Maharashtra breaking News Live Updates : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 45 जागांची यादी जाहीर, युगेंद्र पवार बारामतीतून लढणार

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 24 Oct 2024 11:33 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी उद्या सकाळी 8 वाजता येणार

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी उद्या सकाळी येणार


राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची एबीपी माझाला माहिती

परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजीत पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार

शिवसेना ठाकरे गटाकडून अखेर परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना  एबी फॉर्म उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे 


 परांडा विधानसभा मतदारसंघात रणजीत पाटील यांना काल पहिल्या शिवसेना ठाकरे गटाच्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली 

काँग्रेस चे आबा बागुल जयंत पाटील यांच्या भेटीला

काँग्रेस चे आबा बागुल जयंत पाटील यांच्या भेटीला


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आबा बागुल दाखल


आबा बागुल पर्वती विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत


जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्यासोबत आबा बागुल करणार चर्चा


पर्वती मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अश्विनी कदम यांचे नाव चर्चेत असताना आबा बागुल यांची ही भेट महत्त्वाची ठरू शकते

काँग्रेसची 48 जागांची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेत्यांना संधी

काँग्रेसची 48 जागांची पहिली यादी जाहीर,  दिग्गज नेत्यांना संधी


नाना पटोले, बाळासाहेब पाटील अन् पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी 


कसब्यातून रविंद्र धंगेकर यांना पुन्हा संधी

सुधीर साळवी यांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज

सुधीर साळवी यांना शिवडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते  पदाधिकारी  नाराज


 लालबाग मध्ये सुधीर साळवी  यांच्यासमोर  कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी, लवकरात लवकर सुधीर साळवी यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी कार्यकर्त्यांची विनंती

नवी मुंबईत ठाकरेंना धक्का, माजी नगरसेवक द्वारकानथा भोईर साथ सोडणार

नवी मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व्दारकानाथ भोईर यांनी दिला पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा


ऐरोली विधानसभेतून एम के मढवी यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळाल्याने भोईर नाराज…


अनेक वर्ष नगरसेवक राहिलेल्या व्दारकानाथ भोईर यांना उमेदवारी न देता एम के मढवी यांना मिळाल्याने राजीनामा 


व्दारकानाथ भोईर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता..

सुहास कांदेंची येवल्यातून लढण्याची इच्छा

येवला मधून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे


मुख्यमंत्री आणि फडणवीस यांची परवानगी मागितली आहे


नांदगाव मधून मी माझ्या कुटुंबातील एक सदस्य देतो, आणि मी येवलामधून लढणार


जरांगे पाटील यांच्याशी भेटलो आहे, सुहास कांदे यांची माहिती 

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी , 45 उमेदवार जाहीर, युगेंद्र पवार, रोहित पाटील यांना संधी

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी , 45 उमेदवार जाहीर, युगेंद्र पवार, रोहित पाटील यांना संधी 


रोहिणी खडसेही रिंगणात 

उमरेड विधानसभेतील शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना

उमरेड विधानसभेतील शिवसैनिकांच्या उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना…


रामटेकच्या बदल्यात उमरेड विधानसभा शिवसेनेला सोडली तर दोन्ही जागेवर महाविकास आघाडीला विजय होणार असल्याचा शिवसैनिकांच्या दावा 


हीच माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी शिवसैनिक मुंबईला निघाले आहे 

Sameer Bhujbal : समीर भुजबळ यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, नांदगावमधून लढणार

नांदगाव मधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगाव मधील दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकारावा अशी नम्र विनंती आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे, असं समीर भुजबळ म्हणाले. 

Ajay Choudhari : शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी लढणार

शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. सुधीर साळवी यांना यावेळी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही.

