Maharashtra Breaking News Live Updates :  साताऱ्यातील शेंद्रे येथे 1 कोटी रुपयांची रोकड जप्त

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 05 Nov 2024 02:19 PM
अभिनेता सलमान खानल लाॅरेन्स बिष्णोईच्या नावाने देण्यात आलेल्या धमकीचा मेसेज कर्नाटकातून

अभिनेता सलमान खानल लाॅरेन्स बिष्णोईच्या नावाने देण्यात आलेल्या धमकीचा मेसेज कर्नाटकातून करण्यात आल्याचे निष्पन्न


मुंबई पोलिसांची टिम आरोपीला पकडण्यासाठी कर्नाटकसाठी रवाना


काल मध्य रात्री अज्ञात व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मेसेज करत धमकावले होते

पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये महिलेची छेड काढणाऱ्या इसमाला तरुणांकडून बेदम मारहाण   

महिलेची छेड काढणाऱ्या इसमाला तरुणांकडून बेदम मारहाण


 पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये करण्यात आली मारहाण 


सदर इसम महिलेची मंडई पासून स्वारगेटपर्यंत करत होता पाठलाग


गाडीवरून पाठलाग करत असताना पैसे देतो गाडीवर बस असेदेखील म्हणाला असल्याचा आरोप 


तरुणाने मारहाण करत स्वारगेट पोलिसांच्या केलं इसमाला स्वाधीन


स्वारगेट पोलिसांनी केला आहे गुन्हा दाखल


अधिक तपास पोलीस करत आहेत

 साताऱ्यातील शेंद्रे येथे 1 कोटी रुपयांची रोकड जप्त

 साताऱ्यातील शेंद्रे येथे 1 कोटी रुपयांची रोकड जप्त.


पुणे बंगलोर महामार्गावर सातारा तालुका पोलिसांची मोठी कारवाई.


पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केली कारवाई 


क्रेटा गाडीत सापडली रोकड.


पोलिसांना मिळालेल्या माहिती नंतर गाडीचा तपासणीत सापडली मोठी रक्कम.


रोकड नेमकी कोणाची याचा तपास सुरू.

कोल्हापूर उत्तरचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

कोल्हापूर


कोल्हापूर उत्तरचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार


दुपारी दोन वाजता होणार भेट


राजेश लाटकर कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

मोठी बातमी! अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी...


धमकी देणार्याने लाॅरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीवजा मेसेज मु़ंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला


वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये लारेन्स बिष्णोई चा भाऊल बोलत असून सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदीरात जाऊन माफी मागावी, नाहीतर ५ कोटी रुपये द्यावे. न दिल्यास जिवे मारू आमची गॅग आजही अॅक्टीव आहे


असा धमकीवजा मेसेजे वाहतूक नियंत्रण कक्षाला काल मध्यरात्री आला आहे


मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण  कक्षाला मेसेज करणार्या व्यक्तीचा शोध सध्या पोलिस घेत आहेत

आदित्य ठाकरे यांचा आज संध्याकाळी वडाळा विधानसभा मतदारसंघातून रोड शो

आज सायंकाळी सहा वाजता आदित्य ठाकरे यांचा वडाळा विधानसभा मतदारसंघातून रोड शो.


 वडाळा विधानसभेच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे करणार रोड शो 


 वडाळा  विधानसभा मतदारसंघात  भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या  श्रद्धा जाधव यांच्यात लढत होत आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिरोळ, पट्टणकोडोली येथे सभा घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला मान शिवसेना पुरस्कृत उमेदवारांसाठी 


आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरोळ मध्ये आणि पट्टणकोडोली या ठिकाणी घेणार सभा


शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा 


तर पट्टणकोडोली या ठिकाणी अशोकराव माने यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा 


राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मिळालं शिट्टी चिन्ह

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच मतदारसंघांत कोणा-कोणामध्ये लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. आता राज्यभरात मोठ्या ताकदीने प्रचाराला सुरुवात होणार आहे. आज राज्यातील अनेक नेते प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. बड्या नेत्यांच्या आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा होणार आहेत. त्यामुळे आज राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींचे तसेच इतरही महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....     

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.