Maharashtra Breaking News Live: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.
नागपूर जिल्हा परिषद येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन सुरू आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विकास कांमाच्या वर्क ऑर्डर भाजपचे नेतृत्वातील राज्य सरकारने थांबविल्याचे आरोप करत हे ठिय्या आंदोलन केले जात आहे.
दरम्यान, भाजप राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये हस्तक्षेप करून राजकारण करत आहे आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला विकास निधी आणि आवश्यक कामांपासून वंचित करत आहे, असा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून केला जात आहे.
नागपूर जिल्हा परिषद येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन सुरू आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विकास कांमाच्या वर्क ऑर्डर भाजपचे नेतृत्वातील राज्य सरकारने थांबविल्याचे आरोप करत हे ठिय्या आंदोलन केले जात आहे.
दरम्यान, भाजप राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये हस्तक्षेप करून राजकारण करत आहे आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला विकास निधी आणि आवश्यक कामांपासून वंचित करत आहे, असा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून केला जात आहे.
भिवंडी-वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या महामार्गावर संत गतीने सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. कामाच्या धीम्या गतीमुळे प्रवासी, विद्यार्थी आणि चाकरमानी वर्गाला वेळेवर पोहोचणे कठीण झाले असून, वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्गावरील अपूर्ण कामामुळे आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या समस्येमुळे वाहनांची गती मंदावली असून, सतत उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने कामाची गती वाढवावी आणि रस्त्याची दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी केली जात आहे.
पालघर : जमिनीच्या वादातून पालघरच्या नागझरी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडलीय. मनोर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नागझरी येथे दोन गटात ही हाणामारी झालीय. हाणामारीचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. कौटुंबिक वादातून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. हाणामारीत महिलांना देखील बेदम मारहाण करण्यात आलीय. मनोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. जखमींवर नागझरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नाशिक अपघातातील मृतांच्या वारसांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून प्रत्येकी ५ लाखांची मदत
नाशिक-मुंबई महामार्गावरील द्वारका चौकाजवळ १३ जानेवारी रोजी झालेला अपघात
दुर्दैवी अपघातातील ९ जणांचा झाला होता मृत्यू
मृतांच्या वारसांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर
या मदतीची एकूण रक्कम ४५ लाख रुपये असून ती नाशिक जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली माहिती
एस. टी. भाडे वाढ विरोधात आज शिवसेना (उद्धव ठाकरे ) कडून रस्तारोखो आंदोलन.
अनेक मोठे मोठे आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेत आलं... मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांची काम करण्याऐवजी आता त्यांची छळवणूक सुरू केली आहे. एकीकडे लाडक्या बहिणींचे लाड करायचे तर दुसरीकडे एसटीची भाडे वाढ करायची . एसटीचे भाडे वाढ ही सर्व सामान्यांचे कंबरडे मोडणारे असल्याच म्हणत या भाडेवाडीला विरोध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून बुलढाणा मध्यवर्ती बस स्थानकासमोर रास्ता रोको करण्यात येणार आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये जास्त
पुणे शहर व परिसरात गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे एकूण १११ रुग्ण आढळून आले आहे.गेल्या काही दिवसांपासून या आजाराचे रुग्ण हे वाढत असल्याच पाहायला मिळत आहे.
वयोगट
० ते ०९ :- १९ रुग्ण
१० ते १९ :- १५ रुग्ण
२० ते २९ :- २० रुग्ण
३० ते ३९ :- १३ रुग्ण
४० ते ४९ :- १२ रुग्ण
५० ते ५९ :- १३ रुग्ण
६० ते ६९ :- ०८ रुग्ण
७० वर्षांवरील :- ०१ रुग्ण
बेपत्ता एसटी बस वाहकाने घेतला गळफास; परिवहन विभागाकडून निलंबनाची कारवाई केल्याने गळफास घेतल्याची माहिती
बीडच्या माजलगाव आगारात कार्यरत असलेल्या बस वाहकाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा वाहक पंधरा दिवसांपासून बेपत्ता होता. दत्ता अंबलकर असे मयत वाहकाचे नाव असून ते माजलगाव आगारात दहा वर्षांपासून कार्यरत होते.
राज्य परिवहन महामंडळ विभागाने 20 दिवसांपूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर ते घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता मिळून न आल्याने माजलगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद देखील करण्यात आली होती.
दरम्यान त्यांचा मृतदेह शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आंतरवाली सराटीतील सामूहिक उपोषणात धनंजय देशमुख सहभागी ,
कोर्ट किंवा तपासा बाबत काही तांत्रिक काम आले नाही तर मी उपोषण कन्टीनिव करणार.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे यांच्या सह त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस .
मसाजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक आमरण उपोषणामध्ये सहभागी झालेत , ते मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणात सहभागी झाले आहेत, दरम्यान तपासाबाबत काही काम निघाले नाही तर आपण शेवट पर्यंत या उपोषणास बसणार असल्याची त्यांनी भूमिका घेतलीय
गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये जास्त
० ते १९ वयोगटातील एकूण १९ रुग्ण
२० ते २९ वयोगटातील २० रुग्ण
पुणे शहर व परिसरात गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे एकूण १११ रुग्ण आढळून आले आहे.गेल्या काही दिवसांपासून या आजाराचे रुग्ण हे वाढत असल्याच पाहायला मिळत आहे.या रुग्णांच्या बाबत माहिती घेतली तर पुण्यातील कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण उपचार घेत आहे.पाहूया...
दिनानाथ रुग्णालय :- २६
ससून रुग्णालय :- २१
काशीबाई नवले रुग्णालय :- ०९
सह्याद्री डेक्कन :- ०७
पूना हॉस्पिटल :-०५
भारती विद्यापीठ :- ०४
वायसीएम :- ०४
पल्स हॉस्पिटल :- ०३
साईनाथ हॉस्पिटल :- ०३
डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय :-०२
ग्लोबल हॉस्पिटल :- ०२
श्रेयानस हॉस्पिटल :- ०२
पुण्यातील विविध भागातील इतर १३ रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्ण...
- पुण्यात थैमान घालणाऱ्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचे गेल्या काही दिवसात नागपुरात 3 रुग्ण आढळले आहे... या तिन्ही रुग्णांनी नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेतले आहे किंवा सध्या घेत आहे.
- यामध्ये मेडिकल मधील एक रुग्ण हा गंभीर अवस्थेत आयसीयुत दाखल आहे.
* तर मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दुसऱ्या रुग्णाची या आजारातून बऱ्यापैकी रिकवरी झाली आहे..
* तिसरा रुग्ण सध्या जनरल वॉर्डमध्ये उपचाराधीन आहे..
अल्पवयीन पळून आणलेल्या मुलीला इंदापूर पोलिसांच्या केले स्वाधीन
बीडच्या अंभोरा पोलिसांनी दोन गावठी पिस्टल आणि एक पिस्टल राऊंड सह पुण्यातील एका तरुणास ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारावर आष्टी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय.
आष्टी तालुक्यातील केरूळ येथे छापा टाकला असता बड्या शिताफीला दत्तू कांबळे इंदापूर येथे राहणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाची झडती घेतला असता त्याच्याकडे हे पिस्टल आढळून आले आहे. याबरोबरच या आरोपीने एका अल्पवयीन मुलीला पळवून देखील आले होते. यासंबंधी पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देऊन पीडित मुलीस इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आरोपी दत्तू कांबळे याच्यावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत.
येत्या 30 जानेवारी रोजी बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक देखील पार पडली. बीडच्या पालकमंत्री पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये येणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा नियोजन समितीचे बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. प्रत्येक विभागाचे प्रस्ताव किती, प्रलंबित किती, स्थिती काय? प्रलंबित राहण्याची कारणे.. यावर चर्चा करण्यात आली..
भिवंडी तालुक्यातील कवाड नजीकच्या देपिवली गावाच्या कुशीत उगम पावून ग्रामीण भागातून 32 किलोमीटरचा प्रवास करीत भिवंडी महानगरपालिकेच्या सिमेवरून वाहत येताना पुढे खाडीत रूपांतर होऊन वसई खाडीत विसावते. नदी जस जशी शहराच्या टप्प्यात येते तसे या पाण्यात प्रदूषण होण्यात वाढ होत असतानाच नदीपात्रात अतिक्रमण वाढल्याने या नदीचा भिवंडी व शेलार गावाच्या सीमेलगतचा प्रवास अक्षरशः गटार गंगा म्हणूनच होत आहे हे विदारक सत्य डोळ्या समोर दिसत असतानाही या कडे प्रदूषण नियंत्रण महामंडळ,स्थानिक महानगरपालिका,जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत.भिवंडी पालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्प अजून अपूर्ण असल्याने शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट खाडी पात्रता सोडले जाते .तर नदी पलीकडील खोणी व शेलार ग्रामपंचायत हद्दीतील कपड्यावर व धाग्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग,धाग्याला कांजी देणाऱ्या सायझींग या शिवाय केमिकल कंपन्या आपल्या कंपन्या मधील केमिकलयुक्त दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडले गेल्याने जल प्रदूषण होत आहे.त्यामुळे कामवारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे.
