Maharashtra Breaking Updates LIVE : देश-विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Sep 2024 12:14 PM
Rahul Gandhi on Maharashtra Visit : राहुल गांधी महाराष्ट्र उद्या  दौऱ्यावर; दिल्लीवरून ते थेट नांदेड गाठणार

Rahul Gandhi on Maharashtra Visit : राहुल गांधी महाराष्ट्र उद्या  दौऱ्यावर


उद्या 5 सप्टेंबर सकाळी दिल्लीवरून ते थेट नांदेड येथे जाणार आहेत


नांदेड येथे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतील


नांदेड येथून ते थेट कोल्हापूरला विमानाने जातील


कोल्हापूर येथून हेलिकॉप्टर द्वारे सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथे  दिवंगत शिक्षण महर्षी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील


लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील  दौऱ्यात सोबत राहणार आहेत

Wardha News : वर्ध्यात ST च्या संपाचा पाहिजे तितका परिणाम नाही

Wardha News : वर्ध्यात एसटीच्या संपाचा परिणाम फारसा जाणवत नसल्याचे चित्र सध्या वर्ध्याच्या बस स्थानकावर आहे. वर्धा अगरातून अनेक गाड्या विविध गावांसाठी सुटल्या आहे. येथे बसगाड्या सुरू असल्याने सकाळच्या सुमारास प्रवस्याना देखील अडचणींचा सामना करावा लागला नाहीए. त्यामुळे वर्ध्यात  एस टी च्या संपाचा फारसा परिणाम दिसून आला नाही. तुरळक बसेस बंद असल्याचं दिसून आले. 

Sindhudurg News : सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांचे हाल होणार; लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्णतः बंद

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंशतः बस सेवा सुरू आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्या पूर्णतः बंद झाल्या आहेत. त्यामुळे कोकणात बस ने येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. कारण बस चे बुकिंग करून एन गणेश चतुर्थीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने कोकणात बस येत नसल्याने गैरसोय होत आहे. कुडाळ, कणकवली, मालवण या बस डेपोतून अंशतः बस सेवा सुरू आहे. तर वेंगुर्ले, मालवण या बस डेपो मधून पूर्णतः वाहतूक ठप्प झाली आहे. याचा मोठा फटाका बसनं येणाऱ्या चाकरमान्यांना बसत आहे. 

Saamana Editorial : खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आज मराठवाड्यात नुकसानीची पाहणी करणार

Saamana Editorial : खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आज मराठवाड्यात नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्याआधी आज सामनातून सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी असं आवाहन करण्यात आलंय. इव्हेंटबाजीत रमलेल्या खोके सरकारने शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यायला हवं असं अग्रलेखात म्हटलंय. 

Latur President Daura : लातूर जिल्ह्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार

Latur President Daura : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. शिवाय विविध शासकीय योजनेतील महिला लाभार्थ्यांचाही कार्यक्रम होणार आहे. यासाठी तब्बल ६०० बसेसचे नियोजन करण्यात आलं होतं. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा याला फटका बसला आहे. सध्या रस्त्यावर फक्त अडीचशे बसेस धावत आहेत. याच बसमधून शक्य होईल तितक्या महिलांना कार्यक्रमाला नेलं जात आहे. शिवाय प्रशासनाकडून खाजगी बसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Bhandara News : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा, भंडाऱ्यातही पडसाद

Bhandara News : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी कालपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यामुळं चालक आणि वाहक या आंदोलनात सहभागी असल्यानं मोठ्या प्रमाणात राज्यातील बस सेवा ठप्प झाली होती. याचा परिणाम प्रवाशांच्या प्रवासावर पडला होता. या संपाविरोधात एसटी महामंडळ कोर्टात गेलो होतो त्यामुळे कोर्टाने एसटी महामंडळाच्या या कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर ठरला असून आजपासून कर्तव्यावर हजर राहण्याचे निर्देशित दिले होते. दरम्यान बस स्थानकावर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दुसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी वेळापत्रकानुसार तर काही ठिकाणी तुरळक

ST Bus Strike : एसटी संप कर्मचारी संपावर उद्योगमंत्र्यांशी झालेल्या बैठक निष्फळ ठरल्याने आता हा संप चिघळलाय. मागण्या मान्य होत नाहीत तोवर संपावर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे काल 50 टक्के सुरू असलेली वाहतूक आज पूर्णपणे बंद होऊ शकते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृती समितीची बैठक होणार आहे. त्यात मागण्यांवर चर्चा होईल.  आजपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू होईल. त्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसणार आहे. औद्योगिक न्यायालयाने आजचा एसटी कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर ठरवलाय. एसटी महामंडळाने या संपाविरोधात कोर्टात धाव घेतलीय. कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे कोर्टाने दिलेत. नाहीतर एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आलेत. 

ST Bus Strike : राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या प्रलंबित विषयांबाबत सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण 

ST Bus Strike : राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या प्रलंबित विषयांबाबत सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण 


एसटी कृती समितीतील कर्मचारी संघटनांसोबतच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेला देखील निमंत्रण 


सोबतच, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेसोबत देखील राज्य सरकार चर्चा करणार 


एकूण २७ एसटी कर्मचारी संघटनांना सह्याद्रीवरील बैठकीसाठी निमंत्रण 


संपात सहभागी नसलेल्या संघटनांना देखील निमंत्रण

पार्श्वभूमी

Breaking News Live Updates : राज्यभरात पावसाच्या सरी बसरत आहेत. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. या घटनांसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.