Maharashtra Breaking Updates LIVE : भाजपा नागपूर जिल्ह्यातील पूर्ण जागा लढणार, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची माहिती

Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 06 Sep 2024 01:16 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live : सध्या देशासह राज्यातही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे पाहात आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत...More

शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी आज हायकोर्टाचा निकाल

शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी आज हायकोर्टाचा निकाल


तपास एसआयटीकडे सोपवण्याची मागणी करत पत्नी तेजस्वीनी घोसाळकर यांची हायकोर्टात याचिका


10 जुलै रोजी राखून ठेवलेला निकाल आज मुंबई उच्च न्यायालय जाहीर करणार 


तपास एसआयटीकडे जाणार की मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडेच राहणार यावर हायकोर्ट निर्णय देणार


मुंबई पोलिसांचा तपास राजकीय दबावाखाली सुरू असून तो योग्य दिशेनं होत नसल्याचा कुटुंबियांचा आरोप


8 फेब्रुवारी 2024 रोजी दहिसर परिसरात गोळ्या झाडून करण्यात आली होती अभिषेक घोसाळकर यांची हत्या


मॉरिस नरोन्हा नावाच्या इसमान त्याच्या ऑफिसमध्ये घोसाळकर यांना सोशल मीडियावर लाईव्हला बसवून केलं होतं या हत्येचं लाईव्ह चित्रिकरण