Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रात मविआचं सरकार येणार, लाडकी बहीण सोबत सुरक्षित बहीण आणणार : आदित्य ठाकरे
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाने देखील या मतदारसंघात उमेदवार दिला आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने लहू शेवाळे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. तर याच मतदारसंघात शरद पवार गटाचे पांडुरंग तांगडे यांना देखील पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध ठरला आहे.
बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिम मधे राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते. : सदा सरवणकर
सायन कोळीवाडा जागेवरुन भाजप नेत्यांमध्ये चर्चा
सायन कोळीवाडा याठिकाणी राजश्री शिरोडकर होत्या इच्छुक
राजेश शिरवडकर आणि राजश्री शिरवडकर भाजप प्रदेश कार्यालयात दाखल
सायन कोळीवाडा मतदारसंघाचे आमदार कॅप्टन तमिल सेल्वन कार्यालयात दाखल
राजेश शिरवडकर आणि तमिल सेल्वन यांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. अन्नदात्याला ताकद देणं, कर्जातून मुक्त करणं, शेतमालाला योग्य भाव देणं हे आमचं काम आहे, असं नाना पटोले म्हणाले.
नवले पुलाजवळ एका उभ्या असलेल्या क्रेनला ट्रकची धडक
या अपघातात दोन जण अडकल्याची माहिती
पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची चार वाहने दाखल
एका व्यक्तीला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले
दुसऱ्याला काढण्याचे काम सुरू
Raj Thackeray: फुकट पैसे देण्यापेक्षा बहिणींना सक्षम बनवा. कुणलाही काही फुकट देऊ नये. फुकट पैसे वाटत बसले तर महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल, असे म्हणत राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरुन निशाणा साधला आहे.
Raj Thackeray: महाराष्ट्राचा चिखल होण्यासाठी शरद पवार जबाबदार : राज ठाकरे
Raj Thackeray: माझ्यासाठी अमित ठाकरे हा मनसेच्या इतर उमेदवारांप्रमाणेच, अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत राज ठाकरेंची माझा व्हिजन कार्यक्रमात प्रतिक्रिया. दिली आहे.
Raj Thackeray: आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत होता, त्यामुळे 50 हजाराची वोट बॅंक असतानाही मी नातेसंबंधांसाठी आदित्य समोर उमेदवार दिला नाही, त्याचं अजिबात शल्य नाही, राज ठाकरेंचं माझा व्हिजन कार्यक्रमात वक्तव्य.
Supriya Sule : आजही राज्याच्या राजकारणात उमटले. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं वक्तव्य अत्यंत वेदनादायी असल्याचं सांगत राजकारणाची पातळी खालावल्याची टीका केली. तसंच देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी निशाणा साधला. मंत्रिपदाची शपथ घेता तेव्हा तुम्ही इतरांना फाईल दाखवू शकत नाही. मग फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्यांनी अजित पवारांना फाईल दाखवलीच कशी? असा सवाल विचारताना याची चौकशी करण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी केली
Devendra Fadnavis: मनसुख हिरेनची हत्या होईल याची कल्पना अनिल देशमुखांना होती की नाही याचं उत्तर द्या असा सवाल फडणवीसांनी केलाय. माझा व्हिजन कार्यक्रमात फडणवीसांनी हा थेट सवाल केला.
Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बडे चेहरे घेणार जाहीर सभा घेतल्या. भाजपकडून शंभरहून अधिक सभांचे नियोजन तयार करण्यात आले,.पंतप्रधान मोदींच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण ८ सभांचे नियोजन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अधिक सभांची जबाबदारी देण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ही १५ सभा होणार आहे. गोवा, मध्य प्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री ही महाराष्ट्र पिंजून काढणार
कुणाच्या किती सभा होणार हे जाणून घेऊया :
पंतप्रधान नरेंद्र मोदी - ८
अमित शाह - २०
नितीन गडकरी - ४०
देवेंद्र फडणवीस - ५०
चंद्रशेखर बावनकुळे - ४०
योगी आदित्यनाथ - १५
Rahul Gandhi: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा मुंबईत होणार आहे. ६ नोव्हेंबरला फोडणार प्रचाराचा नारळ फोडणार आहे.
Ashish Deshmukh: सावनेर मतदारसंघात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले देशमुख आणि केदार आमनेसामने आहे .सावनेर मतदारसंघात सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार विरुद्ध भाजपचे आशिष देशमुख मैदानात आहे. सावनेर अत्यंत संवेदनशील मतदारसंघ आहे. त्यामुळे आशिष देशमुख यांच्या व्हीडीओनंतर त्यांच्या खाजगी सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.
Uddhav Thackeray: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात होणार उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. उदय सामंत यांच्या विरोधातील प्रचारात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. पाच नोव्हेंबर रोजी होणार जाहीर सभा होणार. आदित्य यांच्या ऐवजी उद्धव यांची सभा रत्नागिरीत होणार असल्याने सामंत यांच्या विरोधातील रणनीतीची अधिक चर्चा आहे.
Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला. मेसेज करणाऱ्या व्यक्तीकडून 2 कोटींची मागणी करण्यात आली. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात ३५४ (२), ३०८(४) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sambhaji Nagar: ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळी छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता नेहमीप्रमाणे फुटली. जलवाहिनी कुठे फुटली हे शोधायला पाच तास लागले. सकाळी जायकवाडी धरणाजवळ पिंपळवाडी येथे फुटलेला भाग सापडला. त्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केले. सायंकाळी 5 वाजता दुरुस्ती संपल्यावर शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. तब्बल 15 तास शहराचा पाणीपुरवठा बंद होता. वसुबारसच्या दिवशीच नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. मंगळवारी धनत्रयोदशीला सुद्धा पाणी मिळाले नाही.त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.
Vanaga : पुनर्वसनाच्या चिंतेमुळे 36 तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आमदार श्रीनिवास वनगा हे आपल्या घरी येऊन पुन्हा माघारी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे.. श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा माघारी गेल्याची माहिती समोर आली आहे. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा आता यापुढे आपली राजकीय भूमिका काय घेतात हे येत्या काळातच स्पष्ट होऊ शकतं . (वाचा सविस्तर)
Ashish Deshmukh: सावनेर मतदारसंघात सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार आणि भाजपचे आशिष देशमुख यांच्यात लढत आहे.. दरम्यात प्रचारसभेत भाषणावेळी आशिष देशमुख यांनी सुनील केदारांवर टीका करताना वादग्रस्त विधान केलंय. तर दिवाळीला केदारांची लंका नेस्तनाभूत करायची असल्याचा इशाराही आशिष देशमुखांनी दिलाय
काँग्रेस नेते सुनील केदार यांनी पत्नी अनुजा केदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला..डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास सुनील केदार यांनी व्यक्त केला यावेळी सुनील केदारची चक्की चालेल तेव्हा भारी पडेल असा इशाराही महायुती नेत्यांना दिलं. तर डिसेंबरमहिन्यात वाळूचे ट्रक बिनधास्तपणे चालतील असा दावा करत जाहीर सभेत सुनील केदार यांनी अवैध वाळू व्यवसायाचं समर्थन केलं
Sunil Kedar: नागपूरमधील उमेदवारांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे सुनील केदार यांची तक्रार केली. भूपेश बघेल यांना भेटून सुनील केदार यांना समज देण्याची मागणी या उमेदवारींनी केली. सुनील केदार यांनी नागपुरातील वेगवेगळ्या मतदारसंघात बंडखोर उमेदवारांचं समर्थन केला, असा या उमेदवारांचा आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील चार मतदारसंघात सुनील केदार समर्थकांनी बंड केलं आहे. रामटेकमधून माजी मंत्री व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. तर उमरेडमध्ये जिल्हा परिषदचे सभापती कैलास चूटे यांनी अपक्ष अर्ज भरला.याशिवाय हिंगणा मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सभापती उज्वला बोढारे यांनी बंडखोरी केली. तर पश्चिम नागपूरमध्ये नरेंद्र जिचकार यांनीही बंडखोरी करत अर्ज दाखल केला
Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज दुपारी बैठक बोलवलीय. यावेळी उमेदवारांच्या बंडखोरीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. अनेक ठिकाणी परस्पर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत यावरही आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे आज दुपारी 2 वाजता हॉटेल ट्रायड्रन्टमध्ये मविआची बैठक होणार आहे..
Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर आता आज अर्जाची छाननी होणार आहे.. महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण २८८ मतदारसंघ असतानाही, महायुतीनं तब्बल २९२ उमेदवार दिलेत. तर महाविकास आघाडीनेही 'नहले पे दहला' मारत २९६ उमेदवारांना रिंगणात उतरवलंय. आता तुम्ही म्हणाल की, मतदारसंघापेक्षा जास्त उमेदवार कसे? तर त्याचं उत्तर आहे काही मतदारसंघात होणाऱ्या मैत्रिपूर्ण लढती. या निवडणुकीसाठी मविआच्या जागावाटपात सेंच्युरी मारणार असा दावा करणाऱ्या, ठाकरेंच्या शिवसेनेनं ९६ ठिकाणी उमेदवार दिलेत, तर १०२ उमेदवारांसह काँग्रेस मविआतला मोठा भाऊ ठरला. महायुतीत १४९ उमेदवारांसह भाजप मोठा भाऊ ठरला.. ८१ उमेदवारांसह शिंदेंची शिवसेना हा महायुतीतला दुसरा मोठा पक्ष ठरला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५५ उमेदवार, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ८७ उमेदवार दिले आहेत..
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप चालू आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. जागावाटपानंतर राज्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील घडामोडींचे हे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर.....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -