Maharashtra Breaking News LIVE Updates : काळजीवाहू मुख्यमंत्री आजारी, पांढऱ्या पेशी वाढल्या, ज्युपिटरमध्ये तपासणीसाठी दाखल

Maharashtra Breaking News LIVE Updates : देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Dec 2024 03:03 PM
Maharashtra News : ज्युपिटर रुग्णालयातून निघाल्यावर एकनाथ शिंदे वर्षा बंगल्याच्या दिशेनं रवाना

Maharashtra News : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असून त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती मिळत आहे. काही वेळापूर्वीच ज्युपिटर रुग्णालयात जाऊन तपासणी केल्यानंतर आता वर्षा निवासस्थानाच्या दिशेनं रवाना होत असल्याची माहिती मिळत आहे. 

Maharashtra News : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना ताप, अशक्तपणा; उपचार सुरू

Maharashtra News : एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नाही, 


डेंग्यू आणि मलेरिया यांची चाचणी केली असता निगेटिव्ह आली आहे, 


मात्र पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूच 


सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक सुरू आहेत, 


त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात अशक्त पणा आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, 


हळूहळू तब्येतीत सुधारणा होत असल्याचे देखील डॉक्टरांचे म्हणणे... 


जुपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत


सूत्रांची माहिती.

Maharashtra Rain Updates : दक्षिण भारतातील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा तळकोकणातही परिमाण, सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या

Maharashtra Rain Updates : दक्षिण भारतातील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा तळकोकणातही परिमाण.


सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.


'फेंगल’ चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन जिल्हात ढगाळ हवामान, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.


गेले दोन दिवस थंडी देखील गायब झालीय. 


ऐन हिवाळ्यात सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने आंबा काजू उत्पादक शेतकरी धास्तावले.


पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Ajit Pawar Delhi Visit : अजित पवारांच्या दिल्ली वारीचे कारण एबीपी माझाच्या हाती 

Ajit Pawar Delhi Visit : अजित पवारांच्या दिल्ली वारीचे कारण एबीपी माझाच्या हाती 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या स्ट्राईकरेटच्या आधारे मंत्रीपदे वाढवून हवीत


जेवढी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तेवढीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रीपदी मिळावीत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका 


दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना भेटून मंत्री पदांच्या मागणी संदर्भात राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याचे सूत्रांची माहिती 


अजित पवार सध्या दिल्लीत मात्र अजूनही अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवार वेटिंगवर


मंत्री पदांच्या वाटपात एखादी जागा कमी आली तरी चालेल मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बरोबरीनेच जागा मिळायला हव्यात अशी राष्ट्रवादीची भूमिका 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांने विधानसभेला ज्यादा जागा लढवल्या असत्या तर नक्कीच आमदारांची संख्या देखील सध्या जादा पाहिला मिळाली असती 


राष्ट्रवादीच्या नेत्यांची अधिकची मंत्रिपदांची मागणी करताना भूमिका

Maharashtra CM Updates : भाजपाने बंजारा समाजाच्या आमदाराना मंत्रिपद द्यावे ; बंजारा समाजाची मागणी

Maharashtra CM : गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टी केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे. भारतातील इतर राज्यातील बहुतांशी वंजारा समाज यापूर्वीच भाजपाकडे वळलेला आहे. 2024 च्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरएसएस च्या नियोजनबद्ध 'गोधरी कुंभ 'आणि 'संत सेवालाल महाराज लभान बंजारा समृद्धी तांडा योजने'मुळे बंजारा समाजाने भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. अशातच  भाजपाने  बंजारा समाजाच्या आमदाराना मंत्रिपद द्यावं, अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे. 

Pune Crime : पुण्यात नामांकित ब्रँडच्या बनावट कपड्यांची विक्री; गुन्हे शाखेकडून संबंधित दुकानावर छापेमारी 

Pune Crime : पुण्यात नामांकित ब्रँडच्या बनावट कपड्यांची विक्री 


गुन्हे शाखेकडून संबंधित दुकानावर छापेमारी 


पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून संबंधित दुकानावर छापेमारी करत 4.50 लाखांच्या ब्रँडेड कपड्यांची जप्ती 


एरंडवणे येथील एका दुकानात पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 118 जीन, शर्ट, टी शर्ट असा चार लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल पुणे पोलिसांकडून जप्त


पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Dhule News : धुळ्यात तापमान घटलं, थंडीमुळे दूध उत्पादनात घट

Dhule News : धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होत असून यामुळे कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे या कडाक्याच्या थंडीचा परिणाम सर्वसामान्यांच्या जनजीवनावर झाला आहे तसंच तो दूध उत्पादक पशुंवर देखील होत असून कडाक्याच्या थंडीमुळे दूध उत्पादनात घट होत असते या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक पशुपालक शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे 


धुळे जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होताच तापमान सहा अंशावर येऊन ठेपले असून या थंडीचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर झाला आहे मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात देखील या थंडीचा परिणाम जाणवू  लागला असून दूध उत्पादक गाय म्हैस या पशूंची कडाक्याच्या थंडीमुळे दूध उत्पादनाची क्षमता देखील कमी होत असते या पार्श्वभूमीवर पशु पालक शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे 

 
Fishing Boat Hits Indian Navy Submarine: नौसेनेच्या पानबुडीला मासेमारी नौकेची धडक; दोन खलाशांचा मृत्यू

Fishing Boat Hits Indian Navy Submarine: नौसेनेच्या पानबुडीला मासेमारी नौकेने धडक दिल्याची घटना अरबी समुद्रात घडली असून या धडकेत नौकेवरील दोन खलाशांचा मृत्यू झाला आहे.


या अपघातात नौसेनाच्या पाणबुडीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मासेमारी बोटीवरील तांडेल विरोधात यलो गेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बोटीवरील दोन्ही खलाशांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन जेजे रुग्णालय येथे पाठविण्यात आले असून मृतदेहाची ओळख पटविण्यात येत आहे.


ही धडक गोवा जवळील अरबी समुद्रात रात्रीच्या सुमारास झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


 कर्नाटक येथील कारवार बंदरातून भारतीय नौसेनेची आय.एन.एस. करंजा ही पाणबुडी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पैरीस्कोप डेप्थ  मेंटेन करुन गोवा राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरून दक्षिण पूर्व (१५४ डिग्री) दिशेने ६ सागरी मैल वेगाने जात होती


दरम्यान पाणबुडीच्या उजव्या बाजुस  एक मासेमारी बोट दोन ते तीन किलोमीटर अंतरावर  दिसून आली, सदर मासेमारी नौकाा एका जागेवर उभी होती


प्रकाश  फार अंधुक असल्यामुळे नोका स्पष्ट दिसत नव्हती, मासेमारी बोट  ऑटोमेटीक आयडेर्डेन्टीफिकेषन सिस्टम काम  करत नव्हते. त्यामुळे मासेमारी नौकेचे वेग, स्थान, दिशा व नाव समजुन येत नव्हते.


पाणबुडीने मासेमारी बोटीपासुन वाचण्याचे सर्व प्रयत्न करुनही ती मासेमारी बोट पाणबुडीला धडकली आणि समुद्रात पलटी होवुन बुडाली

Maharashtra News : अणदूर इथ खंडोबाची यात्रा, राज्यभरातून भाविकांची गर्दी

Maharashtra News : धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथिल खंडोबाच्या याञेला उत्साहात सुरुवात झालीय. बॉण्ड वरती करार करून देवाला घेवून जाणारे  देशातील एकमेव  तिर्थक्षेञ म्हणून अणदूर येथिल खंडोबा देवस्थान प्रसिध्द आहे. अणदूर आणि नळदुर्ग या गावांमध्ये देवसाठीचा करार होतो. अणदूर इथ असलेला खंडेराया या करारानुसार  नळदुर्ग इथ जात असतो. या याञा महोत्सवात राज्यभरातून भाविक  अणदूर येथे दर्शनासाठी दाखल होतात.  भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत, येळकोट येळकोट जय मल्हारचा जय घोष करत. हजारो भाविक अणदूरमध्ये खंडोबाच्या दर्शनासाठी दाखल झालेत.

