Maharashtra Breaking News Live Updates: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यात येणार, मोठा रोड शो करणार
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजप माजी आमदार बाळा भेगडे सागर बंगल्यावर दाखल
दोन्ही नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार चर्चा
सुनील शेळकेंना उमेदवारी दिल्याने भेगडे आणि भाजप कार्यकर्ते नाराज
शेळकेंविरोधात प्रचार करण्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतला होता पवित्रा
अखेर वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस करणार मध्यस्थी
निलेश राणे थोड्याच वेळात वर्षावर जातील
एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या यादीत निलेश राणेंच्या नावाचा समावेश असणार आहे
यामुळे निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला जाणार आहेत
पुण्यात राहुल गांधींचा रोड शो
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यात करणारं रोड शो
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी पुण्यात
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात राहुल गांधी करण्यात भव्य रोड शो
पुण्यातील महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्याकडून राहुल गांधींना रोडशोसाठी आमंत्रण
लवकरच राहुल गांधी तारीख कळवणार
राष्ट्रवादी अजित पवार गटात दहा जागांवरून तिढा कायम
आतापर्यंत एकूण 49 जागांवर उमेदारांची घोषणा करण्यात आलीय
महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँगेस पक्षाला 60 जागा सुटण्याची शक्यता होती
माञ युतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आद्याप दहा जागांवर तिढा असल्याची माहिती मिळत आहे
या जागां संदर्भात सध्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत बैठका सुरु आहेत
पालघर
पालघर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असला तरीही महायुतीकडून अजूनही उमेदवाराची घोषणा नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू श्रीनिवास वनगा अजूनही वेटिंगवर
श्रीनिवास वनगा यांच्यासोबत भाजपमध्ये असलेले राजेंद्र गावित यांच्या नावाची चर्चा
पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी पहाटे एक कोटी पाच लाख रूपयांचा अवैध गुटखा ट्रक सह जप्त केलाय.
रविवारी पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आलीय. ट्रकसह २ जणांना ताब्यात घेण्यात आलंय . ट्रक क्रमांक एम. एच. ०५ डी. के. ८१६७ या वाहनात विमल पानमसाल्याच्या २०२ पोत्यांचा समावेश असून त्याची अंदाजे किंमत तब्बल एक कोटी ५ लाख रुपये असल्याचे प्राथमिक अंदाजावरून सांगण्यात आलंय
राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, साताऱ्याहून पुण्याकडे जाणारा एक ट्रक खेड शिवापूर टोल नाक्यावर पहाटे आला. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
नागपूर ब्रेकिंग
पश्चिम नागपूर विधानसभेला भाजपचा तिढा अजून कायम..
स्थानिकांना तिकीट द्या अशी भाजप कार्यकर्त्यांची भूमिका..,
माजी महापौर संदीप जोशी नंतर आता नरेश बरडे यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी…
बाहेरच्या उमेदवाराला स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडूंच विरोध..
त्यामुळे पश्चिम नागपूर अजूनही ही भाजपने ठेवले होल्ड…
पक्षाच्या स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार व्हावा अशी नरेश बरडे यांची मागणी…
रावसाहेब दानवे यांच्या मुलीचा थोड्या वेळेत शिवसेनेत प्रवेश. संजना जाधव करणार शिवसेनेत प्रवेश. सकाळी 11 वाजता शिवसेनेत प्रवेश.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश.संजना जाधव कन्नड विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक..
शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांचा पक्षाचा राजीनामा
मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत दिला राजीनामा
मुख्यमंत्र्यांना इतर नेते भेटू देत नाही आणि विषय मांडू देत नाही त्यामुळे दिला राजीनामा
तसेच महामंडळ स्थापन करून नियुक्ती न केल्याने, पक्ष वाढीसाठी कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने, विकास कामांचे निवेदन देऊनही काम न झाल्याने दिला राजीनामा
घाटकोपर पश्चिम विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र माजी नगरसेवक संजय भालेराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक इमरान शेख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इमरान शेख यांच्या कार्यकर्त्यांनी इमरान शेख यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आपण नाराज असून निवडणूक लढणार असल्याचे इमरान शेख म्हणाले.घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे मतांचे या मुळे विभाजन होण्याची शक्यता आहे.याकरिता इमरान यांना उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर भेटण्यासाठी बोलविण्यात आले आहे.
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी
एकूण नऊ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
कोल्हापूर उत्तर मधून राजू लाटकर यांना उमेदवारी मिळतात काँग्रेस कार्यालयाला काळं फासलं
कार्यालयाच्या दरवाजावर दगडफेक केल्याची देखील माहिती
कार्यालयाच्या बोर्डला काळं फासून चव्हाण पॅटर्न असा केला उल्लेख
सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीची उधळपट्टी चुकीची - हायकोर्ट
निधीचा दुरुपयोग रोखण्यासाठी तीन सदस्सीय समिती स्थापन करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात प्रसिद्ध होणाऱ्या सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत हायकोर्टात जनहित याचिका
समिती अस्तित्त्वात असल्यास तिची पुनर्रचना करून ती पुन्हा सक्रिय करण्याचेही आदेश न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेत
यापूर्वी साल 2015 मध्ये त्रिसदस्यीय समितीच्या स्थापनेचे आदेश देण्यात आले होते
एप्रिल 2016 मध्येही हायकोर्टाकडून याचा पुनरुच्चार करण्यात आला होता
मनसेकडून पनवेलमधून योगेश चिले तर श्रीवर्धनमधून फैझल पोपेरे निवडणुकीच्या रिंगणात
श्रीवर्धन मतदारसंघातून मनसेकडून मुस्लीम उमेदवार जाहीर
मनसेचे फैझल पोपेरे यांना पक्षाकडून AB फॉर्म
राज ठाकरे यांच्याकडून मुस्लीम उमेदवाराला संधी
मंत्री आदिती तटकरे विरूद्ध फैजल पोपेरे अशी होणार लढत
मविआकडून अद्याप उमेदवाराची चाचपणी सुरूच
श्रीवर्धन मतदार संघात 35 हजार मुस्लीम वोटर
पार्श्वभूमी
मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) धूम चालू आहे. ज्या नेत्यांना आपापल्य पक्षांकडून तिकीट मिळाले आहे, त्यांनी प्रचाराला जोमात सुरुवात केली आहे. तर ज्यांना अद्याप तिकीट मिळालेले नाही, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे किंवा अन्य पर्यायाचा विचार केला जातोय. दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) यांच्यातील काही जागांचा वाद अद्याप संपलेला नाही. असे असताना राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -