Maharashtra Breaking News Live Updates : पूर्व नागपूर जागेचा तिढा सुटला, संगीता तलमले यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे 

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 04 Nov 2024 02:58 PM
मोठी बातमी! मधुरिमाराजे यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये आणखी एक ट्विस्ट


काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला

Geeta Jain : गीता जैन उमेदवारीवर ठाम, निवडणुकीला सामोरे जाणार 

उमेदवारीवर मी ठाम आहे, निवडणुकीला सामोरे जाणार 


लोकांचा आग्रह आहे नाही तर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा रावण जागा होईल, त्यामुळे शहराला त्यांच्या अत्याचारापासून वाचवायचं आहे तर तुम्ही पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे 


महायुतीला माहिती आहे मी अपक्ष आहे, त्यांना ही कुठे गिल्टी फील होत असेल ५ वर्ष मदत घेतली आणि असं सर्व होतंय 


मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं होतं, उमेदवार तुमचा आणि चिन्ह आमचं, मात्र तसं झालं नाही त्यामुळे मुख्यमंत्री देखील दुखावले आहेत


लोकांना विरोधक समजवण्याचा प्रयत्न करत आहेत बटोगे कटोगे वगैरे 


मात्र जनतेला माहिती आहे पुढे काय करायचं 


रिंगणात उतरल्यावर जिंकण्याचा विश्वास असतो, लोकांकडे बघितल्यावर वाटतं मीच जिंकेन 


नरेंद्र मेहतांवर एफआयआर झाली आहे, फक्त मी आरोप लावले नाही आहे 


बलात्कार, भ्रष्टाचार सारखे आरोप त्यांच्यावर आहे 


सगळ्यांना वाटते की पार्टीनं चूक केलीय त्यांना उमेदवारी देऊन आणि तीच चूक सुधरायला आम्ही इथे आहोत


मुख्यमंत्र्यांना वाटतंय की त्यांच्याबरोबर धोका झाला, उमेदवार तुमचा निशाणी आमची असं ठरलं होतं पण तसं नाही झालं 


आज निशाणी भेटणार त्यानंतर आमचा देखील प्रचार वेगानं सुरु होणार

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते व अपक्ष उमेदवार तानाजी वनवे यांचा उमेदवारी अर्ज मागे

पूर्व नागपूर काँग्रेस बंडखोरी अपडेट 


पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते व अपक्ष उमेदवार तानाजी वनवे यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे... 


पूर्व नागपूर मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेल्या नंतर नाराज होऊन तानाजी वनवे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.. मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानंतर आज त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे...

Jayadatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर यांची बीड विधानसभा निवडणुकीतून माघार

जयदत्त क्षीरसागर यांची बीड विधानसभा निवडणुकीतून माघार..


जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुकीतून  माघार 


अपक्ष उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता बीड विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर या चुलत भावामध्ये संघर्ष होणार आहे..

मध्य नागपूर मतदारसंघातून भाजप पदाधिकारी किशोर समुद्रे यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे

मध्य नागपूर मतदारसंघातून भाजप पदाधिकारी किशोर समुद्रे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे... 


मध्य नागपूर मधून भाजप ने प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली असून किशोर समुद्रे यांची बंडखोरी दटके साठी अडचणीची होती...


अखेरीस किशोर समुद्रेने पक्ष नेत्यांचा ऐकून त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे...

नाशिक मध्य विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या बंडखोर हेमलता पाटील यांच्या भेटीला वसंत गीते 

नाशिक मध्य विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या बंडखोर हेमलता पाटील यांच्या भेटीला वसंत गीते 


वसंत गीते शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार


हेमलता पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी हेमलता पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले
-
 हेमलता पाटील यांचं शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बोलणे करून दिले 
-
हेमलता पाटील यांच्या उमेदवारी मिळेल महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता


 उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी शिवसेना पदाधिकाऱ्यांची धावाधाव सुरू

पूर्व नागपूर जागेचा तिढा सुटला, संगीता तलमले यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे 

नागपूर - 


- पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून मविआमधून एक बंडखोरी मागे 
- नागपूर पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्या संगीता तलमले यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे 
- पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून पक्ष हितासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचा संगीता तलमले यांनी सांगितले

 वांद्रे पूर्वमधील बंडखोरी रोखण्यास महायुतीला अपयश, शिंदेंच्या शिवसेनेचे कुणाल सरमळकर अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम

 वांद्रे पूर्व मधील बंडखोरी रोखण्यास महायुतीला अपयश, शिंदेंच्या शिवसेनेचे कुणाल सरमळकर अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम


कुणाल सरमळकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत


पक्षातील वरिष्ठांना याची कल्पना या आधीच दिल्याची सरमळकर यांची माहिती

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम आणि सिद्धी कदम यांची माघार 

मोहोळ विधानसभा मतदार संघातून माजी आमदार रमेश कदम आणि सिद्धी कदम यांची माघार 


राष्ट्रवादी शरद पवार गटाने सिद्धी कदम याना उमेदवारी जाहीर करून नंतर ती माघे घेत राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली होती 


त्यानंतर माजी आमदार रमेश कदम आणि सिद्धी कदम यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलेला होता 


मात्र शरद पवारांनी अवघ्या 26 व्या वर्षी सिद्धीला संधी दिलेली होती, त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी नको अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती 


त्यामुळेच सिद्धी आणि माझा दोघांचाही उमेदवारी अर्ज आम्ही माघारी घेतोय 


आमचे राजकीय पुनर्वसन झाले पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे


पण सध्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार विरोधात आमही राहणार नाही 


मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची एबीपी माझाला माहिती

सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून प्रयत्न, विधानपरिषद, मंत्रिपदाची ऑफर

सदा सरवणकर यांची मनधरणी करण्याचे अखेरपर्यॅत प्रयत्न सुरु 


सरवणकर यांना विधानपरिषद आणि मंत्री पद देऊन सन्मान करण्याचा प्रस्ताव


अमित ठाकरेंसाठी महायुतीचा सरवणकरांना प्रस्ताव 


सदा सरवणकर आणि कार्यकर्ते चर्चा करून
सकारात्मक निर्णय घेणार

मुंबईकरांच्या मतांसाठी भाजपकडून जाहिरातीसाठी मुंबई मेट्रोचा ताबा, जोरदार जाहिरातबाजी

मुंबईकरांच्या मतांसाठी भाजपकडून जाहिरातीसाठी मुंबई मेट्रोचा ताबा


मुंबई मेट्रोत भाजपची जोरदार जाहिरातबाजी


मेट्रोच्या आत आणि बाहेर राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांची पोस्टरबाजी


कोस्टल रोड, अटल सेतू, टोल फ्री निर्णयांचा भाजपकडून गवगवा


भाजप महायुती आहे, तर गती आहे 


महाराष्ट्राची प्रगती आहे, अशा आशयाचे बॅनर्स

Geeta Jain : मीरा रोडमधून गीता जैन उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, सूत्रांची माहिती

मीरा रोडमधून गीता जैन उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, सूत्रांची माहिती


त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढणार


२०१९ मध्ये देखील गीता जैन यांनी बंडखोरी करत नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता


यावेळेस देखील गीता जैन अपक्ष निवडणुकीच्या मैदानात


मीरा रोड मतदारसंघात यंदा देखील तिहेरी लढत दिसणार


कांग्रेसकडून मुजफ्फर हुसैन, अपक्ष गीता जैन आणि भाजपकडून नरेंद्र मेहतांना उमेदवारी

Narendra Pawar : कल्याण पश्चिममधून भाजपचे बंडखोर उमेदवार नरेंद्र पवार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता

कल्याण पश्चिममधून भाजपचे बंडखोर उमेदवार नरेंद्र पवार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता


कल्याण पश्चिममधून शिंदेंचे विद्यामान विश्वनाथ भोईर महायुतीचे अधिकृत उमेदवार 


कल्याण पूर्वमधून भाजपच्या गणपत गायकवाडांच्या पत्नीच्या विरोधात शिंदेंच्या महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत भरला होता उमेदवारी अर्ज


त्याला प्रत्युत्तर म्हणून कल्याण पश्चिममधून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता

धक्कादायक! अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवताना 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, संबंध ठेवण्याआधी गोळ्या घेतल्याचे तपासात समोर

मुंबईच्या डी बी मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकार समोर आला आहे


एका अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक संबध करताना ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर


संजयकुमार तिवारी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे


शारिरीक संबध ठेवण्याआधी संजय याने काही गोळ्यांचे प्राशन केल्याचे तपसात समोर



दरम्यान मुलीच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर संजय याने मुलीला मदत केली होती


दरम्यान २ आॅक्टोंबर रोजी पिडीत मुलीला मुंबईत फिरण्याच्या नावाखाली आणून संजय तिला घेऊन ग्रॅडरोड येथील सुपर हाॅटेलमध्ये गेला


त्या ठिकाणी मुलीचे वय कमी असल्याने बनावट आधारकार्ड देत दोघांनी हाॅटेलमध्ये प्रवेश केला


मुलीसोबत शरिरसंबध ठेवण्यापूर्वी संजयने काही गोळ्यांचे सेवन केले


काही वेळाने संजय हा बेशुद्ध पडलयानंतर मुलीने हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना पाचरण केले


पोलिसांनी संजयला जे जे रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला


दरम्यान पोलिसांनी मयत आरोपी संजय विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्यचार केल्याच्या आरोपाखाली पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे

Swikruti Sharma : अंधेरी पुर्वमधून स्वीकृती शर्मा आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार

अंधेरी पुर्वमधून स्विकृती शर्मा आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार


स्वीकृती शर्मा या एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्य पत्नी

Gopal Shetty : गोपाळ शेट्टी यांनी घेतली निवडणुकीतून माघार 

गोपाळ शेट्टी यांनी घेतली निवडणुकीतून माघार 


बोरीवलीमधून लढवणार होते निवडणूक

Nashik Central Constituency : मोठी बातमी! नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे माघार घेणार

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे माघार घेणार


-
रंजन ठाकरे यांनी भरला होता अपक्ष अर्ज


ठाकरेंच्या माघारीने देवयानी फरांदे यांना मिळणार दिलासा
- देवयानी फरांदे भाजपच्या अधिकृत उमेदवार
ठाकरे दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान घेणार उमेदवारी अर्ज मागे


महायुती मधील मतविभाजन टाळण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनंतर अर्ज घेणार मागे

Shivsena : शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, शरद पोंक्षे, गोविंदा यांचा समावेश

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर


यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामदास कदम, गजानन किर्तीकर, आनंद अडसूळ, गुलाबराव पाटील, अभिनेता गोविंदा आहुजा शरद पोंक्षेपासून ४० जणाची नावे


यादीत शिवसेनेचे मंत्री प्रवक्ते यांचीही नावे


सर्व प्रवक्त्यांनांना राज्यभरात उमेदवारांच्या प्रचारांची जबाबदारी वाटून दिली जाणार

Pune Accident : फटाक्यांमुळे सगळीकडे धूरच धूर, पुण्यात उरुळी कांचन येथे भीषण अपघात

पुणे


पुण्यात उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात...


दिवाळीत काही मुले रस्त्यावर फटाके वाजवत होते. फटाक्यांमुळे संपूर्ण रस्त्यावर धूर झाल्याने दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. 


या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत.तर एकजण गंभीर जखमी झाला असून चौघांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


चक्रधर संतोष कांचन, क्षितिज राहुल जाधव (वय- 18, रा. दोघेही उरुळी कांचन), सिद्धांत नवनाथ सातव (वय- 20) व प्रतीक संतोष साठे (वय- 20) असे अपघातात जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत. यातील सिद्धांत सातव याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.


रस्ता पूर्णपणे हा धुरमय झाला होता.त्यातून समोर काही दिसत नव्हते त्यातून हा अपघात झाला..


एका दुकानाचे उद्घाटन सुरू होते त्यावेळी घटना घडली आहे.एका व्यक्तीने लांबून फटाक्यांचा व्हिडीओ काढत असताना अपघात व्हिडीओ निघाला आहे..


मात्र आता पोलिस कोणावर कारवाई करणार हे पाहावं लागेल...

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीचीच (Vidhan Sabha Election 2024) चर्चा आहे. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मात्र बंडखोर नेत्यांमुळे या पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणता नेता आपला अर्ज मागे घेणार? आणि कोणता नेते आपल्या भूमिकेवर ठाम राहणार? हे स्पष्ट होणार आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्याचा वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.