Maharashtra Breaking 28th August LIVE: मालवणमध्ये तणाव, राणे-ठाकरे आमने-सामने, कार्यकर्ते भिडले

Breaking News Live Updates : राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Aug 2024 01:18 PM
निलेश आणि नारायण राणेंकडून पाहणी, त्याचवेळी आदित्य ठाकरे पोहोचले; सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्याजवळ राडा

मालवण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरवे आहेत.  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे  पाहणीसाठी आले त्यावेळी आदित्य ठाकरे दाखल होताच  प्रवेशद्वारावरच राडा झाल्याचे पाहायला मिळाला. शिवसेना  उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.  पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला घेतले. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामरी झाली.   यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरधार घोषणाबाजी करण्यात आली. 

ठाकरेंची एन्ट्री; राणे-नाईक भिडले

Maharashtra News : मालवणमध्ये राजकोट किल्ल्यात राणे आणि ठाकरे आमने-सामने

Maharashtra News : मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर काहीसा तणाव झाल्याचं पाहायला मिळालं. मालवणमध्ये ठाकरे आणि राणे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंसमोर राणे समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावरुन भाजप आणि ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये काहीसा तणाव पाहायला मिळाला. 

Maharashtra News : मालवणमध्ये आज महाविकास आघाडीचं आंदोलन

Maharashtra News : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरणार आहेत. मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, अंबादास दानवे, भास्कर जाधव, विनायक राऊत हे मोर्चात सहभागी होतील. आज मालवणमध्ये भरड नाका ते मालवण तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

Ahmednagar News : साखळाई योजनेसाठी शेतकऱ्यांचा रस्तारोको

Ahmednagar News : अहमदनगरच्या दौंड राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील साखळाई उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला होता.  देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा साखळी योजनेसाठी नाशिक येथे पाणी उपलब्ध असताना अधिकाऱ्यांकडून लाल फितीत अडकलेला प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा. यासाठी हे रास्ता रोको आंदोलन केले गेले. दोन्ही तालुक्यातील 35 गावांना या उपसा सिंचन योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे या 35 गावातील शेतकऱ्यांनी या रास्ता रोको मध्ये सहभाग घेतला होता. तब्बल अडीच तास रास्ता रोको सुरू राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती...हा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही तर रेल रोकोसारखं उग्र आंदोलन करण्यात येईल... एवढेच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकाही राजकीय नेत्याला या उपस्थित गावात फिरू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे

Badlapur Crime : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; निलंबनाच्या कारवाईविरोधात ठाण्याचे शिक्षणाधिकारी मुंबई उच्च न्यायालयात

Badlapur Crime : बदलापूर येथील शाळेच्या आवारात दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर निलंबित करण्यात आलेले ठाण्याचे शिक्षणाधिकारी भाळासाहेब राक्षे यांनी मंगळवारी हायकोर्टात धाव घेत निलंबनाच्या निर्णयाला आव्हान दिलंय


आपल्याला या प्रकरणी नाहक गोवण्यात आले असून आपल्यावरील निलंबनाची कारवाई ही राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा राक्षे यांचा दावा


राक्षे यांनी सुरूवातीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) निलंबनाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं


मात्र न्याधिकरणानं कोणताही दिलासा न दिल्यानं राक्षे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे


निलंबनाच्या कारवाईला स्थगिती देत अर्जावर अंतिम निर्णय येईपर्यंत या पदी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यापासून सरकारला मज्जाव करण्याची याचिकेतून मागणी

Badlapur Crime : बदलापुरातील लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर बदलापूरकरांनी एक लढा उभारत आंदोलन

Badlapur Crime : बदलापुरातील लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर बदलापूरकरांनी एक लढा उभारत आंदोलन केले होते 


या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत, आंदोलनकर्त्यांना या आंदोलनात लाठी चार्जला सामोरे जावे लागले व त्रास सहन करावा लागला. त्यासाठी या अटक होऊन जामिनावर सुटलेल्या आंदोलनकर्त्यांची व भीतीपोटी घरदार सोडून बाहेर वणवण भटकणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबाची होणारी तळमळ लक्षात घेऊन या सगळ्यांची भेट घेण्यासाठी व तमाम बदलापूरकरांशी आज राज ठाकरे संवाद साधणार आहेत 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज  दुपारी 11.30 वाजता बदलापूर पश्चिम सानेवाडी येथील अदिती बँक्वेट हॉलला येणार आहेत.


