Maharashtra News Live Updates : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आता बीडमध्ये मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 29 Sep 2024 12:01 PM
पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आता बीडमध्ये मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत

पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर बीडमध्ये भव्य बैलगाडा शर्यत पार पडते आहे. बीड जवळील तळेगाव शिवारात तीनशे मीटर धावपट्टीवर बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलीय. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी बैलगाडा शर्यत पार पडते. यावर्षी मात्र राजकारणाची किनार शर्यतीला दिसून आली.


बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर प्रत्येक वर्षी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बीडमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. यावर्षी बहुचर्चित मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्रातील नामांकित बैल बकासुर, सर्जा, सोन्या, हिंदकेसरी यासारख्या बैल जोड्यांचा थरार पाहायला मिळालाय. याच बैलगाडा शर्यतीतून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकलेय. विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे मस्के यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

नायब तहसीलदारांच्या बदलीचे अधिकार मंत्रालय पातळीवरून विभागीय आयुक्त पातळीला हस्तांतरित

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्यानंतर आता प्रशासनिक हालचाली ही जोरात सुरू झाल्या आहे... 


राज्यातील नायब तहसीलदारांच्या बदलीचे अधिकार मंत्रालय पातळीवरून विभागीय आयुक्त पातळीला हस्तांतरित करण्यात आले आहे... सोबतच बदलीस पात्र नायब तहसीलदार यांची यादी ही संबंधित विभागीय आयुक्तांना देण्यात आली आहे... 


उद्यापर्यंत बदलीस पात्र सर्व नायब तहसीलदारांच्या बदल्या कराव्या असे निर्देश मंत्रालयातून जारी करण्यात आले आहे...


निवडणूक आयोगाने अनेक महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली संदर्भातले नियम स्पष्ट केले होते मात्र राज्यातील नायब तहसीलदारांच्या बदली प्रक्रियेत त्या नियमांचा पालन करण्यात आले नव्हते.. म्हणून राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यात निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त केली होती...


त्यानंतर नायब तहसीलदारांच्या बदलीचे अधिकार मंत्रालय पातळीवरून विभागीय आयुक्त पातळीवर हस्तांतरित करण्यात आले आहे...

भाजप नेते नितेश राणे यांच्या अमरावती दौऱ्याला मुस्लीम समुदायाचा विरोध, पोलिसांचा मोठा बंदोबस्त!

भाजप नेते नितेश राणे आज अमरावती दौऱ्यावर


मुस्लिम समुदायाचा नितेश राणेंच्या दौऱ्याला विरोध


अचलपूर मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात


राणे नागपूर येथून दुपारी १.३० वाजता अचलपूर- परतवाडाकडे प्रयाण करणार


सायंकाळी ४ वाजता सकल हिंदू समाजाच्या मोर्चात राणे सामील होणार


परतवाडा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नितेश राणेंची सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदान इथे होण्याची शक्यता 

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदान इथे होण्याची शक्यता 


शिवसेनेकडून दोन्ही मैदानाचे दसऱ्याच्या दिवशी करण्यात आले आरक्षण 


तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली नसल्याची सूत्रांची माहिती 


पुढील काही दिवसात शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून दोन्ही मैदानाची पाहणी केली जाणार आणि अंतिम जागा निश्चित केली जाणार 


यापैकी बीकेसी मैदान अंतिम होण्याची शक्यता जास्त, कारण याच ठिकाणी आधी देखील शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता,

पुणे सातारा महामार्ग लगत फॉरेस्ट रेंज ऑफिससमोर बिबट्याच्या बछड्याचा कारच्या धडकेने मृत्यू

पुणे सातारा महामार्ग लगत फॉरेस्ट रेंज ऑफिससमोर नसरापूर येथे काल रात्री 10 च्या सुमारास बिबट्याचे एक छोटे बछडे कारच्या धडकेने मृत पावलेले आहे.


दोन-चार दिवसांपूर्वी नसरापूर मध्ये वनविहार सोसायटी ते बनेश्वर भागामध्ये बिबट्याचा वावर आहे...


काल रात्री ही दुर्दैवी घटना घडलीय...

बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून मोटारसायकल नेणारा तरुण गेला वाहून, अक्कलकोट तालुक्यातील आळगे येथील धक्कादायक घटना 

सोलापूर ब्रेकिंग -


बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून मोटारसायकल नेणारा तरुण गेला वाहून, अक्कलकोट तालुक्यातील आळगे येथील धक्कादायक घटना 


अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथे राहणारा अल्ताफ तांबोळी हा आळगी बांधाऱ्यावरून कर्नाटककडे जाण्याचा प्रयत्न करत होता 


काल संध्याकाळी 4 सुमारास बंधारा ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात तो दुचाकीसह वाहून गेला


अक्कलकोट ग्रामीण पोलीस आणि हैद्रा ग्रामस्थ  यांच्याकडून रात्रभर त्याचा शोध सुरु होता, अद्याप त्याच पत्ता लागलेला नाहीये.


उजनी धारणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली 


अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे

बीडच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याला मनोज जरांगे उपस्थितीत राहणार ?

छत्रपती संभाजीनगर ब्रेकींग 


बीडच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याला मनोज जरांगे उपस्थितीत राहणार ?


उद्धव ठाकरे, पंकजा मुंडेंच्यानंतर आता जरांगेंचा दसरा मेळावा?


भगवान भक्तीगडावर होतो पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा


मनोज जरांगे आणि नारायणगडाचे प्रमुख शिवाजी महाराज यांच्यात मेळाव्याबाबत चर्चा


आज दसरा मेळाव्या बाबत नारायण गडावर बैठक



महाराष्ट्रातील प्रमुख दसरा मेळावे 


 १. शिवसेना (उबाठा) शिवाजी पार्क उद्धव ठाकरे 


२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशीमबाग, नागपूर


३. मुख्यमंत्री एककनाथ शिंदे, आझाद मैदान, मुंबई


४. पंकजा मुंडे, सावरगाव घाट

भिडेवाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याच निमित्ताने याच स्मारकाची प्रतिकृती पुण्यातील गणेश कला रंगमंचावर आणल्या गेली. दुपारी ११.३० वाजता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या स्मारकाचे मॉडेल आज नागरिकांना पाहायला मिळणार आहे. मॉडेल च्या नुसार भव्य असे स्मारक उभारण्यात आले असून भारतातील पहिली मुलींची शाळा असा मोठा फलक लावण्यात आला आहे. या स्मारकात एक संग्रालय, पुस्तकालय हे देखील असणार आहेत. या मॉडेल ची एक झलक प्रेक्षकांसाठी...

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. 28 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत सूतोवाच केले आहे. दरम्यान, निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाची प्रक्रिया चालू आहे. त्यासाठी दोन्ही गटांत स्वतंत्रपणे बैठकांचे सत्र चालू आहे. राज्यात पुणे, मुंबईसह राज्याच्या इतरही भागात पाऊस कोसळतो आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर.... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.