Maharashtra News Live Updates : पुण्यात 16 वर्षीय मुलीवर 4 तरुणांकडून अत्याचार, अभाविपचे महाविद्यालयासमोर आंदोलन

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 28 Sep 2024 01:16 PM
अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ठाणे पोलिसांकडून बदलापूर, अंबरनाथ, ठाण्यातील स्मशानभूमींमध्ये चाचपणी

अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ठाणे पोलिसांनी बदलापूर अंबरनाथ आणि ठाण्यातील स्मशानभूमींमध्ये चाचपणी सुरू


पोलिस प्रशासनाकडून  स्मशानभूमित जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा


जागा उपलब्ध होताच आज किंवा उद्या सकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती


अक्षयवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्यसरकारने गुरूवारी उच्चन्यायालयात हमी दिली होती

पुण्यात 16 वर्षीय मुलीवर 4 तरुणांकडून अत्याचार, अभाविपचे महाविद्यालयासमोर आंदोलन

पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील १६ वर्षीय मुलीवर ४ तरुणांकडून अत्याचार झाल्याची घटना घडली. त्याविरोधात पुण्यातील ABVP च्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत महाविद्यालयासमोर आंदोलन केलं. हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न कॉलेज प्रशासन करत आहे. याची चौकशी व्हावी आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी abvpच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका, SIT स्थापन करून चौकशीची मागणी

अक्षय शिंदे एनकाउंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 


“सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करा”


“SIT कडून तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा “


जनहित याचिकेतून मागणी 


विशेष तपास पथकाकडून तपास केला जाण्याची मागणी 


मुंबईतील घनश्याम उपाध्याय या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाकडे जनहित याचिका

धनगर आरक्षणासाठी वडवणी तालुक्यातील देवगाव येथे पाच दिवसांपासून साखळी उपोषण

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षणाची अंमलबजावणी केली जावी, या मागणीसाठी वडवणी तालुक्यातील देवगाव येथे पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू


  धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षणाची अंमलबजावणी केली जावी. या मागणी करिता बीडच्या वडवणी तालुक्यातील देवगाव येथे मागील पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला यावेळी पाठिंबा दिला जातो आहे.


मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाज आरक्षणाच्या मागणी करिता आग्रही आहे. मागील 16 दिवसांपासून पंढरपूर येथे एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता वडवणी तालुक्यातील देवगाव येथे सकल धनगर समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा तिढा सोडवावा अशी मागणी या दरम्यान केली जातेय. गेल्या अनेक दिवसांपासून धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील प्रलंबित आहे. सरकारने धनगर समाजाला अनेकदा आश्वासने दिली. मात्र दिलेलं आश्वासन पूर्ण होत नसल्याने धनगर समाज आरक्षणाच्या मागणी करिता आक्रमक होत आहेत.

बदलापूर प्रकरणातील मृत अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी अद्यापही जमीन नाहीच, राज्य सरकारने शांततेत अत्यसंस्कार करण्याची दिली होती हमी

बदलापूर प्रकरणातील मृत अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी जमीन देण्यात आलेली नाही


राज्यसरकारने मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करून देताच अक्षयवर तत्काळ अंत्ससंस्कार करण्यात येतील अशी माहिती वकिलांनी दिली आहे


अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी जमीन देऊन पोलिसाच्या मदतीने शांततेत अंत्यसंस्कार करण्याची हमी राज्यसरकारने गुरूवारी कोर्टात दिली होती.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे नेते यापुढे मुख्यमंत्रिपदाच्या दाव्याबद्दल कुठेही सार्वजनिक वक्तव्य करणार नाहीत, पक्षश्रेष्ठीच्या आपआपल्या नेत्यांना सूचना

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे नेते यापुढे मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याबद्दल कुठेही सार्वजनिकरित्या वक्तव्य करणार नाही ...


तिन्ही पक्षाच्या पक्षश्रेष्ठीच्या आपआपल्या नेत्यांना सूचना ...


विनाकारण विवाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्याचे आदेश ...

नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी किसान सभा शेतकऱ्यांच्या बांधावर,आपत्ती निवारण कोषातून शेतकऱ्यांना मदत द्या - किसान सभेची मागणी

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आजही शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलय. याच नुकसानग्रस्त पिकांची पाहणी किसान सभेने केली. परळी तालुक्यातील बोरखेड शिवारात सोयाबीन आणि कापसाच्या पिकात पाणी आहे. याच ठिकाणी जाऊन किसान सभेने शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत राज्य सरकारवर टीका केली. 


केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी संकटात आहे. यंदा पाऊस चांगला झाला त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे हाती येतील अशी अपेक्षा होती. मात्र या पावसाने मोठे नुकसान केले आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसाने 58 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिमंत्र्यांनी पाहणी केली. पंचनामे न करता मदत देऊ अस आश्वासन दिलं. मात्र हे आश्वासन फोल ठरल आहे. कृषीमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना आपत्ती निवारण कोषातून मदत केली जावी. अशी मागणी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे यांनी केली आहे.

Mumbai Rain Update : मुंबई आणि उपनगरातील पावसाचा जोर कमी होणार, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार सरींचा अंदाज 

Mumbai Rain : मुंबई आणि उपनगरातील पावसाचा जोर कमी होणार 


पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस अनुभवायला मिळू शकतो 


उत्तर महाराष्ट्रात आज काही भागात मुसळधार सरींचा अंदाज 


विदर्भात देखील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आज पावसाची शक्यता

नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरणातील सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखी 10 विद्यार्थिनींकडून तक्रार दाखल

नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखी 10 विद्यार्थिनींनी चौकशी समितीसमोर तक्रारी दाखल केल्या आहेत


या प्रकरणाची चौकशी मुंबई महानगरपालिकेकडून सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपविण्यात आली आहे


त्यानुसार या केंद्राकडून गुरुवारी पीडित तरुणीसह अन्य विद्यार्थिनींना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते

वाईट झालं की मला लय शिव्या पडतात, म्हणूनच रोज रात्री उचक्या लागतात- धनंजय मुंडे

राज्यात पाऊस कमी पडो की जास्त पडो अथवा विमा अन अनुदान उशीरा मिळो शिव्या या कृषी मंत्र्याला खाव्या लागतात. त्यामुळं मला रोज रात्री उचक्या येतात, असं वक्तव्य कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय. कृषी खातं हे साधंसुधं नाही, हे सांगताना चांगलं झालं तर लोक साधं कौतुक ही करत नाहीत. पण वाईट झालं की शिव्यांची लाखोली वाहतात,  असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात मुंडे बोलत होते. तुम्ही कशाला कृषी मंत्री झालात. असं मला इन्शुरन्स कंपन्या म्हणत असल्याचं ही मुंडे म्हणाले. तसेच लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांवर ही मुंडेंनी तोंड सुख घेतलं. 

कोकणात मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची थेट उद्धव ठाकरेंकडे मागणी

कोकणात मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची थेट उद्धव ठाकरेंकडे मागणी


कोकणात राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असलेल्या जागेवर ठाकरे गटाचा दावा!


चिपळूण - संगमेश्वरची जागा शिवसेनेला सोडावी; माजी आमदार सुभाष बनेंची मागणी


उमेदवार म्हणून रोहन बने यांच्या नावाचा विचार केला जावा - सुभाष बने


चिपळूण - संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी


शरद पवार, अजित पवार यांचे झाले दौरे

 एसटीच्या सुशोभीकरण आणि एसटी स्टॅडच्या स्वच्छतेवर भर देण्याचे भरत गोगावलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा संभाळताच पहिल्याच बैठकित आमदार भरत गोगावलेंचे महामंडळतील अधिकाऱ्यांना निर्देश


 एसटीच्या सुशोभीकरण आणि एसटी स्टॅडच्या स्वच्छतेवर भर देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश


महामंडळाच्या आढावा बैठकीत एसटीच्या रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेत त्यावर चर्चा केली


तसेच एसटीसोबतच एसटी स्टॅडचे शौचालय व परिसराच्या स्वच्छतेबाबत उपाय योजना तातडीने व्हाव्यात याबाबत निर्देश दिले


स्टॅड परिसरातील कचरा दूर करा त्या ठिकाणी सुशोभीकरण करा....


नागरिकांना एसटीचा सुखकर प्रवास देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत

नागपूर मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार

नागपूर - महानगरपालिका कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 ते 30 जून 2024 या कालावधीतील 30 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार आहे.15 हप्त्यात ही थकबाकी दिली जाणार असून कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात थकबाकीचा पहिला हप्ता मिळणार आहे. महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार मनपाच्या वित्त विभागाने थकबाकी देण्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांसाठी येणारी दिवाळी गोड होणार आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आता कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. तर दुसरीकडे तिकीट मिळावे म्हणून राज्यभरातील नेतेमंडळी पक्षनेतृत्त्वाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यत सध्या सगळीकडे परतीचा पाऊस कोसळतोय. या पावसामुळे मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, कापूस या पिकाचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. पुणे, मुंबईतही पाऊस बरसत आहे. या प्रमुख घडामोडींसह देश, राज्य तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...     

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.