Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर... ...More
मोदींचं गंगास्नान ते मतदानापूर्वी केंद्राचं बजेट, आम आदमी पक्षाचे सर्वात मोठे 3 आक्षेप
१) गंगा स्नान करुन धार्मिक ध्रुवीकरण - मतदानादिवशी मोदींनी गंगास्नान करुन मीडियाचं लक्ष केंद्रित केलं, धार्मिक ध्रुवीकरण केलं
२) १ फेब्रुवारीला बजेट, त्यानंतर मतदान- निवडणूक आयोगाने बजेटपूर्वी मतदान का घेतलं नाही, १२ लाख उत्पन्न टॅक्स फ्री, यामुळे केंद्र सरकारचं परसेप्शन बनवण्यात निवडणूक आयोगाने मदत केली
३) आठवा वेतन आयोग जाहीर केला, मतदानादिवशी भाजपची सगळ्या वर्तमानपत्रात अॅड आली, एकप्रकारे केंद्राचं कौतुक होतं
हा अनफेअर गेम आहे - आप प्रवक्ते
संभाजी भिडे गुरुजींच्या धारातीर्थी यात्रेसाठी येणाऱ्या धारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात ...
अपघातात 20 धारकरी जखमी ....
संभाजी भिडे गुरूजी यांची रायगड जिल्ह्यांत सुरू आहे धारातीर्थ यात्रा...
सांगली सातारा वरून पोलादपूर कडे येत असताना आंबेनळी घाटात पिक अप टेम्पो पलटी.
जखमींवर पोलादपूर शासकिय रुग्णालयात उपचार
गिरीश महाजन ऑन दिल्ली विजय
27 वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस
27 वर्षापासून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदापासून व सत्तेपासून आम्ही दूर होतो मात्र यावेळी जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिला आहे.
70 पैकी 40 च्या वर जागा दिल्लीमध्ये भाजपाच्या आलेल्या आहेत
दिल्ली ही देशाची राजधानी आहे व राजकारणाचे मुख्य केंद्र आहे
दिल्लीच्या विजयामुळे संपूर्ण देशात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उत्साहाची लाट आलेली आहे
सर्व दिल्लीकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्या आभार मानतो
गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी यांची सत्ता दिल्लीमध्ये होती
लोकांना सर्व मोफत अशा भूल ताफा द्यायच्या मात्र प्रत्यक्षात या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचल्या नव्हत्या
हा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला
त्यामुळे केजरीवालांना यावेळी दिल्लीत हार पत्करावी लागली
दिल्लीतील विजयाचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश अतिशय पुढे चाललेला आहे म्हणून जनतेचा विश्वास आता भारतीय जनता पार्टीवर आहे
अण्णा हजारे ऑन दिल्ली इलेक्शन
अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीला चांगली कामे केली मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली. दारूचे मोठ्या प्रमाणात लायसन दिले गेले त्यामुळे सामान्य नागरिकांनी आता त्यांना नाकारल्याचं दिसत आहे आज जो कौल आपल्याला पाहायला मिळतो आहे तो दारूच्या दुकानांना दिलेली लायसन्स आणि त्यातून मिळालेले पैसे याचा परिणाम असल्याचं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे
बाईट- अण्णा हजारे ,जेष्ठ समाजसेवक
पुणे जिल्हा हादरला, जन्मदात्या आईनेच घेतला दोन चिमुकल्यांचा बळी, झोपेतच गळा दाबून केली मुलांची हत्या, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील धक्कादाय घटना
दौंड पोलिसांनी आरोपी महिलेला घेतलं ताब्यात
एका महिलेने चक्क आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केलीये. यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केलेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी या आरोपी कोमल दुर्योधन मिंढे या 30 वर्षीय महिलेला ताब्यात घेतलं आहे. शंभू दुर्योधन मींढे वय 1 वर्ष आणि पियू दुर्योधन मींढे वय 3 वर्ष अशी मयत मुलांची नावे असून या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मींढे वय 35 वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केल आहे. पती-पत्नीच्या वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्या माहिती मिळत आहे. आज पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनिवर अत्याचार
13 वर्षाच्या विद्यार्थिनींवर अत्याचार
मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि त्याला मदत करणाऱ्या वर्गशिक्षक ला पोलिसांनी केली अटक
वर्गशिक्षक जोशी याने विद्यार्थिनीला मुख्याध्यापककडे जाण्यास सांगितल्याची प्राथमिक माहिती
शिक्षकी पेशला काळिमा फासणारी घटना
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा देखील महत्वाचा होता. भाजपच्या दिल्ली दिग्विजयानंतर जय श्री रामचे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्ते भाजप कार्यालयात पोहचले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीनी…
पुनीत जी, अध्यक्ष, ऑटो महासंघ
- हे रामाचे सरकार आहे
- हे रामभक्तांचे सरकार आहे
- सनातनचा अपमान केजरीवालने केला
- राजतिलक की करो तयारी आ रहे है भगवाधारी
- जो राम का नहीं वो किसी काम का नहीं
बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन येथे 2 दिवसीय आनंदवन मित्रमेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे. आज आणि उद्या या निमित्ताने अनेक कार्यक्रम परिसंवाद चर्चा आयोजित करण्यात आलेले आहे आज सकाळी वृक्षदिंडीने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली या वृक्ष दिंडीला ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे विकास आमटे आणि माजी राज्यपाल राम नाईक यांच्यासह राज्यातील अनेक गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते. बाबा आमटे यांनी वरोरा तालुक्यातल्या आनंदवन येथे सुरू केलेल्या महारोगी सेवा समिती मुळे लाखो वंचितांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली आणि त्यांचा हा सेवा प्रकल्प तिसऱ्या पिढीच्या हाती आपलं मार्गक्रमण करत आहे. यावेळी बोलताना कौस्तुभ आमटे यांनी आनंदवन चा 75 वर्षांचा प्रवास उलगडत पुढील 25 वर्षासाठी आपण काय करू शकतो यासाठी आनंदवनचे स्नेही, आर्थिक मदत देणारे आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन दिशा ठरवली जाणार असल्याचं सांगितलं.
शिर्डीत पोलिसांचं कोंबींग ऑपरेशन सुरू असतानाही मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोड्या...
शिर्डीतील संतनगर परिसर आणि साई कुटीर निवास परिसर आंध्रा गल्ली येथे दोन घरांची कुलूप तोडून चोरट्यांनी केला लाखोंचा ऐवज लंपास...
शिर्डीतील संतनगर परिसरातील चोरट्यांचा पळतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कैद...
दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना शिर्डीत चोरट्यांची दहशत...
दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. मतमोजणी अजूनही सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलं आहे की,जनता भाजपबरोबर आहे.
देशाने यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून स्वीकारला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही…
आमदार चित्रा किशोर वाघ*
भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष
जालना - मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद
आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहे..
राज्यातील मराठे कणखर पने लढाई लढणार..
आज 12 -13 दिवस झाले..
देवेंद्र फडणीस यांचा सुरेश धस यांनी मार्फत निरोप दिला होता की , आम्ही तात्काळ मागणी मान्य करू मात्र आज 13 दिवस झाले
आज 12-13 दिवस झाले , देवेंद्र फडणवीस यांचा निरोप सुरेश धस यांनी दिला होता आणि म्हणाले मागण्या तात्काळ मान्य करू....
पण अजून शिंदे समिती सक्रिय केली नाही,प्रक्रिया अजून सुरू केली नाही
गॅजेट सुद्धा घेतलं नाही,
Sebc चा विषय होता त्याचा निर्णय आजुन घेतला नाही
उपोषण सोडू पर्यंत हे करत आहेत का
सरकार जाणून बुजून फसवणूक करायला लागलं ....
15 तारखेपासून आम्ही अंतरालीसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू करतो....
याची दखल घेतली नाही तर आमरण करू असं जरांगे म्हणाले.
