Maharashtra News Live Updates: मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट कायम

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

ज्योती देवरे Last Updated: 26 Sep 2024 03:03 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर... ...More

Rain Update : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट कायम

Rain Update : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आज देखील मुसळधार पावसाचा इशारा 


हवामान विभागाकडून आॅरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आलाय, मात्र कालपेक्षा तीव्रता कमी असल्याचं मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून सांगण्यात येत आहे


मुंबई आणि उपनगरात काही मोजक्या ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे 


किनारपट्टी भागातील कमी दाबाचा पट्टा राज्याच्या उत्तरेकडे सरकल्याने पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाचा अंदाज 


पालघर आणि नाशिकात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी 


सोबतच, धुळे, नंदुरबारमध्ये देखील धुंवाधार पावसाचा इशारा, आॅरेंज अलर्ट जारी 


पुण्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, आॅरेंज अलर्ट जारी 


मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता