Maharashtra News Live Updates : मुंबईत पावसामुळे हाल, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
पुणे
कोरेगाव पार्क बलात्कार प्रकरण
आमदार रवींद्र धंगेकर पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल होणार
धंगेकर देणार पोलिसांना निवेदन
या घटनेचा सखोल तपास व्हावा यासाठी पोलिसांना देणार निवेदन
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट पदी नियुक्ती प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एक गट नाराज- सूत्र
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाकडून मुंबई प्रदेशला विश्वासात न घेता नियुक्ती केल्यामुळे नाराजीचा सूर
मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांना विश्वासात न घेता तीन सदस्यांची नेमणूक केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
प्रदेश कार्यालयाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे जी नावे पाठवण्यात आली त्याबाबत मुंबई अध्यक्षांना कळवल नसल्याची सूत्रांची माहिती
मुंबई प्रदेश मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत- सूत्र
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अपडेट
सिनेट निवडणूक निकालामध्ये अजूनही छाननी प्रक्रिया सुरूच...
64 मत पेट्यानपैकी 42 मत पेट्यांची छाननी पूर्ण...
इतर मत पेट्या छाननीसाठी अजून काही वेळ जाणार असल्याची माहिती...
छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कोटा ठरवला जाईल...
छत्रपती संभाजीनगर ब्रेकींग
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीसा
पीक कर्ज भरण्यासाठी बँकांच्या शेतकऱ्यांना नोटिसा
महालोक आदालतमध्ये कर्जाची तडजोड करण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा
बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेतकरी खातेदारांना नोटीसा
काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात 285 मंडळात अतिवृष्टी झाली.15 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला 10 लाख हेक्टर पेक्षा अधिक पिकांचं नुकसान
अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर नव संकट
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवा
कांग्रेस शिष्टमंडळांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी
दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर केंद्रीय निवडणूक आयोग आहे
ज्या पोलिस स्टेशनमध्ये जास्त काळ अधिकारी पदावर आहे ते निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतात म्हणुन त्याची ही तात्काळ बदली करावी
इतर विभागात ही जास्त कालावधीसाठी अधिकारी आहेत त्यांची ही बदली करावी अशी मागणी कांग्रेस कडून करण्यात आली आहे
प्रत्येक राजकिय पक्षाच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाने आज भेटायला बोलवलं आहे
यावेळी ही कांग्रेसने मागणी केली आहे
आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहला दफन करण्यासाठी विरोध होत असल्यामुळे आरोपी अक्षय शिंदे यांचे आई वडील यांनी कोर्टात तातडीची याचिका दाखल केली आहे
दुपारी १ वाजता सुनावणी होणार आहे
आरोपीच्या बाजूने वकील अमित कटारनवरे हे युक्तिवाद करणार
फ्लॅश:- मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेला अधून मधून जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली कडून वांद्रे च्या दिशेने जाणारा मार्गावर गोरेगाव ते सांताक्रुज दरम्यान वाहनांचे मोठी वाहतूक कोंडी.
सांताक्रुझ,विलेपार्ले,अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव या दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
गोरेगाव ते सांताक्रुझ अर्धा तासाच्या प्रवास मात्र या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना दीड ते दोन तासांमध्ये करावा लागत आहे.
नाशिक : बहुचर्चित धर्मवीर 2 चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपटचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी, आहे. ढोल तशाच्या गजरात फटक्यांच्या आतषबाजीत शिवसैनिक चित्रपटगृहात दाखल झाले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शिवसैनिक चित्रपट गृहात दाखल झालेत. या चित्रपटात काय आहे हे बघण्याची शिवसैनिकमध्ये उत्सुकता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मोफत चित्रपट दाखविला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेकडून 'महाविजय संवाद' यात्रेला आज पासून सुरूवात
या यात्रेच्यामाध्यमातून युवा सेनेचे पदाधिकारी युवा महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तरूणांशी संवाद साधणार
महाविजय संवाद यात्रेचा टिझर रिलिज
तसेच शिवसेना सोशल आवाजच्या माध्यमातून कॅम्पेनिंग करत लाडकी बहिण संपर्क अभियन राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार युवासेनेचे कार्यद्धयक्ष पूर्वेश सरनाईक याच्या नेतृत्वात महाविजय संवाद यात्रा काढली जाणार आहे
२७ सप्टेबरपासून या यात्रेला सुरूवात होणार असून मुंबई शहर व उपनगर पहिल्या टप्यात ही यात्रा होणार आहे
तर १३ आॅक्टोंबर पासून १६ आॅक्टोंबरपर्यंत मराठवाड्यात युवासेनेतर्फे ही यात्रा काढली जाणार असून २० आॅक्टोंबर ते २२ आॅक्टोंबर दरम्यान कोकणमध्ये यात्रा केली जाणार आहे
महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार संघात जाऊन शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रसार आणि प्रचार केला जाणार
विदर्भ, मराठवाड्यानंतर अमित शहांच्या टार्गेटवर मुंबई
मुंबईसाठी अमित शहा यांचे विशेष प्लॅनिंग
अमित शाह स्वतः घेणार मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारासंघांचा विभागनिहाय आढावा
अमित शहा मुंबईत कार्यकर्त्यांशी संवादही साधणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्ट मोडवर
पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश
पुढच्या तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार
हा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सादर केला जाणार
ज्यांची कामगिरी समाधान कारक नाही त्या आमदारांचे वाढणार टेंशन
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उमेदवार
अभविप उमेदवारांची नावे
१) हर्षद भिडे (open )
२) प्रतीक नाईक (open
३) रोहन ठाकरे (open
४)प्रेषित जयवंत (open )
५) जयेश शेखावत (open )
६) राजेंद्र सायगावकर (SC
७) निशा सावरा (ST )
८) राकेश भुजबळ ( OBC
९) अजिंक्य जाधव (VjNT )
१०) रेणुका ठाकूर(महिला )
युवा सेना सिनेट उमेदवार -
प्रदीप सावंत open
मिलिंद साटम open
परम यादव open
अल्पेश भोईर open
किसन सावंत. Open
स्नेहा गवळी- महिला
शीतल शेठ - SC
मयूर पांचाळ - obc
धनराज कोहचडे - ST
शशिकांत झोरे - NT
एकूण इतर आठ उमेदवार अपक्ष आहेत
रोहित ढाले (open
सुधाकर तांबोळी (open
संजय वैराळ (open )
जितेंद्र म्हात्रे (open )
मोहम्मद इरफान अन्सारी (open )
भूषण गांगडा (ST )
सनील मोसेकर (obc )
महेश सातपुते (VJNT )
निवडणूक आयोगाची आज मुंबईत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाची टीम सध्या मुंबईत
मुंबईच्या ट्रायडंट हॅाटेलमध्ये राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकासोबत चर्चा
आज सकाळी ११ वाजता होणार बैठक
राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून अनिल पाटील आणि शिवाजीराव गर्जे या बैठकीसाठी उपस्थित राहणार
शरद पवार यांच्या पक्षाकडून रवींद्र पवार आणि अदिती नलावडे उपस्थित राहणार
सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन मुलीवर चार जणांनी केला बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. कोरेगाव पार्क पोलिसांकडून या प्रकरणी पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील दोन तरुण अल्पवयीन आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अॅक्शन मोडवर
3 दिवसांत मंडल अध्यक्षांन शक्तीकेंद्र प्रमुख,आणि बूथ प्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक मतदारां पर्यंत पोहचण्याच दिले होते आदेश
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत नाराजी व्यक्त करत न बसता मरगळ झटकून कामाला लागण्याचे दिले होते आदेश
या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भाजपचे सूक्ष्म नियोजन आणि बैठकांचा धडका सुरू
मतदार याद्याची पडताळणी करून सुरू झाले कामाचे वाटप
-
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर A-B-C वर्गवारी करून प्रत्येक बुथवर मिळालेल्या केले जात आहे लक्ष केंद्रित
-
लोकसभा प्रमाणे गाफील न राहता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले भाजपचे पदाधिकारी
बहुप्रतिक्षित व बहुचर्चित मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत. अशातच आमच्या दहाच्या दहा जागा निवडून येतील अस विश्वास शिवसेना उबाठाच्या उमेदवारांना आहे. फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणीअंती निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शिवसेना उबाठाचे उमेदवार प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, यांच्याशी बातचीत कली आहे आमच्या प्रतिनिधींनी
भाजप आता तालुका स्तरावर करणार लक्ष केंद्रित
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर सूक्ष्म नियोजन
भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचलन समिती प्रमुख रावसाहेब दानवे, संघटन मंत्री शिवप्रकाश यांनी जिल्हानिहाय घेतला आढावा
लोकसभा निवडणुकीत मताधिक्य घटलेल्या तालुक्यांचा घेतला आढावा
प्रथम तालुका व नंतर गाव स्तरावर भाजपा कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणार
शासनाच्या योजना पोहचवताना संघटन मजबुतीकरण करणार
पार्श्वभूमी
मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. दुसरीकडे पुणे, मुंबई यासारख्या प्रमुख शहरांसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात जोरदार पाऊस पडत आहेत. या पावसामुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -