Maharashtra Breaking 24th June LIVE Updates: जालन्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 24 Jun 2024 02:47 PM
Jalna News: जालन्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी

Jalna News: जालन्यातील परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे. ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांना गावात प्रवेश करू नये तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल असा इशाराही या फलकावर देण्यात आलंय. दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याच म्हटलंय. 


 

Pune News: डीजेचा दणदणाट, बेधुंद तरुणाई, L3 बार मधील आणखी 2 व्हिडीओ समोर

Pune News: डीजेचा दणदणाट, बेधुंद तरुणाई, L3 बार मधील आणखी 2 व्हिडीओ समोर


"त्या" पार्टीचे आणखी काही व्हिडिओ समोर


रविवारी पहाटे 4 पर्यंत सुरू होती पार्टी


40 ते 50 जणांची पुण्यातील एफ सी रोड असलेल्या L3 बार मधील पार्टीचे व्हिडीओ आले समोर


हातात मद्याचे ग्लास, डी जे चा मोठा दणदणाट तरुणाई कडून सुरू होता या बार मध्ये जल्लोष

Pune News: इंदापुरात विहिरीत पाय घसरुन पडल्यामुळे मुलीचा मृत्यू

Pune News: इंदापूर तालुक्यातील राजवडी पाटी येथे पंधरा वर्षीय मुलगी विहिरीत पाय घसरुन बुडाल्याचा अंदाज आहे. सारिका पिराजी शिंदे असं या मुलीचं नांव असून आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारासती या विहिरीवरती पाणी आणण्यासाठी गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. इंदापूर पोलीस आणि महसूल प्रशासन या ठिकाणी दाखल झाला असून या बुढेलेल्या मुलीचा शोध घेतला जातोय. सारिका पिराजी शिंदे वय 15 वर्षे राहणार परतुर तालुका परतुर जिल्हा जालना ही मुलगी आज सकाळी साडेसात वाजता राजवडी तालुका इंदापूर येथील विहिरी वरती पाणी भरणे कामी गेली असताना पाय घसरून पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने तिचा शोध सुरू आहे.

Beed News : बीड येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात 11 जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती, शांतता रॅलीचं आयोजन

Beed News : बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती तथा शांतता रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे स्वतः या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी बीड येथे रविवारी सकल मराठा समाजाकडून व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत तालुका निहाय  नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यासाठी बीड जिल्हाभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.ही रॅली 11 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती सहभाग नोंदवणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.


 
मुस्लिम समाजाला शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षण द्या : सचिन खरात

मुस्लिम समाज महाराष्ट्र राज्यामध्ये गरीब असल्यामुळे शिक्षणात अत्यल्प समाज आहे, तसेच मुस्लिम समाजामध्ये सहा ते बारा वयोगटातील 75 टक्के मुलं गरीब असल्यामुळे शिक्षणापासून वंचित आहेत, मुस्लिम समाज खाजगी नोकऱ्यांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दोन टक्के आहे यामुळे मुस्लिम समाज हा शिक्षणापासून आणि नोकऱ्यांपासून वंचित असल्यामुळे  मुस्लिम समाजाची गरीब परिस्थिती आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मागणी करता येईल मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण जाहीर करा अशी विनंती करत आहे.

Sindhudurg News: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्याव यावर मी ठाम; मुसलमानांना पण ओबीसीतून आरक्षण द्या, असं कानावर आलंय : निलेश राणे

Sindhudurg News: सिंधुदुर्ग : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्याव यावर मी ठाम आहे. पण काल मुसलमानांना पण ओबीसीतून आरक्षण द्या असं काहीतरी कानावर आलं. हा शोध कुणी लावला??? आणि हे सगळे विषय जोडून मराठ्यांचा अजून किती नुकसान करणार आहात?? असा प्रश्न एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित केला. तर मीरा रोड परिसरात अनेक वर्षापासून नाईजेरियन लोकं राहतात उद्या ही मंडळी त्यांना पण ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणायला सुरू करतील, असा अप्रत्यश टोला मनोज जरांगे यांना लगावला आहे.





18th Lok Sabha First Session: संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांचा एल्गार; इंडिया आघाडीचे तीनही सदस्यांचा प्रोटेम स्पीकरच्या पॅनेलवर बहिष्कार

18th Lok Sabha First Session: संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांचा एल्गार


इंडिया आघाडीचे तीनही सदस्यांचा प्रोटेम स्पीकरच्या पॅनेलवर बहिष्कार


 काँग्रेसचे के सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर बालू यांचा पॅनेलवर बहिष्कार 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिघांनाही प्रोटेम स्पीकरच्या पॅनलमध्ये नियुक्त केले आहे. 


प्रोटेम स्पीकरच्या पॅनेलचे तीन सदस्य प्रोटेम स्पीकरला मदत करणार नाहीत


नवीन खासदारांना शपथ देणार नाहीत

Parbhani News: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह कमेंट, जिंतूर शहर बंदची ओबीसी समाजाकडून हाक

Parbhani News: परभणीच्या जिंतूर तालुक्यातील एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे वाद निर्माण झाला असुन याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर बंदची हाक देण्यात आली असून सकाळी आठ वाजल्यापासून जिंतूर शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे.कमेंट करणारा तरुण हा अल्पवयीन असुन त्याच्यावर जिंतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.सध्या जिंतुर मध्ये शांतता असुन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नितीश कुमार यांनी मोदी मंत्रिमंडळात मोठं मंत्रालय का मागितलं नाही? प्रशांत किशोर यांचा खळबळजनक खुलासा

Prashant Kishor on Nitish Kumar: नवी दिल्ली : राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी रविवारी (23 जून) बिहारचे (Bihar Politcs) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यादरम्यान, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारमध्ये जेडीयूला मोठे मंत्रिपद न मिळाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. नितीश कुमार यांनी पक्षातील अंतर्गत मतभेद टाळण्यासाठी कोणतंही मोठं मंत्रालय मागितलं नाही, असा दावा राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी केला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Mumbai Rain: मुंबईला ऑरेंज अलर्ट

Mumbai Rain: मुंबईला पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत कालपासून अधुनमधून पावसाच्या सरी बरसत असल्या तरी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Maharashtra assembly Election 2024: विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत

Maharashtra assembly Election 2024: भाजपने विधानसभा निवडणुकीत 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेसाठी 60 ते 65 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी 50 ते 55 जागा सोडण्याची तयारी असल्याचे समजते. तर महायुतीमधील अन्य तीन मित्रपक्षांसाठी 15 जागा राखून ठेवण्याची भाजपची योजना असल्याचे समजते.

NEET Paper Leak Case: शिक्षकांकडे आढळले नीटच्या 12 विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड

NEET Paper Leak Case: देशभरात गदारोळ माजवणाऱ्या नीट पेपरफुटीचे धागेदोरे (NEET Paper Leak Case) आता महाराष्ट्रात सापडले आहेत. लातुरातून (Latur) नांदेड एटीएसनं (Nanded ATS) दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं. त्या दोन्ही शिक्षकांविरोधात आता नीट पेपरफुटी प्रकरणी (NEET Exam) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या शिक्षकांची कसून चौकशी सुरू होती. अशातच या शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड सापडल्याचं समोर आलं आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.