निवृत्ती पोलीस उपअधीक्षक संजय पूजलवार यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल संजय पूजलवार यांच्यावर करण्यात आलेले लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाची मुंबई इथून झालेली ही कारवाई आहे संजय पूजलवार यांची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातून सुरू करण्यात आली होती त्यात पूजलवार यांचा कडे 28,74,146 किमती मालमत्ता पत्नी मनीषा पूजलवार यांच्या नावे संपादित केल्याचे उघड झालेले आहे त्यामुळे बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी संजय पुजलवार व त्यांची पत्नी मनीषा पूजलवार यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवृत्त पोलीस उपअधीक्षक संजय पुजलवार व मनीषा पूजलवार यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल
पूजलवार यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 16.65% किमतीची आपसंपदा
डीआरआय पुणेने महाराष्ट्रात बिबट्याच्या कातडीच्या अवैध व्यापाराचा पर्दाफाश केला.
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, राजस्व गुप्तचर संचालनालय (DRI), पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या कातडीचा अवैध व्यापार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही व्यक्तींना अकोट, जिल्हा अकोला, महाराष्ट्रातील जंगल भागात पाठलाग करून पकडले.
या कारवाईदरम्यान, तीन व्यक्तींना—दोन वाहक आणि एका मध्यस्थाला—ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान, त्यांच्या ताब्यातून ८०.५ इंच x २५ इंच आकाराची बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली. बिबट्या हा वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची I मध्ये समाविष्ट आहे, आणि त्याच्या कातडीचा व्यापार, खरेदी, विक्री किंवा ताबा कठोरपणे प्रतिबंधित आहे.
जप्त करण्यात आलेली कातडी आणि ताब्यात घेतलेले तिन्ही आरोपी पुढील तपासासाठी अकोला जिल्हा वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
अंगणवाडी पोषण आहारात आढळला चक्क मेलेला उंदीर
मल्टी मिक्स सिरीयल्स अँण्ड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये निघाला मेलेला उंदिर
वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्र. 03 मधील घटना
६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांकरीता वापरात येते हे खाऊ
अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनात आल्यानंतर वस्तुस्थिती समोर
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असणाऱ्या वडखळ मधील ही घटना आहे.
६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांकरीता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टी मिक्स सिरीयल्स अँण्ड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये चक्क मेलेला उंदिर आढळून आला आहे.
प्रयागराज इथे कुंभमेळा सुरू असताना नाशिकमधे आगामी कुंभमेळाच्या तयारीला सुरवात
- नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले आज घेणार आढावा बैठक
- नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा घेणार आढावा बैठक
-
- मनपा,पोलीस, महसुल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार
- आगामी कुंभमेळा संदर्भात सुरू असलेल्या तयारीचा एकनाथ डवले घेणार माहिती
- शहरातील नियोजित विकास कामे,रिंग रोड, stp प्लांट गोदावरी स्वच्छता,आरोग्य सेवाचा आढावा घेतला जाणार
-
कुंभमेळा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक, पालक सचिव यांच्यां अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक
- एकीकडे नासिक जिल्ह्याचा पालकमंत्री ठरत नसताना पालक सचिव बैठक घेत असल्याने बैठकीला महत्त्व
कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला विमानाने जाण्याचं नियोजन पडणार महागात!
विमान कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा विमान तिकिटांची विक्री
२६ फेब्रुवारीपर्यंत कुंभमेळ्यामुळे विमान तिकीटांचे दर चढेच
सर्वसामान्यपणे मुंबई ते प्रयागराज ४ ते ४.५ हजार रुपयांचे तिकीट
मुंबईतून प्रयागराज जाण्यासाठी सरासरी २० ते २५ हजार रुपयांचे तिकीट
नागपूरवरुन प्रयागराज सरासरी २५ ते ३० हजार रुपयांचे तिकीट दर, सर्वसामान्यपणे नागपूर ते प्रयागराज १० हजार रुपयांचे तिकीट
राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक
राजूल पटेल यांची शाखा शिवसेना ठाकरे गट ताब्यात घेणार
राजूल पटेल यांची शाखा क्रमांक 61 खाली करावी ठाकरेंच्या शिवसेने कडून सांगण्यात आला आहे, 24 तासाच्या आत ही शाखा खाली करावी अन्यथा शाखा ताब्यात घेऊ ठाकरे गटाकडून इशारा
राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण वाढत असल्याने आता केंद्र सरकार ही अलर्ट मोडवर
गुलेन बॅरी सिंड्रोममुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने केंद्र सरकारने तज्ज्ञांचे सात सदस्यीय पथक नेमले
महाराष्ट्रातील आजाराची स्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे.
बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पोलिलांनी त्यांचा मुलगा झिशान सिद्धीकी याने पोलिस जबाबात अनेक बिल्डर्सप्रमााणेच भाजप नेता मोहित कंबोज यांची नावे घेत संशय व्यक्त केला आहे. पोलिसांच्या आरोपपत्रात बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स या नामकिंत विकासकांच्या नावांचा उल्लेख आहे.
नागपूर-
- पुण्यात थैमान घालणाऱ्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचे गेल्या काही दिवसात नागपुरात 3 रुग्ण आढळले आहे... या तिन्ही रुग्णांनी नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेतले आहे किंवा सध्या घेत आहे.
- यामध्ये मेडिकल मधील एक रुग्ण हा गंभीर अवस्थेत आयसीयुत दाखल आहे.
तर मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दुसऱ्या रुग्णाची या आजारातून बऱ्यापैकी रिकवरी झाली आहे..
तिसरा रुग्ण सध्या जनरल वॉर्डमध्ये उपचाराधीन आहे..
कोल्हापूरमध्ये जीबी सिंड्रोमचे दोन रुग्ण
दोन्ही रुग्णांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू
एक रुग्ण कर्नाटकातील कोगणोळी इथला तर दुसरा हुपरी येथील
हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील प्रलंबित खटल्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
जस्टीस सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर आज दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता
ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड पुनर्रचना संदर्भातील प्रलंबित प्रकरणावर आज सुनावणी ची शक्यता
राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका कधी होणार हे याच खटल्यावर अवलंबून
आमदार आदित्य ठाकरे घेणार मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट
आज सायंकाळी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आदित्य ठाकरे आणि आयुक्तांची बैठक
काल आदित्य ठाकरे यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर ती चर्चा केली होती
त्यानंतर मुंबईतील इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहेत
त्या अगोदर जी दक्षिण विभागाच्या वॉर्ड ऑफिसरांसोबत दुपारी 2.30 वाजता आदित्य ठाकरे यांची बैठक होणार आहे
पुण्यात जीबीएसच्या संशयित रुग्णांची संख्या १११ वर
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
१५०० हून अधिक घराचं निरीक्षण करण्यात आल आहे.
८ दिवसात रुग्णांची शंभरी पार
सोलापूर ब्रेकिंग- अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध 'पोस्को' अंतर्गत गुन्हा
सोलापुरातील एका नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार
पीडितेने दिलेल्या फिर्यादवरून सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
'मला सोडून जाऊ नकोस, अन्यथा मी काहीतरी बरेवाईट करून घेईन', अशी धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादमध्ये म्हटले आहे.
एकीकडे कोट्यवधी रुपयांची दाओसमध्ये गुंतवणूक करीत असलेले सरकार शेतकऱ्याकडे मात्र, दुर्लक्ष करीत आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अमरावती विभागात अतिवृष्टीने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची माती झाली. सुपीक जमीन खरडून गेली. शेतकरी पुरता कोलमडला. तत्कालीन मुख्यमंत्रीनि बधितांचे अश्रू पुसले. तातडीने मदत देण्याचे आश्वासनही दिले. शासन दरबारी मदत निधीचे प्रस्ताव गेले. मात्र, पाच महिने लोटले तरी मदतीचा प्रस्ताव लालफीतशाहीत अडकून पडला आहे.
मालेगाव ( नाशिक )-
- बांगलादेशी रोहिंग्या उशिरा जन्म नोंदणी प्रमाणपत्र प्रकरण..
- २ लाख १४ हजार ३०७ अर्जांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे...
- माजी खा.किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी...
- उशिरा जन्म नोंदणी अर्ज हे बांगला देशी रोहींग्या यांचे असल्याचा सोमय्या यांचा आरोप..
- या प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे बनावट, खोटे असल्याचा पत्रात उल्लेख...
- यातील ९० टक्के जन्म नोंदणी प्रमाणपत्र अर्ज हे रद्द होतील असाही सोमय्या यांनी या पत्राद्वारे दावा केला आहे..
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात विविध घटना घडत आहे. अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी देखील अपडेट्स समोर येत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणी वाल्मिक कराडबाबत विविध माहिती समोर येत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -