Maharashtra breaking News Live Updates : महाविकास आघाडीच  ठरलं ! उद्या जागा वाटपाचे सूत्र निश्चित होणार 

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 21 Oct 2024 03:14 PM
Maha Vikas Aghadi Seat Distribution : महाविकास आघाडीच  ठरलं ! उद्या महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित होणार 

महाविकास आघाडीच  ठरलं ! उद्या महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित होणार 


विदर्भातील जागा वाटपाचा तिढा आजच्या आज महाविकास आघाडीचे नेते सोडवणार!


आज उद्या मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या सुद्धा  जाहीर केल्या जाणार!


महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना  ठाकरे गटातील वादावर  शरद पवार यांची मध्यस्थी!

Maha Vikas Aghadi Seat Distribution : महाविकास आघाडीच  ठरलं ! उद्या महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित होणार 

महाविकास आघाडीच  ठरलं ! उद्या महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित होणार 


विदर्भातील जागा वाटपाचा तिढा आजच्या आज महाविकास आघाडीचे नेते सोडवणार!


आज उद्या मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या सुद्धा  जाहीर केल्या जाणार!


महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना  ठाकरे गटातील वादावर  शरद पवार यांची मध्यस्थी!

Hemant Patil Meeting to Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे आमदार हेमंत पाटील सागर बंगल्यावर दाखल


एकनाथ शिंदेंचे आमदार हेमंत पाटील सागर बंगल्यावर दाखल


नांदेड पूर्व मतदारसंघातून हेमंत पाटील निवडणूक लढण्याची शक्यता


लोकसभेला हेमंत पाटील यांचे तिकीट कापण्यात आलं होतं


विधान परिषदेवर हेमंत पाटील यांचे नुकतच झालं होतं पुनर्वसन


त्यामुळे आता विधानसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हेमंत पाटील कमबॅक करणार का हे पाहणं महत्त्वाचं

Ajit Pawar NCP Candidate List : राष्ट्रवादी अजित पवार यांची पहिली यादी आज संध्याकाळ पर्यंत येण्याची शक्यता.

राष्ट्रवादी अजित पवार यांची पहिली यादी आज संध्याकाळ पर्यंत येण्याची शक्यता.


पहिल्या यादीत ३२-३५ नाव असण्याची शक्यता.


यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना करताहेत एबी फॅार्मचे वाटप.

Eknath Shinde Shivsena Candidate List : एकनाथ शिंदेंच्या 60 उमेदवारांची यादी तयार, आजच मुख्यमंत्री निर्णय घेणार, सूत्रांची माहिती

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जागा वाटपाबाबत बैठक


या बैठकिला विद्यमान आमदार, खासदार आणि इच्छुक उमेदवारांची वर्षावर बैठक


भाजपच्या यादीनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीकडे सर्वांचे लक्ष


६० उमेदवारांची यादी तयार, आजच मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती


वर्षावर सध्या कृपाल तुमाने, हेमंत पाटील, माजी खासदार हेमत गोडसे, अजय बोरस्ते, प्रकाश पाटील, वामन म्हात्रे, शिशिर शिंदे, मिलिंद देवरा, किरण पासकर, भाऊ साहेब चौधरी, रविंद्र फाटक, खा धर्येशील माने, शितल म्हात्रे, विनायक राणे, मंत्री प्रतापराव जाधव, संजय निरूपम, निलम गोर्हे, नरेंद्र बोडेकर दाखल


तर खा धनंजय महाडिक, संजय बनसोडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार


24 तारखेला बहुतांश सेनेचे उमेदवार अर्ज भरणार 


लवकर अर्ज भरून मुख्यमंत्री महाराष्ट्रात प्रचारासाठी निघणार

Maha Vikas AghadI Seat Sharing : मविआत नेमक्या किती जागांवर तिढा, खरा आकडा आला समोर, वडेट्टीवार यांनी नेमकं सांगितलं!


