Maharashtra News Live Updates 24 Sep 2024: पुढील 2 तासांत अक्षय शिंदेचं शवविच्छेदन पूर्ण होणार

Maharashtra News Live Updates 23 September 2024: राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 24 Sep 2024 01:33 PM
पुढील 2 तासांत अक्षय शिंदेचं शवविच्छेदन पूर्ण होणार

अक्षय शिंदेच्या शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पोलिसांकडून कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण


पुढील 2 तासांत शवविच्छेदन प्रक्रिया होणार पूर्ण

वाशीतील मॅाडर्न कॅालेज येथे सिनेट निवडणूकीत गोंधळ 

नवी मुंबई - वाशीतील मॅाडर्न कॅालेज येथे सिनेट निवडणूकीत गोंधळ 


उध्दव ठाकरे गटाने बनावट पोलींग ऐजंट बसवला असल्याचा अभवि चा आरोप


आक्षेप घेतल्या नंतर बसलेला पोलींग ऐजंट पळून गेला


यावेळी काही वेळ येथे गोंधळ उडाला होता

पुण्यातील मंडई परिसरात असलेल्या मेट्रो स्टेशनच्या नावावरून माळी महासंघाचे निषेध आंदोलन

पुण्यातील मंडई परिसरात असलेल्या मेट्रो स्टेशनच्या नावावरून माळी महासंघाने निषेध व्यक्त केला आहे. मेट्रो स्टेशनचं नाव आता मंडई मेट्रो स्टेशन ठेवण्यात आलं आहे. मात्र हे नाव न देता संपूर्ण महात्मा फुले मंडई अस नाव देण्यात यावं यासाठी माळी संघातर्फे मंडईत निदर्शने करण्यात आली. फक्त मंडई नाव ठेवून फुलेंचा अपमान मेट्रोतर्फे करण्यात येत असल्याचा आरोप माळी समाजाने केला आहे.

वैभववाडीत भुईबावडा घाटात दरड कोसळली, 16 तासांपासून वाहतूक बंद

सिंधुदुर्ग : वैभववाडीत भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने गेल्या १६ तासांपासून वाहतूक बंद.


ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका भुईबावडा घाटाला बसला असून मुसळधार पावसामुळे भली मोठी दरड रस्त्यावर कोसळल्याने भुईबावडा घाटातील वाहतूक बंद.


अजूनही ४ ते ५ तास भुईबावडा घाटातील दरड बाजूला करण्यासाठी लागणार असल्याने सध्या कोल्हापूर वरून सिंधुदुर्गात येणारी वाहतूक फोंडा घाट मार्गे वळविली आहे.

वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरु 

विरार :  वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरु 


रिमझिम सरींसह अधून-मधून जोरदार पाऊस पडत आहे.


परिसरात आभाळ पूर्णतः भरून आले असून हवेत गारवा पसरला आहे.


विरार ते चर्चगेट लोकल सेवा आणि शहरतील वाहतूक सेवा सुरळीत आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे- सुप्रिया सुळे

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली 


या घटनेची चौकशी झाली पाहिजे


त्या नराधमांना फाशी मिळावी अशी आजही माझी मागणी


चौकात फाशी द्यावी अशी माझी मागणी


हा देश संविधानाने चालतो 


काल जी घटना झाली त्याची चौकशी झाली पाहिजे


मला पोलिसांची काळजी वाटते


त्याचे दोन्ही हात बांधले आहेत तर त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला 


गृहमंत्री यांनी ऊत्तर द्यावे


आज राज्यातील पोलीस सुरक्षित नाही


आमची मागणी फाशीची होती


एखाद्या पोलिसांवर हल्ला होतो, ही यंत्रणा करते काय करतो


सुप्रिया सुळे यांचा सवाल 

विधानसभा निवडणुकीत महिला व तरुणांच्या मतांवर भाजपचा डोळा, युवा मोर्चा व महिला मोर्चांवर विशेष जबाबदारी

विधानसभा निवडणुकीत महिला व तरुणांच्या मतांवर भाजपचा डोळा


भाजप कोअर कमिटी बैठकीत युवा मोर्चा व महिला मोर्चांवर विशेष जबाबदारी


तरुण व महिलांची मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्याची व्यूहरचना


लाडकी बहीण व लाडका भाऊ योजनेचे लाभार्थी वाढवण्यासाठी दिला जाणार भर


तरुण व महिलांसाठी असलेल्या योजनांचा प्रत्येक आठवड्यात आढावा घेतला जाणार

मांजरा धरण अखेर 90 टक्के भरले, 1392 क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू

बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्याला पाणी पुरवणारे मांजरा धरण अखेर 90 टक्के भरले आहे.. मराठवाड्यातील बहुतेक पाण्याचे प्रकल्प संपूर्ण क्षमतेने भरले असतानाच सगळ्यात उशिरा मांजरा धरण भरले आहे.बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 90% भरले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.  मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मांजरा धरण 90% भरले आहे. 1392 क्युसेक्स वेगाने सध्या धरणात पाण्याची आवक सुरू आहे. तर पाणी पातळी 642 मिलिमीटरवर वर पोहोचली आहे. धरण परिसर क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रकरण, सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

नवी दिल्ली -मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रकरण


सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी


सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी


राज्य सरकार आणि काही विद्यार्थी संघटना यांची निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी


न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि SVN Bhatti यांच्या पिठासमोर होणार सुनावणी


आज सिनेट निवडणुकीसाठी एकीकडे मतदान होत असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे एन्काऊंटर करण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर- दीपक केदार 

अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरवरून ऑल इंडिया पॅंथरचे दीपक केदार यांनी राज्य सरकारला लक्ष करत हे राजकीय एन्काऊंटर असल्याचा आरोप केलाय. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर राजकीय एन्काऊंटर आहे. केवळ मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन रोखता येत नाही. उठवता येत नाही. म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा एन्काऊंटर करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला असल्याचा थेट आरोप केदार यांनी केला आहे.


येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात आचारसंहिता लागू शकते. राज्य सरकारला हे दिवस काढायचे आहेत. म्हणून काही काळ जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून लक्ष हटविण्यासाठी जाणीवपूर्वक अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झालेल आहे. त्यामुळे मराठा समाजाला केदार यांनी आव्हान करत जरांगे पाटील यांचे काळजी घ्या असं म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा एन्काऊंटर करण्याचा निश्चय सरकारचा आहे. त्यामुळे जरांगे यांचं आंदोलन उध्वस्त होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचं दीपक केदार यांनी म्हटलं.

मुंबई विद्यापीठाच्या बहुचर्चित अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या बहुचर्चित अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी आज  मतदान होत असून उद्धवसेनेची युवासेना आणि भाजपप्रणीत अभाविप या दोन संघटनांचे उमेदवार आमने-सामने आहेत. एकूण २८ उमेदवार ही निवडणूक लढवीत असून युवासेना आणि अभाविपच्या प्रत्येकी १० उमेदवारांत हा सामना रंगेल. मुंबईतील डहाणूकर कॉलेज येथील मतदान केंद्रावर , मतदानाला सुरुवात झाली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी

पुणे महापालिका भूमिगत विहिरींचा घेणार शोध, लक्ष्मी रस्त्यावरील अपघातामुळे निर्णय

पुणे : पुणे महापालिका भूमिगत विहिरींचा घेणार शोध 


लक्ष्मी रस्त्यावरील अपघातामुळे पालिका विहिरींचा घेणार शोध लवकरच निविदा काढली जाणार 


शहरात सन 2010 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात 399 विहिरी आढळल्या होत्या.त्यातील बहुतांश विहीरी या शहराच्या मध्यभागात असून 95 टक्के विहिरी बुजवण्यात आले आहेत.


लक्ष्मी रस्त्यावर नुकताच झालेल्या अपघात अशाच बुजवलेल्या विहिरीमुळे झाल्याचे समोर आले आहे.या पार्श्वभूमीवर महापालिकेने बुजवलेल्या विहिरींचा शोध घेण्यात सुरुवात केली आहे.


पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात तुंबलेल्या सांडपाण्याची वाहिनी स्वच्छ करताना फेवर ब्लॉक खचल्याने पालिकेचा सेटिंग मशीन ट्रक खड्ड्यात कोसळला होता. त्या जागी विहीर होती.


या घटनेनंतर आता पालिका जागी झाली आहे.

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा पंचनामा पूर्ण, मृतदेह आता जे जे रुग्णालयात नेला जाणार

कळवा रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा पंचनामा झाला आहे. त्यानंतर आता पेपरवर्क पूर्ण करून न्यायाधीश रुग्णालयातून बाहेर पडले.


पेपर प्रोसिजर पूर्ण झाल्यामुळे पोलिसांकडून आता अक्षय शिंदेची बॉडी पोस्टमॉर्टम करण्यासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे.


 

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. दुसरकीडे 23 सप्टेंबर रोजी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. त्याने पोलिसांची बंदुक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातच अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.