Maharashtra Breaking 28th June LIVE Updates: सोलापुरात चोऱ्या, घरफोड्या, मोटारसायकल चोरणाऱ्या सात चोरट्यांना बेड्या

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 28 Jun 2024 12:31 PM
Beed News: बीड: शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर मुंडे समर्थक आक्रमक

Beed News: बीडमधील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे महायुतीत असताना देखील त्यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांचं काम केले असल्याची कबुली एका कथित ऑडिओ क्लिप दिली. या ऑडिओ क्लिप नंतर सध्या बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच कुंडलिक खांडे यांच्या विरोधात रोष व्यक्त करत केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली गावात कुंडलिक खांडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले. यावेळी खांडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही कथित ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर काल कुंडलिक खांडे यांचं कार्यालय फोडण्यात आले होते. आणि आता कुंडलिक खांडे यांच्या विरोधात हा रोष व्यक्त होताना दिसून येत आहे.

NEET Exam Mumbai : साकीनाका येथील नीट परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक गायब

NEET Exam Mumbai : साकीनाका येथील वन एरोसिटी येथे नीट परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक अचानक पळून गेल्याने मोठे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्वया विद्या प्रवेश मार्गदर्शक प्रा. ली असं या कंपनीचं नाव आहे. तिच्या मालकाचं नाव अरविंद देशमुख असल्याचं त्यानं कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं. मात्र, काल अचानक ही कंपनी बंद करून मालक फरार झाल्यानं मोठं संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे नीट परीक्षेबाबत मोठा घोटाळा समोर येत असताना या कंपनीच्या मालकानं फरार झाल्यानं यात संशय निर्माण होत आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार मिळालेला नाही.त्यात कोणतेही कारण न देता ही कंपनी बंद केल्याने कर्मचारी संताप व्यक्त करीत आहेत, तसेच चौकशी ची मागणी करीत आहेत.

Kolhapur News: महापुरुषांच्या पुतळा अवमान प्रकरणी  कोल्हापूर मधील सकल हिंदू समाज आक्रमक 


Kolhapur News: कोल्हापूर: महापुरुषांच्या पुतळा अवमान प्रकरणी कोल्हापूरमधील सकल हिंदू समाज आक्रमक 



कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात सकल हिंदू समाजाचे रास्ता रोको आंदोलन


वारंवार होणाऱ्या महापुरुषांच्या अवमानाच्या घटनेला आवर घाला, आंदोलकांची मागणी


पुण्याच्या हडपसर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाचं कोल्हापूर मध्ये आंदोलन

Shirur News: शिरूरमधील दुकानं शॉर्टसर्किटमुळेच जळाली; सोशल मीडियावर चुकीचे व्हिडीओ फिरत असल्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

Shirur News:  शिरूर मधील जे दुकानात जळाले ते शॉर्टसर्किटमुळे, सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ फिरत असल्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न.


शिरूर मध्ये काल रात्री दहा दुकानांना आग लागली यामध्ये कोट्यावधी रुपयांच्या नुकसान झालं मात्र हे नुकसान शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीतून झालं असल्याचं दुकानदारांचे म्हणणं आहे.


शिरूर कासार मधील मुख्य बाजारपेठेत जिजामाता चौकात असलेले हे दुकान या दहा दुकानांना रात्री बारा वाजता अचानक आग लागली यागी मध्ये कोट्यावधी रुपयाचा नुकसान झाले शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असल्याचा संशय दुकानदारांनी व्यक्त केला आहेत.

Ashadhi Ekadashi: आषाढी साठी येणाऱ्या भाविकांनी 65 एकर पालखी तळावर आपल्या जागा आरक्षित करा; प्रशासनाचं आवाहन

Ashadhi Ekadashi: विठुरायाच्या दर्शनासाठी साऱ्या राज्यभरातून हजारो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना पंढरपूर मध्ये आल्यावर निवासासाठी शासनाने उभारलेल्या 65 एकरावरील भक्तिसागर येथे आपल्या जागा आरक्षित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे . काही वर्षांपूर्वी प्रशासनाने चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या 65 एकर जागेत भक्तिसागर हा वारकऱ्यांच्या मोफत निवासासाठी तळ विकसित केला आहे. या ठिकाणी भाविकांना शुद्ध पाणी , डांबरी रस्ते , वीज , स्वच्छतागृहे , दवाखाने , पोलीस व्यवस्था , अग्निशामक यंत्रणा पुरविल्याने हा शहरातील सर्वात मोठा सुसज्ज निवास तळ तयार झाला आहे. याठिकाणी 497 मोकळे प्लॉट तयार केले असून या ठिकाणी भाविक आणि दिंड्या आपले तंबू आणि राहुट्या टाकून निवास करीत असतात. आता आज जगतगुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवत असून उद्या माऊली पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. याशिवाय राज्यातल्या अनेक भागातून विविध संतांचे पालखी सोहळे  पंढरपूरकडे वाट चालत आहेत. आषाढी यात्रा काळात शहरात जवळपास 18 ते 20 लाख भाविक येत असताना नेहमीच निवासाचा प्रश्न उभा राहत असतो. अशावेळी पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि भाविकांनी या 65 एकर जागेवर आपल्या प्लॉटचे आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे . ज्याचे अर्ज आधी येतील त्यांना जागा दिली जाणार असल्याने तातडीने अर्ज देऊन गैरसोय टाळण्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी माझाशी बोलताना सांगितले . यावर्षी याच ठिकाणी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चौथे महाआरोग्य शिबीर घेतले जाणार असून त्यामुळे येथे राहणाऱ्या चार ते पाच लाख भाविकांना जागेवर सर्व प्रकारचे उपचार मिळू शकणार आहेत . या शासनाच्या 65 एकर शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या 16 एकर जागेतही भाविकांच्या निवासाची सोया केली जाणार असल्याने तातडीने आपली जागा आरक्षित करावी लागणार आहे.

Navi Mumbai : उरण रेल्वे स्टेशन मध्ये शिरले पावसाचे पाणी; रेल्वे प्रशासनाची उडाली तारांबळ

Navi Mumbai : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या  उरणच्या रेल्वे स्टेशन मधिल अंडरग्राऊंड मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रवाशांना रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागला.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात मार्च 2024 मध्ये उरण लोकल रेल्वे सेवेचा शुभारंभ केला. मात्र रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे मागील वर्षीच्या पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या उरणच्या रेल्वे स्टेशन मधिल अंडरग्राऊंड मध्ये चार ते पाच फूटा पर्यंत पावसाचे पाणी शिरल्याची बाब समोर आली होती.

Yavatmal News : यवतमाळमध्ये अतिवृष्टीनं शेताला आलं तळ्याचं स्वरूप

Yavatmal News : रात्रीच्या सुमारास जवळ पास दोन तास पडलेल्या धुंवाधार पावसाने यवतमाळच्या राळेगाव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. शेतात दोन ते तीन फूट पाणी साचल्याने शेताने तळ्याचे स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली पीक पाण्या खाली गेले आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका राळेगाव मंडळातील वारा, बोरी, मेंगापुर, सगमा, या भागातील शेतकऱ्यांना बसला असून लागवड केलेले कपाशी, तूर , सोयाबीन मातीमोल झाले.  अधिकाऱ्यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करावी आणि शासनाकडून मदत  मीळऊन द्यावी अशी  मागणी या  भागातील शेतकऱ्यांची  आहे.

Mumbai Local Updates: हार्बर लाईन खोळंबली, 30 मिनिटांपासून CSMT कडे जाणाऱ्या लोकल डॉकयार्डपासून एका मागे एक उभ्या

Mumbai Local Updates: आज सकाळपासूनच मुंबई लोकलच्या हार्बर लाईनवरील गाड्यांचं वेळापत्रक बारगळल्याचं पाहायला मिळालं होतं. सकाळपासूनच हार्बर लाईनवरील लोकल उशीरानं धावत होत्या. तर गेल्या 30 मिनिटांपासून हार्बर लाईन खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे. CSMT कडे जाणाऱ्या लोकल डॉकयार्डपासून एका मागे एक उभ्या आहेत, अशी माहिती मिळत आहे. 

Ahmednagar News: संत निवृत्तीनाथ पालखी नगर जिल्ह्यात दाखल

Ahmednagar News: त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिक जिल्ह्याची सीमा ओलांडून आता नगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे. नगर जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत झाल्यानंतर आज निवृत्तीनाथांची पालखी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात पोहोचलीय. लोणी ग्रामस्थांनी पालखीचं स्वागत केलं असून पालखीच्या भोजनाची सोय देखील गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते. लोणीत भोजन केल्यानंतर ही पालखी बाभळेश्वर मार्गे श्रीरामपूर कडे रवाना होईल. आज आणि उद्या ही पालखी नगर जिल्ह्यात राहणार असून त्यानंतर नगर जिल्ह्याची सीमा ओलांडून ही पालखी पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल लोणी गावात आढावा घेतला आहे. 

Ahmednagar News: शनी चौथ्यावरील दर्शनास प्रतिबंध

Ahmednagar News: श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनी चौथाऱ्यावरील दर्शन काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. शनी देवाच्या चौथाऱ्याच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने चौथाऱ्यावर जाऊन तेलाभिषेक आणि दर्शन करण्यात बंद करण्यात आले आहे. नूतनीकरणाच्या कामामुळे 4 ऑगस्टपर्यंत शनी चौथाऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास करण्यास बंदी असेल मात्र शनी चौथऱ्यासमोरून दर्शन नियमित सुरू राहणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

Solapur News: सोलापुरात चोऱ्या, घरफोड्या, मोटारसायकल चोरणाऱ्या सात चोरट्यांना बेड्या

Solapur News: सोलापूर शहरातील विविध भागातून चोऱ्या, घरफोड्या, मोटारसायकल चोरणाऱ्या सात चोरट्याना सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डिबी अटक केली. या आरोपीकडून पोलिसानी 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात सात मोटारसायकल, मोबाईल, लॅपटॉप अशा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर दुसरीकडे गजबजलेल्या बाजारपेठ परिसरातून चोरट्यांनी पळवलेले 20 मोबाईल शोधून काढण्यात देखील सोलापूरच्या सदर बझार पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. शहरातील विविध भागात चोरीला गेलेले जवळपास 2 लाख 97 हजार रुपयांचे 20 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. ज्या नागरिकांनी मोबाईल चोरीची फिर्याद नोंदविली होती त्यांना बोलावून घेण्यात आले. शहानिशा करून त्यांना हे मोबाईल परत करण्यात आले. चोरीचा मोबाईल परत मिळाल्याबद्दल मोबाईलधारकांनी आनंद व्यक्त केला.

Rohit Pawar on NCP Ajit Pawar Group MLA: अजित पवार गटाच्या 18-19 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला : रोहित पवार

Rohit Pawar on NCP Ajit Pawar Group MLA: अजित पवार गटाच्या 18-19 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असा दावा रोहित पवारांनी केला आहे. मात्र शरद पवार त्यातल्या 10 ते 12 आमदारांनाच घेतील असंही रोहित म्हणाले. भाजप अजित पवार गटाला फक्त २० जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यासही सांगेल असंही रोहित म्हणाले. 

Kolhapur News: इचलकरंजीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चार मुलांना अमानुषपणे मारहाण 

Kolhapur News: इचलकरंजीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चार मुलांना अमानुषपणे मारहाण  


मोक्कातून सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखेचा व्हिडीओ व्हायरल


खंडणीची मागणी करत मुलांचे अपहरण करून बंद खोलीत अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल 


तरुणाच्या मानेवर पाय ठेवून लोखंडी पाईपनं जबर मारहाण केली 


मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल 


आपली दहशत कायम राहावी यासाठी व्हिडिओ व्हायरल केल्याचं तपासात आले समोर

Chandrapur News: संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये नाराजी नाट्य

Chandrapur News: चंद्रपूर : शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रविंद्र शिंदे यांची प्रतिक्रिया. माझ्या नियुक्ती मागे संजय राऊत नसून मी गेल्या काही वर्षात चांगलं काम केल्याने पक्षाने दिली मला संधी, माझ्या नियुक्तीला विरोध करण्यापेक्षा सर्वांनी मिळून काम करावं, अशी व्यक्त केली अपेक्षा. शिंदे यांच्या नियुक्ती विरोधात चंद्रपूर जिल्हा शिवसेनेचे (उबाठा) दोन्ही जिल्हाप्रमुख, सर्व तालुका प्रमुख, महिला प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी पदाचा राजीनामा देण्यासाठी मुंबईला कालच रवाना झाले आहेत. आज या पदाधिकाऱ्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची पार्श्वभूमी असलेल्या शिंदे यांची नियुक्ती खासदार संजय राऊत यांनी केल्याची शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी आहे. विधानसभा मांडणीच्या आधी जिल्हा उबाठा शिवसेनेत भूकंप झाला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा


2. राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार, आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता, एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी 


3. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला आर्थिक गुन्हे शाखेचा विरोध, आम्ही दोनदा तपास केला, घोटाळा झालेलाच नाही, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका


4. अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा, पुणे भाजप उपाध्यक्षाची अजित पवारांविरोधात आगपाखड, राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक, अजितदादांनी घेतली माहिती


5. पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता, रावसाहेब दानवे आणि महादेव जानकरांचं नावही चर्चेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.