विजय वडेट्टीवार बाईट -


जागावाटपाची चर्चा संपल्यात जमा आहे


15-16 जागांची चर्चा बाकी आहे


7-8 जागा आमच्यात बदलायच ठरवल आहे


जागावाटप बाबत महायुतीच्या नेत्यांनी देव पाण्यात बुडू ठेवले असेल तर ते स्वापणात आहेत


उद्या संध्याकाळ पर्यंत सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल... उद्या संध्याकाळी आम्ही जागा जाहीर करून पुढे गेलेले असू


काही प्रमाणात थोडीफार नाराजी असतेच... त्यांची आम्ही समज घालू आणि आघाडी म्हणून एकत्र लढू


तिन्ही पक्षांचा 17 जागांचा तिढा आहे... तो उद्या रात्री पर्यंत सुटेल


काल आम्ही हायकमांड सोबत चर्चा करून माहिती दिली


मार्ग कसा काढायचा यावर देखील त्यांच्याशी आम्ही बोललो


90 जागा घेऊन आम्ही आज CEC मधे जात आहोत


आज रात्री किंवा उद्या सकाळी आमची यादी येईल


विदर्भात 5-6 जागांवर आमचा वाद आहे... तो देखील सुटेल


ऑन संजय राऊत विधान -


आम्ही चर्चा करून ठरवू... ते काय म्हणले आम्ही काय म्हणल यावर प्रतिक्रिया द्यायला नको

Rahuri Vidhan Sabha Election : पहिली यादी जाहीर होताच अहिल्यानगरात भाजपला बंडखोरीचे ग्रहण

राहुरी / अहिल्यानगर : पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचे ग्रहण...
राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर कदमांची जाहिर नाराजी...
राहुरी विधानसभेसाठी  सत्यजित कदम होते इच्छुक..
पक्षाने तिकीट नाकारल्याने समोर आली नाराजी... सत्यजित कदम हे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे सुपुत्र....
पक्षाने तिकीट नाकारल्याने चंद्रशेखर कदम नाराज... 
मागील निवडणुकीत पक्ष हितासाठी थांबलो मात्र पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही...
सत्यजित कदम आणि त्यांचे कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी ठामपणे उभा राहणार.

Satyajeet Tambe Devendra Fadnavis Meeting : आमदार सत्यजित तांबे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला


आमदार सत्यजित तांबे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला


काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे  सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार आहेत


सत्यजित तांबे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सोनिया गांधी राहुल, प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा होणार, काँग्रेसने रचली खास रणनीती  

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला बाईट 


प्रियंका गांधी वायनाड मधून निवडणूक लढवणार आहेत


 महाराष्ट्रात प्रचारासाठी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी येतील 


शिवसेनेसोबत आमच्यात कोणतेही वाद नाहीत 


थोड्याफार प्रमाणात असलेल्या जागाबाबत लवकरच तोडगा निघेल

Congress Candidate First List : काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या येणार, नाना पटोले यांची माहिती


काँग्रेसची यादी उद्या येणार 


 महायुतीमध्येही संभ्रम सुरू आहे 


आमच्यात कुठलेही वाद नाहीत, काल काही कारणास्तव आमची सीईसी रद्द झाली आज होतेय 


विदर्भातील कुठल्याच जागे बाबत वाद नाहीत पटोले यांचे स्पष्टीकरण 


खर्गेसोबतच्या बैठकीमध्ये नाराजी बाबत कोणतीही चर्चा झाली नाही नाना पटोले यांनी शिवसेनेबाबत केलेली मागणी फेटाळली

Mahayuti Support to MNS : महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता

महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये झाली चर्चा


खात्रीलायक सूत्रांची माहिती


मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री झाली चर्चा


शिंदे-फडणवीस-ठाकरेंमध्ये झाली दोन तास चर्चा


शिवडी, वरळी, माहिमसह काही मतदारसंघांवर झाली चर्चा


महायुती आणि मनसेच्या पुढील निर्णयाकडे लक्ष

Sameer Meghe BJP Candidate : भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेले उमेदवार लागले प्रचाराला, हिंगणा मतदारसंघात जोरदार तयारी


 भाजपकडून काल उमेदवारी जाहिर झालेले उमेदवार लागले प्रचाराला


 नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातील भाजप उमेदवार आ. समिर मेघे यांचा प्रचार सुरु


 हिंगणा मतदारसंघातून समिर मेघे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी


उमेदवारी जाहिर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुरु झाला प्रचार 


आ. समिर मेघे यांच्याकडून कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी सुरु 


 भाजपने ज्या ज्या मतदारसंघात उमेदवारी जाहिर केली, तिथे प्रचार सुरु 


महाविकास आघाडीने कोणताही उमेदवार दिला त्याचा कोणताही परिणाम आमच्या तयारीवर पडणार नसल्याचे समीर मेघे यांनी सांगितले.


समीर मेघे यांच्या प्रचाराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी 

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात भाजपाच्या उमेदवारांकडून प्रचाराचा श्रीगणेशा

 छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून भाजपाला तीन उमेदवार घोषित केले आहेत. औरंगाबाद पूर्व मधून अतुल सावे यांना उमेदवारी दिली आहे त्यांनी आपल्या प्रचाराच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवपूजेने केली. तर फुलंब्री मतदारसंघात भाजपाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या अनुराधा चव्हाण यांनीही देवपूजा करत देवदर्शन घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रचाराचा शुभारंभ केला. तिकडे प्रशांत बंब ग्रामीण भागात लोकांशी संवाद साधत आहेत..

Andheri East Vidhan Sabha : अंधेरी पूर्वतून मुरजी पटेल इच्छुक, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

अंधेरी पूर्वतून इच्छुक मुरजी पटेल हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला


भाजपकडून अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी भरला होता अर्ज


अर्ज भरल्यानंतर पक्षाने सांगितल्याने घेतली होती माघार


शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके याठिकाणी आमदा


 लोकसभा निवडणुकीत याठिकाणी महायुतीला मिळाले होते मताधिक्य

आमदार राजेश विटेकर विधानसभेच्या रिंगणात? पाथरीतून अजितदादांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता

आमदार राजेश विटेकर विधानसभेच्या रिंगणात?


आमदार राजेश विटेकर अजित पवारांना भेटण्यासाठी देवगिरी निवासस्थानी पोहचले


राजेश विटेकर स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो


पाथरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची शक्यता


सूत्रांची माहिती

मनसेच्या नेते आणि मुंबईतील विभागप्रमुखांची आज महत्त्वाची बैठक

मनसेच्या नेते आणि मुंबईतील विभागप्रमुखांची आज महत्त्वाची बैठक


बैठकितील नेते आणि विभागप्रमुखांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार


मनसेच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी आज येण्याची शक्यता

काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागावाटपाचा संघर्ष शिगेला, विदर्भातील काँग्रेस नेते दिल्लीत ठाण मांडून 

- कॅाग्रेस आणि ठाकरे गटातील जागावाटपाचा संघर्ष 


- विदर्भातील कॅाग्रेस नेते दिल्लीत ठाण मांडून 


- ठाकरे गटाने दावा केलेल्या १२ जागांपैकी एकंही जागा कॅाग्रेस सोडायला तयार नाही 


- सुनील केदार, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, संगिता तलमले, उमेश डांगे दिल्लीत दाखल  


- विदर्भातील जागा न सोडाव्या, यासाठी कॅाग्रेस नेते हायकमांडकडे मागणी करणार

Dindori Vidhan Sabha Constituency : दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा
-
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यां जागेवर शिवसेने केला दावा
-
महायुतीत दिंडोरीची जागा शिवसेनेला मिळावी या मागणीसाठी माजी आमदार धनराज महाले आणि समर्थकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
-
दिंडोरी विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढण्यासाठी धनराज महाले आहेत इच्छुक
-
इगतपुरी विधानसभा ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस कडे जाणार असल्यानं दिंडोरी च्या जागेवर शिवसेनेचा दावा

उमेदवारी न मिळाल्याने पाचपुतेंच्या डोळ्यात अश्रू

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक विधानसभा मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे...अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू  पाहायला मिळाले...मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे, पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे असं म्हणत पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली... सोबतच सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे...मात्र भाजपचे चिन्ह कार्यालयातून हटवताना त्यांना भरून आल्याचे त्यांनी सांगितले... तसेच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे...सुवर्णा पाचपुते यांच्याशी बातचीत केलीये आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी.

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी सकाळी 11 वाजेपर्यंत जाहीर होणार

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी लवकरच जाहीर होणार


 सकाळी ११ वाजेपर्यंत पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात महायुती (MahaYuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) या दोन्ही युतींमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपले जागावाटप जाहीर करणार आहे. तर महायुतीचेही जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावे आहेत. या पहिल्या यादीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नाव आहेत. त्यामुळे आज राज्यात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर....

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.