Maharashtra Breaking 29th August LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Breaking News Live Updates : राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Akola News : अकोल्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला अकोल्यात सुरूवात. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांसह देशभरातून नेते उपस्थित. अकोल्यातील मराठा मंडळ सभागृहात होतो आहे वर्धापन दिन कार्यक्रम. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर व्यासपीठावर न बसता खाली कार्यकर्त्यांमध्ये बसलेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रासप आणि महादेव जानकर काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे दुर्लक्ष.
Hingoli : वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार यांचा काल एका इसमाने मिरची पावडर तोंडावर फेकत चाकूने हल्ला करत निर्घृणपणे खून केला आहे तलाठीच्या कार्यालयातच हा खून झाल्याने या खुनाचे पडसाद आज राज्यभर पाहायला मिळत आहेत तलाठी महासंघाच्या वतीने आज राज्यभर काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे त्यानुसार आज हिंगोली मध्ये सुद्धा महसूल विभागातील वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे यानुसार हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल विभागातील तलाठी मंडळ अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा या कामधंदा आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत या प्रकरणातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या अशीच मागणी यावेळी आंदोलन कर्मचाऱ्यांनी केली आहे
Dhule : राज्य सरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणा सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेला कुठून पैसा आला? आदिवासी विकास योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला असल्याचा आरोप एकलव्य आदिवासी संघटनेने केला आहे. या संदर्भात त्यांनी धुळे जिल्हाधिकारी यांची देखील भेट घेतली आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लागू करून अनेक महिलांच्या खात्यावर करोड रुपये टाकले आहे. मात्र हे पैसे आदिवासी विकास विभागाच्या विशेष निधीमधून वर्ग केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. त्याआधीही आदिवासींच्या अवहेलना या सरकारने केली आहे. जर कधी आदिवासींचा निधी लाडकी बहीण योजना कडे वळवला असेल तर संपूर्ण आदिवासी समाज राज्य सरकारच्या विरोधात जाऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे
Thane News : ठाणे जिल्ह्यातील बांधकाम विभागातील ठेकेदार संपावर गेले असून त्यांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने केले आहेत... तर शहरात हजारो कोटींचा निधी द्यायला निधी उपलब्ध आहे परंतु आमच्या ठेकेदारांचे बिल द्यायला प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचा आरोप यावेळी ठेकेदारांनी केला आहे तसेच लाडक्या बहिणीच्या खात्यात सरकार पैसे देते परंतु आमच्या सारख्या लाडक्या बहिणींचा देखील सरकारने विचार करायला हवा असे यावेळी ठेकेदार म्हणाले आहेत.. ऐन गणेशोत्सवाच्या वेळीच आमचे बिल थांबल्याने आम्ही सण साजरे कसे करायचे अशी खंत यावेळी ठेकेदारांनी व्यक्त केली आहे.जो मर्यंत ठेकेदारांचे कामाचे पैसे मिळत नाही तो पर्यंत काम बंद अनोदनाचा इशारा महाराष्ट्र ठेकेदार संघटनेच्या वतीने सरकार आणि शासनाला दिला आहे.
Solapur News : सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची बदली
पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या सीईओपदी झाली आव्हाळे यांची नियुक्ती
तर कुलदीप जगम यांची सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
Sindhudurg : सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतलीये. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. तसंच मुख्य सचिव, पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि नेव्हीचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
Maharashtra News : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून अंतर्गत सर्व्हे करण्यात आला. काँग्रेस पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसचं मोठा पक्ष राहणार आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला 85 जागा, शरद पवार गटाला 55 ते 60 जागा तर ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे.. दरम्यान काँग्रेसचा हा सर्व्हे आहे की उद्धव ठाकरेंना इशारा आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय.
Maharashtra News : शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुंबईतील काही जागांवर रस्सीखेच सुरु असून दोन्ही पक्षाकडून मुंबईत अधिकाधिक जागा आपल्या पक्षाने लढाव्यात असा आग्रह आहे. ठाकरे गट मुंबईत 20 ते 22 जागा लढवण्यावर ठाम असताना काँग्रेसने 18 जागांचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. त्याच 18 मध्ये काही जागा ठाकरे गटाने लढविण्याची तयारी केली आहे...सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा 7 जागांचा प्रस्ताव ठेवलाय. त्यामुळे प्रत्येकाला समाधानकारक जागा मेरिटनुसार मिळण्यासाठी काहीशी अडचण होणार आहे..
Maharashtra News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रदेश कोअर कमिटीची बैठक
उद्या संध्याकाळी भाजप प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक
प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
भाजपमधील गळती रोखण्यासाठी कोअर कमिटी करणार चर्चा
निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग वाढवण्यासाठी होणार खलबते
राज्यातील दुर्घटनांनंतर बॅकफूटवर असलेल्या संघटनेला पुन्हा उसळी घेण्यासाठी काय करावे? यावर होणार विचारमंथन
Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान होण्याची दाट शक्यता
राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता
दोन टप्प्यांत निवडणुका घेण्याची गुप्तचर विभागाची सूचना
दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता
पार्श्वभूमी
Breaking News Live Updates : देश-विदेशासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
1. विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता बळावली, 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान दोन टप्प्यांत मतदानाची शक्यता
2. शिवरायांच्या पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती
3. पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार
4. मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्याला भेट देणार, कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण नको, जरांगेंचं आवाहन
5. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या शिवसृष्टीचे उद्या लोकार्पण, शिवसृष्टीत आहे शिवरायांचा 32 फुटांचा पुतळा...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -