Maharashtra Breaking 25th June LIVE Updates: ओम बिर्लाच पुन्हा एनडीएचे स्पीकरपदाचे उमेदवार; आज नामांकन अर्ज भरणार
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
NEET Paper Leak Case : नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी संजय जाधव यास सहा दिवसाची पोलीस कोठडी. संजय जाधव दिल्ली आणि लातूर यामधील दुवा होता. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजत असलेलं नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूर पर्यंत आहेत. या प्रकरणात चार लोकांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील जलील खान पठाण याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. यातील फरारी संजय जाधव यास काल अटक करण्यात आली. आज लातूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले.. संजय जाधव यास सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Bhiwandi : बकरी ईद निमित्त भिवंडी शहरात कुर्बानी साठी मोठ्या प्रमाणावर रेडे म्हैस यांची खरेदी झाली असताना शहरातील हंडी कंपाऊंड येथे 12 जून रोजी सायंकाळी एका रेड्याचा ताबा सुटून 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. यामधील गंभीर जखमी असलेल्या नियाज अहमद वय 24 वर्ष या युवकाचा उपचारा दरम्यान मुंबई येथील जे जे रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या रेड्याच्या हल्ल्यात एक महिला व तीन पुरुष जखमी झाले होते. त्यावेळी रस्त्यातून जात असलेल्या नियाज अहमद यांच्या पोटात रेड्याचा शिंग लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता.या घटनेचा थरार सीसीटिव्ही कैद झाला होता. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात रेडा मालक तारिफ फारुकी या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra Assembly Election Maha Vikas Aghadi Seat Sharing : मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक (Assembly Elections) अत्यंत चुरशीची होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीनं अद्याप आपला फॉर्म्युला निश्चित केलेला नाही. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) भागीदारांनी समान संख्येनं जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
NEET Exams : नीट पेपरफुटी प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी लातूरमधील संशयित आरोपी असलेल्या जलील उमरखाँ पठाण याला सोमवारी लातूरच्या जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांकडून अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला. आरोपींनी 2024 मधील नीट परीक्षेतच नव्हे तर, देशात घेण्यात आलेल्या मागील नीट परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेत देखील गैरव्यवहार केल्याची शक्यता असल्याचं पालिसांनी म्हटले आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणाला आणखी मोठं वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच आणखी कोणत्या कोणत्या परीक्षेत या आरोपींना घोटाळा केला आहे हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Parliament Session: लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. तर लोकसभेचं उपाध्यक्ष विरोधी पक्षाला मिळावं, अशी INDIA आघाडीची मागणी आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला, डी पुरंदेश्वरी यांची नावं चर्चेत आहेत.
Solapur News : दक्षिण सोलापूर अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी तिच्या मृतदेहाला जाळून टाकले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना घडलीय.
याप्रकरणी मंद्रूप पोलिस ठाण्यात पतीसह त्याच्या भावा विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भाग्यश्री बसवराज कोळी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती बसवराज अडव्याप्पा कोळी याच्या विरुध्द खूनाचा तर त्याचा भाऊ गजानन आडव्याप्पा कोळी आणि शिवानंद आडव्याप्पा कोळी यांच्याविरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ahmednagar: खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात खरीपाचा 5 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा असतो. त्यासाठी सरकारने जिल्ह्यातील 10 पीकांसाठी ही योजना लागू केली आहे. मागील वर्षी या योजनेचा लाभ 5 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी घेतला होता, त्यानुसार यावर्षी देखील आत्तापर्यंत 1 लाख 25 हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.
Parliament Session: सकाळी 11 वाजता सुनेत्रा पवार यांना राज्यसभा अध्यक्षां कडून शपथ घेण्यासाठी निमंत्रण
राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली कार्यालयात जल्लोष कार्यक्रम
महाराष्ट्रातील अजित दादा गटाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरेसुद्धा आज शपथ घेणार
Pune News: पुण्यात कायद्याचं राज्य राहिलंय का? विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याला आता ड्रग्जमाफियांनी ताब्यात घेतलंय का? पुण्याला ड्रग्जच्या नशेबाजांचा विळखा पडलाय का? आणि पुण्यात कायदा-सुव्यवस्था नावाची गोष्ट औषधाला तरी उरलीय का? असे संतप्त सवाल आता पुणेकर विचारू लागलेयत. कारण, काल एफसी रोडवरच्या लिक्विड लाऊंजमधील ड्रग्ज पार्टीचा प्रकार उघड झाल्यानंतर काल पुन्हा ड्रग्ज पार्टीचा नवा व्हिडीओ समोर आलाय. लक्विड लाऊंजमध्ये पहाटेपर्यंत ड्रग्ज पार्टी चालल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला तर, काल अहमदनगर रोडवरील एका नामांकित मॉलच्या वॉशरूममध्ये काही तरूण ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ड्रग्जचं सेवन करतानाचं मोबाईलमध्ये शूटिंगही करण्यात आलंय.
Maharashtra Politics: अजित पवार गटातील आमदार आमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीवाटप झाल्यावर येऊ, असं संबंधित आमदारांनी आश्वासन दिल्याचा दावा शरद पवारांनी केलाय. दरम्यान, अजित दादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नसल्याचंही वक्तव्य शरद पवारांनी केलंय. शरद पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवारांच्या गोटात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.
Mumbai News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत सध्या समाधानकारक पाऊस होत आहे. दररोज अडीच ते साडेतीन हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा आणि अप्पर वैतरणा वगळता अन्य पाच तलावांमध्ये 21 जूनला 76 हजार दशलक्ष लिटर म्हणजे 5 पूर्णांक 31 टक्के पाणीसाठा होता. 24 जूनपर्यंत हा साठा 76 हजार दशलक्ष लिटर म्हणजेच 5 पूर्णांक 30 टक्के इतका झाला. दरम्यान तलाव क्षेत्रात अजूनही जोरदार पावसाची आवश्यकता आहे. तरच मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर होईल असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर अत्यंत उच्चभ्रू वसाहत असलेल्या एन वन भागात 75 वर्षीय वृद्ध दाम्पत्याने सोमवारी रात्री पावसात घरा बाहेर अनोखे आंदोलन सुरू केले. आणि याचं कारण आहे भाडेकरारनामा संपल्यानंतर ही भाडेकरू वृद्ध दाम्पत्याला त्रास देणे सुरू करून जागा सोडण्यास नकार दिलाय. पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे .
70 वर्षीय एलीझाबेथ बत्रा 76 वर्षीय पती सोबत एन-1 परिसरात राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, 2020 मध्ये त्यांना एका व्यक्तीला घरा समोरील जागा किराणा, डेली निड्स व्यवसायासाठी भाडयाने दिली. सप्टेंबर, 2023 पर्यंत त्यांनी रीतसर लिव्ह अँड लायसन्स करार केला. जून, 2023 मध्ये त्यांनी सदर भाडेकरू ला जागा खाली करण्याची नोटीस दिली. मात्र, सप्टेंबर उलटल्यानंतर ही जागा सोडली नाही. याबाबत पोलिसांकडे त्यांनी वारंवार तक्रार केली. न्यायालयात देखील धाव घेतली. मात्र, न्याय मिळत नसल्याने त्यांनी अखेर सोमवारी रात्री घरा बाहेर झोपून आंदोलन सुरू केले.
Pune News : पुण्याच्या तळेगावमध्ये हवेत तो ही फिल्मी स्टाईल गोळीबार करण्यात आला होता. मात्र आता पोलिसांनी दहशत माजवण्यासाठी हे कृत्य करणाऱ्या समाजकंठकांची त्याचं परिसरात धिंड काढत, त्यांची मस्ती उतरवली आहे. वीस जूनला सहा जणांनी दुचाकीवरून पिस्तुलं नाचवत ज्या-ज्या परिसरात जाऊन हवेत गोळीबार केला आणि 'आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचं नाही.' असं म्हणत दहशत माजवली अन सगळ्यांनी पोबारा केला. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकांनी या सहा जणांच्या मुसक्या आळवल्या आणि त्यांच्याकडून सात पिस्तुलांसह चौदा जिवंत काडतुसे जप्त केली. पोलीस इथंच थांबले नाहीत. त्यांनी गोळीबार केलेल्या परिसरातच या समाजकंठकांची धिंड काढत, त्यांची मस्ती ही उतरवली.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगालसह 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 278 खासदारांचा शपथविधी सोहळा
2. लोकसभेतील विरोधी पक्षनेता आज ठरणार, राहुल गांधींच्या नावासाठी काँग्रेस आग्रही
3. रवींद्र वायकरांना खासदारपदाची शपथ घेऊ देणार नाही, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचा इशारा, आज वायकरांच्या शपथविधीकडे राज्याकडे लक्ष
4. इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी 10 वाजता बैठक, लोकसभा अध्यक्षपदाची ठरणार रणनीती
5. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बैठक, विधानसभा जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा होणार
6. अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास
7. लातूर नीट पेपरफुटीप्रकरणी दुसरा आरोपीही अटकेत, पोबारा केलेल्या संजय जाधवच्या लातूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
8. पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी, अल्पवयीन मुलाच्या आत्याच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता
9.पोर्शे कार अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट... दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
10. फर्ग्युसन रस्त्यावरच्या ड्रग्ज प्रकरणानंतर आणखी एक व्हिडीओ समोर, पुणे-नगर रस्त्यावरच्या मॉलमध्ये 2 तरुणी ड्रग्जसेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -