Maharashtra Breaking 27th June LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 27 Jun 2024 11:32 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...1. आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, मुंबईतील विधान भवनात एकूण १३ दिवस चालणार कामकाज,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी...More

Naresh Mhaske on Future CM : महाविकास आघाडीनं राज्यात अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करावा : नरेश म्हस्के

Naresh Mhaske on Future CM : महाविकास आघाडीनं राज्यात अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करावा, 
तसाही त्यांनी निवडणुकीत झेंड्याचा रंग बदललेला आहे. हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षाचा घरात बसून केलेला कारभार आणि अडीच वर्ष पायाला भिंगरी बांधून एकनाथ शिंदे यांनी केलेला कारभार याच मूल्यमापन करावं लागेल, असं नरेश म्हस्के म्हणाले. 

नरेश म्हस्के म्हणाले की, आमच्या नेत्यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे, आमचा (महायुतीचा) राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील.