Maharashtra Breaking 31st August LIVE: कोल्हापुरात भक्ताकडून अंबाबाईला 50 लाखांचा सुवर्णसिंह अर्पण
Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Nanded : नांदेडमध्ये वीस वर्षीय तरुणाची आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा
नांदेड जिल्हयातील वाडी पुयड येथे एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली ..
जयंत पूयड या तरुणाने गळफास घेउन आत्महत्या केली ..
मराठा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकानी केला .
आत्महत्येपूर्वी जयवंत कदम याने चिट्टी लीहल्याचे सांगण्यात आले ..
दरम्यान प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे अशी मागणी करत समाज बांधवांनी शासकिय रूग्णालयात ठिय्या केला ...
Kolhapur : कोल्हापुरात एका भयानक अपघाताचा व्हिडीओ समोर
या घटनेत एका तरुणाला चारचाकीची जोराची धडक
शहराजवळील उंचगाव या गावात गुरुवारी रात्रीची ही घटना
या दुर्घटनेत तरुणाच्या डोक्याला डोक्याला दुखापत झालीये
CCTV फुटेजनंतर हा अपघात समोर आला आहे
गांधीनगर पोलिसात या घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे
अज्ञात चारचाकीचा तपास सुरु आहे
Nagpur : नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला नागपूर जिल्ह्यातून दाखल झाल्या आहे....
आज या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याचा निधी cm आणि दोन्ही dcm च्या उपस्थितीत महिलांच्या खात्यात जाणार आहे...
कार्यक्रमाला 2 वाजता नंतर सुरुवात होईल...
Jalgaon : जळगाव शहराच्या मधून जात असलेल्या मुंबई नागपूर महामार्गावर अपघातात दोन महिलांची घटना ताजी असताना आज पुन्हा याच ठिकाणी एक अपघात होऊन त्यात एक जण दगावला असल्याने संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून चक्का जाम केला आहे
Beed : राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक अभिषेक बियानी यांना पुण्यातून अटक.
बीड आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
राज्यस्थानी मल्टीस्टेटचा संचालक अभिषेक बियाणीला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे ताब्यात घेतले आहे.
मागच्या अनेक महिन्यांपासून मल्टिस्टेट प्रकरणातील आरोपी बीडच्या पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होते.
अनेक तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
त्याला आता बीड ला घेऊन येणार असून राजस्थानी मल्टीस्टेट च्या प्रकरणातील तपासला आता वेग येणार आहे.
Kolhapur : कोल्हापुरात भक्ताकडून अंबाबाईला 50 लाखांचा सुवर्णसिंह अर्पण
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवी चरणी 50 लाख 33 हजार 168 रुपयांचा सुवर्णसिंह अर्पण करण्यात आला आहे.
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका भक्ताने अंबाबाई चरणी हा सोन्याचा सिंह अर्पण केलाय.
71 तोळे 100 ग्रॅम वजनाचा हा सिंह असून तो अंबाबाई देवीच्या पूजेमध्ये समाविष्ट देखील करण्यात आला आहे
त्यामुळे अंबाबाई देवीचे रूप आणखीन खुलून दिसत आहे.
Dhule : धुळे महापालिकेचे माजी महापौर चंद्रकांत सोनार यांची सून आणि नगरसेवक देवेंद्र सोनार यांच्या पत्नी स्नेहल सोनार यांची तापी नदी पात्रात आत्महत्या
आत्महत्येमागील कारण अस्पष्ट
नरडाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
पोलिसांकडून तपास सुरू.....
Sindhudurg : मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटीलला यांच्या वतीने कोल्हापूर मधून वकिलांची फौज मालवणात दाखल
ॲड तुषार शिंदे, ॲड सोनावले, ॲड अभिजीत हिरुगडे, कोमलराव राणे ॲड सुरेश तेली हे आरोपीचे वकीलपत्र घेऊन दाखल.
आरोपीला दुपारच्या सत्रात न्यायालयात हजर केले जाणार.
काँग्रेसच्या जाहीरनामा समितीची बैठक
पृथ्वीराज चव्हाण आणि भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थिती टिळक भवनला बैठक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांचा समावेश करण अपेक्षित याची चाचणी सुरू
बिंदुसरा प्रकल्प ओव्हर फ्लो.. तर माजलगाव धरणासाठी जायकवाडीतून पाणी सोडल..
मागच्या अनेक वर्षात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत बीड जिल्ह्यातील बहुतेक प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत.. बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदूसरा धरण ओव्हर फ्लो होत आहे.. बिंदुसरा धरणाच्या छोट्या चादरीवरून सध्या पाणी पडायला सुरुवात झाली आहे..
तर तिकडे जायकवाडी मध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्याने माजलगावच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले.. उद्या दिवसभरात कधीही गोदावरीचे पाणी माजलगाव धरणात भरायला सुरुवात होईल..
भिवंडी ब्रेकिंग
Bhiwandi : भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर एचपी गॅस टँकर मधून गॅस गळती
परिसरात एकच खळबळ
महामार्गावरील वडपा गावाजवळ घडली घटना
काही काळ मुंबई नाशिक महामार्ग वर वाहतूक कोंडी
भिवंडी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल
घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल
गॅस टँकर सर्विस रोडला उभी करून गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू
सिंधुदुर्ग- प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केली राजकोट किल्ल्याची पाहणी
राम सुतार यांचा राजकोट पाहणीचा दौरा प्रशासन ठेवला अत्यंत गुप्त
राम सुतार राजकोट किल्ल्याची आणि दुर्घटना झालेल्या पुतळ्याची पाहणी करून मुंबईत परतले
राम सुतार राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार
राम सुतार राजकोट किल्ल्याची पाहणी करत असताना सुद्धा त्यांच्यासोबत मोजकेच अधिकारी
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्तीसगड येथील भाजपा आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले
रामजी भारती माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांची बैठक होणार
एकूण 20 आमदार या बैठकीत असणार आहे
तसेच 7 ते 8 माजी आमदार देखील असणार आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काही जबाबदारी या आमदारांवर असणार आहे
Beed : शासकीय स्वराती रुग्णालयात रुग्णांसह नातेवाईकांना प्रवेश पत्र बंधनकारक..
बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयात आता रुग्णांसह नातेवाईकांना प्रवेश पत्र बंधनकारक करण्यात आल आहे कोलकत्ता आणि रत्नागिरीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
Mumbai : जी टी रुग्णालयात गरीबांसाठी चालवल्या जाणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या 9 लाख 87 हजारहून अधिक रक्कमेवर चोरट्याचा डल्ला
१० बनावट चेकच्या माध्यमातून रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांच्या खोट्या स्वाक्षरीकरून हे पैसे सात जणांच्या खात्यावर वळवण्यात आल्याचे प्रथमदर्शी समोर
डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही रक्कम काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे
एकाच नंबरचे चेक दोन वेगवेगळ्या खात्यावर वटवण्यात आल्यान हीबाब आली समोर
Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या मालवणला भेट देणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थानाला भेट देणार रामदस्त आठवले
रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उद्या जाणार मालवणला
मनोज जरांगे पाटील यांचाही मालवण दौरा उद्याच आहे
Ajit Pawar : जेथे आमचे आमदार 2019 मध्ये निवडून आले,त्या सर्व मतदार संघात मी जात आहे- अजित पवार
त्या पार्शवभूमीवर आज काटोल विधानसभा मतदार संघात माझी यात्रा आहे - अजित पवार
जागावाटपाच्या चर्चेची पहिली बैठक आटोपली,
निवडून येईल त्यालाच तिकीट हाच जागा वाटप करतांना निकष असणार आहे.- अजित पवार
राष्ट्रवादी बरोबर दुर्देवी युती.... - भाजप प्रवक्ते गणेश हाके
असंगाशी संग केला...- भाजप प्रवक्ते गणेश हाके
लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकर्ते बाहेर पडलेच नाही..- भाजप प्रवक्ते गणेश हाके
. यामुळे भाजपाच्या खासदाराचा पराभव झाला...- भाजप प्रवक्ते गणेश हाके
अजितदादा तुम्ही सांगताय की मतदारसंघा तर ती कुठे दिले भाजप विचाराच्या कट्टर गाव सोडून...- भाजप प्रवक्ते गणेश हाके
अशा थेट सवाल भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी उपस्थित केलाय..
Political : शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट...
रात्री उशिरा दोघांमध्ये अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणावर एक तास चर्चा..
चर्चा सकारात्मक झाल्याचा योगेश केदार यांचा दावा
Local Railway : हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्ववत,
ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम पूर्ण,
सी एस एम टी ते पनवेल वाहतूक सुरू
Political : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवार यांचा युवकांच्या मेळाव्यात उल्लेख
काँग्रेसचे हिरामण खोसकर झिशान सिद्धकी आणि सुलभा खोडके लवकरच आपल्या सोबत येणार असल्याची अजित पवारांची माहिती
यासोबतच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकाप चे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्या सोबत असल्याचे अजित पवारांचा उल्लेख
पक्षाचे स्वतःची 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन शेकाप एक आणि दोन अपक्ष या 60 जणांच्या व्यतिरिक्त आणखी देखील जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची अजित पवारांची माहिती
Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रोखपाल पदावर कार्यरत महिलेने 44 लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे...
नागपूर विद्यापीठात कॅश काऊंटरवर रोखपाल म्हणून कार्यरत महिलेने विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये 439 पावत्या अवैध पद्धतीने मॉडीफाय करत अपहार केल्यानं अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
2023 मध्ये विद्यापीठाच्या अभियंता विभागात 34 हजार 160 रुपयांची सुरक्षा ठेव रिफंडसाठी जमा केली गेली होती. मात्र, वित्त विभागाच्या तपासणीत तीच पावती 4 हजार 160 रुपयांची होती. पावती मॉडीफाय करून घोटाळा होत असल्याचे समोर आले होते..
Political : महाविकास आघाडीच्या उद्या होणाऱ्या जोडो मारो आंदोलनाला मुंबई पोलिसांची अद्याप परवानगी नाही
या आंदोलनाच्या परवानगीसाठी आज महाविकास आघाडीतील काही नेते आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या घटनेसंदर्भात उद्या महाविकास आघाडी कडून “जोडे मारो” आंदोलन हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत आंदोलन होणार आहे
पोलिसांची परवानगी मिळाली नाही तरी आंदोलनाच्या भूमिकेत मविआ ठाम आहे
Sindhudurg - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी कन्सल्टंट चेतन पाटील याला काल सायंकाळी दाखवली अटक
काल पहाटे कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटील त्याला घेतलं होतं कोल्हापूर इथून ताब्यात
दोन ते तीन तास चौकशी केल्यानंतर चेतन पाटील याला काल सायंकाळी केली अटक
सुरक्षेसाठी चेतन पाटील यांची पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय तपासणी
मालवण पोलिसांकडून पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर आणून चेतन पाटील यांची वैद्यकीय तपासणी
चेतन पाटील याला अकरा वाजेपर्यंत मालवणच्या न्यायालयात हजर केले जाणार
नौदल आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत चेतन पाटील याची काल झाली चौकशी
Crime : आंध्र प्रदेशात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात छुपे कॅमेरे लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील घटना
माहिती समोर येताच विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून कारवाई करण्याची केली मागणी
पोलिसांनी याच कॉलेजमधे शिकणाऱ्या एका बीटेक विद्यार्थ्याला अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केल्याची माहिती
त्याने प्रेयसीला ब्लॅकमेल करून बाथरूममधे कॅमेरे लावल्याचा आरोप आहे
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले महाविद्यालयातील घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून कडक कारवाईचे त्यांनी संकेत दिले आहेत
पण अशी घटना समोर आल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आलाय
Central Railway : नाशिक आणि डहाणू त्र्यंबकेश्वर मार्गे जोडण्याची रेल्वेची योजना -
नवीन रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षण (Final Location Survey) मंजूर
नाशिक - डहाणू नवीन रेल्वे मार्गासह महाराष्ट्रात रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी रेल्वे आणखी एक मोठी प्रगती करण्यासाठी सज्ज आहे.
नाशिक -डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी (Final Location Survey) एकूण रु. २.५० कोटी खर्चास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
त्र्यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा १०० किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधील पंचवटी (ज्या ठिकाणी श्री राम वनवासात राहिले ते ठिकाण) दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वे वाहतूक उपलब्ध कर…
Mumbai Local : हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.
वाशीसमोर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने लोकल उशिराने धावत आहे.
ट्रेनमधून उतरल्यानंतर प्रवासी रुळावरून चालत आहेत.
Sindhudurg : मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर जाणार
किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला त्याची पाहणी करणार आहेत.
त्यानंतर कुडाळ मध्ये मराठा समाजाशी मराठा समाज हॉल मध्ये संवाद साधणार आहेत.
Pune : पुण्यातील हुक्का पार्लरवर धडक कारवाई; चार जणांवर गुन्हा दाखल, माजी गृहमंत्री रमेश बागवे यांच्या मुलाच्या मालकीचं होतं हुक्का पार्लर
सिंहगड आणि पाषाण परिसर दोन पदचारी महिलांचा अपघाती मृत्यू ; वाहनचालकावर गुन्हा दाखल
तू मला आवडते, पळून जाऊन लग्न करू म्हणत रिक्षा चालकाने केला शाळकरी मुलीचा विनयभंग, पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तरुणाचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; तरुण गंभीर जखमी, हडपसर परिसरातील घटना
पुण्यातील सैट वर्षाच्या अरिष्का लड्डा हिने सर केला माउंट एल्ब्रस शिखर; सगळीकडून कौतुकाचा वर्षाव
Ganesh Chaturthi 2024 : मुंबईत आज विविध मंडळाच्या गणपती बाप्पांचे आगमन
प्रसिद्ध चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा देखील आज आगमन सोहळा
मिरवणुका आणि चिंतामणी आगमन मिरवणुकांमुळे लालबाग, परळ भागामध्ये शनिवारी-रविवारी गर्दी होण्याची शक्यता
त्यामुळे प्रवाशांनी लालबाग, परळ(डॉ. बी.ए. आंबेडकर रोडने) जाणे टाळावे व बॅ. नाथ पै, रफी किडवाई रोड, ना. म. जोशी, साने गुरुजी मार्गाचा वापर करावा असं आवाहन मुंबई ट्राफिक पोलिसांच्या वतीने करण्यात आलेय
Mumbai Local : हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराने
वाशीजवळ ओव्हरहेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक उशिराने
गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून काही रेल्वे स्थानकात आणि ट्रॅकवर लोकल थांबल्या आहेत
Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाविरोधात 'पॉस्को'अंतर्गत गुन्हा दाखल
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वांद्री गावातील घटना
प्राथमिक शाळेच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल आणि अटक
संगमेश्वर पोलिसांची पालकांच्या तक्रारीनंतर तात्काळ कारवाई
शुक्रवारी संध्याकाळी शिक्षकाविरोधात चार ते पाच मुलींनी पालकांकडे केली होती तक्रार
मुलींच्या तक्रारीनंतर पालकांची पोलीस ठाण्यात धाव; पोलिसांकडून कारवाई
Nandurbar : नंदुरबारमध्ये सातपुड्याचे नैसर्गिक सौंदर्य खुलले
मुसळधार पावसाच्या विश्रांतीनंतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये धुक्याची दाट चादर...
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी
गणेशोत्सव सणात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरूनअवजड वाहतूक राहणार बंद
16 टन पेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गणेशोत्सवात प्रवेश बंदी
पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दरम्यान NH 66 वरून अवजड वाहतुक राहणार बंद.
गणेशोत्सव सणाला मुंबईकर चाकरमानी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रह (परिवहन ) विभागाचा निर्णय.
अत्यावश्यक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना राहणार सुट यामध्ये दूध,पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर मेडिकल ऑक्सीजन, अन्न धान्य भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वाहून नेणाऱ्या वाहनांना असणार मुभा.
Nagpur : लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांच्या बहिष्कार ?
एकीकडे नागपूर शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असतांना या कामात आशा सेविकांची जबाबदारी जास्त असतांना लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मेळाव्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याने आशा सेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करत बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिला आहे
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे बहिष्कारचा इशारा देण्यात आला आहे.
Raigad : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग खडबडून जागे
महामार्गावर दिवस रात्र कंत्राटदारांची रस्ते दुरुस्तीसाठी तारांबळ
नागोठणे ते कोलाड परिसरात खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदार रस्त्यावर
मे चेतक कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हा दाखल होताच इतर कंत्राटदार देखील कामात व्यस्त
गणेशोत्सव सणापूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांना अधिकाऱ्यांच्या सक्त सूचना
Sangamner : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात...
ताफ्यातील पोलिस गाडीचा अपघात...
ताफ्यातील पोलिस गाडीने इतर वाहनाला दिली धडक...
संगमनेर तालुक्यातील समनापूर गावातील घटना...
पोलिस वाहनातील दोन पोलिस कर्मचारी जखमी...
विखे पाटलांचा ताफा समनापूर गावातून संगमनेरकडे जाताना घडला अपघात...
जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात केले दाखल..
Jalna : जालन्यात शुक्रवारी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सौम्य लाठीचार्ज,
दहीहंडी उत्सवा निमित्त गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा धुडगूस, पोलिसांकडून प्रेक्षक तरुणांना हुसकवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज..
जालन्यातील आझाद मैदानावरती गौतमीचा डान्स परफॉर्मन्स....
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking 31st August LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
शिवरायांच्या पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती
मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्याला भेट देणार, कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण नको, जरांगेंचं आवाहन
विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता बळावली, 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान दोन टप्प्यांत मतदानाची शक्यता
, , , , ,
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -