Maharashtra News Live Updates : बदलापूरच्या शाळेत मुलींच्या ब्ल्यू फिल्म बनवायचे, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 08 Nov 2024 01:38 PM
बदलापूरच्या शाळेत मुलींच्या ब्ल्यू फिल्म बनवायचे, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

बदलापूर येथील शाळेमध्ये लहान मुलीवर अत्याचारची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित असून या शाळेत लहान मुलींचे अश्लील चित्रफिती तयार करणे, अवयव विक्री करणे अशा पद्धतीचे उद्योग सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका जाहीर सभेत केला आहे. हा आरोप त्यांनी नांदेड येथील वाजेगाव येथील जाहीर सभेत केला आहे. आरएसएसशी संबंधित शाळा असल्यानेच सरकारने या शाळेवर मेहेरबानी दाखवल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे.   

महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा काळे झेंडे दाखवून निषेध 

पालघर - 


महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे पालघर उमेदवार राजेंद्र गावित यांचा काळे झेंडे दाखवून निषेध . 


प्रचार रॅलीसाठी गेलेल्या गावितांना मुरबे येथील ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवत केला निषेध . 


वाढवण बंदर विरोधात गावित यांनी आपली भूमिका बदलल्याचा स्थानिकांचा आरोप . 


काळे झेंडे दाखवत गावित यांची प्रचार रॅली रोखली .

मुलुंडमध्ये निष्काळजीपणामुळे पाच वर्षाच्या मुलाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

मुलुंड मध्ये निष्काळजीपणा मुळे एक पाच वर्षाच्या मुलाचा कार मध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे.कबीर अर्जुन कनोजिया असे या मृत्यू पावलेल्या पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. काल दुपारी हा मुलगा जवळील गॅरेज मध्ये खेळत होता. खेळता खेळता त्याने एक उभ्या असलेल्या  मोटर कार चा दरवाजा उघडून गाडीत  जाऊन बसला.गाडी आतून त्याला उघडता  आली नाही आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला.

घरकाम करणाऱ्या महिलेकडे आढळले 18 लाख रुपये

घरकाम करणाऱ्या महिलेकडे आढळले 18 लाख रुपये



बीडच्या अंबाजोगाईत पोलिसांच्या सतर्कतेने समोर आला प्रकार:  चौकशी सुरू


बीडच्या अंबाजोगाई मध्ये रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेच्या हातातील पिशवीची तपासणी केली असता तब्बल 18 लाख रुपये आढळून आले.. विशेष म्हणजे ही महिला घरकाम करणारी आहे.. निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी अंबाजोगाई मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत होते.. यादरम्यान शहरातील गुरुवार पेठ ते मंगळवार पेठ या रस्त्यावर जात असलेल्या एका महिलेला थांबवून पोलिसांनी चौकशी केली तसेच तिच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये पण 18 लाख रुपयांची रक्कम अजून आली.. फरजाना बाबाखान पठाण असं या महिलेचे नाव असून तिच्याकडे अधिक चौकशी पोलीस करत आहेत..

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे सोलापूर पोलिसांना निवेदन, विरोधकांकडून जीवितास धोका असल्याचा दावा

सोलापूर ब्रेकिंग --



मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे सोलापूर पोलिसांना निवेदन 


विरोधकांकडून जीवितास धोका असून पोलीस सारंक्षण मिळण्यासाठी कदम यांचे पोलिसाना पत्र 


दोन दिवसापूर्वी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी मोहोळ येथील दोघां आरोपीना पोलिसांनी अटक केलीय 


यातील एक आरोपी अटकेच्या आधी माजी आमदार रमेश कदम यांच्या कार्यालयात आला असल्याचं रमेश कदम यांचा आरोप


तर निवडणुकीत अर्ज माघारी घेतल्याने कदम यांच्या कार्यकर्त्यांना धमकी वजा फोन येतं असल्याचा ही रमेश कदम यांचा आरोप


त्यामुळे विरोधकांकडून जीवितास धोका असून पोलीस सारंक्षण देण्याची मगणी माजी आमदार रमेश कदम यांनी केलीय

काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांचा गडचिरोलीत होणार रोड शो

काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी गडचिरोलीत करणार प्रचार...


१३ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीमध्ये करणार रोड शो


काँग्रेसचे गडचिरोलीचे उमेदवार मनोहर पोरोटी आणि आरमोरीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारसाठी रोड शो


गडचिरोली शहरात होणार हा रोड शो

काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांचा गडचिरोलीत होणार रोड शो

काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी गडचिरोलीत करणार प्रचार...


१३ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीमध्ये करणार रोड शो


काँग्रेसचे गडचिरोलीचे उमेदवार मनोहर पोरोटी आणि आरमोरीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारसाठी रोड शो


गडचिरोली शहरात होणार हा रोड शो

गडचिरोलीमधील आदिवासी मतदारसंघसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मोर्चेबांधणी

गडचिरोलीमधील आदिवासी मतदारसंघसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मोर्चेबांधणी


काँग्रेस पक्षाच्या सहसचिव प्रियांका गांधी गडचिरोलीत करणार प्रचार


13 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीमध्ये करणार रोड शो


काँग्रेसचे गडचिरोलीचे उमेदवार मनोहर पोरोटी आणि आरमोरीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारसाठी रोड शो


गडचिरोली शहरात होणार रोड शो

मुंबईच्या भूलेश्वर परिसरात 2 कोटी 30 लाख 76 हजारांची रोकड जप्त


मुंबईच्या भूलेश्वर परिसरात २ कोटी ३० लाख ८६ हजाराची रोकड भरारी पथकाकडून जप्त


ही संशयित रोकड नेहणार्या १२ जणांना भरारी पथकाने घेतलं ताब्यात


 


या जणांकडे पोलिस आणि भरारी पथक अधिक चौकशी करत आहेत


 ही रोकड मिळाल्यानंतर १८६- मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे एफ.एस.टी. पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले.


 एफ.एस.टी. पथक नोडल अधिकार्यांकडून मिळालेल्या रोकडची व्हिडीओग्राफी करुन संशयीत इसमांना लो.टी.मार्ग पोलीस ठाणे येथे पुढील कारवाईकामी आणण्यात आले आहे


 एफ.एस.टी. पथकाने लो टी. मार्ग पोलीस ठाणे येथे संशयीत इसमांची चौकशीसाठी नेहण्यात आले


 या पैशांच्या अधिक चौकशीसाठी रोकड आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या कार्यालयात घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली

पुण्यात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने खळबळ

पुण्यात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने खळबळ


शहरात एकीकडे विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवांचे कॉलमुळे विमान प्रशासनाला हैराण करून सोडल्याची घटना मागील काही दिवसात घडल्या त्यातच आता बुधवारी कात्रज परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयालाही धमकीचा ई-मेल आला आहे. 

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. आम्ही महायुतीतील घटकपक्ष एकत्र आहोत, असे महायुतीकडून सांगितले जात आहे. मात्र राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या पक्षातील नेत दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच नेत्यांनी राज्यात सभांचा धडाका लावला आहे. संभांमध्ये अनेक नेते विरोधकांवर गंभीर टीका करत आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या प्रमुख तसेच इतरही महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर....  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.