त्यामुळे बदलापुरातील घटनेवर, लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राज ठाकरे आज काय भूमिका बदलापुरात घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Crime News : गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये मौलानाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Crime News : गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये मौलानाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग


मोहम्मद तन्वीर शहा असे या आरोपीचे नाव आहे


मोहम्मद तन्वीर हे शिवाजी नगर येथील मस्जिदमध्ये मुलांना अरबी भाषा शिकवतात


पिडीत 7 वर्षाची मुलगी त्यांच्यकडे अरबी भाषा शिकण्यासाठी जात होती


दरम्यान 22 ऑगस्ट रोजी मौलानाने मुलीला चुकीचा स्पर्ष केला. या घटनेनंतर मुलगी अरबी भाषेच्या शिकवणीस जाण्यास नकार देऊ लागली


याबाबत मुलीच्या आईने तिच्याकडे विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला


या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कलम 74 बीएनएस, 2023,  सह कलम 8, 12, पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत

Hingoli News: अजित पवार यांची जनसमान यात्रा आज वसमतमध्ये; सायंकाळी सहा वाजता होणार भव्यसभा

Hingoli News: जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र दौरा करत असून आज अजित पवार यांची जनसमान यात्रा हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे दाखल होणार आहे  गिरगाव फाटा येथून सायंकाळी पाच वाजता अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये जन सन्मान यात्रेची सुरुवात होणार असून साधारणतः सहा वाजता मयूर मंगल कार्यालयासमोर भव्य सभेचे आयोजन वसमतचे आमदार राजेश नवघरे यांच्या वतीने करण्यात आले आहे ही सभा साधारणतः सहा वाजता सुरू होणार असून अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते सुद्धा या जनसन्मान  यात्रेला उपस्थित राहणार आहेत या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आता वसमत शहरांमध्ये जोरदार तयारी पाहायला मिळत आहे  आलेल्या नागरिकांच्या आसनाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात आले असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळे आजच्या या सभेमधून अजित पवार काय बोलतात हे पाहणं गरजेचं आहे. 

Maharashtra News : महाविकास आघाडीची आज 'मातोश्री' निवासस्थानी तातडीची बैठक

Maharashtra News : उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत हे नेते राहणार बैठकीला उपस्थित. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या गंभीर घटना, राजकीय आणि सामाजिक घडामोडी यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार असून महाविकास आघाडीची पुढील रणनीती व दिशा ठरवली जाणार आहे.


राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याबाबत  महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे, त्यासोबतच बदलापूर मधील घटना, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार  याबाबत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते  चर्चा करणार आहेत

 

मालवणात शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला हा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे अवघ्या आठ महिन्यांत कोसळला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीत या सगळ्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे... महाविकास आघाडीची भूमिका व पुढील रणनीती या सगळ्या बैठकीनंतर ठरणार आहे 
Maharashtra News : नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांनी काल पुतळ्याची केली पाहणी

Maharashtra News : नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील आणि कमांडर सुशील कुमार राय या दोन अधिकाऱ्यांनी काल राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. याबाबत   स्वतंत्र अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविणार असल्याचे सांगण्यात आलं. पुतळा उभारणी कामात शासनाशी समन्वयक म्हणून याच दोन अधिकाऱ्यांनी काम पाहिले होतं

Malvan News : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते मैदानात

Malvan News : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरणार आहेत. मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, अंबादास दानवे, भास्कर जाधव, विनायक राऊत हे मोर्चात सहभागी होतील. आज मालवणमध्ये भरड नाका ते मालवण तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

पार्श्वभूमी

Breaking News Live Updates : राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...


1. अवघ्या काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेल्या मंत्र्यांच्या बंगले आणि कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींची उधळपट्टी, रंगरंगोटीसाठी कागदोपत्री निविदा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उधळपट्टीचा माझाकडून पर्दाफाश


2. समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा, तात्पुरती सिमेंटची मलमपट्टी महिन्याभरात उखडली, सरकारच्या नोटिशीला कंत्राटदाराकडून केराची टोपली


3. शिवरायांच्या पुतळ्याच्या अपघाताविरोधात महाविकास आघाडी मैदानात, आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह मविआचे नेते आज मालवणमध्ये


4. समुद्रावरील वाऱ्याचा नौदलाला अंदाज आला नसावा, मालवण पुतळा अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य 


5. मुंबई दहीहंडी फोडताना 238 गोविंदा जखमी, सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार, केईएममधील दोघांची प्रकृती गंभीर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.