Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 08 Mar 2025 03:04 PM
पहिल्या नवऱ्याने मित्रा सोबत मिळून काढला पत्नीचा काटा; पतीच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातील कुडतुडी आदिवासीवाडी येथे एक महिला घरी कपडे धूत असताना तिच्यावर जीवघेणा हल्ला चढविल्याची घटना समोर आली आहे.हा हल्ला दुसरा तिसरा कोणी केला नसून तिच्याच पहिल्या नवऱ्याने आपल्या मित्राला सोबत घेऊन केला आहे.या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचाराकरिता म्हसळा येथील  दवाखान्यात दाखल करण्यात आली आहे.या हल्ल्यात तिच्या डोक्यावर व हातावर लाकडाने तसेच मानेवर स्क्रू ड्रायव्हर च्या सहाय्याने वार करण्यात आले आहेत. याविरोधात या दोन्ही आरोपींवर म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्वेश धाडवे अस या आरोपीचं नाव असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

महिला दिनाच्या दिवशी  महिलांचा  जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा

महिला दिनाच्या दिवशी  महिलांचा  जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा


मार्च महिन्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणी टंचाई जाणवत आल्यानं इगतपुरी त्रंबकेश्वर  तालुक्यातील गावामध्ये राहणाऱ्या महिलांचा मोर्चा


एकीकड महिला दिनाचे कार्यक्रम होत असताना दुसरीकडे महिलाच मोर्चा

Pune Crime: गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून कोथरूड भागात पुन्हा बेदम मारहाण

पुण्यातील कोथरुड भागात पुन्हा हाणामारीची घटना घडलीय . गाडी आडवी मारल्याच्या कारणावरुन अक्षय लोणकर नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीय.  ही मारहाण केल्याबद्दल सचिन मीसाळ आणि त्याच्या  साथीदारांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोथरुड मधील एम आय टी कॉलेजच्या समोर गाडी आडवी आ
आणल्याच्या कारणावरुन ही भांडणं झालीत. पोलीसांनी सचीन मीसाळला अटक केली असुन इतर आरोपींचा शोध घेतला जातोय.

साताऱ्यातील माण तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट

साताऱ्यातील माण तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईचे संकट, शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळेना नागरिक झाले हातबाल..


साताऱ्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखले जाणाऱ्या माण तालुक्यांमध्ये भीषण पाणीटंचाईच संकट उभे राहिले आहे.. माण तालुक्यातील धुळदेव गावात आणि त्या परिसरातील भागामध्ये भीषण पाणीटंचाई सुरू असल्याने गावागावांमध्ये प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे जनावरांना चारा आणि पाणी याची कमतरता फेब्रुवारी महिन्यापासूनच भासत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.. एक-दोन दिवसांनी गावामध्ये पाणी टँकर आल्याने मोठी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.. फेब्रुवारी महिन्यामध्ये टँकर सुरू झाल्याने माण मधील नागरिक आणि शेतकरी चिंतेत पडला आहे

सोलापूर मधील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी मातोश्रीवर पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल 

सोलापूर मधील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी मातोश्रीवर पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल 


सोलापूर मधील जिल्हाप्रमुख नेते आणि काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वात मोठे शक्ती प्रदर्शन 


सोलापुरातील शिवसेना ठाकरे गटातील जिल्हाप्रमुख आणि माजी मंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता 


 ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत हाकालपट्टीनंतर प्रवेश केला होता 


 आज मातोश्रीवर सोलापूर मधील पदाधिकारी  ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल

मूल शहराजवळ वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा मृत्यू

चंद्रपूर : मूल शहराजवळ वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा मृत्यू... मल्लाजी पोचूजी येगावार (68) असं मृतक मेंढपाळाचं नाव, मूल शहरात राहणारे मल्लाजी आज पहाटे मूल शहराजवळील सोमनाथ रोडवर गेले होते बकऱ्या चराईसाठी, मात्र कोसंबी नाला परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने केलेल्या हल्ल्यात झाला त्यांचा मृत्यू, विशेष म्हणजे कालच मूल शहराजवळ एमआयडीसी परिसरात वाघाच्या हल्ल्यात निलेश दुर्गा कोरवार (39) या मेंढपाळाचा झाला होता मृत्यू, दोन्ही घटना मूल शहराच्या अगदी जवळ असल्याने मूल शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ, वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या मागणी साठी धनगर (स्थानिक कुरमार) समाज आक्रमक

कल्याण पूर्वेतील विजयनगर कमानीजवळ भीषण अपघात

कल्याण पूर्वेतील विजयनगर कमानीजवळ भीषण अपघात सिमेंटच्या मिक्सरचा ब्रेक फेल झाल्याने झाला अपघात या अपघातामध्ये दोन ते तीन रिक्षांसह एक पिकप गाडी या मिक्सरने उडवली रिक्षा आणि पिकप एका दुकानात शिरली चार प्रवाशी गंभीर जखमी 
रिक्षातील दोन प्रवासी पिकअप मधील एक आणि अन्य एक प्रवासी गंभीर जखमी

साताऱ्यात भाजप महिला आघाडी कडून जिल्हाधिकाऱ्यांना घेराव...

सातारा 


साताऱ्यात भाजप महिला आघाडी कडून जिल्हाधिकाऱ्यांना घेराव...


ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात खोटी तक्रार करणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची महिला आघाडीची मागणी...


अँकर - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचे पडसाद विधान भवनामध्ये सुद्धा उमटताना पाहायला मिळाले. या आरोपांबाबत सातारा जिल्ह्यातील भाजपची महिला आघाडी आता आक्रमक झाली असून. आज साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना भाजपा महिला आघाडीने घेराव घालून जयकुमार गोरे यांची बदनामी थांबवावी आणि संबंधित महिलेवर कडक कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन दिले.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना गैरव्यवहार प्रकरण

Breaking news
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना गैरव्यवहार प्रकरण


एबीपी माझाच्या बातमीची सरकारकडून दखल


बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना पैसे देण्याऐवजी मराठा विद्या  प्रसारक शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस


एबीपी माझाच्या वृतानंतर संस्थेच्या सभासद आणि भाजपच्या पदाधिकारी अमृता पवार यांच्याकडून मागविण्यात आली माहिती


अमृता पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट
संस्था चालकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी


कौशल्य विकास रोजगार विभागाचे अधिकारी आणि मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था चालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

सीआयडीकडून पुन्हा बीड सत्र न्यायालयात अर्ज

ब्रेकींग 


सीआयडीकडून पुन्हा बीड सत्र न्यायालयात अर्ज.


संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टात नको तर बीड सत्र न्यायालयातच चालवण्याची विनंती.


कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत सीआयडीने केला बीड सत्र न्यायालयात अर्ज.


सध्या हा खटला केज कोर्टात चालणार आहे मात्र सीआयडीकडून बीड कोर्टात खटला चालवण्याचे प्रयत्न.


खटला बीड कोर्टात की केज कोर्टात यावर १० तारखेला निर्णय..


बीड सत्र न्यायालयात मुख्य न्यायाधीशांसमोर होणार १० तारखेला सुनावणी.

तुळजाभवानी मंदिराचे शिखर खाली उतरायचं की नाही यावर पुरातत्व अहवालानंतर निर्णय: आशिष शेलार

आशिष शेलार ऑन तुळजाभवानी मंदिर 


तुळजाभवानी मंदिराचे शिखर खाली उतरायचं की नाही याबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाणार


कळस खोलून दुरूस्ती की ठेऊन काम यावर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आशिष शेलार यांची चर्चा . 


केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुढील पंधरा दिवसात पाहणी करणार, त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय  घेतला जाणार. शेलार यांची माहिती


आशिष शेलार ऑन उद्धव ठाकरे 


उद्धव ठाकरे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरु आहेत


ज्यांचे पाय चिखलात माखलेले आहेत त्यांनी दुसऱ्याला स्वच्छतेचे धडे घेऊ नये


उध्दव ठाकरेंवर आशिष शेलार यांची टीका, शिंदे सेना ही आणाजी पंतांची सेना असल्याच्या ठाकरेंच्या वक्तव्यावर टीका. 



.......


आशिष शेलार ऑन काँग्रेस सद्भावना रॅली 


काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या घरापासून वर्षा गायकवाड यांच्या घरापर्यंत यात्रा काढावी 


काँग्रेमधील आतल्या भावना काय आहेत त्या अध्यक्षांनी एकाव्यात


मस्साजोग आणि संवेदनशील घटनावर सरकार कायदेशीर कारवाई करत आहे त्या कारवाई मध्ये कोणी लुडबुड करू नये, काँग्रेसवर शेलार यांची टीका 
.........



आशिष शेलार ऑन सेन्सॉर बोर्ड 


सेन्सॉर बोर्डाने अक्कल गहान ठेवून काम करू नये, मंत्री आशिष शेलार यांचा संताप 


नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांना गेटवर आडवल्याच्या घटनेवर मंत्री आशिष शेलार संतापले 


मंत्रीपदावर आहे म्हणून काही मर्यादा ठेवतोय - शेला

40 वर्षे कबर काढायला जमलं नाह,आता पालिका निवडणूक तोंडावर काढा म्हणतात: मनोज जरांगे

मनोज जरांगे PC


महिला दिनाच्या शुभेच्छा,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात शिक्षा दिली जायची,, आताच्या सरकारच्या काळात खूप तफावत आहे. सरकार कठोर वागत नाही. महिलांना खरा न्याय मिळाला तर खर महिला दिन ठरेल


ऑन मराठा आरक्षण


अधिवेशन संपेपर्यंत शांत आहोत, त्यानंतर शांत राहणार नाही.* मराठा कुणबी एकच आहे , तात्काळ कारवाई सुरू करावे आणि प्रमाणपत्र द्यावे.... शिंदे संमती काम करत नाही. गुन्हे देखील मागे घेतली नाही... याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा... मराठा आमदारांनी अधिवेशनात आवाज उठवावा, मराठा कुणबी एकच असल्याचा आदेश काढावा...


ऑन बोक्क्या


हरणाचे शिकार करत असतील तर कडक कारवाई केले पाहिजे....


जालना चटके प्रकरण व्हिडीओ


पोलिसांकडून तपास सुरू आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे, देवदेवतांचा विटंबना झाली आहे... प्रशासन अधिकारी यांच्यावर संशय निर्माण होईल असे काम करू नयेत, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री यांना देखील उत्तर दयावे लागेल....चटके दिले त्याच समर्थन करत नाही.... धर्म देव आणि महापुरुष यावेतिरक काही लोकांना आपली जात महत्वाची वाटते छगन भुजबळ सारखे माणसे देव महापुरुष यांच्यापेक्षा जातीवादाला महत्व देतात.... चूक झाली तरीही आमचा बाब्या चांगला....आम्हाला जातीवादी म्हणतात, आम्ही कुणाचं समर्थन करत नाही आम्ही फक्त आरक्षण मागत आहे,, भुजबळ स्वप्नां पूर्ण होणार नाही, त्याला मराठा ओबीसी मारामारी लावायची आहे....


ऑन जालना चटके प्रकरण


जेव्हा सरकार आणि प्रशासनकडून पडतळी होत नाही तोपर्यंत कुणाचं नाव घेणार नाही. हे सर्व बनवाबनवी षडयंत्र आहे, काही लोक कानात सांगून जातात... थोडं थांबा यातील मोठं  बाहेर येणार आहे....तोच व्यक्ती एक दिवस सर्वकाही खर सांगणार आहे...पडताळणी झाली नाही तर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री यांनी दबाव आणला असल्याचे समोर येईल, ते अडचणीत येईल


ऑन औरंगजेब


मोठं मोठे लोक बोलले आता मी काय करू, फेका काय म्हणायची गरज आहे. त्यांनीच पैसे दिले, वेगळी भूमिका घेतात....चाळीस वर्षे कबर काढायला जमलं नाही आणि आता महानगरपालिका निवडणूक तोंडावर काढा म्हणतात....औरंगजेब नालायक होता...निवडणूक तोंडावर असे विषय आणतात...


ऑन संतोष देशमुख


संतोष देशमुख प्रकरणात काय केलं, नाव तुम्ही काढले, पुरावे दिले, वकील नाव सांगतात, आरोपी अटक आंदोलन केल्याने झाले, मग तुम्ही काय केलं....


ऑन औरंगजेब कबर


कबर काढायची असेल तर काढा, त्याच काय करायचं, मीडिया ट्रायल करू नका,,, बाबरी केली होती ना त्यांनी सांगितले थोडं होते, करणारे सांगत नसतात


ऑन वैभवी जबाब


खुप वाईट वाटलं एकूण, यात खूप बाहेर येणार आहे, यांना वाटत आहे आपण सुटणार आहे, पण यांचे सोशल मीडिया चालवणारे देखील अडकणार आहे. यांना खोड्या करण्याची सवय आहे, मुंडेंच्या टोळीने आंनद साजरा केला 


काँग्रेस रॅली मस्साजोग


त्यांनी काढली मी काय करू, त्याला राजकारण म्हणून पाहू नयेत...


ऑन कृषी विभाग परस्पर पैसे उचलले


यांनी खूप खाल्ले,या पैसे काय करत होते, गोड लागत होते, आता पळत आहे, आता पाप फेडावे लागणार आहे, कराडने सांगावे त्यासाठी मी पैसे खात होतो, कराडच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगावे पापात कोण सहभागी होते,,,


ऑन महादेव मुंडे प्रकरण


महादेव मुंडे कुटुंबासोबत आहे, त्यानं गरज वाटत नसेल तर आपण बळच जात असल्याचे वाटू नयेत, त्यांना न्याय मिळावा भूमिका आहे....

फरार आरोपीवर लवकरच भूमिका जाहीर करू: धनंजय देशमुख

धनंजय देशमुख tic
---


या यात्रेमध्ये सर्व स्तरातील सर्व विचारांचे लोक सहभागी झाले आहेत


इथे कोणत्याही जातीचा विषय नाही हा विकृतीचा विषय आहे


सरकारने जी आश्वासन दिले आहे त्या पद्धतीने पूर्तता झाली पाहिजे l, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे


एक आरोपी अद्याप करार आहे त्याबाबतीत आम्ही लवकरच आमची भूमिका जाहीर करणार आहोत


या फरार आरोपीपासून समाजाला धोका आहे


त्याचा शोध कसा लागेल यासाठी आम्ही दोन दिवसात गावकऱ्यांशी चर्चा करून काहीतरी निर्णय घेऊ

हिमायतनगर मध्ये रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

 नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर इथल्या परमेश्वर यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत नामवंत बैलगाडा मालकांनी सहभागी झाल्याने शर्यत चांगलीच रंगली होती. बैलगाडा शर्यतीचा हा थरार पाहण्यासाठी यात्रेकरूंची मोठी गर्दी झाली होती.

पुण्यात मध्यधुंद तरुणाचे रस्त्यावर अश्लील चाळे

पुणे


पुण्यात मध्यधुंद तरुणाचे रस्त्यावर अश्लील चाळे


पुण्यात लाजिरवाणी आणि घृणास्पद घटना


दारूच्या नशेत भर रस्त्यात अश्लील चाळे


पुणे नगर रोड शास्त्रीनगर चौकातील  संतापजनक घटना


सिग्नल वर गाडी उभी करून, बाहेर येत केली रस्त्यावर लघुशंका


सकाळच्या सुमारास तरुणाचा सिग्नल वर अश्लीलपणा व्हिडिओ मध्ये कैद


जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर शुद्ध केले अश्लील कृत्य


भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार

सद्भावनेचे साकडे आम्ही भगवानगड आणि नारायणगड येथे घातले: हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ बाईट पॉइंटर 


एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.. देशमुख कुटुंबाने खूप सहन केले..


देशमुख यांच्या नावापुढे शहीद लागू शकते.. त्यांची हत्या कोणाच्या तरी हव्यासामुळे झाली आहे.. 


घटना घडल्यापासून धनंजय देशमुख आणि त्यांची कन्या वैभवी देशमुख यांचा तोल जाऊ दिला नाही 


सद्भावनेचा संदेश या माध्यमातून द्यायचा आहे..


साधभावनेच्या विरोधात व्देष पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत.. आम्ही थेट विकृतीच्या विरोधात आहोत..


संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी..


सद्भावनेचे साकडे आम्ही भगवानगड आणि नारायणगड येथे घातले आहे.. त्या ठिकाणी सद्भावनेच्या दृष्टीने चर्चा झाली..


ज्या तक्रारी झाल्या त्या आपल्या समोर आहेत.. 


जे द्वेष निर्माण करणारे आहेत.. भ्रष्ट प्रवृत्ती आहेत.. त्यामुळे सद्भावना पदयात्रा काढत आहोत..


तर धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या बद्दल इथे बोलणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

चौकशीची टांगती तलवार असेल तर तो भ्रमिष्ट होतो एकनाथ शिंदे यांचा देखील तसाच झाले: संजय राऊत 

संजय राऊत 


ऑन महिला दिन


* आज जागतिक महिला दिन आहे आज प्रधानमंत्री यांनी दिल्लीत महिला सोबत एक कार्यक्रम ठेवला आहे आणि तसे महिलांचे रक्षक आहोत आम्ही कसं महिलांची काळजी घेतो अशा प्रकारचे कार्यक्रम करून महिला दिनाच्या त्यांना नक्की प्रसिद्धी दिली जाते सरकारच्या कार्यक्रमाला 
* पण महाराष्ट्राची अवस्था पाहिली गेल्या काही महिन्यात तर या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार हे देशात सर्वाधिक आहेत मंत्री त्याच्यामध्ये सामील आहेत सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत पोलिसांवरती दबाव आणला जातो
* लाडकी बहिण सारख्या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत या भूमिकेत जर सरकार असेल तर सरकार समस्त महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करत आहे 
* लाडकी बहीण योजना हे सुद्धा किती फसवी आहे हे सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिले 
* २१०० रुपये देणार होते लाडक्या बहिणींना निवडणुकीनंतर ताबडतोब आता संबंधित खात्याच्या मंत्री बाई आहेत त्याही महिला जाहीर त्यांनी ते शक्य नाही सांगितलं ही महिलांची फसवणूक आहे 
* मला काल काही वृद्ध कलाकार भेटले त्यांना सरकारतर्फे महिन्याला एक ठराविक मानधन मिळते त्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांचे मानधन मिळालेले नाही
* जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे काल त्याच्यावरच बोट दाखवून हा राज्य कर्जाच्या ओजाखाली चिरडत आहे 
* २१०० रुपये द्यायचे कबूल केले आहे ना मग फसवी नाही का या सरकारने महिलांना २१०० देऊ सांगितले आणि द्यायला तयार नाही 


देवेंद्र फडणवीस ऑन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे


* त्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या त्यांनी उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर टीका करू द्या त्यांना दुसरं कार्यक्रम नाही आहे 
* तुम्ही समोर पाहत आहात शिंदे आणि फडणवीस यांच्यात कसे वॉर युद्ध सुरू आहे हे स्पष्ट दिसत आहे रोज दिसत आहे अनेक निर्णय जय भ्रष्टाचारा संदर्भात होते ज्यांच्यावर भ्रष्टाचार सुरू होता असे निर्णय देवेंद्र फडणवीस थांबवले त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत केले. अशाच निर्णयात उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली असेच आधीच्या नगरविकास मंत्री यांचे किंवा अन्य मंत्री यांचे यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल दलाल चालना मिळेल आचार निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन केले पाहिजे 
* तुम्ही भ्रष्टाचार याला चालना देणारे खतपाणी घालणारे आधीच्या मुख्यमंत्री यांचे निर्णयात थांबवले आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचे आहे म्हणून आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आम्ही रडीचे डाव खेळत नाही 


एकनाथ शिंदे विधान भवन टुरिझम विधान


* एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्याला महाराष्ट्रात आता तसे काही महत्त्व राहिले नाही जे मुख्यमंत्री बोलतात त्याला महत्त्व एकनाथ शिंदे यांचा आता कोण ऐकतं कोणीही ऐकत नाही 
* लिहून दिलेली भाषणे वाचायची टीवल्या बावल्या करायच्या याच्या त्याच्यावर बोलायचं याच्यावर काय साध्य होणार 
* पैसे देऊन स्वतः सत्कार करून घ्यायचे पुरस्कार विकत घ्यायचे याच्या पलीकडे यांचा भविष्य काय 


ऑन हिंदुत्व


* २०१४ काय झालं त्यांना विचारा भारतीय जनता पक्षाने देखील हिंदुत्व सोडलं होतं आमच्याशी युती तोडून एकनाथ शिंदे यांचा इतिहास आणि अभ्यास खूप कच्चा आहे त्यांना नव्याने शाळेत जावं लागेल 
* माणसाच्या डोक्यावरती अटकेची टांगती तलवार असेल तर चौकशीची टांगती तलवार असेल तर तो भ्रमिष्ट होतो एकनाथ शिंदे यांचा देखील तसाच झाले आहे 
* २०१९ आम्ही जे केलं त्यात आपणही सहभागी होतात अडीच वर्ष त्याआधी २०१४साली भारतीय जनता पक्षाने हिंदुत्ववादी शिवसेनेची हरकत तेव्हाही आपण त्या निर्णयात सहभागी होतात

पुण्यातील भेसळयुक्त पनीर बनविण्याच्या कारखान्यावर छापा

पुणे ब्रेकिंग


पुण्यातील भेसळयुक्त पनीर बनविण्याच्या कारखान्यावर छापा


पुण्यातील मांजरी खुर्द येथील कारखान्यावर पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी 


पोलिसांच्या छापेमारीत १४०० किलो पनीर जप्त


पनीरचे नमुने तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या gu he शाखेच्या युनिट ६ मधील कर्मचाऱ्यांना एका कारखान्यात भेसळयुक्त पनीर बनविले जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ही बाब अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवली. पोलिसांनी आणि औषध प्रशासन विभागाने या कारखान्यावर संयुक्त कारवाई केली


या कारवाईत कारखान्यातून ४०० किलो जी एम एस पावडर, १८०० किलो एस एम पी पावडर, ७१८ लिटर पामतेल तसेच १४०० किलो भेसळयुक्त पनीर असा ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे


अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे

“राष्ट्रपती महोदया, आम्हाला खुन करण्याची परवानगी द्या…”रोहिणीताई खडसे यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांची राष्ट्रपतींकडे मागणी


मुंबई:- आज जागतिक महिला दिन ! नारीस्त्रीचे कौतुक करणारा दिन मात्र या जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई एक विचित्र मागणी केली आहे. आम्हाला खुन करण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्र सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे.


त्या आपल्या पत्रात म्हणतात की,


सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे…


आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल ?


नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हे नुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खुन माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.


आम्हाला खुन करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे.


आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू 


धन्यवाद!

श्रीगोदामधून 4 बांग्लादेशी महिला ताब्यात

अहिल्यानगर:


अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल न्यू प्रशांतमधून चार बांग्लादेशी महिलांना घेतले ताब्यात...
श्रीगोंदा पोलिस  आणि नाशिक दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्त करावाई...
कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती...
बांगलादेशात बेरोजगारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याची महिलांकडून देण्यात आली माहिती...
मुरसनिला सिकंदर, रोमाना रूमी, सानिया खान, सानिफा खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांची नाव...
श्रीगोंदा पोलिसात गुन्ह्याची, नोंद पुढील तपास सुरू...

कल्याण डोंबिवली महापालिकेचा मनमानी कारभार! नियमांचे उल्लंघन करत आयुक्तांच्या पत्नीची 24 तासांत भरती

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचा मनमानी कारभार समोर आला आहे कंत्राटी भरती नियमांचे उल्लंघन करून अतिरिक्त आयुक्तांची पत्नी 24 तासात थेट कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी MD पॅथॉलॉजी या पदावर भरती 


कल्याण डोंबिवली महापालिका वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते कंत्राटी भरती  नियमांचे उल्लंघन करत अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची पत्नी डॉ श्रुती कोनाले कल्याण डोंबिवली पहालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी M D पॅथॉलॉजी या पदावर थेट 24 तासात भरती झाल्याचे माहितीच्या अधिकारातुन उघड झाले आहे


नगर विकास विभागाने शासन मान्यता आणि नियम


नगर विकास शासन निर्णय  1जून 2021 अन्वेषण कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे सेवा प्रवेश नियमांना शासन मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार नियुक्ती कामे अहर्ता व अनुभव निर्धारित करण्यात आलेला आहे वैद्यकीय अधिकारी एमडी पॅथॉलॉजी 


अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमडी पदव्युत्तर पदवी तथापि पदवीत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद उत्तर पदवीधारकांमधून डीसीपी डिप्लोमा इन क्लीनिकल पॅथॉलॉजी भरण्यात येईल
ब) शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक


अशा पद्धतीने नगर विकास विभाग यांनी घालून दिलेल्या भरती प्रक्रियेतील अहर्ता व अनुभव निर्धारित करण्यात आल्यानुसार भरती प्रक्रिया करावी असे सांगण्यात आले आहे मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कंत्राटी कामगार भरती संदर्भात कुठलीही जाहिरात दिली नाही त्याचप्रमाणे भरती केलेल्या डॉक्टर श्रुती गणपतराव कोनाले यांनी आयुक्तांच्या नावाने कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदावर नेमणूक होण्यासाठी विनंती अर्ज केला 
या अर्जात डॉ श्रुती यांनी असे म्हटले आहे मी MD पॅथॉलॉजी डिसेंबर 2023 मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून हिंगणघाट येथील एका खाजगी रुग्णालयात लॅब इंचार्ज पदावर काम केले असून मला 6 मगिन्यांचा अनुभव आहे 


मात्र नगर विकास विभाग शासनाने नियमांच्या अधीन राहून भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश असताना डॉ श्रुती यांना md पॅथॉलॉजी पदाचा 6 महिन्याचा अनुभव असताना वैद्यकीय अधिकारी पदावर भरती कसे केले हा  सवाल उपस्थित झाला आहे 


तर डॉ श्रुती यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदावर नेमणूक होण्यासाठी विनंती अर्ज आयुक्तांच्या नावाने केला खरा मात्र तो अर्ज आयुक्तांच्या दालनात न जाता परस्पर वैद्यकीय विभागात दाखल करण्यात आला
वैद्यकीय विभागाकडून डॉक्टर श्रुती गणपतराव कोनाले यांनी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक मिळणे बाबत 10 ऑक्टोबर 2024 रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला आहे असे म्हटले आहे मात्र हा अर्ज वैद्यकीय विभागाला सादर केला नसून आयुक्तांना सादर केल्याचे दिसून येत आहे
धक्कादायक बाब म्हणजे 10 ऑक्टोबर 2024 ला कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदावर नेमणूक होण्याबाबत अर्ज सादर केला वैद्यकीय विभागाने सामान्य प्रशासनाकडे हा अर्ज पाठवला सामान्य प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड हे डॉक्टर श्रुती यांचे पती असून त्यांनी या भरती संदर्भात अभिप्राय दिला वैद्यकीय विभागाच्या अभिप्रायानुसार मनुष्यबळाची आवश्यकता पाहता निवळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्त्वावर डॉक्टर श्रुती कोनाले यांची md पॅथॉलॉजी वैद्यकीय अधिकारी या पदावर पूर्णवेळ नियुक्ती करण्याच्या मान्यतेस्तव तथा आदेश स्वाक्षरीस्तव सादर असा अभिप्राय देत आयुक्त इंदूर राणी जाखड यांच्याकडे 11 ऑक्टोबर 2024 रोजी पाठवण्यात आला आयुक्त जाखड यांनी अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या अभिप्रायानुसार डॉक्टर श्रुती कोनाले यांची भरती प्रक्रिया पूर्ण केली 


10 ऑक्टोबर 24 ला अर्ज दाखल 11 ऑक्टोबर 2024 ला भरती प्रक्रिया पूर्ण


शासकीय विभागामध्ये कंत्राटी कामगार अधिकारी भरती प्रक्रिया राबवत असताना नगर विकास खात्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून भरती करण्याची प्रक्रिया पार पाडण्याचे नियम असताना अधिकाऱ्यांनी एमडी पॅथॉलॉजी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याची जाहिरात दिली नाही कंत्राटी कामगार भरती पूर्णपणे गुपित ठेवली सामान्य प्रशासन विभागांमध्ये अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची पत्नी डॉक्टर श्रुती गायकवाड यांची थेट 24 तासात एमडी पॅथॉलॉजी वैद्यकीय अधिकारी पदावरती थेट भरती करण्यात आली या भरतीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे

धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग

धुळे: धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर मुल्लाच्या ढाबा मन्नत पार्क परिसरात प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग.



धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गाजवळील वडजाई रोडवरील हॉटेल मुल्लाच्या ढाबा व मन्नत पार्क परिसरात, एका प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. प्लास्टिकची फॅक्टरी असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते, रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते.

पाणीटंचाईची समस्या सुटतं नसल्यानं पुरुष उपसरपंचानं घागर फोडून केलं प्रशासनाचा निषेध

घागर फोडून केलं प्रशासनाचा निषेध


भंडाऱ्याच्या परसवाडा गावासह लगतच्या सहा गावांमध्ये जलसंकट


Bhandara: उन्हाळ्याच्या पूर्वीचं पाणी समस्यावर तोडगा काढण्याचं प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आलेत. मात्र, त्यावर अद्याप तोडगा काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळं परसवाडा गावासह लगतच्या सात गावांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जर संकट उभा ठाकलं आहे. त्यामुळे उद्विग्ध होऊन परसवाडा गावचे उपसरपंच पवन खवास यांनी चक्क साडी घालून डोक्यावर घागर घेतं,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं कार्यालय गाठतं तिथं घागर फोडली. प्रशासनानं या जलसंकटावर तातडीनं तोडगा नं काढल्यास हजारो ग्रामस्थांसह जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

प्रदूषणामुळं आरोग्याची समस्या वाढली, हिंजवडीलगत आयटीयन्स रस्त्यावर उतरले

आयटी हब हिंजवडीत काम करणारे आयटीयन्स आज रस्त्यावर उतरले होते. त्यांचं आरोग्य सध्या धोक्यात आहे. कारण वाकड आणि ताथवडेत प्रदूषणाची पातळी खालावत चाललीये. आजपण काही ठिकाणी 170 येक्यूआय तर काही ठिकाणी 300 येक्यूआय इतकी हवेची गुणवत्ता आहे. परिसरातील सिमेंट क्रशरच्या करखान्यांमुळं ही गंभीर परिस्थिती निर्माण झालीये. घरोघरी आरोग्याची समस्या निर्माण झाल्याचं इथले रहिवाशी सांगतायेत.

प्रदूषणामुळं आरोग्याची समस्या वाढली, हिंजवडीलगत आयटीयन्स रस्त्यावर उतरले.

pune : आयटी हब हिंजवडीत काम करणारे आयटीयन्स आज रस्त्यावर उतरले होते. त्यांचं आरोग्य सध्या धोक्यात आहे. कारण वाकड आणि ताथवडेत प्रदूषणाची पातळी खालावत चाललीये. आजपण काही ठिकाणी 170 येक्यूआय तर काही ठिकाणी 300 येक्यूआय इतकी हवेची गुणवत्ता आहे. परिसरातील सिमेंट क्रशरच्या करखान्यांमुळं ही गंभीर परिस्थिती निर्माण झालीये. घरोघरी आरोग्याची समस्या निर्माण झाल्याचं इथले रहिवाशी सांगतायेत. आम्ही कोट्यवधी रुपयांचे कर भरतोय, पण प्रशासन आम्हाला शुद्ध हवेची हमी देत नाही. अशी खंत ते व्यक्त करतायेत. एबीपी माझाने पालिकेचा महामुद्दामध्ये यावर आवाज उठवला होता. परिणामी आज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. आता न्यायालयीन लढा उभारण्याची तयारी सुद्धा करण्यात आलीये. 

प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने केली कारवाई

प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने कारवाई केली.


या कारवाईमध्ये चार जणांना ताब्यात घेतले असून ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला..


धरमपेठेतील कॉफी हाऊस चौकात एलएसडी कॅफे आहे. तेथे ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य विविध फ्लेव्हरसह हुक्का पुरविला जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. 

समृद्धी महामार्गावर भाविकांच्या भरधाव क्रुझर गाडीच टायर फुटून भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर भाविकांच्या भरधाव क्रुझर गाडीच टायर फुटून भीषण अपघात


अपघातात दोन ठार तर सहा जण जखमी.


जखमींवर सिंदखेड राजा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. 


तिघांची प्रकृती चिंताजनक.


अपघातानंतर क्रुझर महामार्गावर पलटी झाली , अपघातग्रस्त क्रुझरवर पाठीमागून येणारी क्रेटा कार धडकल्याने मोठा अपघात.

सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत सुरू असते तुळजाभवानीची अभिषेक पूजा 

तुळजाभवानी मंदिरात अभिषेक सुरू असताना मंञी आशिष शेलार दाखल झाल्याने अभिषेक काही काळ बंद 


सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत सुरू असते तुळजाभवानीची अभिषेक पूजा 


अभिषेक पूजेदरम्यान तुळजाभवानी मंदिरातील देवीचे दर्शन असते बंद 


सकाळी साडेसहा ते दहाच्या दरम्यान अभिषेक पूजाशिवाय दिले जात नाही दर्शन


मंत्री आशिष शेलार तुळजाभवानीच्या मंदिरात दाखल झालेले बुकिंग केलेल्या अभिषेक पूजा काही थांबल्या


तुळजाभवानीच्या भक्तांमध्ये नाराजी

के/पुर्व विभाग कार्यालयात जागतिक महिला दिवस केला साजरा

अंधेरीत मुंबई महानगरपालिका के/पुर्व विभाग कार्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.


 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पालिकेच्या के/पूर्व विभागातील सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांच्या करिता कॅन्सरबाबत जनजागृती सत्र तसेच तपासणी  शिबिर आयोजित करण्यात आले.


सदर सत्रामध्ये स्त्रीरोगतज्ञ डॉ. आशिष, डॉ. पल्लवी यांनी कॅन्सर ची लक्षणे,आणि प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच मासिक पाळीमुळे उद्भवणारे आजार (PCOS,PCOD) याबाबत माहिती दिली.

सद्भावना रॅलीमध्ये देशमुख कुटुंब सहभागी होणार..

सद्भावना रॅलीमध्ये देशमुख कुटुंब सहभागी होणार..


धनंजय देशमुख आणि वैभव देशमुख दोघेही काँग्रेसच्या सदभावना रॅलीमध्ये सहभागी होऊन आज चालणार आहेत..

कवठेमहांकाळ मधील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून मागणी

एका सरपंचाला मारहाण आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी  करण्यात आलीय. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षांकाकडे ही मागणी केलीय. सरपंच राजेश पडळकर हे पंचायत समितीमध्ये आले असताना पोलिस कर्मचारी यांनी त्यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून तुला गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवीन असे धमकावले. तुला जर गुन्ह्यामध्ये अडकवायचे नसेल तर दोन लाख रुपये दे अशी मागणी पोलीस कर्मचारी यांनी केली असा आरोप करण्यात आलाय.

महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू

महादेव मुंडे खून प्रकरण अपडेट 


महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू


 16 महिन्यांपूर्वी मुंडे यांचा परळीत झाला होता खून अद्याप एकही आरोपी निष्पन्न नाही 


पोलीस उपअधीक्ष कांकडे तपास देऊन देखील अद्याप आरोपी अटक नसल्याने सीआयडी कडे तपास देण्याच्या हालचाली सुरू आहेत 


सूत्रांकडून याबाबत माहिती मिळते आहे 


तर या प्रकरणाचा तपास आतापर्यंत तीन वेळा बदलण्यात आला आहे 


पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकांकडून संशयतांची चौकशी देखील झाली आहे

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील वैभवी देशमुखचा जबाब माझाच्या हाती 

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील वैभवी देशमुखचा जबाब माझाच्या हाती 


माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे.. वैभवीच्या जवाबातील संतोष देशमुख यांचे वाक्य..


भाऊ एवढं काय झालं नाही. कशाला एवढं ताणता भाऊ, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का? पप्पाचा हा फोन दहा ते 12 मिनिटे सुरू होता.. वैभवी देशमुख 


हा कॉल विष्णू चाटेचाच होता संतोष देशमुख यांनी  मुलीला सांगितलं होतं..

अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला चाप बसणार 

अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला चाप बसणार 


आरोपी आणि अधिकाऱ्यांमधील साटेलोटे रोखण्यासाठी महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय


ठराविक कालमर्यादेत करावी लागणार कार्यवाही


तक्रारीनंतर ७ दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून चौकशीची कार्यवाही बंधनकारक


पुढील १५ दिवसात दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश


तक्रारदाराला कारवाईची लेखी माहिती द्यावी लागणार


वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी

साताऱ्यातील सदरबझार येथे स्पंदन हॉस्पिटलला लागली आग

साताऱ्यातील सदर बाजार येथे मध्यरात्रीच्या सुमारास स्पंदन हॉस्पिटल मधील तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागल्यामुळे हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.. या ठिकाणी असणाऱ्या आयसीयू विभागातील पेशंट तात्काळ दुसरा रुग्णालय हलवण्यात आले. दरम्यान याची माहिती अग्निशामक दलाला दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने हे आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आगीचे मात्र कारण समजू शकलेले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांमध्ये आज बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांमध्ये आज बैठक


सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन


राज्यातील प्रमुख खनिजाच्या ४० खाणपट्ट्यांसंदर्भात होणार चर्चा


खाणपट्ट्यांच्या कार्यान्वयाच्या अनुषंगाने घेतला जाणार आढावा

हिंगोली जिल्ह्यातील ढवुळगावमध्ये घराला भीषण आग
हिंगोली जिल्ह्यातील ढवूळगाव या गावांमध्ये  काल सायंकाळी राहत्या घराला काल भीषण आग लागली आहे या आगीमध्ये सर्व संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल आहे. उमराव क्षीरसागर यांच्या घरात महिलांनी नेहमीप्रमाणे घरामध्ये दिवा लावला आणि सायंकाळी कामानिमित्त घराच्या बाहेर सर्वजण पडले होते अशातच या दिव्याने मोठा पेट घेतला आणि ही आग संपूर्ण घरामध्ये पसरली पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केलं होतं ही आग ग्रामस्थांना आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाच्या वतीने एका अग्नी बंबाच्या गाडीला त्या ठिकाणी पाचरण करण्यात आलं होतं हट्टा पोलीस  फायर ब्रिगेडचे जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात यश आले असून या आगीमध्ये घरातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे यामध्ये घरातल्या सर्व संसार उपयोगी साहित्य कपडे महत्त्वाचे कागदपत्र यासह मौल्यवान वस्तू सुद्धा या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे प्रशासन आणि नागरिक अलर्ट मोडवर

दुष्काळी पट्ट्यातील गावांची तहान भागवणाऱ्या निरा उजव्या कालव्यामध्ये खंडाळा तालुक्यातील पिंपरी  गावाच्या हद्दीत  दि ५ रोजी शेकडो मृत कोंबड्या वाहत असणारा व्हिडिओ विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी आपल्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवून नागरीकांनी सावधगिरी बाळगा असा सल्ला दिला होता.

सांगली- तासगाव रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
तासगाव - सांगली मार्गावर कवठेएकंद गावच्या हद्दीत रात्री दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक बसून दोघांचा मृत्यू झालाय. शेतमजूरी करून गावी परतत असतानाच दोघांवर काळाने हा घाला घातला. याप्रकरणी तासगाव पोलीसात नोंद झाली आहे.

या अपघातात दुचाकी वरील बाबासी शिवाजी पाटील आणि  पोपट जगन्नाथ पाटील  हे दोघेजण ठार झाले आहेत.
रील बनवणे भोवले,कुख्यात सुमित ठाकूरची रवानगी पुन्हा तुरुंगात 

- रील बनवणे भोवले,कुख्यात सुमित ठाकूरची रवानगी पुन्हा तुरुंगात 


- मकोका मध्ये जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रील बनवणे कुख्यात गुंड सुमित ठाकूरला भावले आहे 


- ऑक्टोबर 2023 च्या अपहरण आणि गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात सुमित ठाकूर सह इतर चार आरोपींवर मकोका कारवाई करण्यात आली होती 


- याप्रकरणी सुमित ठाकूर जामिनावर  तुरुंगातून बाहेर आला, त्याला घेण्यासाठी अनेक गुन्हेगार तुरुंगा बाहेर पोहोचले होते 

विजय वडेट्टीवार यांना  निवडणूक प्रकरणात उच्च न्यायालयाची  नोटीस 

- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना  निवडणूक प्रकरणात उच्च न्यायालयाची  नोटीस 


- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विधानसभा निवडणूक प्रकरणात आमदार वडेट्टीवार यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले 


- काँग्रेस उमेदवार वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदार संघातून विजय मिळवला आहे 


- त्यांच्याविरुद्ध स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार एडवोकेट नारायण जांभुळे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे

अंतरिम जामिन मिळाला असताना देखील प्रशांत कोरटकर १५ दिवसापासून भूमिगत.

अंतरिम जामिन मिळाला असतांना देखील प्रशांत कोरटकर १५ दिवसापासून भूमिगत...


छत्रपती शिवाजी महाराजावर अक्षेपार्य वक्तव्य केल्या नंतर प्रशांत कोरटकर झाला होता फरार..


कोल्हापूर पोलीस पुणे फॉरेन्सिक लॅबला पाठवणार कोरटकरचा मोबाईल...


कोरटकरांचे आवाजाचे नमुने कसे घ्यायचे कोल्हापूर पोलिसांकडे प्रश्न

बिअर बारसमोर युवकांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, तर एक पोलीस जखमी

चंद्रपूर : बिअर बारसमोर युवकांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर एक पोलीस जखमी... 


दिलीप चव्हाण (36) असं मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव तर समीर चापले (34) असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव,


चंद्रपूर शहरातील पठाणपुरा मार्गावरील पिंक बारसमोर किरकोळ वादातून युवकांच्या टोळीने केला धारदार शस्त्राने हल्ला, 


पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि परिसरात मोठा तणाव, सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल, 


दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पुढील तपास सुरू

चिमूर शहरात मोठा तणाव

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्य पोस्ट केल्याने चिमूर शहरात मोठा तणाव होता. शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची चिमूर पोलीस स्टेशन समोर गर्दी, सोनू शेख (30) या चिमूर शहरात राहणाऱ्या तरुणाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल इन्स्टाग्राम स्टोरीवर आक्षेपार्ह कमेंट केली. यामुळे दुखावलेल्या शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी चिमूर पोलीस स्टेशन समोर गर्दी केली. पोलिसांनी तातडीने आरोपी सोनू शेखला अटक केली.

नाल्याच्या पात्रातील पाण्यात बुडून दोन चिमुकल्याचा मृत्यू

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील दापुरामजलापूर येथील कोला नाल्याच्या पात्रातील पाण्यात बुडून दोन चिमुकल्याचा करुण अंत झाल्याची घटना ७ मार्च रोजी घडली. समर इंगळे व दिव्यांशु डोंगरे असे मृत्यू झालेल्या चिमुकल्यांचे नाव आहे. 

रायगड पाणी टंचाई बातमी

सध्या उन्हाळा सुरु झालाय आणि दुसरीकडे या उन्हाळ्यात रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईची झळ काही गावांना बसण्यास सुरुवात झाली आहे.अलिबाग तालुक्यातील कोळघर गावात ग्रामस्थांवर शेतातल्या डवऱ्यात साचलेले पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाचशे हून अधिक वस्ती असलेल्या या गावावर ही वेळ केवळ नी केवळ जळजीवन मिशन च्या  रेंगाळलेल्या योजनेमुळे आली आहे. दोन कोटी रुपयांची जळजीवन योजना सण 2021 मध्ये या गावाला मंजूर असून सुद्धा केवळ नि केवळ 40 टक्केच काम झाल्याच पहायला मिळतंय त्यामुळे येथील गावकऱ्यांनी जळजीवन योजनेमधील ठेकेदार विरोधात देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates:  काँग्रेसकडून आज  मस्साजोगमध्ये सद्भावना पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. यावेळी विजय वडेट्टीवार,  सतेज पाटील, विश्वजीत कदम उपस्थित राहणार आहे. राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.