Maharashtra News Live Updates : मविआमधील धुसफुस कायम, विदर्भातील जागांवर अजूनही रस्सीखेच सुरूच, सूत्रांची माहिती

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 20 Oct 2024 12:27 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्या विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhan Sabha Election 2024) राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) यांच्यात स्वतंत्रपणे जागावाटपावर चर्चा होत आहे. या दोन्ही...More

गेवराई विधानसभा मतदारसंघातून वंचितचा उमेदवार जाहीर, मराठा उमेदवारासमोर ओबीसी चेहरा देऊन वंचितची खेळी

बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने पहिली उमेदवारी जाहीर केलीय. प्रियंका खेडकर या वंचितच्या उमेदवार असून त्यांनी आज प्रचाराला चकलांबा गावातून सुरुवात केलीय. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर प्रामुख्याने दिसून आला होता. आता विधानसभा निवडणुकीत देखील ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष अटळ असणार आहे. 


गेवराई विधानसभा मतदारसंघात पंडित आणि पवार या दोन राजकीय कुटुंबात सत्ता राहिलेली आहे. आता अशातच प्रस्थापितांविरोधात नवे चेहरे दिले जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर विधानसभा निवडणुकीचे समीकरण बदलले आहे. अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित, महाविकास आघाडी कडून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच वंचितने उमेदवार दिला आहे. प्रियंका खेडकर या सध्या चकलांबा गावच्या विद्यमान सरपंच आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच गेवराई मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे. पवार आणि पंडित या दोघांविरोधात वंचित ने ओबीसी चेहरा देऊन त्यांना आव्हान दिले आहे.