Maharashtra News Live Updates : नरेंद्र मोदींकडून पोहरादेवीची आरती, तर राहुल गांधी कोल्हापुरात सभास्थळी पोहोचले

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 05 Oct 2024 11:39 AM
पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्याकडून पोहरादेवीची पूजा

पंतप्रदान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी गडावर पोहोचले आहेत. 


नरेंद्र मोदी यांच्याकडून पोहरादेवीची पूज केली जात आहे. 


तर दुसरीकडे राहुल गांधी हे कोल्हापुरात पोहोचले आहेत.


ते सभास्थळी मंचावर बसले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी गडावर पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी गडावर पोहोचले आहेत.


पोहरादेवी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्यात अचानक बदल,  कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी उचगावमधील काँग्रेस कार्यकर्त्याची घेतली भेट 

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्यात अचानक बदल 


कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी उचगाव मधील काँग्रेस कार्यकर्त्याची घेतली भेट 


उचगाव मधील अजय संधे या कार्यकर्त्याच्या घरी पाऊण तास बैठक 


अचानक भेट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह मात्र पोलिसांची तारांबळ

हराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतली खासदार संजय राऊत यांची भेट

धुळे : शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतली खासदार संजय राऊत यांची भेट


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनिल गोटे यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण


धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आणि संपूर्ण जिल्हा विषयी आमची चर्चा झाल्याची संजय राऊत यांची माहिती


अनिल गोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


जवळपास 20 मिनिटे बंद दाराआड अनिल गोटे आणि संजय राऊत यांची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन, पोहरादेवीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान 

नांदेड :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी आज शनिवारी ५ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर सकाळी १०.३० वाजता आगमन झाले.


 गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर आगमनानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण,खा.अजित गोपछडे,आ.बालाजी कल्याणकर,आ.भीमराव केराम,आ.डॉ. तुषार राठोड,आ.राजेश पवार,पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. १०.३५ ला ते पोहरादेवीकडे रवाना झाले.


   सकाळी ११ वा. पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. पोहरादेवी येथील कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर सहभागी होणार आहे.


 
प्रधानमंत्र्यांचा पोहरादेवी येथील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे...


 सकाळी ११ ला वाशिम जिल्ह्यातील पोहारादेवी हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे ते दर्शन घेतील. सकाळी ११.१५ वा. बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे ते लोकार्पण करतील. त्यानंतर दुपारी ११.३० वा. पोहरादेवी येथील जाहिर सभेमध्ये ते जनतेला संबोधित करतील. दुपारी १२.५५ वा. पोहरादेवी येथून प्रस्थान करून १.४५  वाजेच्या सुमारास नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १.५० ला नांदेड विमानतळावरून ते मुंबईकडे प्रयाण करतील. 

पॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलांकडून 5 वर्षीय बालकावर अत्याचार, भावासमोर केलं कृ्त्य

पुण्यात धक्कादायक घटना


पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना


मुलांनीच बालकासोबत केलं अनैसर्गिक कृत्य


पाच वर्षाच्या अल्पवयीन बालकावर तीन अल्पवयीन मुलांनी केल अनैसर्गिक कृत्य


पॉर्न व्हिडिओ दाखवत केलं अनैसर्गिक कृत्य 


पुण्यातील कोंढवा परिसरातील धक्कादायक घटना


पिडीत पाच वर्षीय मुलगा सोसायटीत खेळत असताना तिघांनी मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ दाखवत केला अत्याचार


पिढीत पाच वर्षीय बालकाच्या मोठ्या भावासमोर केलं अनैसर्गिक कृत्य


कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल अधिक तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना; आई गुड टच आणि बॅडची माहिती देताना लेकीनं सांगितला प्रकार

पुण्यातील वानवडीत स्कुल बसचालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणं हादरलं आहे.  तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेतच लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील खराडीतील शाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चंदन नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 ऑक्टोंबरला तिसऱ्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकलीची आई तिला गुड टच आणि बॅड टचसंदर्भात माहिती  सांगत होती. त्यावेळी चिमुकलीने शाळेत तिच्यासोबत असा प्रकार घडल्याचं सांगितलं. त्यानंतर आईने शाळेतील मुख्यध्यापकांना यासंदर्भात माहिती दिली. मुलगी, आईने पोलीस ठाण्यात घाव घेत तक्रार दाखल केली आहे. अजून आरोपीची ओळख पटलेली नाही पोलिसांकडून तपास सुरुय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोहरादेवी दौऱ्यात पोलिसांच्या नियोजनात मोठा गोंधळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोहरादेवी दौऱ्यात पोलिसांच्या नियोजनात मोठा गोंधळ.


पंतप्रधानांच्या दौऱ्यातच पोलिसांचा ढिसाळ कारभार.


बंदोबस्ताला असणाऱ्या वरीष्ठ पोलीस अधिकारीही ढिसाळ नियोजनामुळे एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.


बंजारा समाजाच्या नागरिकांच्या येण्यावर अनेक ठिकाणी निर्बंध.


पोलिसांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका प्रसार माध्यमांनाही.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोहरादेवी येथीस सभा स्थळी पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा गलथानपणा.


सभेला होणारी गर्दी पोलिसांच्या चूकीच्या नियोजनामुळे, सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची पाठ.


पोलिसांच्या सुरक्षेतील गलथानपणामुळे सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना ५ किलोमीटर करावी लागत आहे पाटपीट.

भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावच्या हद्दीत असलेल्या वी-लॉजिस गोदामाला, 8 ते 9 तास उलटूनही आग सुरूच

भिवंडी फायर अपडेट 


भिवंडी  तालुक्यातील  वालशिंद गावच्या  हद्दीत असलेल्या वी - लॉजिस गोदामाला लागलेली आग 8 ते  9 तास उलटूनही सुरूच


आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक 


गोदामात मोठ्या प्रमाणात हायड्रोलिक ऑइल, कापड, प्लास्टिक वस्तू व केमिकल चा साठा 


गोदामात मोठ मोठे स्पोट 


आगीचे कारण अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरू 


भिवंडी  येथील 2 अग्निशमन दलाच्या गाड्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू


पाण्याची कमतरता असल्याने आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अडथळा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा पुढील आठवड्यात मुंबईत मिळावा  

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा पुढील आठवड्यात मुंबईत मिळावा होणार 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे जोरदार तयारी करत आहे 


त्यातच मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा निवडणूक पार्श्वभूमीवर पार पडणार आहे


मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मार्गदर्शन


मनसेची विधानसभेची पहिली यादी पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे

मोठी बातमी! आठ-दहा दिवसांत आचारसंहिता तर 35 दिवसांनी मतदान, अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत

येत्या आठ ते दहा दिवसांत आचारसंहिता लागू होईल अन पस्तीस दिवसांनी मतदान होईल. असं म्हणत अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिलेत. आता समज-गैरसमज दूर करा, उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल तेंव्हा हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा. असं आवाहनही अजित पवारांनी केलं.

राज्यातील 26 आयटीआयला कौशल्य विकास विभागाकडून महापुरुषांचे नाव 

राज्यातील २६ आयटीआयला कौशल्य विकास विभागाकडून महापुरुषांचे नाव 


कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय


गेल्या आठवड्यात १४ आयटीआयला दिली नवी नावे


आयटीआयच्या नामांतरात क्रांतिकारक व स्थानिक महापुरुषांची नावांस प्राधान्य


कुठल्या आयटीआयला कुठल्या महापुरुषाचे नाव? जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून... 



ठाणे - राजामाता जिजाऊ
औंध - छत्रपती शिवाजी महाराज
चंद्रपूर - राणी दुर्गावती
पुणे - सावित्रीबाई फुले
दादर - रमाबाई आंबेडकर
जळगाव - राणी लक्ष्मीबाई
मुंबई मांडवी - डॉ ए पी जे अब्दुल कलाम
दादर - क्रांतीवीर बाबू गेनू
मुलुंड - श्रीमद राजचंद्रजी
धरणगाव, जळगाव- क्रांतिकारी खाज्याजी नाईक
नांदेड - गुरु गोविंद सिंह
सेलू, वर्धा - संत जगनाडे महाराज
कळंब, धाराशिव - संतश्रेष्ठ गोरोबा काका
रत्नागिरी - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
शिरपूर, धुळे - किशनसिंह राजपूत
कारंजा, वर्धा - चक्रवर्ती राजा भोज
पेण, रायगड - हुतात्मा नाग्या कातकरी
गडचिरोली - क्रांतिवीर बाबुराव शेडमाके
अकोले, अहमदनगर - क्रांतिकारक राघोजी भांगरे
किनवट, नांदेड - राजा शंकर शाह
तळोदा, नंदुरबार - संत श्री गुलाम महाराज
बसवेश्वर- महात्मा बसवेश्वर
सावरकर- स्वातंत्र्यवीर सावरकर
अलिबाग - सरखेल कान्होजी आंग्रे
कळवण, नाशिक - ए टी पवार
बारामती, पुणे - अनंतराव पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सचिन कुर्मी यांच्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

ब्रेकिंग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर रात्री अज्ञाताचा हल्ला


हल्ल्यामध्ये तालुकाध्यक्ष कूर्मी यांचा मृत्यू


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सचिन कुर्मी भायखळा तालुकाध्यक्ष


रात्री हल्ला झाल्यानंतर तत्काळ कुर्मी यांना जे जे हॉस्पिटल मधे दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केलं


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ कुर्मी यांच्या कुटुंबाची भेट घेणार

नागपुरात कारने अचानक घेतला पेट, रिंग रोडवरील पडोळे चौकातील घटना 

नागपूर


- अचानक कारमधून धूर निघाला आणि कार ने घेतला पेट...


- नागपूरच्या रिंग रोडवरील पडोळे चौकातील काल रात्रीची घटना, 


- अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करत विझवली आग


- कारचालक महेंद्र सुरडकर सुखरूप मात्र कारचे मोठे नुकसान...

पार्श्वभूमी

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच गोष्ट लक्षात घेऊन सध्या राज्यातील नेतेमंडळी कामाला लागले आहेत.  राज्य सरकारकडून अनेक धडाडीचे निर्णय घेतले जात आहेत. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकतेच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. भविष्यातदेखील अनेक नेतेमंडळी पक्षबदल करणार आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.