Pushpa 2 Advance Booking: प्रदर्शीत होण्यापूर्वीच रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर पुष्पाचा बोलबाला; अॅडव्हान्स बुकींगमध्ये कमावले 30 कोटी

Pushpa 2 Advance Booking: अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा बहुप्रतिक्षित सिनेमा 5 डिसेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. मात्र रिलीजआधीच या सिनेमाने 30 कोटींची कमाई केली आहे.  सिनेमाचं सगळ्यात भाषेतलं मिळून एकूण अॅडव्हान्स बुकींग हे 30 कोटी झाल्याची माहिती मिळतेय. 

Maharashtra Politics : राज्यात दाढीवरून राजकारण रंगलं; दोन शिवसेनांमध्ये रंगला सामना, कोण जिंकणार?

Maharashtra Politics : महाराष्ट्रात कधी कुठच्या गोष्टीवरुन राजकारण रंगेल हे सांगता येत नाही. सध्या राज्याच्या राजकारणातला एक चर्चेतला विषय ठरतोय तो दाढी. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दाढी. या दाढीवरून संजय शिरसाटांनी आव्हान दिलं आणि दोन शिवसेनेमध्ये सामना सुरू झाला. हा सामना कोण जिंकणार? की सामना सुरू होण्यापूर्वीच याचा निकाल लागलाय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Solapur News : सोलापुरातील मारकडवाडी गावात बॅलेटवर निवडणूक घेण्याचा निर्णय, प्रशासनाचा आक्षेप

Solapur News : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर खापर फोडलं. पण सोलापूरच्या माळशिरसमधील एक गाव असं आहे, की या गावातल्या ग्रामस्थांनीच ईव्हीएमचा घोळ तपासण्याचा निर्णय घेतलाय. मारकडवाडी गावात बॅलेटवर निवडणूक घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. पण त्याला प्रशासनानं आक्षेप घेतलाय.

Who is Maharashtra News CM : महायुतीत मंत्रीपदासाठी अनेक आमदार इच्छुक, मात्र, आमदारांसमोर महाशक्तीच्या परीक्षेचं आव्हान

Who is Maharashtra News CM : लवकरच नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल. या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. मात्र मंत्रिपदासाठी या आमदारांना महाशक्तीच्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. आणि या परीक्षेचा पेपर स्वतः अमित शाह तपासणार आहेत. त्यासाठी शाहांनी पेपर सेट केलाय. आता त्या पेपरमध्ये कोणता आमदार पास होणार? हे त्या त्या मंत्र्याचं रिपोर्टकार्ड पाहूनच ठरणार आहे. 

Ajit Pawar Delhi Meeting : अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान घडामोडींना वेग... मंत्रिपदासाठी सात ते आठ नावं आजच ठरवणार असल्याची चर्चा, मात्र अमित शाह चंदीगडला रवाना

Ajit Pawar Delhi Meeting : एकीकडे राज्यात सत्तास्थापनेचं आगळंवेगळं नाट्य सुरू असताना अजित पवार मात्र एकटे दिल्लीत दाखल झालेत. अजित पवार दिल्लीत प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी दाखल झालेत. अजित पवारांसोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार देखील आहेत...दिल्लीत राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक झाली.  मंत्रिपदासाठी सात ते आठ नावं रात्रीच ठरवण्यात आल्याची माहिती मिळतेय. अचानक अजित पवारांनी दिल्लीवारी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. महत्त्वाची बाब म्हणजे  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नव्या फौजदारी कार्यक्रमासाठी चंदिगडला रवाना झालेत. अजित पवारांकडून संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अमित शाह चंदीगडला रवाना जाल्याने अजित पवार दिल्लीत कोणाला भेटणार असा सवाल उपस्थित होतोय.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. त्यासोबतच साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. तर दुसरीकडे राज्याचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नानं सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन खलबतं सुरू आहेत. सध्या एकनाथ शिंदे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा कधी सुटणार? महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? याकडे राज्यच काय, तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 


सर्व घडामोडींचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.