Maharashtra Breaking News Live Updates : नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा चार दिवसांनी घरी परतले

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 31 Oct 2024 12:33 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. उमेदवारी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या काळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील. राज्यात बंडखोरांना थोपवण्याचेही आव्हान राज्यातील प्रमुख पक्षांपुढे...More

नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा चार दिवसांनी घरी परतले

पालघर -  नॉट रिचेबल असलेले शिवसेना शिंदे गटाचे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा तब्बल चार दिवसानंतर घरी परतले . उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा मागील चार दिवसांपासून होते नॉट रिचेबल . आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास वनगा तलासरीतील कवाडे येथील त्यांच्या राहत्या घरी परतले .