Maharashtra News Live Updates : नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
नाशिक ब्रेकिंग. - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक सुरू...
- पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमित ठाकरे मात्र खुर्चीवर न बसता शेजारी उभे राहून बैठकीत उपस्थित...
- नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंचा संवाद...
- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंकडून दिल्या जात आहेत सूचना...
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अविनाश अभ्यंकर आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी किशोर शिंदे आणि प्रमुख नेते उपस्थित...
कॉंग्रेस पार्टी हिंदुद्वेषी पार्टी आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे काल राहुल गांधी ऐन नवरात्रीत कोल्हापूर ला येऊन सुद्धा अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत. याचे कारण त्यांच्या ख्रिश्चन आईने बिंबवलेले ख्रिश्चन संस्कार तर दुसरीकडे लोकसभेला एकगठ्ठा मिळालेली मुसमानांची मते गमावण्याची भीती हे आहे. महाराष्ट्रातल्या सजग हिंदुंनी कॉंग्रेस पार्टीचा हा हिंदु विरोधी चेहरा ओळखला पाहीजे आणि त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहीजे.
दिल्ली
नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर
आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होणार
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत येण्याची शक्यता
नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत येणार असल्याची माहिती
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बोलवली आहे दिल्लीत बैठक
राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात होणार बैठक
सोमवारी नक्षलग्रस्त राज्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आहे
महाराष्ट्र , झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या आठ राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला अपेक्षित
कोल्हापूर
कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाभुळकर इच्छुक
नंदाताई बाभुळकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा चंदगडच्या नेसरीमध्ये
प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत होणार जाहीर सभा
अजित पवार गटाचे राजेश पाटील हे चंदगडचे विद्यमान आमदार
चार दिवसापूर्वीच नेसरीमध्येच अजितदादा पवार यांची झाली होती जन सन्मान यात्रा आणि सभा
पुणे ड्ग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पोलीस खात्यातून बडतर्फ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा पोलिस दलात रुजू..
एका पोलीस अधिकाऱ्यासह चौघा जणांना पुन्हा पोलीस दलात नियुक्ती..
पुण्यातील ससून हॉस्पिटल मधून ड्रगजी तस्करी करणाऱ्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत केल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलीस हवालदार राजेश जनार्दन काळे ,नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं..
परंतु आता या बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा गृह विभागाने पोलीस दलामध्ये समाविष्ट करून घेतलअसल्याने एकच खळबळ उडाली आहे..
पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील ड्रगची करत होता तस्करी..
या प्रकरणात ड्रग्ज ललित पाटील याच्यासोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तस्करीत सहभाग आढळल्या प्रकरणात त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं
आता यांना पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत समाविष्ट करून घेतल्याने खळबळ उडाली आहे
नागपूर
नागपुरातील एम्प्रेस मॉलमधील ग्राऊंड फ्लोअरवरील दुकानाला काल रात्री अचानक आग लागली.. आगीमुळे एकच खळबळ उडाली..
- प्राथमिक अंदाजानुसार शॉक सर्किट मुळे आग लागली असल्याचं बोललं जात आहे.
- आग लागली त्यावेळी मोठ्या प्रमाणात लोकं मॉलमध्ये असल्याने एकच खलबळ उडाली.
- पळापळ सुरू झाल्यानं सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना मॉलच्या बाहेर काढले...
- तात्काळ अग्निशामक विभागाचे तीन बंब पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात काही वेळात यश मिळाले..
- कपड्याच्या दुकानाची ही आग लगतच्या दोन ते तीन दुकानांमध्ये पसरली.. आर्थिक नुकसानीचा अंदाज मात्र अद्याप कळू शकला नाही.
* या आगीत कोणीही जखमी झालेला नाही...
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग
समृद्धी महामार्गावरील अपघातात मोठी घट
2023 पेक्षा 2024 मध्ये अपघाताची संख्या कमीच
वेगवेगळ्या उपाययोजनेनंतर अपघाताचे प्रमाण घटले
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांनी तयारी चालू केली आहे. तर राजकीय नेतेंमडळी तिकीट मिळवण्यासाठी धडपडताना दिसतायत. निवडणूक लक्षात घेता सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून जनतेला मोठी आश्वासनं दिली जात आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -