Maharashtra breaking Live: शिवसेना शिंदे गटातील मुंबईतील नेत्याचीं आज महत्वाची बैठक, जागांसंदर्भात होणार चर्चा, श्रीकांत शिंदे घेणार मतदार संघांचा आढावा
Maharashtra News Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी राज्यात सुरु आहे. विविध राजकीय पक्ष आपआपली रणनीती आखत आहेत.
Vidhan Sabha Election 2024: माहिम विधानसभेची निवडणूकीचं ऐन रंगात,
अमित ठाकरेंसाठी भाजप आणि शिवसेनेची लॅाबिंग !!
भाजपा करणार शिवसेनेची मनधरणी, तर शिवसेना करणार सदा सरवणकरांची मनधरणी ?
दीपक केसरकरांनी घेतली राज ठाकरेंपाठोपाठ सदा सरवणकरांची भेट
सदा सरवणकर करणार सकारात्मक विचार ?
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर त्याग करणार का?
वरळीत २०१९ साली आदित्य ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी दिला नव्हता उमेदवार
२०२४ ला एकनाथ शिंदेंच्या विरोधात मनसेनंही दिला नाही उमेदवार
Nashik - चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात केदा आहेर हातात तुतारी घेण्याची शक्यता..
- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस यशवंत गोसावी आणि केदा आहेरांमध्ये गुप्त बैठक झाल्याची जोरदार चर्चा...
- चांदवड-देवळा मतदार संघाची जागा आहे काँग्रेसच्या वाट्याला..
- काँग्रेसचा दुसऱ्या यादीतही चांदवडच्या अद्याप उमेदवार जाहीर नाही..
- त्यामुळे राजकीय घडामोडी घडून ही जागा शरद पवार राष्ट्रवादीला मिळण्याची आहे शक्यता..
- केदा आहेर भाजप उमेदवारी न मिळाल्याने नाराज..
- अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे केले आहे जाहीर...
Politics: सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त वक्तव्य प्रकरण
अजित पवार यांचा सुजय विखे यांना फोन
अजित पवार यांनी सुजय विखे यांची सदर वक्तव्य प्रकरणी कानउघडणी केली
महायुतीला अडचणी निर्माण होतील असं कुठंलही वक्तव्य न करण्याची सूचना केली
सूत्रांची माहिती
Nashik - शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांचा राजीनामा
- ठाकरेंच्या शिवसेनेने मुलाला उमेदवारी दिल्याने राजीनामा
- समाजाच्या आणि मतदारसंघातील कामांचा शब्दही न पाळल्याची नाराजी
- ठाकरेंच्या शिवसेनेतील मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत घोलप यांनी सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत केला होता प्रवेश
- ठाकरेंची शिवसेना सोडत असताना अन्याय झाल्याची केली होती भावना व्यक्त, तर माजी मंत्री बबन घोलपांचा शिंदेंच्या शिवसेनेलाही जय महाराष्ट्र...
Mumbai: लाचखोरी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील तीन कर्मचाऱ्यांना अटक
मयांक रावल, ऋषीकेश निकुंभ आणि प्रकाश ताटे अशी तिघांची नावं
तिन्ही कर्मचारी तीन वेगवेगळ्या न्यायमूर्तींच्या कोर्टात कार्यरत होते
हा प्रकार उघडकीस येताच काही दिवसांपूर्वी या तिघांची तक्रार मुख्य न्यायमूर्तींकडे करण्यात आली होती
त्यानंतर हायकोर्ट शिस्तपालन समितीनं या तिघांना कामावरून निलंबित केलं होतं
त्यानंतर याची रितसर तक्रार झाल्यानं पोलीसांनी केलीय कायदेशीर कारवाई
Vidhan Sabha Election: प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपात प्रवेश करणार
प्रहारचे बच्चू कडू यांना विदर्भात मोठा धक्का
भाजप प्रदेश कार्यालयात थोड्याच वेळात प्रवेश होणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना भाजपचा जोरदार धक्का
Nashik - चांदवड तालुक्यातील भाजपात पुन्हा बंडाळी...
- चांडवडमध्ये भाजपाचा अजून एक बडा नेता बंडाच्या तयारीत..?
- माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे अपक्ष उमेदवारीच्या तयारीत.
- उद्या रविवारी सायंकाळी घेणार कार्यकर्ते हितचिंतकांनी बैठक...
- बैठकीत उमेदवारीबाबत निर्णय घेण्याची जोरदार शक्यता
- तिकीट नाकारल्याने डॉ. कुंभार्डे अनेक दिवसांपासून होते नाराज.
- भाजपचे उमेदवार डॉ.राहुल आहेर यांना ही निवडणूक होणार अवघड.
- आमदार राहुल आहेर यांना पक्षातूनच होतोय विरोध.
- मतदासंघातील भाजपचा अंतर्गत वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर आला चव्हाट्यावर..
Kalyan: कल्याण पूर्वेत धनंजय बोडारेंना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटात नाराजी
शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांचे ठाकरे गटाच्या नेत्यावर गंभीर आरोप
माझा फॉर्म गहाळ करून बोडारे यांना दिला ,ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत ,संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत यांच्यावर केले थेट आरोप
स्थानिक उमेदवार देण्याची मागणी
उमेदवार बदलला नाही तर निर्णय घेऊ
महाविकास आघाडी मधील कोंग्रेस ,राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नाराजी नंतर आता ठाकरे गटात देखील नाराजी
महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले
Hingoli: हिंगोली विधानसभेत उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या गोटात नाराजी
हिंगोली विधानसभा आघाडीत काँग्रेसकडे असलेला मतदार संघ
भाऊ पाटील गोरेगावकर समर्थकांची तत्काळ बैठक बोलावली
हिंगोली शहरातील शिवलीला लॉन्समध्ये आढावा बैठक
माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी न दिल्याने कार्यकर्त्यात संताप
पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष उमेदवारी भरावी कार्यकर्त्यांचा आग्रह
Mumbai: शिवसेना शिंदे गटातील मुंबईतील नेत्याचीं आज महत्वाची बैठक
मुंबईत शिवसेना लढवत असलेल्या जागांसंदर्भात होणार चर्चा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे घेणार मुंबईतील विधानसभा उमेदवारांच्या मतदार संघांचा आढावा
निवडणूकीत पक्षाचा प्रचार आणि प्रसार याबाबत श्रीकांत शिंदे करणार मार्गदर्शन
बैठकीला शिवसेनेचे उमेदवार, पक्षाचे मुंबईतील सचिव आणि विधानसभा समन्वयक राहणार उपस्थित
Vasai : वसईतून मनोज पाटील भाजपकडून इच्छूक
मनोज पाटील कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
वसईची जागा अद्यापही जाहीर न झाल्याने कार्यकर्ते फडणवीस यांच्या भेटीसाठी
Vidhan Sabha Election: छत्रपती संभाजीनगरमध्ये सतीश चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार
थोड्या वेळात सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता
संध्याकाळी चार वाजता सतीश चव्हाण घेणार पत्रकार परिषद
अजित पवारांना आणखी एक धक्का
सतीश चव्हाण गंगापूर विधानसभा मतदारसंघातून लढवणार निवडणूक
Vidhan Sabha Election: रश्मी बागल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल
करमाळा विधानसभा भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी
करमाळ्यामधून भाजपकडून रश्मी बागल यांचे नाव चर्चेत
मात्र, त्या बाहेरील असल्याचं म्हणत बागल यांच्या नावाला स्थानिक शिवसेनेचा विरोध
याप्रकरणी दोन दिवसांआधी करमाळ्यातील शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बागल यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती
रश्मी बागल करमाळा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती
मात्र, त्यानंतर बागल यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये घेतला होता प्रवेश
रश्मी बागल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल
करमाळा विधानसभा भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी
करमाळ्यामधून भाजपकडून रश्मी बागल यांचे नाव चर्चेत
मात्र, त्या बाहेरील असल्याचं म्हणत बागल यांच्या नावाला स्थानिक शिवसेनेचा विरोध
याप्रकरणी दोन दिवसांआधी करमाळ्यातील शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बागल यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती
रश्मी बागल करमाळा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती
मात्र, त्यानंतर बागल यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये घेतला होता प्रवेश
करमाळ्यात सध्या अपक्ष आमदार संजय मामा शिंदे आहेत
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नाही, कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित पानसे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा पक्षाचा निर्णय
कोकण पदवीधर मतदार संघातून देखील अभिजित पानसे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले होते,
आता ठाण्यात, ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव, ओवळा माजिवडा इथून संदीप पाचांगे आणि कळवा मुंब्रा इथून सुशांत सूर्यराव हे उमेदवार लढणार
मुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे उमेदवार देणार नसल्याची माहिती
जरी अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेने सदा सरवणकर यांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी राज ठाकरे मुख्यमंत्री यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत,
याबाबत जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना विचारले असता, " राज ठाकरे दोस्तीचा दुनियेतला राजा माणूस आहे" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे
यामिनी यशवंत जाधव दि. २८ रोजी भरणार उमेदवारी अर्ज
भायखळ्याच्या आमदार आणि भायखळा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीच्या उमेदवार सोमवार दिनांक २८ ॲाक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अंजीरवाडी येथील गणेश मंदिरात गणेश दर्शन घेऊन त्या मस्करेन्हस रोड तसेच शेठ मोतीशा लेन येथून भायखळा रिचर्डसन क्रुडास येथे आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करतील. शिवसेना+भाजपा+राष्ट्रवादी आणि रिपाईचे महिला-पुरुष कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. जल्लोषी मिरवणुकीने यामिनी जाधव यांचा अर्ज सादर केला जाणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आणि यामिनी यशवंत जाधव यांना आपले बहुमोल आशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन विभागप्रमुख तथा शिवसेना उपनेते यशवंत जाधव तसेच महायुतीच्या भायखळ्यातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Worli: भाजप प्रवक्त्या शायना एनसी फडणवीसांच्या भेटीला दाखल
वरळी विधानसभेतून शायना एनसी इच्छूक आहेत
वरळीवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा कायम, मिलिंद देवरा यांचे नाव चर्चेत
शिंदेकडून खासदार मिलिंद देवरा यांनी वरळीतून उमेदवारी देणार असल्याची माहिती
Latur: अर्चना पाटील चाकूरकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
लातूर शहर मतदारसंघातून अर्चना पाटील चाकूरकर इच्छूक आहेत
मात्र, लातूर भाजपमधूनच अर्चना पाटील चाकूरकर यांना विरोध होत असल्यानं मतदारसंघाचा पेच फसल्याची सूत्रांची माहिती
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या स्नुषा आहेत अर्चना पाटील चाकूरकर
अमित देशमुख यांच्या समोर अर्चना पाटील चाकूरकर लढण्यास इच्छूक
Nashik - नाशिकमध्ये काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही इगतपुरी मतदारसंघात उमेदवार जाहीर नाही
- हिरामण खोसकर या मतदारसंघात होते काँग्रेसचे आमदार
- हिरामण खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेतल्याने काँग्रेस कडून अद्याप उमेदवार जाहीर नाही
- दुसऱ्या यादीत देखील इगतपुरी मतदार संघाचा समावेश नसल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली
- नाशिक जिल्ह्यातील एकमेव मतदार संघ काँग्रेसकडे
Yavatmal : यवतमाळ मतदार संघाचा तिढा सुटला, महाविकास आघाडीतील जागा कॉंग्रेसकडे
अनिल उर्फ बाळासाहेब मंगुळकर उमेदवार घोषित
- 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपचे मदन येरावार यांच्याकडून केवळ 2200 मतांनी पराभव
-1989 पासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय
-सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हापरिषद उपाध्यक्ष पद भूषविले
-सतत 20 वर्ष जिल्हा परिषद सदस्य
-2012 ते 2017 जिल्हापरिषद उपाध्यक्ष
- जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष 2019 ते 2023
सिंधुदुर्ग : खराब हवामानामुळे पुणे सिंधुदुर्ग विमान सेवा आज रद्द करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तसेच पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना विमान सेवा रद्द झाल्याने फटका बसला आहे. नियमित सेवा देणारे फ्लाय ९१ ची पुणे चिपी सिंधुदुर्ग सेवा खराब हवामानामुळे आज रद्द करण्याची वेळ आली. पुणेहून सिंधुदुर्ग मध्ये ५० प्रवाशांना घेऊन विमान निघाले. मात्र सिंधुदुर्ग मधील चिपी विमानतळ परिसरात दोन घिरट्या घातल्यानंतर हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान गोव्याच्या दिशेने रवाना झाले.
तर मुंबईवरून कोकणात आणि कोकणातून मुंबईमध्ये येण्यासाठी विमान प्रवास करणाऱ्यांसाठी विमानसेवा आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला आहे.
अर्चना पाटील चाकूरकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
लातूर मतदारसंघातून अर्चना पाटील चाकूरकर इच्छुक आहेत
मात्र, लातूर भाजपमधूनच अर्चना पाटील चाकूरकर यांना विरोध होत असल्यानं मतदारसंघाचा पेच फसल्याची सूत्रांची माहिती
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या स्नुषा आहेत अर्चना पाटील चाकूरकर
अमित देशमुख यांच्या समोर अर्चना पाटील चाकूरकर लढण्यास इच्छूक
यवतमाळ मतदार संघाचा तिढा सुटला
महाविकास आघाडीतील जागा कॉंग्रेसकडे
अनिल उर्फ बाळासाहेब मंगुळकर उमेदवार घोषित
- 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपचे मदन येरावार यांच्याकडून केवळ 2200 मतांनी पराभव
-1989 पासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय
-सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हापरिषद उपाध्यक्ष पद भूषविले
-सतत 20 वर्ष जिल्हा परिषद सदस्य
-2012 ते 2017 जिल्हापरिषद उपाध्यक्ष
- जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष 2019 ते 2023
कृष्णराज महाडिक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
कोल्हापूर उत्तरमधून कृष्णराज महाडिक इच्छूक
कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेचाही दावा
राजेश क्षीरसागर देखील शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छूक
मागील काही दिवसात महाडिक कुटुंबियांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी
Kolhapur: कृष्णराज महाडिक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
कोल्हापूर उत्तरमधून कृष्णराज महाडिक इच्छूक
कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेचाही दावा
राजेश क्षीरसागर देखील शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छूक
मागील काही दिवसात महाडिक कुटुंबियांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी
Vidhan Sabha Election 2024: राजापूरमध्ये राजन साळवींची डोकेदुखी वाढणार
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांंची बंडखोरी, प्रचारालाही सुरुवात
कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही - अविनाश लाड
काँग्रेस पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म नक्की मिळेल - लाड
राजापूर विधानसभा मतदारसंघात राजन साळवी यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी - लाड
काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी मी हे पाऊल उचललं आहे - लाड
कोणत्याही परिस्थितीत माघार नाही -- लाड
Vidhan Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला...
केसरकर आणि राज ठाकरे यांच्यात दोन मिनिटांची चर्चा..
दीपक केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन आल्याची चर्चा...
दादर माहीम मतदारसंघमध्ये राज ठाकरे यांच्या मुलाविरुद्ध शिवसेना शिंदे गटांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे...
त्यामुळे या मतदारसंघाबाबत चर्चा झाली असल्याची प्राथमिक माहिती...
शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला...
केसरकर आणि राज ठाकरे यांच्यात दोन मिनिटांची चर्चा..
दीपक केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन आल्याची चर्चा...
दादर माहीम मतदारसंघमध्ये राज ठाकरे यांच्या मुलाविरुद्ध शिवसेना शिंदे गटांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे...
त्यामुळे या मतदारसंघाबाबत चर्चा झाली असल्याची प्राथमिक माहिती...
Nagpur - नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी
- पश्चिम नागपूर मतदारसंघात संदिप जोशी यांनी निवडणूक लढावी यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रह
- पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजपचा उमेदवार अद्यापंही निश्चित नाही
- बाहेरचा उमेदवार देण्यापेक्षा संदीप जोशी यांनी लढावं, हा कार्यकर्त्यांचा आग्रह
Akola: अकोल्यातील बळीराम सिरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
बाळापूर विधानसभेचा तिढा आज सुटणार का ?
सिरस्कार हे सध्या भाजपमध्ये असेल तरी त्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळू शकते
ते वंचित कडून आधी याच मतदार संघातून आमदार राहिले आहेत
गव्हाणकर यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने अकोल्यातील भाजप नेत्यांनी त्याला विरोध दाखवला आहे,
त्यामुळे बाळापूर इथून कोणाला तिकीट मिळणार ? गव्हाणकर की सिरस्कार? हा वाद आज सोडवला जाण्याची शक्यता
Akola: अकोल्यातील बळीराम सिरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
बाळापूर विधानसभेचा तिढा आज सुटणार का ?
सिरस्कार हे सध्या भाजपमध्ये असेल तरी त्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळू शकते
ते वंचित कडून आधी याच मतदार संघातून आमदार राहिले आहेत
गव्हाणकर यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने अकोल्यातील भाजप नेत्यांनी त्याला विरोध दाखवला आहे,
त्यामुळे बाळापूर इथून कोणाला तिकीट मिळणार ? गव्हाणकर की सिरस्कार? हा वाद आज सोडवला जाण्याची शक्यता
Gadchiroli: गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार देवराव होळी सागर बंगल्यावर
पहिल्या यादीत होळी यांचा समावेश नसल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
गडचिरोली मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव
भाजपची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याने काही इच्छुक फडणवीस यांच्या भेटीसाठी सागरवर दाखल
Bhandara: भंडाऱ्यात लोखंडी गेट अंगावर पडून पाच वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
भंडाऱ्याच्या प्रसिद्ध उद्योजक गुप्ता कुटुंबीयांवर शोककळा
घराच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले भले मोठे लोखंडी गेट अंगावर कोसळल्यानं त्यात चिमूरड्याचा दबून दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना भंडाऱ्यात काल रात्री घडली
नाशिक ब्रेकिंग...
Nashik - भाजप आमदार डॉ राहुल आहेर छगन भुजबळ यांच्या भेटीला
- राहुल आहेर आणि मंत्री छगन भुजबळांची बंद दाराआड चर्चा
- राहुल आहेर चांदवड देवळा मतदार संघातून भाजपाचे आहेत उमेदवार
- राहुल आहेरांचे भाऊ केदा आहेर यांनी केलंय बंड
- चांदवड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर नाही
- आहेर आणि भुजबळांची भेटीमगाचे कारण मात्र अध्याप अस्पष्ट
Nagpur - नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी
- पश्चिम नागपूर मतदारसंघात संदिप जोशी यांनी निवडणूक लढावी यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रह
- पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजपचा उमेदवार अद्यापंही निश्चित नाही
- बाहेरचा उमेदवार देण्यापेक्षा संदीप जोशी यांनी लढावं, हा कार्यकर्त्यांचा आग्रह
- भाजप कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार
Satara: कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारमध्ये सापडले 15 लाख
तासवडे टोल नाक्यावर कारची तपासणी करत असताना सापडली रक्कम
बोलेरो कार गुजरात पासिंगची
पैसे नेमके कशाचे याचा तपास सुरु.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तासवडे टोलनाक्यावरती तळबीड पोलिसांची विशेष तपासणी मोहीम...
Mumbai: महाविकास आघाडीतून आम आदमी पार्टी मलबार हिलची जागा लढवणार, सूत्रांची माहिती
विलेपार्लेच्या जागेवरुन चर्चा सुरु होती, याप्रकरणी वाटाघाटी झाल्यानंतर विलेपार्लेची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात
आम आदमी पार्टीकडून अद्याप उमेदवार निश्चित नसला तरी जागा सुटल्याची ‘आप’मधल्या सूत्रांची माहिती
महायुतीकडून मलबार हिलची जागा मंगलप्रभात लोढा लढवणार आहेत
Akola: अकोल्यातील बाळापूरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे
भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांना शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची शक्यता
गव्हाणकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती
अकोला जिल्ह्यात बाळापूर हा एकच मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, जिथे नितीन देशमुख हे आमदार आहेत,
नितीन देशमुख आधी शिंदेंसोबत गेले मात्र अर्ध्यावरच परतून आले, आणि उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहिले,
याच नितीन देशमुखांच्या विरोधात नारायण गव्हाणकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
Kolhapur: कोल्हापुरात लक्झरी बसला आग, एकाचा होरपळून मृत्यू
पुणे बेंगलोर महामार्गावर मयूर पेट्रोल पंपाजवळ ची दुर्घटना,
सहा प्रवासी बचावले
बेळगावहून पुण्याला निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सची बस जळून खाक
गोकुळ शिरगाव जवळ बस येताच अचानक इंजिन मध्ये आग लागली
Palghar: पालघरमध्ये राज ठाकरेंच्या पक्ष स्थापनेपासून सोबत असलेला मनसेचा शिलेदार शिवसेना शिंदे गटाच्या गळाला .
डहाणू तालुकाप्रमुख आणि 2019 चे पालघर विधानसभेचे मनसेचे उमेदवार उमेश गोवारी यांचा आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश .
2019 चे विधानसभा निवडणुकीत पालघर विधानसभेत उमेश गोवारी पंधरा हजार मतं घेऊन तिसऱ्या नंबर वर.
पालघर जिल्ह्यात मनसेने दोन्ही आयात उमेदवार दिल्याने गोवारी नाराज .
उमेश गोवारी यांच्यासह डहाणू आणि तलासरीतील आठ ते दहा पदाधिकारी आणि बारा पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांच्या हाती धनुष्यबाण .
एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा पक्षप्रवेश .
भाजप आमदार मेघना बोर्डीकरांचीही वाढली संपत्ती
५ वर्षात वार्षिक उत्पन्नात तीन पटीने वाढ-७ कोटी ७४ लाखांचे कर्ज
परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार मेघना बोर्डीकर यांची संपत्ती ही वाढली मागच्या पाच वर्षात तीन पटीने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली तर त्यांच्यावर एकूण सात कोटी 74 लाखांचे कर्जही आहे. निवडणूक विभागाला दिलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे.
जालना -उदय सामंत यांच्या भेटीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया..
या दिवसात काय चर्चा असते आता पोळा आहे.?-मनोज जरांगे
राजकिय सामाजिक चर्चा झाली,-जरांगे
उदय सामंत यांच्या भेटीवरती मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली असून सामाजिक आणि राजकीय विषयावरती चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलय दरम्यान फडणवीस यांनी आरक्षण आरक्षण न दिल्यामुळे 30 तारखे च्या तुमच्या निर्णयावर आम्ही न ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
Hingoli: हिंगोली विधानसभा ठाकरे शिवसेनेला - सूत्र
काँगेस मध्ये नाराजगी मवीआ मध्ये बंडखोरी होण्याची शक्यता
परंपरागत काँग्रेसच्या असलेल्या मतदारसंघांमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने रूपाली पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे अशी सूत्रांची माहिती आहे
त्यांना एबी फॉर्म सुद्धा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे
आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे असताना शिवसेनेने उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते
Jalna: उदय सामंत अंतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीला, सोबत मुख्यमंत्र्यांची एचडी मंगेश चिवटे यांनी देखील घेतली भेट.
दोघांमध्ये 20 ते 25 मिनिट चर्चा.
संभाजीनगर दौऱ्यावर आले असता उदय सामंत यांनी घेतली भेट.
अंतरवाली सराटी येथील सरपंचाच्या घरी दोघांत चर्चा..
मात्र चर्चेचं कारण अस्पष्ट,
Dharashiv: धाराशिवमध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन दिवस उरले, महाविकास आघाडीतील गोंधळ संपेना
धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात गोंधळ
उमरगा आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अजूनही तिकिटासाठी रस्सीखेच उमेदवार ठरलेला नाही.
तर परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षाकडून उमेदवार.
राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह भरला उमेदवारी अर्ज, तर शिवसेनेच्या रणजीत पाटील यांच्याकडेही पक्षाचा एबी फॉर्म सोमवारी अर्ज भरणार
Sangamner: जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान.. गुन्हा नोंदविण्यासाठी जयश्री सह तांबे कुटुंबीयांचा ठिय्या गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून विलंब...
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं...
या सभेत भाजपच्या एका वक्त्याने जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे...
या घटनेचे काँग्रेस पक्षातून तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत...
या विधानामुळे संताप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या तर काही ठिकाणी गाड्यांना आग देखील लावण्यात आली,..
Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील जागांबाबत बैठकीनंतरही तिढा कायम, आज निर्णय होण्याची शक्यता
काल रात्री उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपची खलबतं
काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीची शक्यता तर काही जागा शिवसेनेला उमेदवार देण्याबाबत चर्चा
वरळी, शिवडी आणि अंधेरी पूर्ववर शिवसेनेचा दावा कायम, सूत्रांची माहिती
जागांवर तोडगा काढून आज भाजप दुसरी यादी जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती
Nashik: देवळाली विधानसभा मतदारसंघाची जागा अखेर शिवसेना ठाकरे गटाकडे
-
देवळाली च्या जागेवरून महाविकास आघडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यांत सुरू होती रस्सीखेच
राष्ट्रवादी काँग्रेस कडची जागा आपल्याकडे खेचण्यात शिवसेना ठाकरे गटाला यश
-
माजी आमदार योगेश घोलप शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार
-
*मागील पंचवार्षिक निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी केला होता योगेश घोलप यांचा पराभव
-
सरोज अहिरे अजित पवार गटात केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने हे सांगितला होता या जागेवर हक्क
-
अखेर ही जागा आपल्याकडे खेचण्यात शिवसेना ठाकर गटाला आली यश
-
2019 च्या निवडणुकीप्रमाणे सरोज अहिरे आणि योगेश घोलप पुन्हा एकदा आमने-सामने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष
छ्त्रपती संभाजीनगर - जिल्हाभरातील 95 टक्के शस्त्रे झाली जमा, पाच टक्के लोकांची अजूनही टाळाटाळ
विधानसभा निवडणुकीच्या काळात शस्त्राचा गैरवापर होऊ शकतो म्हणून जिल्ह्यातील परवानाधारकांची शस्त्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरू केली आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १ हजार ७५ आणि पोलिस अधीक्षक ग्रामीण यांच्या हद्दीत ५२५ जणांकडे शस्त्र परवाना आहे.
त्यांच्यापैकी खेळाडू, बँक कर्मचारी आदींना शस्त्र जमा करण्यापासून सूट देण्यात आली आहे.
उर्वरित शस्त्रधारकांपैकी सुमारे ९५ टक्के शस्त्र आतापर्यंत पोलिस ठाण्यांमध्ये जमा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
Vidhan Sabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर
एकूण 15 उमेदवारांचा शिवसेना ठाकरे गटाच्या दुसरे यादी समावेश
१) धुळे शहर- अनिल गोटे
२)चोपडा (अज)- राजू तडवी
३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
४) बुलढाणा- जयश्री शेळके,
५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील
७) परतूर- आसाराम बोराडे
८) देवळाली (अजा) योगेश घोलप
९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे
१० )कल्याण पूर्व - धनंजय बोडारे
११) वडाळा श्रद्धा श्रीधर जाधव
१२ )शिवडी- अजय चौधरी
१३) भायखळा- मनोज जामसुतकर
१४)श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
१५)कणकवली- संदेश भास्कर पारकर.
Beed: बीड जिल्ह्यात निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय पेच निर्माण
आचारसंहिता लागून 11 दिवस झाले तरीही आणखी राजकीय पक्षांना उमेदवार ठरवता आला नाही.
उमेदवार मुंबई वारी करत तिकीटासाठी वेटिंग वर आहेत तर कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..
Solapur: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात काल काँग्रेसने जागा सुटल्याचा दावा करताच ठाकरे गट आक्रमक
सोलापूर दक्षिणची जागा शिवसेनेचीच असून शिवसनेचे अमर पाटीलच निवडणूक लढवणार
काँग्रेस नेते दिलीप मानेंना आघाडीतून जागा सुटल्याची माहिती चुकीची, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी आक्रमक
काँग्रेसकडून दबावतंत्राचा वापर केला जातोय मात्र दक्षिण सोलापूरची जागा शिवसेना लढणार
काँग्रेसवाल्यांनी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल अशी कृत्य करू नये
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींचे काँग्रेस नेत्यांना आवाहन
येत्या सोमवारी महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार
Anant Ambani : उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
मध्यरात्री 12 च्या सुमारास अनंत अंबानी फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल
जवळपास दीड ते दोन तास अनंत अंबानी यांची फडणवीस यांच्याशी चर्चा
निवडणुकीच्या काळात अनंत अंबानींनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
Bhiwandi: भाजपचे संतोष शेट्टी शिवसेना शिंदे गटात प्रवेश; धनुष्यबाण चिन्हावर लढवणार निवडणूक
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते आणि प्रभावी कार्यकर्ते संतोष शेट्टी यांनी अधिकृतरित्या भाजपला सोडचिट्टी देत शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई येथील वर्षा बंगल्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संतोष शेट्टी यांनी भगवा हातात घेऊन प्रवेश केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत शेट्टी शिंदे गटाच्या तिकिटावर आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आहे.
Vidhan Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी
नरेंद्र मोदी
जे पी नद्दा
राजनाथ सिंह
नितीन गडकरी
देवेंद्र फडणवीस
विनोद तावडे
अशोक चव्हाण
आशिष शेलार
पंकजा मुंडे
चंद्रकांत पाटील
मुरलीधर मोहोळ
संजय कुटे
नवनीत राणा
भाजपचे बहुतांशी मुख्यमंत्री
यांच्यासह ४० जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश
पार्श्वभूमी
Maharashtra News Live Updates: राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) धामधूम सुरु असून राजकीय वारे जोमाने वाहू लागत आहेत. विधानसभा निवडणूक 2024 साठी सर्वपक्षीयांकडून निवडणूक याद्या जाहीर होत आहेत. काँग्रेसने आज दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -