Maharashtra News Live Updates: संवर्धनाचे काम सुरु असलेल्या विठ्ठल मंदिरात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी झिरपू लागले पाणी , प्रशासनाचा खुलासा 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर"

ज्योती देवरे Last Updated: 10 Jun 2024 05:16 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : मुंबई, पुण्यासह मान्सून राज्यात दाखल झाला आहे. रविवारी संध्याकाळी मुंबईत विविध ठिकाणी संध्याकाळपासून पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. तर राज्यातील विविध भागात काही ठिकाणी मध्यम...More

Pandharpur : संवर्धनाचे काम सुरु असलेल्या विठ्ठल मंदिरात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी झिरपू लागले पाणी , प्रशासनाचा खुलासा 
विठ्ठल मंदिरात सध्या संवर्धनाचे काम सुरु असताना गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पाण्याची गळती सुरु झाली असून कामे पूर्ण झाल्यावर या सर्व अडचणी दूर होतील असा दावा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केला आहे . सध्या मंदिरात ठिकठिकाणी दुरुस्तीची कामे सुरु असून अजून ही कामे दीड ते दोन वर्षे चालणार आहेत . मात्र गेले चार दिवस पंढरपूर परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मंदिरातील काही भिंतीवर पाणी झिरपू लागल्याचे समोर आले आहे . अजून मंदिराची कामेच झालेली नसल्याने छताचे पूर्ण काम झाल्यावर वॉटर प्रूफिंगची कामे केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले .