Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 03 Mar 2025 04:36 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (3 मार्च) सुरु होणार आहे. 3 मार्च ते 21 मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. तसेच 10 मार्च रोजी...More

उघड्यावर शौचास गेलेल्या तरुणीला जबर मारहाण ; तरुणी आढळली बेशुद्ध अवस्थेत

गडचिरोली: शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेली 23 वर्षीय तरुणी उघड्यावर शौचास गेलेली असताना तिला अमानुष मारहाण केल्याने ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची घटना गडचिरोली लगतच्या शिवनी गावात समोर आली आहे. त्या तरुणीवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून नागपूरला हलवण्यात आले आहे. त्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी वैद्यकीय तपासानंतरच या संदर्भात माहिती स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तरुणी रविवारी रात्रीच्या सुमारास उघड्यावर शौचास गेली होती. मात्र बराच वेळ ती परत न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला तर ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या हाताला जखमा असून डोळ्याखाली दगड किंवा विटाणे मारहाण केल्याचे व्रण होते. या घटनेची माहिती मिळतात गडचिरोली पोलिसांनी आरोपी शोधण्यासाठी पाच पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेला रवाना केली आहेत. हल्लेखोर गावातील आहे की बाहेरील याचा तपास सुरू आहे.