= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, आजचे सर्व कार्यक्रम रद्द CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तब्येत बरी नसल्याने कारणाने मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. सोलापूर दौरा आणि राज्यमंत्री मंडळाची बैठकही रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेय
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mhada Lottery: थोड्याच वेळात म्हाडाच्या घरांची सोडत निघणार Mhada Lottory: थोड्याच वेळात म्हाडाच्या घरांची सोडत निघणार आहे. मुंबईतील 2030 घरांसाठी मुख्यमंत्री यांच्या हस्ते निघणार सोडत निघणार आहे. या सोडतीसाठी 1 लाख 5 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन उपस्थित असणार आहेत. तर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbai Heat : ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण; ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ Mumbai Heat : ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण झालेत.. तापमान वाढल्याने मुंबईत उकाडा जाणवत आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकल्याच्या संसर्गाने मुंबईकर हैराण झाले आहेत. ऑक्टोबर हिटचा आरोग्याला त्रास होतं असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. संसर्गात ताप, सर्दी कमी झाली तरी खोकला राहतोच. शिवाय अशक्तपणाही बरेच दिवस राहत असल्याच्याही तक्रारी आहेत. काही रुग्णांना न्यूमोनियाचाही त्रास झाल्याचे दिसते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Suresh Kusale : स्वप्नील कुसाळेची राज्य सरकारने चेष्टा केली, वडिलांची खंत Suresh Kusale : ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेची राज्य सरकारने चेष्टा केल्याची खंत स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळेंनी बोलून दाखवली... कारण राज्य सरकारने जाहीर केलेलं बक्षीस अतिशय तोकडे असून विजयानंतर दोन महिन्यांनी बक्षीस जाहीर करण्यात आल्यानं त्यांनी नाराजी दर्शवलीय. नेमबाजांसाठी सरकार इतकं उदासीन आहे असं माहिती असतं तर स्वप्नीलला या खेळाकडे पाठवलंच नसतं... असही सुरेश कुसाळेंनी सांगितलंय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Laxman Hake : मी जेव्हा उपोषणाला बसलो तेव्हापासूनच माझ्यावर पाळत, लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट Laxman Hake : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यावरून लक्ष्मण हाकेंनी लक्ष केलंय. शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून जरांगे स्वतची गादी निर्माण करत असल्याची टीका हाकेंनी केलीय. दरम्यान वडीगोद्री येथे दुसऱ्यांदा मी जेव्हा उपोषणाला बसलो तेव्हापासूनच माझ्यावर पाळत ठेवल्या जात असल्याचा गौप्यस्फोट लक्ष्मण हाके यांनी एबीपी माझा सोबत बोलताना केलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Buldhana News: समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसवर दगडफेक Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर बिबी गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसवर दगडफेक करण्यात आलीय. दगडफेकीत एका बसमधील चालकासह दोन प्रवासी जखमी झालेत. दगडफेक केल्यानंतर बस न थांबवल्याने दगडफेक करणारे फरार झाले. दोन किमी अंतरावर बस थांबवून चालकाने प्रसंगावधान राखत पोलिसांना फोन करून माहिती दिली.
जखमींवर समृद्धी रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी उपचार केलेत. दोन्ही बसेस नागपूरकडून मुंबईकडे जात होत्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अकोल्यातील दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत 50 संशयित ताब्यात, पोलिसांचं रात्रभर कोम्बिंग Akola News: अकोल्यातील हरिहरपेठ भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. काल रात्री अकोला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या भागात कोंबिंग ऑपरेशन राबत जवळपास 50 संशयितांना ताब्यात घेतलं. या संपूर्ण प्रकरणात एकूण चार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. काल या भागात क्षुल्लक कारणावरून दोन गटात जोरदार राडा झालाय. यामध्ये एका ऑटोसह चार दुचाकी जाळण्यात आल्या. या घटनेत चार जण जखमी झालेत. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक अमोल गोगे यांचा समावेश आहे. घटनेनंतर हरिहर पेठ भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Bhaskar Jadhav: आमदार भास्कर जाधव यांचा जाखडी नृत्यावर ठेका Bhaskar Jadhav : दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त आमदार भास्कर जाधव यांनी मुलगा विक्रांत जाधव यांच्यासोबत त्यांच्या मूळ गावी जाखडी नृत्यावर ठेका धरला. यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केलीये.