Sunil Kedar : कांग्रेसचे नेते सुनिल केदार मातोश्रीवर दाखल

विदर्भातील काही जागांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सुनिल केदार मातोश्रीवर दाखल


विदर्भातील काही जागांसंदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती


महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा आज सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात 8 दिवस सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात 8 दिवस सभा


७ नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान यांच्या महाराष्ट्रात सभांचा धडाका


पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विभागवार सभा


फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा


पंतप्रधान 14 नोव्हेंबर नंतर परदेश दौऱ्यावर असल्याने सभांना मिळणार कमी कालावधी

Belapur Vidhan Sabha Election : बेलापूर विधानसभेतून महायुतीमध्ये बंडखोरी, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी भरला अपक्ष अर्ज 

बेलापुर विधानसभेतून महायुती मध्ये बंडखोरी 


शिवसेनेचे उपनेते 
विजय नाहटा यांनी भरला अपक्ष अर्ज 


भाजपा कडून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या विजय नाहटा यांनी भरला अर्ज


बेलापुर मध्ये सांगली पॅटर्न राबवून आपण निवडून येणार विजय नाहटा यांचा निर्धार


भाजपा कडून मंदा म्हात्रे , राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संदीप नाईक तर अपक्ष विजय नाहटा अशी तिरंगी लढत बेलापुर विधानसभेत होणार

Solapur South Vidhan Sabha Election : दक्षिण सोलापूर जागेसाठी वंचितकडून संतोष पवार यांना तिकीट, प्रकाश आंबेडकरांनी दिला एबी फॉर्म  

सोलापूर ब्रेकींग-
----


दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून संतोष पवार यांना उमेदवारी जाहीर 


वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संतोष पवार यांना देण्यात आला एबी फॉर्म 


दक्षिण मध्ये भाजप-शिवसेना ठाकरे गट-मनसे नंतर आता वंचितचाही उमेदवार जाहीर


माजी सहकार मंत्री आणि सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात संतोष पवार उतरले रिंगणात

Avinsh Jadhav : मनसेच्या अविनाश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज 

मनसेच्या अविनाश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज 


अविनाश जाधव ठाणे शहरातून निवडणूक लढवणार

Anil Gote Joins Uddhav Thackeray Shivsena : अनिल गोटे यांचा ठाकरेंच्या पक्षात प्रवेश, धुळे शहरातून उमेदवारी जाहीर

अनिल गोटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा प्रवेश संपन्न


अनिल गोटे यांच्या हाती शिवबंधन


अनिल गोटे यांना धुळे शहरातून उमेदवारी जाहीर, उद्धव ठाकरेंनी एबी फाॅर्म सुपुर्द केला


‘मी तुम्हाला उमेदवार देतो तुम्ही मला आमदार द्या’, उद्धव ठाकरेंचं अनिल गोटे यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन

Rajan Salvi : उमेदवारी अर्जाचा मुहूर्त साधण्यासाठी आमदार राजन साळवी प्रांत कार्यालयात 

रत्नागिरी- उमेदवारी अर्जाचा मुहूर्त साधण्यासाठी आमदार राजन साळवी प्रांत कार्यालयात 


उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वजाबाकी


राजन साळवी यांना प्रांत ऑफिसमध्ये सोडण्याची कर्मचाऱ्यांनी अडवले 


 सूचक यांना आत मध्ये सोडण्यावरून राजन साळवीचा भाऊ आणि पोलिसांची काही काळ शाब्दिक बाचाबाची

Dhananjay Munde : पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज


बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पाच लाडक्या बहिणी सोबत धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

Dhananjay Munde : पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज


बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पाच लाडक्या बहिणी सोबत धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, अस्लम शेख मातोश्रीवर

मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, अस्लम शेख मातोश्रीवर दाखल, महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी दाखल झाल्याची सूत्रांची माहिती, धारावी, भायखळा आणि वांद्रे पूर्व विधानसभेसाठी कांग्रेस पक्ष आग्रही, मात्र, धारावी, भायखळा आणि वांद्रे पूर्वसाठी देखील कांग्रेसचा अजूनही दावा कायम, मुंबईतील जागावाटपासंदर्भात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वाद मिटते का? हे बघणं महत्वाचं असेल

Bhiwandi Constituency : भिवंडी ग्रामीण भागात भाजपची बंडखोरी, स्नेहा पाटील अपक्ष उमेदवारी भरण्याचा तयारीत 

भिवंडी ग्रामीण भागात भाजपची बंडखोरी होणार 


भाजपच्या इच्छुक उमेदवार स्नेहा पाटील अपक्ष उमेदवारी भरण्याचा तयारीत 


आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार 


भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिंदे गट व भाजप आग्रही 


अजूनही या जागेवर महायुतीने घोषणा केलेली नाही


मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल


स्नेहा पाटील भिवंडी भाजपा युती मोर्चाच्या तालुका अध्यक्ष

Ashok Pawar : आमदार अशोक पवार आज उमेदवारी अर्ज भरणार

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही मात्र इकडे शिरूर हवेलीत आमदार अशोक पवारांचं ठरलंय. अशोक पवार आज शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरजचंद्र पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 


उद्योजक प्रकाश धारिवाल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके यांच्या उपस्थित महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल करणार ठाकरे, शरद पवारांच्या पक्षासाठी प्रचार, महाराष्ट्रात मोठ्या सभा घेणार

नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात प्रचार करणार


 शिवसेना युबीटी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस साठी प्रचार करणार 


दोन्ही पक्षांकडून अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क,  सूत्रांची माहिती 


झारखंडमध्येही अरविंद केजरीवाल प्रचार करणार 


अरविंद केजरीवाल यांच्या विभागवार जाहीर सभा होणार असल्याची माहिती

राजापूर विधानसभा मतदारसंघात किर यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन 

रत्नागिरी- राजापूर विधानसभा मतदारसंघात यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन 


किरण सामंत थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार 


उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा 


किरण सामंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील उपस्थित राहणार 


किरण सामंत यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन 


जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून किरण सामंत कार्यकर्ता मेळाव्यात

Shivadi Vidhan Sabha : महायुतीतही शिवडी विधानसभेवरुन पेच, भाजपमधून गोपाळ दळवींच्या नावाची चर्चा

 महायुतीतही शिवडी विधानसभा मतदारसंघाचा पेच कायम


शिंदेच्या शिवसेनेकडे शिवडीत कुठलाही बडा चेहरा नसल्याने भाजपचा शिवडी विधानसभा मतदारसंघावर दावा


शिवडी विधानसभेतून भाजपमधून गोपाळ दळवींच्या नावाची चर्चा


नवरात्र,दहीहंडीत शिवडीच्या विकासासाठी बदल, आशयाचे बॅनर लावत दळवींनी फुंकले होते रणशिंग


मराठी दांडिया आणि दहीहंडी उत्सवातही सेलिब्रिटींची शिवडीत रीघ लावत मराठी मतांना घातले होते साकडे


महायुती भाजपच्या गोपाळ दळवींना संधी देणार? की जागा शिवसेनेला सोडणार? याकडे लक्ष


गोपाळ दळवी हे माजी आमदार शिवराम दळवींचे पुत्र

Samrjeet Ghadge Kagal : समरजीत घाटगेंनी अर्ज भरला, कागलमध्ये हसन मुश्रीफांविरुद्ध लढाई

समरजित घाटगे यांचा कागल विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल, अजित पवारांचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध लढाई



समरजीत घाटगे नेमकं काय म्हणाले? 


आज केवळ मी उमेदवारी अर्ज भरला नाही तर कागल-गडहिंग्लज-उत्तूर मतदार संघातील जनतेनं परिवर्तनासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे


ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे, त्यामुळे मुश्रीफ साहेबांच्या पायाखालची वाळू सरकली आहे


गुरुदक्षिणा दिली म्हणून गुरुवर कधी पावशेर ठेवायचं नसतं 


आता देखील पवार साहेबांचा गुरुदक्षिणा दिली म्हणून अपमान केला आहे


कागलचे संस्कार असे नाहीत


कागल मतदार संघात होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन वरूनच ठरतं


... तर मी इलेक्शन लढणार नाही म्हणून पळ काढू नका


कागलच्या जनतेला परिवर्तन करण्यापासून वंचित ठेवू नका


कागलच्या जनतेला परिवर्तन करण्यासाठी मिळालेली संधी घालवू नका, तुम्ही निवडणूक लढाच


जनता दलच्या नेत्या स्वाती कोरी यांची आणि वरीष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक झाली आहे दोन दिवसात सकारात्मक निर्णय येईल


 

Sharad Pawar NCP : ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 4 जागा

ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ४ जागा


कळवा मुंब्रा, उल्लासनगर, मुरबाड आणि शहापूर विधानसभेचा समावेश 


कळवा मुंब्रा- जितेंद्र आव्हाड, उल्लासनगर- पप्पू कलानी, मुरबाड - सुभाष पवार आणि शहापूर- पांडुरंग बरोरा यांचा नावांचा समावेश


सूत्रांची माहिती

Anil Gote to Join Uddhav Thackeray Shivsena : लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे यांचा लवकरच ठाकरे गटात प्रवेळ, धुळ्यातून उमेदवारी मिळणार

लोकसंग्रामचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांचा शिवसेना ठाकरे गटात आज साडेबारा वाजता प्रवेश होणार आहे


 अनिल गोटे यांना धुळे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार


 अनिल गोटे हे तीन टर्म माजी आमदार होते, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप  त्यांचा लोकसंग्राम पक्ष  आणि आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश


 उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता मातोश्री ते पक्षप्रवेश.... आजच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

Sameer Bhujbal : नांदगावमधून माजी खासदार समीर भुजबळ यांचे निवडणूक लढण्याचे संकेत

नांदगाव विधानसभा मतदार संघामधून माजी खासदार समीर भुजबळ यांचे निवडणूक लढण्याचे संकेत


 आज संध्याकाळी मनमाड शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची भूमिका जाणून निर्णय घेणार


मुंबई अध्यक्ष पदाबाबत पक्ष काय कारवाई करेल ते त्यावेळेस बघू आज कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेणार



 नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदे महायुतीचे आहेत उमेदवार

Atul Bhatkhalkar : भाजप नेते अतुल भातखळकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

भाजप नेते अतुल भातखळकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार


अर्ज दाखल करण्यापूर्वी घेतले जैन मुनीचे आशीर्वाद.


कांदिवली परिसरात मोठा शक्ती प्रदर्शन करत अतुल भातखळकर दाखल करत आहेत आपला उमेदवारी अर्ज.

Ajit Pawar NCP : दिल्लीतील खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजितदादांच्या पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक

दिल्लीतील खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक


आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक तत्पूर्वी राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक सुरू


राष्ट्रवादीच्या वाट्याचा आष्टी, वरुड मोर्शी, वडगाव शेरी या जागांबाबत चर्चा होईल


आष्टीची जागा भाजप सुरेश धस यांच्यासाठी, वडगाव शेरीची जागा जगदीश मुळीक यांच्यासाठी तर वरुड मुर्शीची जागा खासदार अनिल बोंडे यांच्या पत्नीसाठी मागत असल्याची सूत्रांची माहिती


अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे त्यामुळे आता पक्षाचा एबी फॉर्म टिंगरे यांच्याकडे राहणार की तिकीट कटणार याकडे लक्ष

Avinash Jadhav : मनसेचे ठाणे शहराचे उमेदवार अविनाश जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार 

मनसेचे ठाणे शहराचे उमेदवार अविनाश जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार, 


राज ठाकरे पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात उपस्थित राहणार 


घरातून औक्षण करून अविनाश जाधव उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले 


मागील वेळेत केवळ 20 हजार मतांनी अविअंश जाधव यांचा संजय केळकर यांनी केला होता पराभव

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ वेळात येवला मतदारसंघासाठी भरणार उमेदवारी अर्ज 

- छगन भुजबळ यांनी घेतले देशमाने गावातील गणपतीचे दर्शन
- थोड्याच वेळात येवला मतदारसंघासाठी भरणार उमेदवारी अर्ज 
- 2004 पासून अर्ज भरण्याच्याधी गणेशाचे दर्शन घेत असल्याची छगन भुजबळ यांनी मतदारांना दिली माहिती
- छगन भुजबळ यांच ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत
- थोड्याच वेळात शक्तिप्रदर्शन करत दाखल करणार उमेदवारी अर्ज

Chandgad Vidhan Sabha Election 2024 : चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीत कुस्ती, राजेश पाटील यांच्या विरोधात शिवाजी पाटील


चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीत कुस्ती


विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात शिवाजी पाटील


शिवाजी पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती


तर राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार


शिवाजी पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Devendra Fadnavis : कालपासून देवेंद्र फडणवीस दिल्ली मुक्कामी, आज महायुतीची दिल्लीमध्ये बैठक होणार


 कालपासून देवेंद्र फडणवीस दिल्ली मुक्कामी


आज महायुतीची दिल्लीमध्ये बैठक होणार


 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत आज महायुतीची बैठक


मुख्यमंत्री ही दिल्लीला रवाना होणार


 काही जागांचा पेच सुटल्यानंतर भाजपची आज दुसरी यादी जाहीर होणार

Solapur Seat Distribution : चार जागांवर उमेदवार देण्यास आणखी दोन दिवस लागणार, सोलापुरात महाविकास आघाडीत बिघाडी?

