Maharashtra News Live Updates : आज दुपारी तीन वाजता ट्रायडेंट येथे महाविकास आघाडीची अंतिम बैठक 

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 19 Oct 2024 12:21 PM
आज दुपारी तीन वाजता ट्रायडेंट येथे महाविकास आघाडीची अंतिम बैठक 

आज दुपारी तीन वाजता ट्रायडेंट येथे महाविकास आघाडीची अंतिम बैठक 


 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत  यांच्यामधील वाद  मिटला असल्याची रमेश चेन्नीथला  यांची माहिती


नाना पटोले यांच्या नेतृत्वातच काँग्रेस  आज महाविकास आघाडीतल्या जागावाटप फायनल करेल...


काही मोजक्या जागांवर तिढा आहे तो या बैठकीत सोडवला जाईल

काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक, ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या वादावर चर्चा होणार

शिवसेनेसोबत टोकाचा विवाद असलेल्या जागांसह इतर विषयांवर आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबई येथे बैठक…


प्रभारी रमेश चेन्नीथला सह वरिष्ठ निरीक्षक अशोक गहलोत, भूपेश बघेल, सचिन पायलट, टीएस सिंहदेव, सय्यद नासिर हुसेन सह काँग्रेसचे जेष्ठ नेते मुकुल वासनिक, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात व इतर नेते उपस्थित राहणार आहे.

Mumbai Assembly Election : मुंबईत शिवसेना शिंदे गट 15 जागांवर निवडणूक लढणार, सूत्रांची माहिती

मुंबईत शिवसेना शिंदे गट 15 जागांवर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती


काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एकूण 17 जागांवर शिवसेनेने निरीक्षक नेमले होते 


आता या 17 पैकी 15 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती 


तर उर्वरित जागा भाजप आणि अजित दादा यांना देण्यात येणार 


मुंबईतील संभाव्य फॉर्म्युला
भाजप 17 किंवा 18 जागा
शिवसेना 15 जागा
एनसीपी अजित पवार गट 3 किंवा 4 जागा


अश्या प्रकारे महायुतीचा मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला असण्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती

सिल्व्हर ओकला इच्छुकांची गर्दी, तिकीट मिळावे म्हणून कसोशीने प्रयत्न

सिल्व्हर ओकला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्रीगोंदा विधानसभेसाठी इच्छुक साजन पाचपुते, माढा विधानसभेसाठी इच्छुक अभिजित पाटील, मोहोळ विधानसभेसाठी इच्छुक रमेश कदम आले आहेत. रोहित पवार देखील सिल्व्हर ओकला आले आहेत

मुंबई महापौर केसरी स्पर्धा विजेते पैलवान आबा काळे यांचा काह क्षणांत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश  

मुंबई महापौर केसरी स्पर्धा विजेते पैलवान आबा काळे यांचा काही वेळातच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश 


काळे यांच्यासह अन्य पैलवान देखील करणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश 


तसेच कुस्तीगीर पैलवानांच्या जीवनावर आधारीत 'पैलवान' गाण्याचं पोस्टर आणि ऑडिओचं होणार अजित पवारांच्या हस्ते लाँच

राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी सिद्दिकींचा पोलीस सुरक्षा रक्षक निलंबित 

राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी सिद्दिकींच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला करण्यात आल निलंबित 


प्राथमिक चौकशीत बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कॉन्स्टेबल कडून चूक झाल्याचं निष्पन्न झाल्याने करण्यात आली कारवाई


कॉन्स्टेबल शाम सोनावणे यांना करण्यात आल निलंबित


फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी गोळीबार केल्याचा सोनावणे यांचा दावा 


बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची देण्यात आली होती सुरक्षा

Gold Rate Today : दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव 80 हजारांवर जाण्याची शक्यता 

दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव ८० हजारांवर जाण्याची शक्यता 


सोन्याच्या भावात मागील दोन दिवसात मोठी वाढ झाली आहे 


सोन्याचा भाव प्रति तोळा ७९ हजार ४०० वर पोहोचला आहे 


मध्य पूर्वेतील भूराजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या भावा मोठी वृद्धी होताना दिसत आहे

Vikramgad Vidhan Sabha Election : विक्रमगड जागेवर शिंदे गटाच्या वैष्णवी राहणे यांचा दावा, निश्चित जिंगण्याचा विश्वास

पालघर : पालघरच्या विक्रमगड विधानसभेवर आता महायुतीच्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दावा केला जातोय . पालघर जिल्हा शिवसेनेच्या महिला संघटिका आणि जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी राहणे यांनी विक्रमगड विधानसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे . विक्रमगड विधानसभेवर सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुनील भुसारा हे आमदार असून ही जागा शिवसेना शिंदे गटाने लढवल्यास आपण ही जागा निश्चितच जिंकू असा विश्वास देखील राहणे यांनी व्यक्त केला आहे . तसंच मागील अनेक वर्षांपासून आपण उमेदवारीसाठी इच्छुक असून यावेळी आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी मागणी देखील राहणे यांनी केली आहे .

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धूम चालू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण झालेले असून मोजक्याच जागांचा प्रश्न कायम आहे. लवकरच हा प्रश्न निकाली निघणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागावाटप प्रगतीपथावर आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात जागावाटपाच्या मुद्द्यावरून काही मतभेद असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र लवकरच आम्ही आमचे जागावाटप पूर्ण करू असे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सांगत आहेत. दुसरीकडे तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत. या सर्व घाडमोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर.... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.