Maharashtra News Live Updates : संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर- सदाभाऊ खोत
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर
संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहे , डुकराला कितीही साबण लावला तरी ते घाणीत जात असतं
संजय राऊत यांनी आम्हाला कुत्र्याची उपमा दिली पण कुत्रे हे इमानदार असतं, ते धन्याची राखण आणि संरक्षण करतं
संजय राऊत यांनी 2014 ला कुणाचा फोटो गळ्यात घालून फोटो घालून मते मागितली हे पाहावे
काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीला सुरवात
चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार समिती गठीत करण्यात आली आहे
या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती ठरवली जाणार
धाराशिव ब्रेकिंग
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये नाराजी
माजी मंत्री मधुकर चव्हाण समर्थक प्रचंड नाराज
मधुकर चव्हाण यांनी माघार घेतल्यानंतर पक्षाने अन्याय केल्याची कार्यकर्त्याची भावना
काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ, मधुकर चव्हाण सहभागी होणार का याकडे लक्ष
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिष्णोई टोळीची दहशत निर्माण झाली असून त्याचा फायदा उचलून आता बिष्णोई टोळीच्या नावाने धमक्या देण्याच्या प्रमाणात झाली वाढ
माझगाव डॉक येथे राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीच्या नावाने दूरध्वनी आला असून आरोपींनी ५५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
याप्रकरणी शिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका व्यक्तीचे ५५ लाख रुपये परत करण्यासाठी धमकावण्यात आले.
सात दिवसांचा वेळ देतो. आमच्या विरोधात जाऊ नकोस, कुटुंब असलेला व्यक्ती आहेस.
तुला जीवाची पर्वा नाही का ? असे सांगून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून प्रकरण मिटवून टाक, असेही आरोपीने धमकावले.
तक्रारदाराने शिवडी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३) अंतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल केला.
शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांची पुण्यातील आजची पत्रकार परिषद रद्द
आज होणारी पत्रकार परीषद पुढे ढकलण्यात आली आहे
आधीच्या पुर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे आजची पत्रकार परीषद घेणार नसल्याची सदाभाऊ खोत यांच्याकडून माहीती
-
सदाभाऊ खोत यांची आज दुपारी १२ वाजता पुण्यातील महायुतीच्या पश्चिम महाराष्ट्र माध्यम केंद्रात होणार होती पत्रकार परीषद
राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी सीबीआय चौकशी सुरू
दिल्ली उच्च न्यायालयाला बुधवारी देण्यात आली माहिती
पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी होणार
राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत चौकशी व्हावी ही याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे
स्वामी यांच्या याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालयाला तपासाचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे
अलहाबाद उच्च न्यायालयातही भाजप कार्यकर्ता एस विघ्नेश शिशिर यांनीही याचिका दाखल केली होती
न्यायमूर्ती म्हणाले की आम्हाला विरोधाभासी आदेश द्यायचे नाहीत
आज अकोला जिल्ह्यातील वाडेगावात एकाच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडणारायेत. या दोन्ही सभा होणारायेत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या बाळापूर मतदारसंघात. ठाकरे गटाचे गुवाहाटीवरून परत आलेले आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहेय. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपचे माजी आमदार बळीराम सिरस्कार रिंगणात आहेयेत. दुपारी अडीच वाजता वाडेगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. तर या मैदानाच्या अगदी बाजूलाच असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणारेय. गुवाहाटीवरून परत आल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले होतेय. या पार्श्वभूमीवर दोन्ही सभांमध्ये दोन्ही बाजूंनी काही नवे राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जातीये.
साताऱ्यातील माण मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रभाकर घार्गे यांच्या उमेदवारी वरून पुन्हा वाद पेटल्याचे चित्र रात्री समोर आले. प्रभाकर देशमुख यांना डावलून प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यामध्ये राग धुमसत होता. मतदार संघातील एका प्रचार सभेत प्रभाकर देशमुख आणि अभय जगताप यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि मोठी बाचाबाचीला सुरवात झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. माझ्या बाबतीत काय राजकारण झालं हे मी 24 नोव्हेंबर सांगेन अस प्रभाकर देशमुख रागात बोलून गेले. मात्र या वादामुळे माण मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रभाकर घार्गे यांच्या उमेदवारी बाबत माण,खटाव मधल्या राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफुस सुरूच असल्याचे समोर आले.
विधानसभा निवडणूकांचा प्रचार जोरात सुरू असून सर्वच प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभाही सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढील काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करणार आहेत. 15 नोव्हेंबरपर्यंत गडकरी यांच्या 45 प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले असून विदर्भासह महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात सभा होणार आहेत...
साताऱ्यातील छत्रपती घरान्यातील चौथी पिडी राजकारणात
भाजपचे उमेदवार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या प्रचारासाठी पहिल्यांदाच
छत्रपती मृणालीराजे यांचा साताऱ्यातील मंडईत प्रचार
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यातील बडे नेते एका-एका दिवशी तीन ते चार सभा घेत आहेत. या सभांमधून आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्हीच निवडणूक जिंकणार, असा दावा प्रत्येकजण करत आहे. या निवडणुकीत अनेक छोट्या पक्षांकडूनही पूर्ण ताकद लावली जात आहे. त्यामुळे भविष्यात ही निवडणूक कोण जिंकणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -