मोठी बातमी! माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या वाहनाचा अपघात 

Maharashtra Live News : Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 30 Sep 2024 06:39 PM

पार्श्वभूमी

मुंबई : महाराष्ट्राला सध्या विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वेध लागले आहे. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच सध्या राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी चालू आहे. महायुती (Mahayuti) आणि...More

Nashik : एल्गार कष्टकरी संघटनेचा इगतपुरी येथील पंचायत समितीवर बिऱ्हाड मोर्चा

नाशिक : इगतपुरी येथील पंचायत समितीवर एल्गार कष्टकरी संघटनेने बिऱ्हाड मोर्चा काढला आहे. या मोर्चात महिलांचा आपल्या लहान लेकरांना घेत मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. इगतपुरी तालुक्यातील बेघर आदिवासी कुटुंबांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेकडो चकरा मारून व फॉर्म भरून देखील लाभ मिळत नाही त्यामुळे पंचायत समितीच्या आवरातच चूल पेटवत ठिय्या मांडण्यात आला आहे.  आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. गेल्या पाच तासांपासून हा मोर्चा सुरु आहे. चर्चा होऊनही मार्ग न निघाल्याने मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत.