Maharashtra Breaking LIVE : राज्य, देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 03 Sep 2024 02:58 PM
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सोलापुरात कोणताही परिणाम नाही 

सोलापूर ब्रेकिंग 

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सोलापुरात कोणताही परिणाम नाही 

सोलापूर एसटी महामंडळ आगारातून सकाळपासून सुरळीत एसटी सेवा सुरु 

सकाळपासून दुपारी 12 पर्यंत नियोजित सर्व 59 फेऱ्या सोलापूर आगारात पूर्ण 

सोलापूर आगर प्रमुख नागेश जाधव यांची माहिती

हानगरपालिकेनंतर रेल्वेकडून अहमदनगरच्या नामांतराला हिरवा कंदील

अहमदनगर : महानगरपालिकेनंतर रेल्वेकडून अहमदनगरच्या नामांतराला हिरवा कंदील...

रेल्वेने अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यास दिली मंजुरी...

नामांतर केल्याचं रेल्वेकडून निवेदन...

स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात करणार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात करणार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

 सिद्धार्थ खरात यांनी एक जुलैला मंत्रालयीन सहसचिव असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि त्यानंतर आता त्यांनी राजकारणात येण्याचा मार्ग स्वीकारला आहे...

आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या ठिकाणी दुपारी एक वाजता  सिद्धार्थ खरात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत 

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  मेहकर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ खरात  हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे

सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग , ग्राम विकास विभाग , गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले असून राज्यमंत्री , कॅबीनेट मंत्री व केंद्रीय राज्य मंत्री यांचे खासगी सचिव म्हणून कामे केली आहेत

एसटी महामंडळाकडून राज्य सरकारला मध्यस्थी करत संपावर त्वरित मार्ग काढण्यासाठी पत्र व्यवहार 

एसटी महामंडळाकडून राज्य सरकारला मध्यस्थी करत संपावर त्वरीत मार्ग काढण्यासाठी पत्र व्यवहार 

एसटी महामंडळाकडून राज्य सरकारला पत्र लिहीत बैठकीचं आयोजन करण्याची मागणी

संपामुळे एसटीचे जवळपास ३५ डेपो बंद झाल्याची माहिती

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गणेशोत्सवानंतर निर्णय होणार 

महाविकास आघाडीच्या जागावाटप संदर्भातील संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार, मुंबईच्या रखडलेल्या जागावाटपसंदर्भात आता गणेशोत्सवानंतर निर्णय होणार 

महाविकास आघाडीच्या  जागावाटपसंदर्भातील  दोन बैठका झाल्यानंतर आता पुढील बैठका या गणेशोत्सवानंतर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, 

गणेशोत्सव झाल्यानंतर  सुरुवातीला मुंबईतील जागावाटपा संदर्भात निर्णय घेतला जाणार असून त्यानंतर कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील जागा वाटप बाबत निर्णय घेतला जाणार आहे 

 महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठका जरी गणेशोत्सवानंतर होणार असल्या तरी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांच्या अंतर्गत बैठका या यादरम्यान होत राहतील, त्यासोबत प्रचाराची रणनीती सुद्धा ठरवतील 

 ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्ष पक्षांतर्गत सर्वे, जागा वाटपापूर्वी पक्षाकडून तयार करण्यात आलेले अहवाल, महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात आपली ताकद आहे, शिवाय कोणते इच्छुक उमेदवार आहेत, कोणत्या जागा संदर्भात आपण आग्रही  असले पाहिजे,या सगळ्या बाबत पक्षांतर्गत चर्चा करतील अशी माहिती देण्यात आली आहे

एसटी कर्मचारी बंदमुळे प्रवाशांचे हाल टपाल खात्यालाही बसला बंदचा फटका

St कर्मचारी बंदमुळे प्रवाशांचे हाल

टपाल खात्यालाही बसला बंदचा फटका

रोज जाणारे टपाल आज जाणारच नाही
-
एक दोन तासापासून थांबूनही प्रवाश्यांना  बस मिळत नाही
-
महिला,ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी कर्मचाऱ्यांना बसचा कर्मचारी आंदोलनाचा फटका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात बैठक 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात बैठक 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन वेळा बैठका पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंतर्गत दहा वाजता बैठक पार पडणार 

बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये 60 पेक्षा जास्त जागांवर लढण्यावर ठाम 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 60 ते 65 जागा मिळण्याची एबीपी माझाला विश्वसनी सूत्रांची माहिती

दिंडोशीत शिवसेना शिंदे गटाकडून मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन 

दिंडोशीत शिवसेना शिंदे गटाकडून मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सून वृषाली शिंदे कार्यक्रमाला उपस्थित

विभाग प्रमुख वैभव भराडकर यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन 

मंगळागौळ कार्यक्रमासाठी दिंडोशी विभागातील शेकडो महिलांची उपस्थिती 

उपस्थित महिला भगिनींसोबत वृषाली शिंदे, प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी देखील घेतला झिम्मा फुगडीचा आनंद....

एसटी संपाचा संभाजीनगराला फटका, सकाळ सत्रातील 100 बस धावल्या नाहीत

छत्रपती संभाजीनगर एसटी संप

दिवस भारत 500 बस धावतात 800 फेऱ्या होतात 

सकाळ सत्रातील 100 बस धावल्या नाहीत

सिडको  पैठण, वैजापूर कन्नड स्थानकातून बस धावल्या नाहीत

मुख्य बस स्थानक, सोयगाव सिल्लोड गंगापूर बससेवा अंशतः सुरू आहे

ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक, एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात 

ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक दिल्याने महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात 

गणपती जादा बसेस पाठविण्यात येणार असल्याने धरणे आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन 

कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्यासाठी आवाहन करण्याच्या सूचना 

बसस्थानकावर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा यासंदर्भात सूचना 

आंदोलनावेळी बसस्थानकात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन 

आंदोलनामुळे फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयाला देण्याच्या सूचना

MUMBAI : मुंबईच्या वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गामध्ये बदल

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४ रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृह मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान या कार्यक्रमांसाठी अतिमहत्वाच्या व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्याने मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गामध्ये काही बदल केले आहेत.

विधान भवन परिसरातील सात मार्गांवरील पे अॅड पार्कला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे

 यात प्रामुख्याने 
* उषा मेहता चौक ते जमनालाल बजाज मार्ग
* विनय के शहा मार्ग
* रामनाथ गोएंका मार्ग
* विधान भवन मार्ग
* एनसीपीए रस्त्याचा शेवट

तसेच रामनाथ गोएंका मार्गावर साखर जंक्शन ते विधानभवन मार्गावर (पोलिस,अग्निशमन दल, रुग्णवाहिका)  वगळत सर्व प्रकारच्या वाहतूकीस प्रतिबंद राहणार आहे

तर कार्यक्रमास उपस्थित राहणार्या विधीमंडळ सदस्यांच्या वाहनांसाठी व्हि व्हि राव मार्ग, फ्रि प्रेस मार्ग यासाठीव्यवस्था कऱण्यात आली आहे

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यभरात पावसाच्या सरी बसरत आहेत. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. या घटनांसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.