Maharashtra Breaking LIVE: पीपल्स रिपब्लिकन पक्ष महायुतीत नाराज, पीआरपी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता

Breaking News Live Updates : राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 30 Aug 2024 03:22 PM
महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणात वामन म्हात्रे यांना हायकोर्टाचा सोमवारपर्यंत अंतरिम दिलासा 

महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणात वामन म्हात्रे यांना हायकोर्टाचा सोमवारपर्यंत अंतरिम दिलासा 


कल्याण कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला म्हात्रेंकडून हायकोर्टात आव्हान


बदलापूरात चार वर्षांच्या मुलीवर शाळेत अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली


यानंतर याघटनेच्या विरुद्ध हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते


बदलापूर रेल्वे स्थानकात ८ ते ९ तास आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं


त्यावेळी या घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबद्दल शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी आक्षेपार्ह भाष्य केलं होतं


त्यानंतर वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पीपल्स रिपब्लिकन पक्ष महायुतीत नाराज, पीआरपी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता

पीपल्स रिपब्लिकन पक्ष महायुतीत नाराज 


 पीआरपी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता


शिवसेना फुटीनंतर शिवसेना शिंदे गटासोबत पीआरपीने केली होती युती 


मात्र गेल्या 2 वर्षापासून महायुतीत पीआरपीला उचित सन्मान आणि युतीतला वाटा मिळाला नसल्याने पीपल्स रिपब्लिकन पक्षात नाराजी 


या नाराजीमुळे उद्धव ठाकरे गटातील नेत्यांचा पी.आर.पी. नेत्यांना फोन 


पीआरपी पक्षाचे नेते लवकरच घेणार उद्धव ठाकरेंची भेट

पुणे शहरात तब्बल 1000 सीसीटिव्ही बंद

पुणे


पुणे शहरात तब्बल १००० सी सी टिव्ही बंद


पुण्यातील २५ पोलीस चौकींच्या हद्दीत हे सर्व सी टिव्ही कॅमेरा बंद


केबल तुटल्यामुळे बहुतांश हे १००० कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर


पुण्यात २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले मात्र, यातील १०५४ सीसीटीव्ही बंद तर १८५५ सुरू


पोलिस चौकी आणि बंद सीसीटीव्हींची संख्या


संभाजी पोलिस चौकी -३०
नारायणपेठ - २७
शनिवार पेठ -३५
खडक -३९
सेनादत्त-३४
मंडई -३८
मीठगंज-१३
पेरूगेट -२६
सहकारनगर -२४
महर्षीनगर - ७१
मार्केटयार्ड - ४२
वानवडी बाजार -२१
घोरपडी- ९
विश्रांतवाडी - ७
समर्थ पोलिस ठाणे- १३९
गाडीतळ- १८
कसबा पेठ -३३
जनवाडी - ४०
अलंकार -८  
कर्वेनगर - ७१
डहाणूकर - १५
हॅपी कॉलनी - ६
ताडीवाला रस्ता- ७०
कोंढवा - ४९
अप्पर इंदिरानगर - १००



रामोशी गेट -२
काशेवाडी- ४
पेरुगेट -२
सहकारनगर - ५
सहकारनगर तळजाई-३
पर्वती दर्शन - ४
लक्ष्मीनगर - ४
वानवडी बाजार - २
तुकाई दर्शन - ६
कोरेगाव पार्क -२
विश्रांतवाडी- ४
कसबा पेठ - ८
शिवाजीनगर पोलिस ठाणे- ४
शिवाजीनगर चौकी -५
पांडवनगर- ९
जनवाडी-४
कोथरूड पोलिस ठाणे -९
कर्वेनगर - २

चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे महिला कॉन्सेटबलचा मृत्यू, मुंबईत धक्कादायक घटना!

 मुंबईच्या अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरातून धक्कादायक घटना...


मुंबई पोलीस दलात कार्यरत महिला कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील यांना हॉस्पिटलमध्ये कानाचे ऑपरेशन करण्याकरिता भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. 


मात्र भुलीचे इजेक्शन दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे...


मरोळ पोलीस कॅम्पमध्ये कार्यरत महिला पोलीस कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील कानाचे ऑपरेशन करण्यासाठी लोखंडवाला परिसरात ॲक्सिस हॉस्पिटलमध्ये भरती झाल्या होत्या. 



मात्र कानाच्या ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे महिला पोलीस शिपायाच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे...


मात्र पोलिसांचा आरोपावर हॉस्पिटल बोलण्यास नाकार देत आहे...


सध्या आंबोली पोलिसांनी एडीआर दाखल करून अधिक तपास करत आहे...

खासदार वर्षा गायकवाड यांना महिला पोलिसांचा गराडा, ईमारतीच्या आतमध्येच आंदोलन सुरू

खासदार वर्षा गायकवाड यांना महिला पोलिसांचा गराडा


ईमारतीच्या आतमध्ये खासदार वर्षा गायकवाड यांचं आंदोलन सुरू

वाढवण बंदराच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त, पोलिसांकडून कसून चौकशी

मुंबई : प्रस्तावित वाढवण बंदराचा भूमिपूजन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.  या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे. त्यानंतर त्यांना आत सोडलं जात आहे. तर हा देशासाठी ऐतिहासिक क्षण असून सर्वांनीच या साठी सहकार्य करावं अशी आशा पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी व्यक्त केली आहे. 

भारतीय भांडवली बाजाराच्या निर्देशांकाचा नवा उच्चांक 

भारतीय भांडवली बाजाराच्या निर्देशांकाचा नवा उच्चांक 


सेन्सेक्स आणि निफ्टीनं गाठला नवा उच्चांकी स्तर 


सेन्सेक्स २५५ अंकांनी वधारत ८२ हजार ३९० पार तर निफ्टी ९२ अंकांनी वधारत २५ हजार २४४ पार

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या घराखाली पोलिसांचा गराडा, वर्षा गायकवाड यांना घराबाहेर पडू न  देण्यासाठी पोलिसांची तयारी

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या घराखाली पोलिसांचा गराडा 


वर्षा गायकवाड यांना घराबाहेर पडू न  देण्यासाठी पोलिसांची तयारी


वर्षा गायकवाड शिवाजी महाराज पुतळ्याच्या संदर्भात पंतप्रधान यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार आहेत


त्याआधीच अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असुन वर्षा गायकवाड यांना ही घराबाहेर पडू न देण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त

एलआयसीकडून 6 हजार 103 कोटी रुपयांचा लाभांश भारत सरकारला सुपूर्द 

एलआयसीकडून ६ हजार १०३ कोटी रुपयांचा लाभांश भारत सरकारला सुपूर्द 


२०२३-२४ आर्थिक वर्षासाठी एलआयसीकडून काल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना ३ हजार ६६२ कोटी रुपयांचा लाभांश देण्यात आला 


सोबतच, १ मार्च २०२४ रोजी देखील एलआयसीकडून २०२३-२४ साठी २ हजार २४१ कोटी रुपयांचा लाभांश दिला गेला होता 


असा एकूण एलआयसीकडून यंदा ६ हजार १०३ कोटींचा लाभांश दिला गेलाय

एलआयसीकडून 6 हजार 103 कोटी रुपयांचा लाभांश भारत सरकारला सुपूर्द 

एलआयसीकडून ६ हजार १०३ कोटी रुपयांचा लाभांश भारत सरकारला सुपूर्द 


२०२३-२४ आर्थिक वर्षासाठी एलआयसीकडून काल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना ३ हजार ६६२ कोटी रुपयांचा लाभांश देण्यात आला 


सोबतच, १ मार्च २०२४ रोजी देखील एलआयसीकडून २०२३-२४ साठी २ हजार २४१ कोटी रुपयांचा लाभांश दिला गेला होता 


असा एकूण एलआयसीकडून यंदा ६ हजार १०३ कोटींचा लाभांश दिला गेलाय

महिलेला तिच्याच घरात बंदी बनवत घरातील 1 लाख 33 हजारांचा एवज लंपास

चारकोपमध्ये चोरट्यांनी २८ वर्षीय महिलेला तिच्याच घरात बंदी बनवत घरातील १ लाख ३३ हजारांचा एवज लंपास केला


गुरूवारी सायंकाळी ७ च्या सुमारास महिला आपल्या लहान मुलासह घरात एकटी असताना घडल प्रकार


तोंडाला काळा फडका बांधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी महिलेला तिच्यात घरात ओढणीने बांधून ठेवले


त्यानंतर चोरांनी महिलेच्या अंगावरील आणि बाळाच्या अंगावरील दागिने काढले


तर घराच्या कपाटात ठेवलेले सोने व चांदीचा एवज लंपास केला


या प्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून चारकोप पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

1993 च्या बॉम्बस्फोटांशी संबंधित टायगर मेमनचे फ्लॅट्स केंद्राकडे सोपवा: टाडा कोर्ट

1993 च्या बॉम्बस्फोटांशी संबंधित टायगर मेमनचे फ्लॅट्स केंद्राकडे सोपवा: टाडा कोर्ट


मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष टाडा कोर्टाने  गुरुवारी  दिले निर्देश 


माहीमच्या अल हुसैन इमारतीतील टायगर मेमनचे तीन फ्लॅट जे  संलग्न आहेत  ( aatached)  केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात येतील.



1993 च्या बॉम्बे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कुटुंबातील अनेक सदस्यांना दोषी ठरवण्यात आले होते, निर्दोष ठरवण्यात आले होते किंवा ते फरार होते


1994 मध्ये संलग्न, फ्लॅट रिसीव्हर, मुंबई उच्च न्यायालयाकडे आहेत


 फरार झालेल्यांमध्ये बॉम्बस्फोटांचा कथित सूत्रधार टायगर मेमन आहे


  त्याचा भाऊ, याकूब, ज्याच्या विरोधात  खटला उभा राहिला आणि दोषी ठरला, त्याला 2015 मध्ये फाशी देण्यात आली 


सहाही मेमन बंधू कधीकाळी या इमारतीत राहत होते


  त्यांची आई, एका फ्लॅटची मालक, हनीफा मेमन, निर्दोष सुटली आणि आता ती मरण पावली आहे


टायगर आणि याकुबची मेहुणी, रुबीना, जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत


संबंधित गृहनिर्माण संस्थेने गेल्या महिन्यात कोर्टात धाव घेत सात सवलती, 18% व्याजासह 41 लाख रुपयांची देखभाल थकबाकी वसूल करण्याची परवानगी मागितल्यानंतर आणि चार दशकांच्या स्थितीमुळे पुनर्विकास किंवा दुरुस्ती करण्यास सक्षम होण्यासाठी हा आदेश आला



त्यांची याचिका फेटाळत न्यायालयाने त्यांना सक्षम अधिकाऱ्याकडे जाण्याचे निर्देश दिले आहेत


 विशेष न्यायाधीश व्हीडी केदार म्हणाले, "जप्तीच्या आदेशानुसार, केंद्र सरकार वादग्रस्त मालमत्तेचे मालक आहे."

Gold Smuggling : मुंबई सेंट्रलमध्ये 17 कोटींचं सोनं जप्त, तिघांना ठोकल्या बेड्या

मुंबई सेंट्रल येथे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईत तस्करीतील सोने लपवण्यासाठी जाणाऱ्या तिघांना अटक केली. आरोपींकडून २३ किलो सोने हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १७ कोटी रुपये आहे. गिरगाव फणसवाडी येथून मुंबई सेंट्रल येथे सोने घेऊन जात असताना आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी आणखी एका आरोपीचा सहभाग उघड झाला आहे.

Rajkot Statue : राजकोट किल्ला पुतळा प्रकरणात आरोपी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर : राजकोट किल्ला पुतळा प्रकरण


आरोपी चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली कारवाई


मध्यरात्री तीन वाजता चेतन पाटीलला घेतलं ताब्यात

Satara : वाई-महाबळेश्वर रोडवरील पसरणी घाटात बिबट्याचे दर्शन 

सातारा : वाई-महाबळेश्वर रोडवरील पसरणी घाटात बिबट्याचे दर्शन 


पर्यटकांना मध्यरात्री पसरणी येथील थापा या ठिकाणी  दिसला बिबट्या


घाटातील रोडच्या कठड्यावर बिबट्या बसल्याचे दिसले


काही वेळानंतर बिबट्या दरीच्या दिशेने

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारवर सडकून टीका केली जात आहे. या प्रकरणातील स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलला (Chetan Patil) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याती राजकारणही चांगलेच तापले आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.