गरिबांच्या मुलाला चाल काढून केस काढत आहे त्यांच्यावरील.
पण फडणविस आता हे चालणार नाही.
धनंजय मुंडे यांच्यासारखी तुझी जी टोळी आहे...तिला पण फिरू देणार नाही. असेही ते म्हणाले.
Hingoli News:कृषी विभागाच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक प्रकार उघड
राज्यभरामध्ये बोगस पीक विम्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हिंगोली जिल्ह्यांमध्ये सुद्धा कृषी विभागाच्या वतीने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये 1800 शेतकऱ्यांनी ४५०० हेक्टर वर बोगस पिक विमा भरल्याचं उघड झाल आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हे बाहेरील जिल्ह्यातील आहेत तर काही शेतकऱ्यांनी तर शासकीय जमिनीवरच पिक विमा भरला आहे तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीची अभिलेखात नोंदच नाही अशा जमिनीवर सुद्धा पिक विमा भरण्यात आला आहे त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे हा पिक विमा कोणत्या ग्राहक सेवा केंद्रावरून भरला आहे त्याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे त्यानंतर त्या ग्राहक सेवा केंद्र वर काय कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचा आहे
संजय राऊत
दिल्लीत देखील महाराष्ट्र पॅटर्न लागू, महाराष्ट्रात जे घृणास्पद कृत्य केले त्याला expose काल राहुल गांधी यांनी केले,
40 मतदान जास्त झाले महाराष्ट्रात, हे वाढलेले मतदान आले कुठेउन याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाहीत,
हे वाढलेले मतं भाजपला गेली, इथून दिल्लीला वळवण्यात आली तर हीच मते बिहार मध्ये वळवण्यात येणार आहेत,
एकच पॅटर्न सगळीकडे सुरू आहे,
दिल्ली मध्ये जागोजाग पैसे वाटत होते, पोलिसांना सूचना होत्या की केस घ्यायची नाही, असे आदेश अमित शहा यांचे होते, अशी निवडणूक कधी झाली नाही, हार जीत होत असते,
देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय मुद्द्यांची जाण नाही, त्यांना दिल्लीत काम करायधे आहे पण अमित शहा असे पर्यंत त्यांना तिकडे काम करायला मिळणार आहे का ?
राहुल गांधी यांनी लोकसभेत हेच मुद्दे पंतप्रधान यांच्या समोर मांडले होते, त्यांचा चेहरा तेव्हा काळा पडला होता, कदाचित त्यांना भ्रम निर्माण झाला असेल,
देवेंद्र ji यांनी राष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास करायला हवा, काही योगायोग असतात, हा frod योगायोग आहे, ते फ्रॉड योगायोगाने मुख्यमंत्री झाले आहेत
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेसाठी जात असताना धारकऱ्याचा अपघात
21 धारकरी असलेली पिकअप महाबळेश्र्वर मार्गे उमरठ येथे येत असताना पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे आंबेनळी घाटातील कुंभळवणे फाटा येथे पलटी झाली
पिकअप मधील 15 धारकरी जखमी झालेले असुन 6 धारकरी यांना किरकोळ दुखापत झालेली असून 15 जखमींवर ग्रामीण रुग्णालय महाड येथे उपचार सुरू
सर्व जखमी हे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील 2 कोळसा खाणींना केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने दिली स्थगिती... वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या प्रयत्नांना धक्का, दुर्गापूर ओपनकास्ट व साखरी-इरावती या दोन्ही खाणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व तेलंगणाच्या कागल व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र भ्रमण मार्गात येत असल्यामुळे घेण्यात आला हा निर्णय, दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीसाठी ८०.७७ हेक्टर वनजमीनच्या लीजचे नूतनीकरण आणि साखरी-इरावतीच्या १२.०७ हेक्टर वनजमिनीला परिवर्तित करण्याचा केंद्र सरकार कडे पाठविण्यात आला होता प्रस्ताव, मात्र वाघांचे भ्रमणमार्ग असल्याने दोन्ही प्रस्तावांना दिली स्थगिती
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते - दिल्ली निकाल -
- आनंदाची बाब आहे, गेले दहा वर्ष ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये केजरीवालांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासामध्ये एक बाधा ठरणारा होता
- राज्य चालवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो प्रयत्न आम्हाला विकास आणि प्रगती मध्ये अडकाठी टाकणार आहे
- तेलंगणा, आंध्र आणि नंतर दिल्लीत हे मतदारांनी सांगितला आहे की देशाच्या प्रगतीचा संकल्प करणारा, इकॉनॉमी च्या निश्चय करणारा असा पक्ष निश्चित विजय झाला पाहिजे
- आता देशाची राजधानी दिल्ली हे प्रगतीपथावर जाईल आणि केजरीवाला यांनी असत्याचा सत्य करण्याचा प्रयत्न केला तो जनतेने समर्पक उत्तर मतदारांनी दिले आहे
- दिल्ली जिंकलो तर देशाही जिंकणार, बिहारवर याचा परिणाम होईल, बिहार मध्ये मोठ्या प्रमाणात नितेश कुमार यांच्या जागा निवडून येतील
एप्रिलमध्ये घरे जमीनही महागणार
एक एप्रिल पासून रेडी रेकनर दरात दहा टक्के वाढ
घराचे स्वप्न अजून महागणार
राज्य सरकारने एक एप्रिल पासून रेडी रेकनेर दरात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे .या पार्श्वभूमीवर नवीन फ्लॅट जमीन किंवा दुकानाची खरेदी एप्रिल पूर्वी करणे कायदेशीर ठरणार आहे. कारण या नव्या दरवाढीमुळे फ्लॅट आणि प्लॉटच्या किंमती देखील वाढणार आहे..
अवैधरीत्या दारू तस्करी आणि बनावट दारू विविध कारवाईतील एक कोटी 81 लाखाचा मुद्देमाल पोलीस प्रशासनाने केला नष्ट.....
नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमा वरती भागात असल्याने गुजरात मध्ये दारूबंदी असल्याने मोठ्या प्रमाणात होते दारू तस्करी
गेल्या काही महिन्यात पोलिसांनी जप्त केलेला अवैध दारू साठा न्यायालयाच्या परवानगीने केला नष्ट
दारूच्या बाटल्स मोकळ्या मैदानात टाकून त्यावर फिरविला बुलडोजर...
एकाच दिवशी जिल्ह्यातील तेरा पोलीस स्टेशन हद्दीतील न्यायालयाने परवानगी दिलेल्या मुद्देमाल केला नष्ट ..
गुहागर मध्ये सापडला कातळ खजिना.
गुहागर मधील रानवी येथील कातळसड्यावर एक दोन नव्हे तर तब्बल सहा कातळशिल्प.
पुण्यातील अभ्यासकांच्या माध्यमातून आढळून आलेल्या कातळशिल्पांचा अभ्यास सुरू.
सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या तीन सदस्यांना जंगल भ्रमंती करताना आढळून आले सहा कातळ शिल्पे.
पुणे पोलीस राबवणार गुन्हेगार दत्तक योजना
गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा निर्णय
शहरातील गुन्हेगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या गुन्हेगारी समाजविघातक कारवायांना चाप लावण्याच्या उद्देशाने शहर पोलिसांनी गुन्हेगार दत्तक योजना तयार केली आहे.
या अंतर्गत पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यावर काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याच्या यादीतील गुन्हेगाराच्या हालचाली तपासणी,त्यांच्या घरी भेट देणे किंवा त्याला ठाण्यात बोलून तपासणी करणे अधिक गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत.
या बैठकीत दत्तक योजनेसह वाहन तोडफोडच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना जरब बसवण्याच्या आदेश पोलिसांना दिले.
गुन्हेगारावर एम पी डी ए,तडीपारी,मकोका अंतर्गत कारवाईचे अदिशी सहायुक्तांनी पोलिसांना दिले आहेत.
पुणे शहरात गेले काही दिवसात वाहनांची तोडफोड घटना घडल्या आहेत.या प्रकरणाची पालकमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन पुणे पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.या घडामोडीनंतर पुणे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी एक बैठक घेतली .
Nagpur News : वाडी पोलिसात कार्यरत हवालदाराची आर्थिक तणावातून राहत्या घरी आत्महत्त्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. हेमराज ज्ञानेश्वर जीचकर असं मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्लॉट खरेदी केला असताना रजिस्ट्रीजवळ येऊन पैशांची जुळवा जुळव होत नसल्याने ते आर्थिक तणावात होते. शुक्रवारी साप्ताहिक रजा असताना घरात पत्नी मुलगा, मुलगी, बाहेर गेले असतांना घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. वाडी पोलिसात कार्यरत असून घर गिट्टीखदान पोलिसात घर असल्यानं घटनेची नोंद करण्यात आली.
शिवसेना उबाठा गटाने पुणे पोलिस आयुक्तांकडे सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
निवेदन पत्र देऊन केली गुन्हा दाखल करण्याची मागणी.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करून सामाजिक अशांतता पासरविणार्या अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उबाठा गटाची मागणी
उबाठा शिवसेनेने राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर गेल्या होत्या तीव्र आंदोलन
राहुल सोलापूरकर याने एका पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी अनेकांना लाच दिली होती. असे वक्तव्य केले असून ह्या वक्तव्यामुळे शिवप्रेमी जनतेमधील प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
राहुल सोलापूरकर याच्यावर सामाजिक तेढ निर्माण करणे, महापुरुषांचा अपमान करणे, सामाजिक सलोखा बिघडविणे, ह्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा.अशी मागणी केली आहे.
तसेच सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी अशी व्यवस्था आपल्या मार्फत व्हावी.अन्यथा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या सन्मानार्थ सोलापूरकरला अटक होउन गुन्हे दाखल करेपर्यंत सातत्याने आंदोलनं करावे लागेल असा इशारा देण्यात आलाय.
Mumbai News: उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिवंडीत माजी उप महापौर व ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांनी विशेष कार्यक्रमाचे 8 फेबूरवारी सकाळी आयोजन करून साजरा केला .यामध्ये भिवंडी शहरातील 20 शाळांमधील 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 108 सूर्यनमस्कार घालत हा वाढदिवस साजरा केला आहे.
विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून देत असताना सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे यासाठी पतंजली योग संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरातील 20 खाजगी व मनपा शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी उप मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.स्व. मोतीराम काटेकर क्रीडांगणावर आयोजित या कार्यक्रमात पतंजली संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
नागपूर
- वाडी पोलिसात कार्यरत हवालदाराची आर्थिक तणावातून राहत्या घरी केली आत्महत्त्या
- हेमराज ज्ञानेश्वर जीचकर असं मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव..
- प्लॉट खरेदी केला असतांना रजिस्ट्री जवळ येऊन पैश्याची जुळवा जुळव होत नसल्याने होता आर्थिक तणावात
- शुक्रवारी साप्ताहिक रजा असताना घरात पत्नी मुलगा, मुलगी, बाहेर गेले असतांना घरात गळफास घेऊन आत्महत्या.
- वाडी पोलिसात कार्यरत असून घर गिट्टीखदान पोलिसात घर असल्यानं घटनेची नोंद करण्यात आली..
Maharashtra News : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेसाठी जात असताना धारकऱ्याचा अपघात झाला आहे. 21 धारकरी असलेली पिकअप महाबळेश्र्वर मार्गे उमरठ येथे येत असताना पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे आंबेनळी घाटातील कुंभळवणे फाटा येथे पलटी झाली. पिकअप मधील 15 धारकरी जखमी झालेले असून 6 धारकरी यांना किरकोळ दुखापत झालेली असून 15 जखमींवर ग्रामीण रुग्णालय महाड येथे उपचार सुरु आहेत.
Sangli News : सांगलीत कृष्णामाई महोत्सवात कृष्णा नदीला साडी नेसवत कृष्णा नदीची पूजा करण्यात आली. यावेळी कृष्णा नदीवरील सरकारी घाट आणि आयर्विन पुलाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. यावेळी कृष्णामाईची ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. सांगली महापालिका, गणपती पंचायतन संस्थान ट्रस्ट आणि कृष्णामाई महोत्सव समितीच्यावतीने सरकारी घाटावरील कृष्णामाई मंदिरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Beed News : बीडच्या केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेत मुंदडा यांच्यासह सर्व उमेदवार आणि निवडणूक आयोगास नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत.
नमिता मुंदडा यांनी भाजपाकडून विजयी मिळवला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी निवडणूक लढविली होती. पराभव झाल्यानंतर साठे यांनी खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मागणी करूनही फॉर्म 17 सीची प्रत त्यांनी दिली नाही. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडीओ शूटिंग, सीसीटीव्ही फुटेज मागणी करूनही दिले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवाराला झुकते माप दिले. केज विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने कुठलेही नोटिफिकेशन काढले नाही. या बाबी निदर्शनास आल्या त्या अनुषंगाने खंडपीठाची ही नोटीस आहे.
Mumbai News : मराठी भाषा विभागाअंतर्गत 2024 करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्थेसाठी 2024 चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 हा डॉ. रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री. मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धन पुरस्कार 2024 हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे.
Maharashtra News Updates : वसई-विरार शहराला सूर्या धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला आज पहाटे 3 वाजता वसईच्या नवघर पूर्व ब्रिजजवळ गळती झाली आहे. त्यामुळे आचोळे मधील एव्हरशाईन, वसंत नगरी, आचोळा टाकी, मधूबन, नवघर पूर्व, नायगाव पश्चिम आणि न्यू परेरा नगर या भागांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या पथकाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून, अंदाजे 10 ते 12 तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरम्यान या भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
Dharashiv : धाराशिवमध्ये 2274 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकी अगोदरपासून 9000 अर्ज प्रलंबित होते. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या अटीत न बसणारे मंजुरी न मिळालेले अर्ज फेटाळण्यात आले आहेत. इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची तपासणी मोहीम सध्या सुरु आहे. चारचाकी वाहन असलेल्या, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात चार लाखांहून अधिक अर्ज मंजूर झाले आहेत. मंजुरी मिळालेल्या अर्जांची राज्यस्तरावरून तपासणी होणार आहे. तर दहा महिलांचं अनुदान बंद करण्यासाठी अर्ज, दोन बहिणींनी संपूर्ण अनुदान जमा केल्याची माहिती मिळतेय.
Maharashtra News : राज्यभरामध्ये बोगस पीक विम्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्येसुद्धा कृषी विभागाच्या वतीने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये 1800 शेतकऱ्यांनी 4500 हेक्टरवर बोगस पिक विमा भरल्याचं उघड झालं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हे बाहेरील जिल्ह्यातील आहेत तर काही शेतकऱ्यांनी तर शासकीय जमिनीवरच पिक विमा भरला आहे तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीची अभिलेखात नोंदच नाही अशा जमिनीवरसुद्धा पिक विमा भरण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा पिक विमा कोणत्या ग्राहक सेवा केंद्रावरून भरला आहे त्याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. त्यानंतर त्या ग्राहक सेवा केंद्रावर काय कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे.
Mumbai : केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या आणि निरुपयोगी वाहनांचे 'स्क्रॅपिंग' अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकूण 6 नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.
वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करताना संबंधित वाहनधारकास एकूण कराच्या 10 टक्के सूट दिली जाणार आहे.
Delhi Assembly Election Results 2025 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेचा (Delhi Assembly Election Results 2025) आज निकाल लागणार आहे. दिल्ली कोणाची यासाठी 5 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. आता आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी कांटे की टक्कर झालीय. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची आप हॅटट्रीक साधणार की भाजप आपचा वारू रोखणार असा सवाल दिल्लीकरांसह संपूर्ण देशाला पडला आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...