरा दिवसाला आढावा घेणार. जर पदाधिकाऱ्याने कामचुकारपणा केल्याचं आढळलं तर मी पदावरून हकालपट्टी करणार. मग त्याला ज्या फुटपाथवर जायचं आहे, त्या फुटपाथवर त्याने जावं, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे.

गोष्ट संविधानाची" या १० भागांच्या मराठी मालिकेचे उद्घाटन

बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व नाशिक वकील संघाच्या संयुक्त विद्यामानाने संविधान अमृत महोत्सवानिमित्ताने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड जयंतराव जायभावे यांच्या संकल्पनेतून निर्मिती करण्यात आलेल्या" गोष्ट संविधानाची" या १० भागांच्या मराठी मालिकेचे उद्घाटन होत आहे,या कार्यक्रमाचे उदघाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  मा. अभय ओक,  तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मा.आलोक अराधे व  मुंबईचे अन्य न्यायमूर्ती  व नाशिकचे पालक न्यायाधीश यांच्या उपस्थितीत होत आहे,न्यायमूर्ती अभय ओक या कार्यक्रमात  प्रसार माध्यमे आणि न्यायव्यवस्था या वर बोलणार आहे

सतीश उर्फ खोक्याचा चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा - महेश ढाकणे

सतीश उर्फ खोक्या भोसले याने ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली होती. आता खोक्याच्या अटकेची मागणी महेश ढाकणे याने केली आहे. खोक्याच्या घरी जे काही सापडला आहे त्याची चौकशीही करावी. त्याच्या घरी आणखी बरंच काही सामान निघू शकत असा आरोप महेश ढाकणे यांनी केला आहे. खोक्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी ही केली असून त्याच्यापासून आम्हाला धोका असल्याने आम्हाला सुरक्षा द्यावी. त्याच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा.

औरंगजेबाच्या कबरीबाबात सरकारचा वेळकाढूपणा- लंके

अहिल्यानगर
Anc- मागील दिवसांपासून औरंगजेबाची कबर ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आलीये...औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढून टाकावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे... देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना म्हटल होत की,  औरंगजेबाची कबर हटवण्याची सगळ्यांची इच्छा आहे...मात्र त्याला कायदेशीर अडचणी आहेत, काँग्रेसच्या काळातच पुरातत्त्व विभागामार्फत त्या कबरीला संरक्षण देण्यात आलं होतं... याबाबत बोलताना खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली असून कबरीबाबत सरकारची वेळकाढूपणाची भूमिका सुरू आहे...तुम्ही राज्याचे नेतृत्व करता तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता अनेक ठिकाणी तर पोलीस बळाचा वापर करून चुकीच्या गोष्टी सरकार घडवून आणतो मग का बर आठवण नाही काय अशक्य गोष्ट नाही पण सरकारचा वेळ काढू पण आहे दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक आहे असा टोला निलेश लंके यांनी लगावला.


बाईट- निलेश लंके , खासदार राष्ट्रवादी (SP)


निलेश लंके ऑन धनंजय मुंडे


Anc- संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले आहेत , मात्र अद्यापही एक आरोपी फरार आहे... त्यातच याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी कराव अशी मागणी होत आहे... यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, सत्यता काय आहे ते पडताळून घ्यावी... केवळ आरोप करण्यात अर्थ नाही , मात्र सत्याता पडताळून जर त्यात कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केल.


बाईट- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी (SP)


निलेश लंके ऑन पाटोदा अत्याचार


Anc- बीड जिल्ह्यातल्या पाटोद्यात रक्षकच भक्षक झाल्याचे घटना घडली.... महिला दिनाच्या दिवशीच पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदाराने एका महिलेवर बलात्कार केला... याबाबत बोलताना खा.निलेश लंके यांनी तीव्र संताप व्यक्त केला, चुकीच्या पद्धतीने राज्यात आलेल्या या सरकारचा गृह विभागावर कोणत्याही प्रकारचा कंट्रोल राहिलेला नाही ज्या पोलिसांकडे आपण रक्षक म्हणून पाहत असतो ते जर भक्षक झाले तर हे नंदनीय गोष्ट असल्याचा मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले... वारंवार राज्यात अशा घटना घडत आहेत, हे या सरकारचं अपयश असल्याचं खासदार निलेश लंके म्हणाले.


बाईट- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी (SP)


निलेश लंके ऑन बीड गुंडगिरी


Anc - बीड गुंडगिरीबाबत हिट लिस्टवर असलं तरी राज्यामध्ये राजकीय पाठिंब्यावर गुंडगिरी पाहायला मिळत आहे...गुंड प्रवृत्तीचे लोक राजकीय व्यासपीठावर देखील पाहायला मिळतात आणि हे जर असं सुरूच राहिलं तर गुंडगिरी संपणार नाही असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी म्हटल आहे... गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा कुठलाही राजकीय विचार असला तरी त्याचा बंदोबस्त व्हायला हवा आपल्या राजकीय स्वार्थासाठी जर कारवाई होत नसेल तर हे राज्यासाठीच नाहीतर देशासाठी घातक असल्याचं लंके म्हणाले आहेत.

डाक पार्सल वाहनाच्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू

 


राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा गावाजवळ घडली घटना


Anchor : गोंदियाकडून नागपूरकडं डाक पार्सल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं समोरील ट्रकवर भीषण धडक बसली. या भीषण अपघातात कंटेनरच्या कॅबिनचा चक्काचूर झाल्यानं त्यात दाबून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा गावाजवळ पहाटेच्या सुमारास घडली. गॅस कटरच्या मदतीनं चार तासाच्या प्रयत्नानंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. रमेश सिंग (३५) रा. नागपूर असं मृतकाचं नावं आहे. घटनेचा अधिक तपास कारधा पोलीस करीत आहे.

सोलापुरात शासकीय योजनेच्या ठेकेदाराने बोगस रक्त चाचण्या दाखवून बिले उचलल्याचा आरोप 

सोलापूर ब्रेकिंग : 
--


सोलापुरात शासकीय योजनेच्या ठेकेदाराने बोगस रक्त चाचण्या दाखवून बिले उचलल्याचा आरोप 


पत्रकार परिषदेत बोगस रक्त चाचण्याचे रिक्षा भरून पुरावे सादर केले


आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात 2022 ते 2024 साली सोलापूर शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडल्याचा आरोप


ड्युटीवरील डॉक्टरांच्या नावे बोगस सह्या करून हा अपहार केल्याचा आरोप


या प्रकरणी ठेकेदार असलेल्या श्री साई डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालकांची चौकशी व्हावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विठ्ठल व्हनमारे यांनी केलीय


महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात आलेल्या रक्त चाचण्या बोगस असून त्याद्वारे 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकची बिले उचलण्यात आल्याचा आरोप 


संत रोहिदास सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल व्हनमारे यांनी माहिती अधिकारातून ही बाब उजेडात आणल्याचा दावा 


या प्रकरणी तात्काळ चौकशी होऊन कारवाई न झाल्यास मुंबई येथे उपोषणाचा ईशाराही देण्यात आलाय

सद्भावना यात्रा अपडेट 

संत श्री बंकटस्वामी महाराजांना वंदन व ध्वजारोहण करून नेकनूर येथून सद्भावना पद यात्रेला सुरुवात 


आज पदयात्रेचा दुसरा दिवस 


 मांजरसुंभा येथे कॅार्नर बैठक 


सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे सद्भावना मेळाव्याने पदयात्रेची सांगता होणार 


काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, हिमाचलच्या प्रभारी खा. रजनीताई पाटील, खा. बळवंत वानखेडे, माजी मंत्री वसंत पुरके, आ. साजीद खान पठाण, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित राहणार

दारणा काठच्या नानेगावला तीन वर्षाची बिबट मादी जेरबंद

नाशिक तालुक्यातील  दारणा पट्ट्यातील नानेगाव येथे शनिवारी  पहाटे तीन वर्षांचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद  झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निष्वास सोडलाय दारणा काठावर अजूनही दोन बिबटे परिसरात मुक्त संचार करीत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दारणा काठ परिसरात सातत्याने बिबट्याचे वास्तव्य असून जसजसे पाण्याचे प्रमाण कमी होत जाते तस तसे येथील बिबटे नागरी वस्तीकडे भटकू लागतात मनोहर शिंदे यांचे पाळीव कुत्र्यावर गेल्या पंधरा दिवसापूर्वी हल्ला करून त्यास ठार मारण्यात आले होते ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार वन विभागाने मनोहर शिंदे यांच्या शेतात पिंजरा लावला होता पहाटे सहा वाजेच्या सुमारास बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने शिंदे यांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिली वन विभागाने बिबट्याला रेस्क्यू केले व पिंजऱ्यासह नाशिक रोपवाटिकेत हलवण्यात आले आहे

शिरूर शहर बंद करू नका..मोर्चा काढू नका, शिरूर पोलिसांची आंदोलकांना नोटीस 

शिरूर शहर बंद करू नका..मोर्चा काढू नका 


शिरूर पोलिसांची आंदोलकांना नोटीस 


कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा



सतीश भोसले याला अटक करावी या मागणीसाठी आज शिरूर शहर बंद करत मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. यानंतर आता पोलिसांनी शिरूर शहर बंद करू नका तसेच मोर्चा काढू नका. प्रशासनाला सहकार्य करा चर्चेतून मार्ग काढू असे म्हणत बळजबरी दुकाने बंद करायला लावली तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिरूर पोलिसांनी आंदोलकांना दिलाय.


शिरूर येथील सतीश भोसले याच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला अद्याप अटक नसल्याने शिरूर शहर बंद चा इशारा देत मोर्चा काढला जाणार असल्याचे समोर आले होते.आता या दरम्यानच पोलिसांनी या प्रकरणातील आंदोलकांना नोटीस बजावत शिरूर शहर बंद करू नका असे आवाहन केले आहे.. पोलिसांनी यात कडक कारवाईचा देखील इशारा दिल्यामुळे आता आज शिरूर मतदार आंदोलक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक


आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अर्थसंकल्पाच्या संदर्भात होणार चर्चा


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपापल्या विभागानुसार अर्थसंकल्प समजावून सांगण्यासंदर्भात होणार चर्चा


अजित पवार यांच्या पोतडीतून महाराष्ट्र राज्याला नक्की काय काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्की काय निर्णय घेतला जातोय याची उत्सुकता

गुहागर विजापूर मार्गावरील तांबी येथे ट्रॅक आणि कंटेनर मध्ये समोरा समोर धडक

ब्रेकिंग 
गुहागर विजापूर मार्गावरील तांबी येथे ट्रॅक आणि कंटेनर मध्ये समोरा समोर धडक.....


गुहागर विजापूर मार्गावरील वाहतूक ठप्प.


गेल कंपनी मधून गॅस वाहून नेणारा कंटेनर जांभ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक वर धडकला. अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी नाही.


तांबी येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठी गर्दी.


चिपळूण पोलिस घटनास्थळी रवाना.....मार्ग खुला करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू.

गौरव अहुजानं VIDEO व्हायरल कसा केला? समोर आली महत्त्वाची माहिती

पुणे 


गौरव आहुजा पुण्यावरून कोल्हापूरला गेला. कोल्हापूर शहराच्या 20 किमी अलीकडे त्याने BMW कार पार्क केली... Auto वाल्याला विचारलं की धारवाडला जायचं आहे. त्यासाठी चारचाकी भाड्याने मिळेल का? एका  स्थानिक रिक्षावाल्याने त्याला गाडी manage करून दिली. रस्त्यात संकेश्वर पर्यंत गेल्यावर गौरवने ड्रायव्हरला गाडी पुण्याच्या दिशेने वळवायला सांगितली. पुन्हा येरवड्याला सोडा, असं तो ड्रायव्हरला म्हणाला. आणि त्यालाच माफी मागताना व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला. व्हिडिओ तयार करून त्याने मित्रांना व्हायरल केला...

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार किरण सामंतांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

रत्नागिरी - शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांचं जिल्ह्यातील विकास कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र 


 या पत्राद्वारे सामंत यांची पंतप्रधान मोदी राजापूर विधानसभा मतदार संघांचे पालकत्व घेण्याची देखील विनंती


 दुर्गम असलेल्या विधानसभा मतदार संघासाठी भरघोस निधीची देखील किरण सामंत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी 


रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टेसला प्रकल्प आणण्यासाठी किरण सामंत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती

अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक 

ब्रेकिंग


अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक 


संध्याकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक 


अर्थसंकल्प सादर करण्याआधी पार पडत असते मंत्रिमंडळाची बैठक

एका राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षच्या ऑफिसमध्ये बैठक झाली त्या बैठकीत कृष्ण आंधळे होता: धनंजय देशमुख

बारामती धनंजय देशमुख बाईट


जेव्हा पासून हत्या झाली तेव्हापासून एकच मागणी मागतो आहे मला न्याय द्या


आम्ही पूर्ण मोडून गेलो आहोत 


आमच्यावर वेळ काय आहे हे घरी गेल्यावर आम्हाला कळतं आहे ते आम्ही सांगू शकत नाही


मीडियाने सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे


आपल्याला न्याय पाहिजे


या न्यायच्या प्रकियेत प्रत्येकाने आपली भूमिका पार पडली पाहिजे


दोन वर्षांपासून तो 307 च्या आरोपाखाली फरार आहे


एका राष्ट्रवादी च्या तालुका अध्यक्षच्या ऑफिस मध्ये बैठक झाली त्या बैठकीत कृष्ण आंधळे होता. हे कॅमेरा मध्ये आला


केज पोलीस ठाण्यात त्याला अभय होतं. 


पोलिसांनी उत्तर दिलं पाहिजे कृष्णा आंधळे कुठं आहे. 


कुणासमोर न्याय मागायचा 


आजही आम्ही त्याच भूमिकेत आहे


आरोपी सिद्ध झालेत. या लोकांना कुणी तयार केलं आहे कुणाच्या आश्रयाखाली तयार झालेत? 


बीडमध्ये अशी अनेक प्रकरणे आहेत पण त्यावर मी आता बोलणार नाही 


कारण मला न्याय पाहिजे

मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे मनसैनिकांना नवा आदेश देणार?

मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे मनसैनिकांना नवा आदेश देणार?


ऍंकर : पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा पहिल्यांदाच वर्धापनदिन साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे मनसैनिकांना कोणता नवा आदेश देतात, तसेच मराठी भाषा, अबू आझमी, गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर काही भाष्य करतात का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. तत्पूर्वी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मनसैनिकांची लगबग पहायला मिळत आहे.

नाशिक म्हाडाच्या अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ

नाशिक ब्रेकिंग...


#नाशिक म्हाडाच्या अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ.
- म्हाडाच्या नाशिक मंडळाला २० टक्के योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या ५०२ घरांच्या  अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू...
- सोडतीच्या वेळापत्रकानुसार कालपासून अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया येणार होती संपुष्टात...
- मात्र २१ मार्चपर्यंत आता मुदतवाढ, इच्छुकांना २१ मार्चपर्यंत सोडतीसाठी अनामत रक्कम अदा करून भरता येणार अर्ज
- नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ५०२ घरांसाठी प्रक्रिया सुरू...

नागपूर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आग ...

नागपूर ब्रेकिंग ( रुग्णालय आग )


नागपूर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आग ...


रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लागली होती आग ..


सुदैवाने जुन्या इमारतीला आग लागल्याने आगीत कोणतीही जीवित व वित्तहानी नाही 


अग्निशाम दलाच्या चार गाड्यांनी काही तासात आगीवर नियंत्रण मिळवले.

करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Anchor - करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला ; 10 मार्च ते 19 एप्रिलपर्यत निवडणूक प्रक्रिया चालणार आहे 


 17 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी मतदान घेण्यात येणार असून 19 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे व मतमोजणीनंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे 


 10 मार्च ते 17 मार्चपर्यत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे


 19 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत 


 सदरच्या कारखान्यात व्यक्ती उत्पादक सभासद जेऊर,सालसे, पोमलवाडी,केम,रावगाव, गटांमध्ये प्रत्येकी 3 असे 15 सदस्य तर उत्पादक सहकारी संस्था,अनुसूचित जाती जमाती, इतर मागास व भटक्या जाती जमाती यामध्ये प्रत्येकी 1 तसेच राखीव महिला 2 सदस्य अशा एकूण 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. गेले अनेक वर्षे आदिनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत होता. रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीने हा कारखाना खरेदी केला होता मात्र पुन्हा न्यायालयीन लढाई व शासनाच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा सभासदांच्या ताब्यात आला होता

स्मार्ट सिटी कंपनीचे सिंहस्थ प्राधिकरणात विलीन करण्याच्या मागणीला काँग्रेसचा विरोध

नाशिक ब्रेकिंग...


- स्मार्ट सिटी कंपनीचे सिंहस्थ प्राधिकरणात विलीन करण्याच्या मागणीला काँग्रेसचा विरोध...
- नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलेले कामे निकृष्ट दर्जाचे - काँग्रेस सेवा दल 
- कुंभमेळा कामांसाठी स्मार्ट सिटी नको - काँग्रेस
- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी स्मार्ट सिटी कंपनीचे निवड झाल्यास काँग्रेस उतरणार रस्त्यावर...
- स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेसने दिला इशारा...
- स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामांचा दर्जा तपासावा आणि त्यानंतर सिंहस्थ प्राधिकरणात विलीन करण्याचा निर्णय घ्यावा काँग्रेसची मागणी...

गौरव आहूजासोबत असलेल्या भाग्येश ओसवाला येरवडा पोलिसांची अटक

पुणे.


गौरव आहूजा बरोबर असलेला त्याचा मित्र भाग्येश ओसवाला येरवडा पोलिसांनी अटक केलीय.


बीएमडब्ल्यू मध्ये बसून पीत होता दारू


भाग्येश ओसवाल चा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती.



भागेश ओसवालच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळलं. 


तर गौरव आहुजा चा मेडिकल रिपोर्ट येणे बाकी.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा उत्साह आता अंतिम टप्प्यात, आज भारत विरुद्ध न्यूझिलँड सामना रंगणार

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा उत्साह आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारत विरुद्ध न्यू झिलँड असा हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. २५ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येतील.
मुंबईतील दादर शिवाजी पार्क मैदानात आलेल्या क्रिकेट प्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे…

इंटर्नशिप करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींना गावातील टवाळखोर मुलांनी केली शिवीगाळ

इंटर्नशिप करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींना गावातील टवाळखोर मुलांनी केली शिवीगाळ... टवाळखोर तरुणांनी लिव्हिंग क्वार्टरवर दगड भिरकावले... गोंदिया तालुक्यातील भानपुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार.... गंगाझरी पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल... टवाळखोरी  करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...


Gondia : गोंदिया तालुक्यातील भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नर्सिंगच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीसोबत भानपुर गावातील काही टवाळखोर तरुणांनी शिवीगाळ करत त्या राहत असलेल्या क्वार्टरवर दगड फेकले. याप्रकरणी नर्सिंगच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी गंगाझरी पोलीस स्टेशन गाठत याची तक्रार केली असता गंगाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरी याप्रकरणी तीन टवाळखोर तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


गोंदियाच्या भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंदिया नर्सिंग कॉलेजच्या 19 विद्यार्थिनी गेल्या एक महिन्यापासून इंटर्नशिप करत आहेत... रात्री या विद्यार्थिनी आपल्या लिव्हिंग क्वार्टरकडे जात असताना गावातील काही मुलांनी त्या विद्यार्थिनींना अश्लील भाषेत शिवीगाळ करत द्विअर्थ शब्दांचा वापर केला आणि त्यानंतर लिव्हिंग क्वार्टरकडे धाव घेतली व दगड भिरकावले.. त्यानंतर या सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी गंगाझरी पोलीस स्टेशन गाठत घटनेची तक्रार दिली..  याप्रकरणी पोलिसांनी कलम 296, 329, 351(2) दाखल अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 3 तरूणांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे....


BYTE : डॉ. अमर खोब्रागडे (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र भानपूर)

जवळा बाजार गावात पाणी टंचाई, टँकर मधील पाणी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी 

जवळा बाजार गावात पाणी टंचाई 


टँकर मधील पाणी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी 


सरकारचे धोरण आणि उपाययोजना  कुचकामी 


 
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्याचे पाहायला मिळते काही ठिकाणी नैसर्गिक दृष्ट्या पाणीटंचाई तर काही ठिकाणी प्रशासनाचा नाकारतेपणा समोर आलाय हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली ग्रामपंचायत आहे या गावांमध्ये 70 टक्के भागांमध्ये पाणीटंचाई असल्याचे समोर आला आहे या भागात असलेले पाणीसाठे कोरडे ठाक पडले आहेत आणि त्यामुळे जवळा बाजार येथे राहत असलेल्या नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय करोडो रुपये खर्च करून  नळ योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे तरीही मात्र नागरिकांना पाणी मिळत नाही   गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागू नये यासाठी अंकुश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या  वतीने गावामध्ये टँकरच्या माध्यमातून मोफत पाणीपुरवठा केला जातोय परंतु अद्यापही गावात पाणीटंचाई आहे याची प्रशासनाला पुसदशी जाणीव सुद्धा नाही, नागरिकांची टँकर मधील पाणी घेण्यासाठी झुंबड पाहायला मिळत आहे 

ऍड.उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर अजित पवार राष्ट्रवादीच्या वाटेवर

सातारा  


ऍड.उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर अजित पवार राष्ट्रवादीच्या वाटेवर



प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड.उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची  सूत्रांकडून माहिती मिळत आहे 


उदयसिंह पाटील हे कॉग्रेसचे जेष्ठ नेते स्वर्गीय माजीमंत्री विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत 


उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चेमुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसला धक्का बसणार आहे 


ऍड. उदयसिंह पाटील यांनी निवडक  प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता अनेक कार्यकर्त्यांनी लवकरच पक्षप्रवेश करावा अशी मते मांडली 


प्रवेशाबाबत अजित दादा व उंडाळकर यांच्यात चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती 


उदयसिंह पाटील उंडाळकरांच्या पक्षप्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी आणखी मजबूत होणार आहे

संतोष देशमुख यांच्या हस्तेच्या निषेधार्थ बारामतीत सर्वधर्मीय निषेध मोर्चा

संतोष देशमुख यांच्या हस्तेच्या निषेधार्थ बारामतीत सर्वधर्मीय निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. हा सर्वधर्मीय मोर्चा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. या मोर्चाला बारामतीतील कसबा या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्याची सांगता बारामतीतील नगरपालिके समोर होणार आहे. या मोर्चासाठी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे उपस्थितीत राहणार आहेत. सकाळी नऊ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल.

अंधेरी पूर्वेत शेरे पंजाब जंक्शनजवळ रात्री गॅसची पाईपलाईन फुटून मोठी आग

मुंबईच्या अंधेरी पूर्वेत शेरे पंजाब जंक्शनजवळ रात्री गॅसची पाईपलाईन फुटून मोठी आग लागली,


या आगीत 3 जण भाजून गंभीर जखमी तर 3 गाडी जळून खाक,


तिघा जखमीवर जोगेश्वरी येथे ट्रामा केअर रुग्णालय मध्ये उपचार सुर,


मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शेरे पंजाब जंक्शन जवळ रस्त्याच्या काम सुरू असताना जेसीबीचा फटका लागून गॅसची मोठी पाईपलाईन फुटली.


गॅसची पाईपलाईन फुटल्यानंतर मोठी आग लागली,


याच आगी मध्ये तिथून जाणारे तीन गाड्या आग पकडली,

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या सदभावना यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या सदभावना यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण


सकाळी मस्साजोगमधून सुरु झालेली सदभावना यात्रा नेकनूर येथे रात्री 8 वाजता पोहोचली 


जवळपास 23 किलोमीटरचे अंतर काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज पहिल्या टप्यात पूर्ण केले 


नेकनूर येथील एका महाविद्यालयात या सर्व कार्यकर्त्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे


उद्या बीड येथे या सदभावना यात्रेचा समारोप होणार असून उद्या दुसऱ्या दिवशी नेकनूर ते बीड अशी ही यात्रा असेल 


सकाळी 9 वाजताच्या सुमारास नेकनूर येथून उद्या ही यात्रा सुरु होईल 

यवतमाळ जिल्ह्यातील 27 हजार लाडक्या बहिणी अपात्र
दीड हजार मिळण्याच्या अपेक्षेने घरी कार, कर भरणारे आणि पती नोकरीवर असतानाही ज्या महिलांनि लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला. अश्या 27 हजार 317 लाडक्या बहिणींना कागदपत्रांच्या पडताळणीत अपात्र ठरविण्यात आले आहे. या नवीन निकष व अटीनुसार अशी पडताळणी सुरूच असून पुन्हा काही महिला अपात्र होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली निवडणुकीच्या काळात अर्ज करणाऱ्या महिलांना सहसकट लाभ देण्यात आला जिल्ह्यात 7 लाख 19 हजार 850 महिलांनी अर्ज केले होते. त्यात 6 लाख 92 हजार 563 अर्ज पात्र ठरले आहे. 
म्हाडाच्या ५०२ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी

म्हाडाच्या नाशिक मंडळाला २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या ५०२ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, या प्रक्रियेस २१ मार्चपर्यंत मुदतवाढ

औरंगजेबाजी कबर महाराष्ट्रात किती काळ राहील हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल- नितेश राणे

औरंगजेबाजी कबर महाराष्ट्रात किती काळ राहील हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल, मंत्री नितेश राणेंचं मोठं विधान, आमचं सरकार योग्य वेळी निर्णय घेईल आणि ब्रेकिंग न्यूज मिळेल, नितेश राणेंचं सूचक वक्तव्य.

लाडकी बहीण योजनेचा एकच हफ्ता जमा

लाडकी बहीण योजनेचा एकच हफ्ता जमा, दोन हफ्ते जमा करण्याचं सरकारचं आश्वासन मात्र फेब्रुवारीचाच हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा.

आज मनसेचा १९ वा वर्धापन दिन

आज मनसेचा १९ वा वर्धापन दिन, मात्र यावेळी वर्धापन दिन सोहळा मुंबईत न होता पुण्याच्या चिंचवड येथे होणार. सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन. मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates: संतोष देशमुखांच्या हत्येला आज तीन महिने पूर्ण झाले. मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुखांना ज्या शस्त्रांनी मारलं त्याची रेखाचित्रे एसआयटीने चार्जशीटमध्ये जोडली, यात एक पांढरा पाईप, गॅसचा पाईप,  वायर लावलेली मूठ , गज आणि लाकडी दांडा या पाच वस्तूंचा समावेश आहे. आज मनसेचा 19 वा वर्धापन दिन, मात्र यावेळी वर्धापन दिन सोहळा मुंबईत न होता पुण्याच्या चिंचवड येथे होणार आहे. सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.