Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Breaking News Live Updates : राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Aug 2024 08:37 AM
Sindhudurg News : सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Sindhudurg News : सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप आपटे आणि डॉ चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, मालवण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित जबाबदार दोघा विरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 109, 110, 125, 318, 3 (5) सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा रजि.नं. 133/2024 अन्वये दाखल करण्यात आलेला आहे.

Pune News: पुण्यातील ससून रुग्णालयात ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण; आरोपी सूद आणि मित्तलला न्यायालयीन कोठडी

Pune News: पुण्यातील ससून रुग्णालयात ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण


आरोपी सूद आणि मित्तलला न्यायालयीन कोठडी


कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलले गेल्याचे तपासात निष्पन्न


आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे 


गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील पुरावा नष्ट करणे, शासकीय दस्तऐवजात फेरफार करणे, गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बेकायदेशीरपणे सोडविण्यासाठी लाचेच्या स्वरूपात आर्थिक व्यवहार करणे, असे प्रकार झाले

Sangali News : सांगलीच्या एका रुग्णावर फुफ्फुसाचे यशस्वी प्रत्यारोपण; फुफ्फुस प्रत्यारोपणाचा पहिलाच प्रयोग

Sangali News : सांगलीच्या विजयकुमार जाधव या रुग्णावर फुफ्फुसाचे यशस्वी प्रत्यारोपण पार पडले. पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडून जाधव याना जीवनदान मिळाले आहे. सांगलीतील प्रसिद्ध श्वासरोग तज्ञ डॉ. अनिल मडके यांच्या मुळे जाधव याच्यावर वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जीवदान मिळाले. अशा प्रकारचे फुफ्फुस प्रत्यारोपण करणारे विजयकुमार जाधव हे सांगलीतील पहिलेच रुग्ण आहेत.  

Nashik News: येवला : मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी लवकरच येवल्यात...

Nashik News: मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने दरसवाडी धरण 'ओव्हर फ्लो' झाले असून ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येऊन दरसवाडी कालव्याचे गेट उघडण्यात आले. गेट उघडल्याने दरसवाडी-डोंगरगाव कालव्यातून येवल्याच्या दिशेने पाणी प्रवाहित झाले आहे. त्यामुळे नेहमीच दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या येवल्यातील उत्तर पूर्व दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मांजरपाडा प्रकल्पाची निर्मिती करून गुजरातला जाणारे पाणी अडवण्यात आले. बोगद्याद्वारे ते पुणेगाव धरणात आणण्यात येऊन तेथून दरसवाडी धरणात टाकण्यात येत आहे. त्यातून हे पाणी दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून येवला येथे पोहचत आहे. या पाण्यामुळे सिंचनाचे प्रश्न सुटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Nashik News : कळवण : विहिरीत आढळले दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह

Nashik News : कळवणच्या दुर्गम अश्या लिंगामा गावाजवळील एका विहीरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मोरे आणि गीतांजली उखंडे असे मयत मुलींचे नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीने दोघा मुलींचे मृतदेह  विहिरीतून बाहेर काढले आहे. घटनेचा पुढील तपास कळवण पोलीस करीत आहे.

Dahihandi LIVE Mumbai Thane : मुंबईत सर्वात मोठी दहीहंडी कुठे आणि कुणाची?

Dahihandi Live Mumbai Thane : मुंबई: दहीहंडी उत्सवानिमित्त (Dahihandi Mumbai Thane) मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ST Bus : एसटी महामंडळाच्या तब्बल 5 हजार डिझेल गाड्यांचं LNG मध्ये रुपांतर करण्यात येणार

ST Bus : एसटी महामंडळाच्या तब्बल 5 हजार डिझेल गाड्यांचं LNG मध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. यासाठी प्रति बस 19 लाख 40 हजारांचा खर्च येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाकडून तब्बल 970 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. यातील 40 कोटी रुपये 2024-25 मध्ये, 200 कोटी रुपये 2025-26 मध्ये, 370 कोटी 2026-27 मध्ये आणि 360 कोटी 2027-28 या आर्थिक वर्षात देण्यात येणार आहे. 

Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास महानगरपालिका आयुक्तांकडून प्रशासकीय मंजुरी

Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास महानगरपालिका आयुक्तांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. वाहन भत्ता, रजा प्रवास सहाय्य, तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते, मुलांच्या शिक्षणाकरीता भत्ता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी देण्यात आली असली तरी, सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. ही बाब अखेर मार्गी लागली. 

Maharashtra News : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी : राज ठाकरे

Maharashtra News : 'छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी'


8 महिन्यांपूर्वी उभा केलेला पुतळा कोसळतोच कसा? : राज ठाकरे


प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे : राज ठाकरे 


महाराजांच्या नावानं मतं मागायची आणि मग टेंडर काढायची, राज ठाकरेंची टीका

पार्श्वभूमी

1. देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, तर दहीहंडीसाठी महाराष्ट्रभर जय्यत तयारी, विधानसभेच्या तोंडावर दहीहंडीदरम्यान राजकीय काला


2. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला, पुतळ्याला गंज लागल्याचं PWDनं नौदलाला कळवलं होतं, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची रवींद्र चव्हाणांची मागणी


3. आमदार वैभव नाईकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध, अनेक नेत्यांकडून शिवप्रेमींना शांत राहण्याचं आवाहन


4. मालवणमधील शिवरायांचा पुतळा नौदलानं उभारला होता, ताशी 45 किमी वेगानं वारे वाहत होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल


5. मुंबई-गोवा महामार्गाचं कंत्राट घेऊन पळून जाणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्य़वधाचा गुन्हा दाखल करा, पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.