Maharashtra Breaking 24th July LIVE Updates: मध्यरेल्वेची आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी रखडपट्टी सुरूच; माटुंगा स्टेशनजवळ फास्ट लोकल खोळंबल्या 

Maharashtra Breaking 23rd July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 24 Jul 2024 01:55 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 24th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...1. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांची खडाजंगी, एबीपी माझाला सूत्रांची माहिती,...More

Mumbai News : मुंबईच्या दहिसर पश्चिमेत गणपत पाटील नगर मध्ये बेस्ट प्रशासनाचा बस स्टॉप गायब

Mumbai News : मुंबईच्या दहिसर पश्चिमेत गणपत पाटील नगर मध्ये बेस्ट प्रशासनाचा बस स्टॉप गायब.


बेस्ट प्रशासनाकडून शोध घेतल्यानंतर एम.एच.बी पोलीस स्टेशनमध्ये बस स्टॉप चोरीची तक्रार.


तक्रार दाखल करताच तीन दिवसानंतर पालिकेकडून बस स्टॉप काढून घेऊन गेल्याची माहिती.


बस स्टॉप काढल्यामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक. शिवसेना शिंदे गटाची मागणी बस स्टॉप काढणारा पालिका अधिकाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करा.


त्याचसोबत रस्त्यावर बस स्टॉप नसल्यामुळे बस कुठून पकडायचं लोकांच्या मनात असा संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे पालिकेने तातडीने बस स्टॉप त्याच जागावर लावा असे मागणी देखील शिवसेना शिंदे गटाचे दहिसर उपविभाग प्रमुख राम यादव यांनी केली आहे.