Maharashtra News Live Updates : महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणात वामन म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 07 Oct 2024 02:45 PM
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विज्ञान भवनात वेगळी बैठक

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विज्ञान भवनात वेगळी बैठक


बैठकीत राज्यातील जागावाटवा संदर्भात चर्चा होत असल्याची सूत्रांची माहिती


राज्याच्या विधानसभेच्या मुद्द्यावर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान चर्चा

25 विधानसभेत शेतकऱ्यांचे पोर लढविणार - रविकांत तुपकर

राज्यात शेतकऱ्यांनाच्या प्रश्नांवर आक्रमकपणे रस्त्यावर उतरणारे जे तरुण आहेत त्यांच्यामागे जनाधार आहे असे तरुण विधानसभेत गेले पाहिजे. यासाठी मी राज्याचा दौरा करीत आहे. यातील 25 जागावर तयारी असून मी तरुण शेतकऱ्यांच्या मुलांना उमेदवारी देऊन निवडणूक लढविण्याचे संकेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिले आहे. 


लोकसभा निवडणुकीत बुलठाना, चिखली आणि शिंदखेडराजा या तिन्ही मतदार संघात मला निवडणूक लढवावी अशी शेतकऱ्यांनाची आग्रही मागणी आहे. महाविकास आघाडी की महायुती यांचे सगळे पर्याय आमच्यासाठी खुले आहे. याचा निर्णय आमची कोर कमिटी घेईल. आमच्या समोर सगळे पर्याय खुले आहे. जो कोणी शेतकऱ्यांनाच्या प्रश्नवर आमच्यासोबत सकारात्मक दाखवेल त्यांच्याबोत जाऊ शकतो असेही बोलताना सांगितले.

महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणात वामन म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणात वामन म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा


मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर


कल्याण सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला म्हात्रेंनी दिलं होतं हायकोर्टात आव्हान


बदलापूर घटनेच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते


त्यावेळी बदलापूर रेल्वे स्थानकात 8 ते 9 तास आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू होतं


त्यावेळेस या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबद्दल शिवसेना शिंदेगटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी काही आक्षेपार्ह भाष्य केलं होतं


त्यानंतर महिला पत्रकारानं दिलेल्या तक्रारीवरून वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अजित पवार बारामती विधानसभेतूनच लढणार, एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांची माहिती 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढणार


एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांची माहिती 


सध्या अजित पवार विविध मतदारसंघात लढण्यासंदर्भात आढावा घेत असल्याची चर्चा तथ्यहीन

भाजप नेते आशिष देशमुख परत एकदा काटोल विधासभा क्षेत्रात सक्रिय

भाजप नेते आशिष देशमुख परत एकदा काटोल विधासभा क्षेत्रात सक्रिय ...


भाजप श्रेष्ठीच्या ग्रीन सिग्नलनंतर आशिष देशमुख काटोलमध्ये सक्रिय...


त्यामुळे नागपूरच्या काटोल मध्ये पुन्हा काका – पुतण्या लढत होण्याची शक्यता ...


भाजपने वेगवेगळ्या नावाची चाचपणी केल्यानंतर आशिष देशमुख यांना सक्रिय होण्याच्या दिल्या सूचना ...


विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आशिष देशमुख यांचे मेळावे आणि दौरे सुरु...

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

नवी दिल्ली 


पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


नक्षलप्रभावित राज्यांच्या बैठकीपूर्वी पोलीस महासंचालक व मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण, आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

पुणे


पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण


आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर


माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार, पोलिसांनी केले जाहीर


२०० पेक्षा अधिक संशयितांची कसून चौकशी


पोलिसांनी आत्तापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती केली संकलित 


बोपदेव घाट परिसरात गुरुवारी रात्री तरुणीवर तीन आरोपींनी तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत 
तरुणीवर केला होता बलात्कार

येत्या दोन तीन दिवसांत रामराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना भेटणार

येत्या दोन तीन दिवसांत रामराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना भेटणार


भेटीत कार्यकर्त्यांच्या भावना अजित पवार यांच्या समोर मांडण्यात येणार


पुढील आठवड्यात फलटण मध्ये कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन आपली पुढील दिशा रामराजे जाहीर करणार


अजित पवारांसोबत सत्तेत जाताना जी आश्वासन देण्यात आली होती ती पूर्ण 
न झाल्यामुळे रामराजे वेगळा निर्णय घेण्याची दाट शक्यता


आज अजित पवार सातारा दौऱ्यावर मात्र रामराजे उपस्थित राहणार नाही


रामराजे सध्या वैयक्तिक कारणास्तव मुंबईला येणार असल्याची सूत्रांची माहिती

भिवंडी ग्रामीण , शहापूर, विक्रमगड मतदारसंघातील शेकडो भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

पालघर 


पालघरच्या वाडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला असून या कार्यकर्त्यांना भिवंडी ग्रामीण , शहापूर आणि विक्रमगड या तीन मतदारसंघातील शेकडो भाजप शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठामध्ये जाहीर प्रवेश केला . वाडा शहरातील भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला असून यावेळी शहापूर आणि भिवंडी ग्रामीण हे दोन विधानसभा मतदारसंघ आपणच लढवावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली . शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा पार पडला असून जिल्ह्यात आणखीन काही मोठे प्रवेश आमच्या पक्षात होतील असा विश्वास यावेळी ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केला

भाजपा नेते ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

राज्य इमारत बांधकाम मंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे नेते ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर पोलिसांवर शिवीगाळ केल्याप्रकरणी, शासकीय कामात अडथळ्याचा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे..


- शनिवारी मुन्ना यादव आणि त्यांचे भाऊ बाला यादव यांच्या मुलांमध्ये राडा झाला होता.


- त्या राडयात एकमेकांना लाठी काठीने मारहाण केल्यामुळे हे प्रकरण धंतोली पोलिस स्टेशन पर्यंत पोहोचले होते. या घटनेत चार जण जखमी ही झाले.. 


- शनिवारी रात्री पोलिस स्टेशनवर समोर दोन्हीं गट पुन्हा अमोरा समोर उभे ठाकले होते. त्यावेळी पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता मुन्ना यादव आणि त्यांच्या मुलांनी पोलिसांसोबत वाद घातला आणि शिवीगाळ केली...


- या प्रकरणात दोन्ही गटाकडून तक्रार न केल्यानं गुन्हा दाखल झाला नाही, मात्र पोलीसांशी झालेल्या वादामुळे मुन्ना यादव सह दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

मुंबईच्या माहीम परिसरात रहिवाशी इमारतीला मोठी आग

मुंबईच्या माहीम परिसरात मोहित हाईट्स रहिवाशी इमारतीला आग


आगीचं कारण अस्पष्ठ, आगीच माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या चार  गाड्या रवाना

नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात रात्रीच्या सुमारास भीषण अपघात

नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात रात्रीच्या सुमारास घडला भीषण अपघात
-
ब्रेक फेल झालेल्या कंटेंनरची पुढे चालणाऱ्या चार वाहनांना धडक


अपघातात तीन जण गंभीर जखमी


जखमित दोन लहान मुलांचा समावेश



*कंटेनर चालक आणि कार मधील मुलगा गाडीतच अडकले होते
-
एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर महामार्ग पोलिस आणि रूट पेट्रोलिंग पथकाने  त्यांना काढले बाहेर


पुढील उपचारासाठी केले कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्य घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे सर्वच पक्ष, नेतेमंडळी कामाला लागले आहेत. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाच्या चर्चेने वेग घेतला आहे. नेतेमंडळी आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. दुसरीकडे इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जागाची चिंता वाढली आहे. कच्च्या तेलाचा भाव चांगलाच वाढला आहे. तर संपूर्ण भारतीयांचे मनोरंजन करण्यासाठी बिग बॉस हिंदीच्या 18 व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या सर्वच घडामोडींचे अपडेट्स तसेच राज्य, देश तसेच जगभरातील इतरही घडामोडी वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.