Maharashtra News Live Updates : राज्यातील महत्त्वांच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Oct 2024 10:27 AM
Repo Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, कोणताही बदल नाही

Repo Rate : सलग दहाव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही.  फेडकडून व्याजदरात कपात केल्यानंतर आरबीआयकडून देखील कपात करण्यात येईल अशी अपेक्षा होती . मात्र, आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्याने व्याजदर जैसे राहणार  आहे. दिवाळी आधी सर्वसामान्यांच्या ईएमआयमध्ये घट होणार नसल्याने कोणताही दिलासा नाही. २०२४-२५ मध्ये आर्थिक विकास दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज  आहे.  याआधी देखील पतधोरण जाहीर करताना आर्थिक विकास दर ७.२ टक्केच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता 

Nanded News: नायगाव मतदारसंघात भाजप इच्छुकांमध्ये कलगीतुरा

Nanded News:  नांदेडच्या नायगावचे भाजप आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार आणि याच मतदार संघातील भाजपचेच इच्छुक उमेदवार कवळे गुरुजी यांच्यात चांगलाच कलगी तुरा रंगलाय.  एकाही विद्यार्थ्याला न शिकवता त्यांनी शासनाचा पगार घेतला, खतं, तसंच त्यांनी 80 लाखांची वीज चोरी केल्याचा आरोप पूनम पवार यांनी कवळे गुरुजींवर केलाय. कवळे गुरुजी यांनी पूनम पवार यांनी केलेले आरोप फेटाळले असून त्या अर्धवट माहितीवर आरोप करीत असल्याचा टोला लगावला. पवार यांना एक कारखाना चालवता आला नाही, आम्ही बंद पडलेले कारखाने सुरू केले. असा पलटवार मारोती कवळे गुरुजींनी केलाय. 

पार्श्वभूमी

आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती, जो निर्णय घेतला तो पवार साहेबांना विचारुन आणि संमतीनेच, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. बारामतीतल्या डॉक्टर मेळाव्यात ते बोलत होते. तसंच सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी आधी मान्य केली होती आणि आताही मान्य करतो, असा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.