Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Live Updates: पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) विजेता ठरला असून महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध माहिती समोर येत आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 03 Feb 2025 02:07 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: अहिल्यानगर येथे 67 वी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2025) कुस्ती स्पर्धा काल (2 फेब्रुवारी) पार पडली. या कुस्ती स्पर्धेमध्ये पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) विजेता...More

भंडाऱ्यात स्कूल व्हॅनमध्ये चालकानं केली 10 वर्षीय विद्यार्थिनीची छेडखानी; गुन्हा दाखल

भंडारा: शहरातील एका स्कूलमध्ये शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीची त्याचं शाळेत मुलं सोडणाऱ्या प्रायव्हेट स्कूल व्हॅन चालकानं विनयभंग केला. ही घटना 1 फेब्रुवारीला घडली असून आज पालकांनी भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून ही घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होताचं चालक फरार झाला आहे. सुभाष फत्तु नेवारे (३५) असं चालकाचं नावं आहे. सुभाष हा प्रायव्हेट स्कूल व्हॅन चालक असून त्याच्या व्हॅनमध्ये पीडिता आणि तिचा लहान भाऊ दोघेही स्कूलमध्ये जातात. शनिवारी सकाळ पाळीची शाळा झाल्यानंतर दोन्ही बहीण भावाला व्हॅननं घराकडं सोडून देताना चालकानं पीडितेचा विनगभंग केला होता.