Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपदाचा तिडा एक-दोन दिवसांत सुटण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates: मस्साजोग वासीयांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आज खासदार बजरंग सोनवणे धनंजय देशमुख यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांची बैठक आहे. ग्रामस्थ आंदोलनावर...More
कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांच्या शेजारी बेवारस वाहन वर्षानुवर्ष धुळखात पडलेली आहेत... अशा वाहनांवर कोल्हापूर पोलीस दल वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे... कोल्हापूर शहरात मुख्य रस्त्यांच्या बाजूला गेली अनेक वर्ष बेवारस पद्धतीने वाहने लावून वाहनांचे मालक गायब आहेत... या वाहनांमुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत... बेवारस पद्धतीने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या या वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सकाळपासून वाहतूक पोलिसांनी दसरा चौक ते स्टेशन रोड वरील मुख्य रस्त्यावर बेवारस वाहने जप्त करण्यास सुरुवात केलेली आहे...
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या आईला बेदम मारहाण केलीये. आईच्या पाठीवर, हातावर, मानेवर व्रण ही उमटलेत. मारहाण करणाऱ्या पोराचं मारुती देशमुख असं नाव असून नुकतीच त्यांची मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीये. कार्ला येथील आई एकविरा देवी ट्रस्टचं विश्वस्त पद ही त्यांच्याकडे आहे. दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी राहत्या घरातच आईला मारहाण केली. आई सावित्रीबाई या सात-आठ महिन्यांपूर्वी मारुती आणि दुसरा मुलगा विलास देशमुखांकडे राहायला आल्या, त्याआधी त्या पुण्यात राहणारा लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांच्याकडे राहत होते. मात्र आता मूळगावी देवघर या ठिकाणी जायचा हट्ट धरला अन त्या तिथं राहायला आल्या. मात्र स्वतःची आई आपल्याकडे राहायला आली हे मारुती देशमुख आणि कुटुंबियांना काय पचनी पडलं नाही. मग त्या इथून परत पुण्यात लहान भावाकडे जावी, म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. असा आरोप लहान मुलगा राजेंद्र यांनी केलाय. यातूनच दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी आईला बेदम मारहाण केली. याप्रकरणी आईने लोणावळा ग्रामीण पोलिसांत मुलगा मारुती, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात केलाय. अजित पवार सत्तेत असल्याचा गैरफायदा त्यांचे समर्थक घेत असल्याचं समोर येत असताना त्यात या आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. माझ्या पक्षातील कोणी कायदा हातात घेतला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करा, असा आदेश अजित पवारांनी आधीच दिलाय. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलाय, पण तो अदखलपात्र गुन्हा आहे. मुळात ज्या आईने जन्म दिला, तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या मारुती देशमुखांना बेड्या ठोकण्याची अन अजित पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची गरज आहे. मात्र पोलीस आणि अजित दादा ही पावलं उचलणार का? हा खरा प्रश्न आहे.
कोल्हापूरचे पोलिसांचे पथक प्रशांत कोरडकर नावाच्या इसमाचा शोध घेण्यासाठी नागपूरच्या दिशेने रवाना ...
पथकामध्ये एक अधिकारी चार कर्मचाऱ्यांचा सहभाग ...
इतिहासकार इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणारा इसमाने प्रशांत कोरडकर नावाने फोन करून धमकी दिली होती.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय राऊत
- आज सावरकर यांचा स्मृती दिन आहे. त्या त्या गीताबद्दल पुरस्कार दिला जातोय. याचं स्वागत आहे
- महाराष्ट्राने दोन हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला हवा. असा ठराव महाराष्टराने केंद्राला पाठवायला हवा.
- मोदीजी बाळासाहेब ठाकरे व स्व सावकर यांना सोई प्रमाणे प्रेरणस्थान माणता.
- सरकार भाजपचं आहे, वोट गणितासाठी भाजपने अनेक स्थानिक व्यक्तींना भाररत्न पुरस्काराची खिरापती वाटली.
- आमचीही मागणी आहे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व स्व सावरकर यांना भारतरत्न मिळायला हवा....
- मोदी काही दिवसांपूर्वी सभेत जनतेचा पैसा खाऊ देणार नाही, खात असतील तर नाव द्या म्हणाले होते
- त्यानुसार आम्ही २६ नावे देणारआहे
- आजच फ्रान्स कंपनीने कसा पैसा मागितला जातो याचा खुलासा केला आहे नगरविकास विभागाने अहवाल मागितला आहे
- देवेंद्रजींना कोणत्या अडथळ्यातून सरकार चालवावं लागत आहे ते दिसतयं
- मुख्यमंत्री फडणवीस यांचे मी स्वागत केले आहे. भ्रष्टाचारात मंत्र्यांचे पीए ओसडी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यानीत्यावर रोख लावली
- मात्र ज्या मंत्र्यांनी त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांचीही नावे जाहिर करा
- नैतिकता साधन सुचिता संस्कार या शब्दांवर भाजपचं प्रेम आहे
- मात्र या मंत्रीमंळात नैतिकता संस्कार याची ऐशीची तैशी झाली आहे
- मात्र भ्रष्टाचार, खून ईडी सीबीआयचे आरोप असलेले अनेक जणांसोबत देवेंद्रजी काम करत आहेत
- फडणवीस यानी साफ सफाई खालून न करता वरून करायला हवी
- भाजपच्याच लोकांना फंड दिला जातोय बाकीच्यांना नाही. घटनेत तसं आहे का ? घटना बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहे यांच्या बाप जाद्यांनी नाही.
- आता आम्ही महाराष्ट्राचे आण्णा यांना जाऊन उठवणारआहे. आण्णा आता उठा भ्रष्टाचारावर बोला. तुम्ही फक्त उठा बाकी आम्ही करतो
- नितेश राणे किरकोळ आहे त्या वेळीचं सरकार कोविडमध्ये सुरूहोतं अभ्यास करायला हवा... त्यांचे वडिल अभ्यासू नेते होते
- मराठीवर काल देवेंद्र व्यासपीठावर फार बोलले मात्र महाराष्ट्रातून पेटेंट बाहेर गेले. त्यावर उद्या सविस्तर बोलू
* पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले असतील असं वाटत नाही. पोलिसांना तपास करू द्यात
सिंधुदुर्ग
लोकेशन : देवगड, सिंधुदुर्ग
नितेश राणे पत्रकार परिषद
जिल्ह्यातील अधिकारी मोठ्या प्रमाणात सुट्या घेतात, जनहिताची काम करताना वेळकाढूपणा करतात. हे त्याचं शेवटचं वर्ष असेल की ते अश्या प्रकारे काम करतात. प्रशासनामध्ये शिस्त लावण्याचं काम यापुढे पालकमंत्री मधून मी करणार आहे.
जिल्हा नियोजनचे पैसे वर्ष संपेपर्यंत खर्च होत नाही, एक दोन महिन्यात २५० कोटी रुपये खर्च करण्याची वेळ येते.
सिंधुदुर्गातील प्रशासनामध्ये आर्थिक बेशिस्तपणा माझ्या जिल्ह्यात यापुढे खपवून घेतला जाणार नाही.
पुणे
"कोथरूड च बीड होऊ देऊ नका," पुणेकरांकडून लावण्यात आले बॅनर
"कोथरूड च बीड होण्यापासून वाचवा, "त्रस्त नागरिकांनी कोथरूड मध्ये लावले बॅनर
बॅनर च्या मार्फत कोथरूडकरांच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
कोथरूड मध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी बाबत नागरिक वैतागले
आमच कोथरूड अस नव्हत म्हणत कोथरूडकरांनी बॅनरद्वारे मांडली व्यथा
वैभवी देशमुख चा उद्या बारावीचा पेपर आहे..
तरीही वैभवी देशमुख आज या अन्न त्याग आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे..
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासा संदर्भात देशमुख कुटुंबीय यांच्यासोबतच मस्सा जोग चे नागरिक अन्नत्याग आंदोलन करत आहेत आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे..
या आंदोलनामध्ये कालपासून धनंजय देशमुख यांनी पाणी सुद्धा पिलेले नाही.. विशेष म्हणजे वैभवी देशमुख हिचा बारावीचा उद्या शेवटचा पेपर आहे आणि तरीही वैभवी देशमुख ही या आंदोलनात सहभागी झाली आहे..
माझ्या आयुष्यात दोन प्रकारच्या परीक्षा आहेत त्यातली एक परीक्षा मी लिहून उद्या देणार आहे तर दुसरी परीक्षा माझी चालू आहे असं म्हणत असताना मला माझ्या वडिलांसाठी न्याय हवाय अस वैभवी देशमुख म्हणत आहे..
ब्रेकिंग...
चंद्रपूर : म्यानमारमार्गे चीनमध्ये झालेल्या वाघांच्या तस्करी प्रकरणात आता ईडी (सक्तवसुली संचलनालय) देखील चौकशी करण्याची शक्यता... म्यानमार मार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती, वाघांच्या शिकारी साठी कुख्यात असलेल्या अजित राजगोंड अटक प्रकरणात वाघांच्या शिकारीच्या मोबदल्यात बहेलिया टोळीला पैसा पुरविणाऱ्या मिझोराम राज्याची राजधानी आयजोल येथून जमखानकप नावाच्या व्यक्तीला करण्यात आली आहे अटक, तर या आधी मेघालय राज्याची राजधानी असलेल्या शिलॉंग येथून लालनेईसंग आणि त्याची महिला साथीदार निंग सॅन लुन यांना करण्यात आली आहे अटक, पूर्वोत्तर राज्यातील या 3 आरोपींच्या चौकशीदरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचं आलं निदर्शनास, विशेष म्हणजे जमखानकप या आरोपीवर या आधी देखील हवाला प्रकरणात सामील असल्याचा दाखल आहे गुन्हा, त्यामुळे या प्रकरणात हवालाच्या माध्यमातून व्यवहार झाल्याची शक्यता लक्षात घेता चंद्रपूर वनविभागाने ईडीला चौकशी करण्यासाठी केला आहे पत्रव्यवहार, त्यामुळे आता या प्रकरणाची ईडी देखील स्वतंत्र चौकशी करण्याची शक्यता
भाईंदर : नवघर अग्निशमन केंद्रातील स्थायी कर्मचारी संजय म्हात्रे, फायरमन, याच्यावर अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संजय म्हात्रे याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
माजी नगरसेविकेच्या माध्यमातून नवघर पोलीस ठाण्यात या संदर्भात लेखी तक्रार देण्यात आली होती.
तक्रारीनंतर ही कारवाई झाली असली तरी, संजय म्हात्रे याच्या विरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाईची शक्यता आहे.
बाईट: निकम धवन (जिल्हा संघटक, उबाठा)
महाशिवरात्री निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या समाधी स्थळी भाविकांनी दर्शना साठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे
महा शिवरात्रीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई समाधी मंदिर परिसरात भव्य यात्रा भरण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे
संपूर्ण राज्यातील नव्हे देशभरातून अनेक भाविक या यात्रेसाठी आणि संत मुक्ताबाईच्या दर्शना साठी मोठी गर्दी करत असतात
शेकडो दिंडी आणि पालख्या मुक्ताई नगरात दाखल झाल्या असून,याच पालख्या आणि दिंड्या संत चांगदेव महाराज यांच्या दर्शना साठी जाण्याची परंपरा आहे
सिल्लोड चे मालेगाव होणार - किरीट सोमैया
सिल्लोड येथेही बांगलादेशी रोहिंग्याना मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा समोर आला आहे
सिल्लोड चे उपविभागीय अधिकारी श्री. खान यांनी 406 अश्या लोकांना जन्माचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले ज्यांनी त्यांचा जन्म सिल्लोड/भारतात झाल्याच्या एकही पुरावा दिलेला नाही. अर्जासोबत फक्त आधार कार्ड दिले आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली आहे श्री. खान यांची हकालपट्टी करावी व सिल्लोड येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश द्यावे.
सिल्लोड येथे वर्ष 2024 मध्ये 4855 अर्ज आले, एकही फेटाळले गेले नाही, यात 3000 अर्ज संशयास्पद आहे.
किरीट सोमैया
Jejuri: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजनांचा लोक देव आसलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जातेय. आजच्या दिवशी मंदिराच्या शिखरमध्ये असलेल्या गुप्त लिंगाचे दर्शन घेता येते. मंदिरात असलेली ही गुप्त लिंग वर्षातून एकदाच भाविकांना दर्शनासाठी खुली केली जातात. त्यामुळे या वेळी दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतायत. भुलोक, पातळ लोक आणि स्वर्ग लोकीच्या महादेवाचं दर्शन आजच्या दिवशी होत असल्याची भावना लोकांची आहे. त्यामुळे आज रात्री बारा वाजले पासूनच पासूनच लोकांनी जेजुरी गडावर दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय. रात्री 12 वाजता शिखारतील मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.
Pune:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची फर्ग्युसन कॉलेजमधील खोली , सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आज खुली
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील त्यांची खोली आज नागरिकांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फर्ग्यूसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना सन १९०२ ते १९०५ या कालावधीमध्ये फर्ग्यूसन महाविद्यालय मुलांचे वसतिगृह क्रमांक १ मधील खोली क्रमांक १७ मध्ये राहत होते. सावरकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली व ऐतिहासिक महत्त्व असलेली आणि विद्यार्थ्यांचे स्फूर्तीस्थान असलेली त्यांची खोली पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. इतिहासाला प्रेरणा देणाऱ्या या खोलीत आज ही अनेक गोष्टींचे जतन करण्यात आलं आहे.
शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांची हायकोर्टात धाव.
आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका.
महेश सावंत यांच्या उमेद्वारीला आव्हान देणारी याचिका.
याचिकेत महेश सावंत यांनी निवडणुक प्रतिज्ञापत्रार चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप.
गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञपत्रात दाखवणे आवश्यक मात्र जनतेची दिशाभुल करुन स्वत वरील चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवली
सरवणकरांचा याचिकेतुन आरोप.
२८ फेब्रुवारीला होणार याचिकेवर सुनावणी
परभणीतील प्रसिद्ध पारदेश्वर महादेवाची शोभायात्रा
जगातील सर्वात मोठे पाऱ्याचे शिवलिंग परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिर
शिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
महाशिवरात्री निमित्त जगातील सर्वात मोठ्या पाऱ्याचे शिवलिंग असलेल्या परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिरात मोठा उत्सव आज साजरा केला जात आहे.मंदिरातुन आज सकाळीच रथातुन पारदेश्वर महादेवाची शोभायात्रा काढण्यात आली.मंदिर आणि परिसरातुन हि शोभायात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेत टाळ,मृदूंग,कलश घेऊन मोठया प्रमाणावर महिला,तरुण,तरुणींसह मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते.महत्वाचे म्हणजे पारदेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली असुन देशभरातून भाविक इथे दर्शनासाठी येतात तसेच आज रात्री 12 वाजता पाऱ्याने महादेवाचा अभिषेक हि केला जातो.तो सोहळा ही पाहण्यासाठी मोठी गर्दी असते
महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात हर हर महादेवचा गजर
पुणे : हर ,हर, महादेव च्या गजरात पुणे जिल्हयातील भीमाशंकर परिसर दुमदुमत आहे. महाशिवरात्री निमित्त माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय महापुजा पार पडली. बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणुन भीमाशंकर येथे भाविक मोठया संख्येने येत असतात. मंदिरातील गुरवाच्या हस्ते पहिली पुजा केल्यानतंर मुख्य महापुजेला सुरवात होते. मंत्राच्या घोषात महादेवाच्या पिडीवर दुध,दही,मध,साखर यांच्या अभिषेक केल्यानतंर बेल वाहुन आरती यावेळी करण्यात आली. यांनतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
मसाजोग करांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस
संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करत दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनाला प्रारंभ
मागण्यांबाबत ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करत या दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला.. जोपर्यंत मागण्याविषयी आश्वासन मिळत नाही. जबाबदार अधिकारी आंदोलन स्थळी भेट देऊन आश्वासन देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. वेळप्रसंगी पाणी न घेण्याचा इशारा देशमुख कुटुंबियांनी दिला.. आता आज या ठिकाणी अधिकारी भेट देतात का? या आंदोलकाच्या मागण्या विषयी सकारात्मकता दाखवत त्या दिशेने पावले उचलतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
महाशिवरात्रीनिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन
संभाजीनगर: संपूर्ण देशात आज महाशिवरात्री उत्सव साजरा केला जात असून भगवान शंकराची भाविक भक्त आस्थेने आराधना करत आहे. राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाशिवरात्रीच्या निमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन भोलेनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. राज्याच्या प्रजेला सुखी आणि समृद्ध कर अशी प्रार्थना दानवे यांनी भगवान शंकराच्या चरणी केली.
पुण्यातील २८९ वर्ष जुन्या ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरी झाली. रुद्राभिषेक आणि महाआरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी पहाटेपासूनच याठिकाणी पाहायला मिळाली. पुणे शहरातील मुठा नदीच्या काठावर असलेल्या मंदिराला पेशवेकालीन इतिहास आहे. पहाटे चार वाजता रुद्राभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आले. आज दिवसभर भाविकांसाठी मंदिर कुठे राहील आणि रात्री आठ वाजता मंदिरात महा आरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात नवीन 73 शाळा सुरू होणार, 73 पैकी 65 शाळा इंग्रजी माध्यमाच्या तर आठ शाळा या मराठी माध्यमाच्या असणार
महाराष्ट्र स्वयं अर्थसहायित शाळा अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा व अस्तित्वात असलेल्या शाळांचे दर्जा वाढ देण्यासाठी आलेल्या प्रस्तावाची छाननी शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे
नवीन शाळांच्या मंजुरीसाठी आणि असेच असलेल्या शाळांच्या दर्जा वाढीसाठी एकूण 241 पत्र प्राधिकरणाचा प्राप्त झाले होते
त्यानुसार 73 नवीन शाळा येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सुरू होतील... यामध्ये मुंबईत सर्वाधिक 28 नव्या शाळा सुरू होतील... तर नाशिक आणि पुण्यामध्ये प्रत्येकी 9 शाळा सुरू होणार आहेत
73 नव्या शाळांमधील 60 शाळा या राज्य मंडळाचे असतील 11 शाळा सीबीएसईच्या तर एक शाळा आयसीएसई आणि एक शाळा केंब्रिज बोर्डाची असेल
73 नव्या शाळा व्यतिरिक्त 54 अस्तित्वात असलेल्या शाळांना दर जवळ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे... ज्या शाळेमध्ये प्रार्थमिक आणि माध्यमिक सोबत उच्च माध्यमिक वर्ग सुद्धा सुरू केले जातील
बुलढाणा- जलजीवन मिशनची कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन.
वर्षभरापासून कामाची 250 कोटींची देयके थकल्याचा परिणाम.
काम थांबल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवणार..?
बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशन ची कामे सुरू आहेत, मात्र गेल्या वर्षभरापासून शेकडो कंत्राटदारांचे 250 कोटी पेक्षा अधिक देयके थकल्याने कंत्राटदार अडचणीत आले आहेत.. त्यामुळे या सर्व कंत्राटदारांनी कालपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.. पासून बुलढाणा जिल्हा परिषद समोर संबंधित कंत्राटदारांनी आंदोलन सुरू करत जोरदार घोषणाबाजी सुरू केलीय.. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, आता ही सर्व कामे बंद पडल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.. शासनाकडून निधी येताच कंत्राटदारांची देयके अदा केली जातील, त्यांनी कामे पूर्ण करावीत असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आमदार रोहित पाटील क्रिकेटच्या मैदानात..रोहित पाटलांची जोरदार फलंदाजी
तासगाव मध्ये आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक क्रीडा स्पर्धेत आमदार रोहित पाटील क्रिकेटच्या मैदानात उतरलेले दिसून आले. या क्रिकेटच्या स्पर्धेत रोहित पाटील यांनी जोरदार फलंदाजी करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.या स्पर्धेत चौकार आणि षटकार मारत रोहितत पाटील यांनी आपले क्रिकेट खेळामधील प्राविण्य दाखवून दिले.
ठाणे:- ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत अति प्राचीन व जागृत देवस्थान ठाण्याचे ग्रामदैवत श्री.कोपीनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्त मंदिरात दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते अगदी मध्य रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनाकरिता रांग लावली आहे तर सुमारे दीड ते दोन किलोमीटर पर्यंत लांब ही दर्शनाची रांग पसरली आहे दिव्यागांकरिता वेगळी रांग ज्येष्ठांकरिता महिलांकरिता अशा अनेक रांगा मंदिर प्रशासनाकडून तयार करण्यात आल्या आहेत. तसेच व्हीआयपी व राजकीय नेत्यांकरिता देखील वेगळ्या रांगा तयार करण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात आज दर्शनालरिता लाखो भाविक येणार आहेत तर त्यांच्या करिता अनेक वॉलेंटियर देखील नेमले असून खबरदारी म्हणून अनेक सीसीटीव्ही कॅमेरे देखील मंदिर प्रशासनाकडून लावण्यात आले आहे.
हिंगोली: महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनाचे महत्त्व काय आहे ? बारा ज्योतिर्लिंग पैकी आठव्या ज्योतिर्लिंगाची काय आहे वेगळेपण
महाशिवरात्रीनिमित्त देशातील सर्व शिव मंदिरामध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे त्याच प्रमाने आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात सुद्धा मोठी गर्दी आहे या मंदिरामध्ये पंजाब मधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिख बांधव दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शंकराचे भक्त आजच्या दिवशी दर्शनासाठी येत असतात आजच्या दिवशीच्या दर्शनाचे महत्त्व काय आहे आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिराचं इतर ज्योतिर्लिंगा पेक्षा वेगळंपण काय आहे
सिंधुदुर्ग: दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यात आला. मध्यरात्री पालकमंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराची पूजा केली, त्यानंतर आरती केली. पहाटे तीन वाजता भाविकांसाठी कुणकेश्वर मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी कुणकेश्वर मंदिर परिसरात दिसून झाली. पाडवकालीन प्राचीन मंदिरांपैकी हे मंदिर आहे. काशीला १०८ शिवलिंग आहे तर इथे १०७ शिवलिंग आल्याने मात्र ती समुद्राला ओहोटी आल्यावर दिसतात. त्यामुळेच दक्षिण काशी म्हणून कुणकेश्वर मंदिराला एक वेगळ स्थान आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईने उजळुन निघाला आहे. आज या यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे दर्शनासाठी येणार आहेत.
शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे हर हर महादेवचा गजर करीत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटे गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत. दक्षिण वाहिनी असलेल्या वैनगंगा नदी मार्कंडादेव येथे उत्तर वाहिनी झाली असून या नदीच्या काठावर मार्कंडेश्वर मंदिर वसले आहे. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री निमित्त पंधरा दिवस इथे यात्रा भरत असते...
सांगली-: सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झालीय. १२३ इच्छुक उमेदवारांचे अर्ज माघारी घेत इच्छुकांची मनधरणी करून तिढा सोडविण्यात खासदार विशाल पाटील यशस्वी झाल्यामुळे ही कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली.
वसंतदादा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जागांसाठी २१ १४४ इच्छुकांनी अर्ज भरले होते. १२३ इच्छुकांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे २१ उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. आष्टा, मिरज, सांगली आणि अनुसूचित जाती व जमाती गटात इच्छुकांची मनधरणी करून तिढा सोडविण्यात आल्यामुळे ही कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली.
वाशिम
सध्या देशविदेशातून कुंभ स्नान करण्यासाठी प्रयागराज इथं मोठी गर्दी पाहायला मिळतंय ..मात्र, ज्या नागरिकांना प्रयागराज इथं कुंभ स्नान शक्य झालं नाही अश्या नागरिकां करिता
वाशिमच्या मंगरूळपीर शहरात चारभुजा मंदिरात महाकुंभ मेळाव्याची प्रतिकुर्ती तयार करण्यात आली .. इथं येणाऱ्या भाविकभक्तां साठी प्रयागराज वरून 1500 लिटर टँकर द्वारे पाणी आणण्यात एक मोठा कुंड तयार करून त्यात महाशिवरात्री कुंभ स्नानची संधी देण्यात आलीय
नांदेड ब्रेकिंग
: नांदेड शहरातील गणेशनगर भागात आज सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान दोघांनी एका तरुणांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अमोल भुजबळ नावाच्या युवकाचा जागीच मृत्यू झालाय. गणेशनगर भागातील वाय कॉर्नरवर सकाळी हे हत्याकांड घडल्याने परिसरात दहशत पसरलीय. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. ही हत्या नेमकी कशामुळे झाली याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
पतंजलीच्या आशियात खंडातील सर्वात मोठ्या फूड आणि हर्बल पार्क चे उद्घाटन नऊ मार्च रोजी नागपुरातील मिहान हा सेझ (SEZ) मध्ये पार पडणार आहे... या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच पतंजली समूहाचे प्रमुख योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण उपस्थित राहणार आहेत... विशेष म्हणजे तब्बल आठ वर्षानंतर हे फूड व हर्बल पार्क अस्तित्वात येत आहे.. 10 सप्टेंबर 2016 रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत झाले होते.. तेव्हा 1000 पेक्षा जास्त कोटींच्या गुंतवणुकीतून विदर्भातील हजारो युवकांना प्रत्यक्ष रोजगार देण्याची घोषणा योग गुरु रामदेव बाबा यांनी केली होती.. मात्र भूमिपूजनाच्या अनेक वर्षानंतरही या प्रकल्पाशी संबंधित कोणतेही बांधकाम झाले नव्हते.. मिहान मधील शेकडो एकर जमीन तशीच पडून होती.. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात आणि योगगुरु रामदेव बाबा यांच्या हेतू संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते.... अनेकांनी या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध ही दर्शवला होता... आता अनेक वर्षांच्या दिरंगाई नंतर का होईना हे प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात येत आहे...
# पतंजली नागपुरातील मिहान सेज मध्ये उभारणार आशियातील सर्वात मोठा फूड व हर्बल पार्क
# 1000 कोटींच्या गुंतवणूकीतून उभा राहणार फूड व हर्बल पार्क....
# मिहान मध्ये तब्बल 264 एकर जमीन पतंजली समूहाने अनेक वर्षांपूर्वी घेतली..
# फूड व हर्बल पार्क मधील उत्पादनांसाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल खरेदी केला जाईल..
# फूड व हर्बल पार्क मध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हजारो स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्याचा दावा...
महाशिवरात्री निम्मिताने मुंबईतील प्राचीन बाबुल नाथ मंदिर भक्तांच्या गर्दीने बहरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाशिवरात्री निमित्त मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची रात्री पासून गर्दी पाहायला मिळत आहे. बाबुलनाथ मंदिर हे हजार वर्षांपेक्षा जुनं मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जवळपास तीन ते चार लाख लाख भाविक बाबुलनाथच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिराचा गाभारा सोन्याच्या मुलाम्याने सजवण्यात आला असून, फुलांची सुंदर सजावट देखील करण्यात आली आहे. भगवान बाबुलनाथाचे दर्शन घेण्यासाठी मलबार हिल पासून गिरगाव चौपाटीपर्यंत दर्शनाची रांग पोचली आहे,
Mumbai: संसार मोडल्याच्या रागातून सासूला पेटवून जावयाने स्वत:लाही पेटवून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मुलुंडच्या नवघर परिसरात घडला आहे
बाबी दाजी उसरे ७२ वर्ष असे मयत सासूचे नाव असून कृष्णा अटनकर ५९ असे आत्महत्या करणार्या जावयाचे नाव आहे
कौटुंबिक कलहातून कृष्णा अटनकर यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. त्यास पत्नीची आई बाबी ही कारणीभूत असल्याचा राग कृष्णा ह्याच्या डोक्यात होता
याच रागातून फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात कृष्णाने त्याची सासू बाबीला मिठागररोड, नाणेपाडा मुलुंड पूर्व येथे भेटायला बोलावले
रस्त्यात वाद नको म्हणून कृष्णाने बाबी यांना टेम्पोत नेहले. त्यानंतर काही समजायच्या आतच बाबी यांच्यावर लोखंडी हातोडीने हल्ला चढवला
त्यानंतर गाडीतील थिनर व पेट्रोल बाबी यांच्या अंगावर ओतून त्यांना पेटवून देत बाबी यांची हत्या केली
त्यानंतरतेच पेट्रोल व थिनर स्वत:च्या अंगावर ओतून घेत आत्महत्या केली
या प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलिसांनी सुरवातीला अपमृत्यूची नोंद केली होती.
मात्र चौकशीनंतर हा हत्येचा प्रकार असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील कलमात वाढ केली
Kolh breaking
कोल्हापूर जिल्हा परिषदेला 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव
मुंबईतील बँक खात्यावर पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न
अज्ञाताविरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अज्ञाताकडून बनावट धनादेश आणि स्टॅम्पचा वापर
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली
रणजी क्रिकेट विजेतेपदासाठी आजपासून विदर्भ आणि केरळ दरम्यान फायनल मुकाबला सुरू होत आहे.. विजय क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर ही लढत होणार आहे... तिसऱ्यांदा विजेतेपदाचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणाऱ्या विदर्भाची या मोसमातील कामगिरी बहारदार राहिली आहे... विदर्भाकडून यश राठोडने पाच शतकांसह या मोसमात 933 धावा काढल्या असून करन नायरने 642 धावा तर कर्णधार अक्षय वाडकर ने 674 धावा काढल्या आहेत.. हर्ष दुबेने अष्टपैलू प्रदर्शन करत 66 बळी घेतले आहे, तसेच 460 धावा ही केल्या आहेत.. तर दुसरीकडे कर्णधार सचिन बेबीच्या नेतृत्वात केरळाला रणजी ट्रॉफीचे पहिले विजेतेपद खुणावत आहे...
रायगडच्या माणगाव तालुक्यातील निसर्ग रम्य ठिकाण असलेल्या कुंभे चन्नाट पर्यटन स्थळावर भर उन्हाळ्यात काही अतिउत्साही ब्लॉगर धोकादायक स्टंट करताना आढळून आलेत. या परिसरात असणाऱ्या धोकादायक जल कुंभ्यात उंचावरून उडी मारतानाचे दृश्य पर्यावरण प्रेमी शंतनू कु्वेस्कर यांनी आपल्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद केलाय . पावसाळ्यात लाखो पर्यटक या भागाला भेट देतात मात्र पावसाळ्यानंतर इथल्या पाण्याचा साठा कमी झाल्याने येथील खडकभाग वर आल्याने एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते.याच पार्शवभूमीवर पर्यावरण प्रेमी शंतनू कु्वेस्कर यांनी वनविभाग, स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीमचे सुद्धा लक्ष वेधले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध श्रीक्षेत्र कोपेश्वर मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई
पहाटेपासूनच भाविकांची दर्शन घेण्यास गर्दी
हर हर महादेवच्या गजरात परिसर दुमदुमला
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गावात बर्ड फ्लूची एन्ट्री झाली आहे. गावातील पोलीस ठाण्याच्या परिसरात गेल्या काही दिवसापूर्वी कावळ्यांचा मृत्यू झाला होता. याचा अहवाल समोर आला असून बर्ड फ्लूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा उघड झाले आहे. यानंतर पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत अलर्ट मोडवर आले असून कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरात विविध उपायोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील उंबर्डा परिसरात रात्री 9.30 वाजताच्या सुमारास राज चौधरी नामक ग्रामस्थाला प्रवासादरम्यान उंबर्डा बाजार मार्गावरील रापेरी गावानजीक बिबट्याचे दर्शन घडले. लगेच राज यांनी आपल्या जवळी मोबाईल केमेऱ्या द्वारे रस्त्यावर वावरणाऱ्या बिबट्याला मोबाईल मध्ये चित्रीकरण कैद केले असून या बाबतीत परिसरातील नागरिकांना सतर्क केले.
आज महाशिवरात्री निमित्त आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिरामध्ये जोरदार तयारी पहायला मिळत आहे मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास शिवसेना आमदार संतोष बांगर आणि हिंगोली चे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सह पत्नी औंढा नागनाथ मंदिर मध्ये नागनाथाची प्रशासकीय पूजा केली आहे दुधाभिषेक घालत शिवलिंगाची त्यांनी विधिवत पूजा केली आहे महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी औंढा नागनाथ मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची सजावट केल्याच आपल्याला पाहायला मिळाल आहे दरम्यान काल सायंकाळ पासून ते मध्यरात्रीपर्यंत औंढा नागनाथ मंदिराचे सर्व दरवाजे बंद ठेवण्यात आले होते मुख्य प्रशासकीय पूजा झाल्यानंतर दोन वाजताच्या सुमारास मंदिराचे दरवाजे भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते त्यानंतर मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्तांनी बम बम भोले आणि हर हर महादेव चा घोषणा देत मध्यरात्रीच आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये मध्यरात्रीच दर्शन घेतल आहे.
आज महाशिवरात्री निमित्त देशातील बाराही ज्योतिर्लिंगा मध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये सुद्धा मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी नागनाथाचे दर्शन मिळावं यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शंकराचे भक्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये मध्यरात्रीपासून दाखल झाले आहेत रांगेमध्ये पाच ते सहा तास थांबल्यानंतर शंकराचे दर्शन होत आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व घडामोडी, वाचा एका क्लिकवर