 पंढरपूर माढा मोहोळ आणि करमाळा या चार मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती दोघांकडूनही उमेदवार देण्यास अजूनही दोन दिवस लागणार .. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार घोषणेमुळे जिल्ह्यात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

Dhananjay Munde : आज धनंजय मुंडे भरणार उमेदवारी अर्ज

आज धनंजय मुंडे भरणार उमेदवारी अर्ज


साध्या पद्धतीने भरणार अर्ज

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळली असून त्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातील दोन ते तीन दगावले असण्याची भीती ही व्यक्त केली जातीये. भोसरीच्या सद्गुरू नगरमध्ये ही घटना आज सकाळी घडली आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर अधिकची माहिती समोर येईल.

Maha Yuti Seat Distribution : महायुतीच्या उर्वरित जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार

महायुतीच्या उर्वरित जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार


राज्याचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात दिल्लीसाठी मुंबईहून निघणार


आता पर्यंततीनही पक्षांनी त्यांच्या बहुतांश विद्यमान आमदारांच्या जागा घोषित केल्या होत्या


उर्विरित जागांवर आज दिल्लीत चर्चा होणार

Raja Mane : ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक राजा माने निवडणूक लढवण्याच्या तयारीत 

ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक राजा माने निवडणूक लढवण्याच्या तयारीत 


मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यास बार्शी विधानसभा लढवणार 


ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचे मत, या संदर्भात राजा माने यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली 


अंतरावली सराटी येथे राजा माने यांनी जरांगे यांची भेट घेऊन उमेदवारी संदर्भात इच्छा व्यक्त केली 


दरम्यान बार्शीत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे


मात्र विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात जरांगे पाटील यांनी उघडपणे भूमिका घेतली होती 


त्यामुळे बार्शी विधानसभा मतदार संघात जरांगे पाटील उमेदवार देणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे

Maha Vikas Aghadi Seat Distribution : 85-85-85 हा अंतिम नाही, काँग्रेस एकूण 100 जागांवर लढणार- सूत्रांची माहिती

८५-८५-८५ हा अंतिम नाही तर तात्पुरता फार्मुला आहे. 


अंतिम फार्मुल्यात काँग्रेस १०० वर जागा लढते 


एबीपी माझा ला काँग्रेसच्या उच्चस्तरीय सूत्रांची माहिती

Mahayuti Seat Distribution : महायुतीत जागावाटप जवळपास पूर्ण, पण मराठवाड्यातील पाच जागांचा पेच अद्याप कायम!

महायुतीमधील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर असली तरी मराठवाड्यातील पाच जागांबाबत महायुतीमध्ये अद्यापही पेच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नांदेड जिल्ह्यातील लोहा, बीड जिल्ह्यातील गेवराई व आष्टी आणि उस्मानाबाद या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीचे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे....

Priti Band : ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना तिकीट, प्रीती बंड यांचे समर्थक आक्रमक!

अमरावतीच्या बडनेरा मतदार संघातुन ठाकरे गटाच्या प्रीती बंड यांना उमेदवारी नाकारल्याने समर्थक आक्रमक...


ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आल्याने  प्रीती बंड गट नाराज...


पक्षा सोबत प्रामाणिक पणे निष्ठा ठेवली पण मला एन वेळेवर तिकीट का नाकारली ? प्रीती बंड यांचा सवाल..


मला पक्षाने निवडणूकिसाठी कामाला लागायचे आदेश दिले होते - प्रिती बंड...


उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासु दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी आहेत प्रिती बंड..


बडनेरा मतदार संघात ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना उमेदवारी दिल्याने खराटे यांना बंड समर्थक मतदान करणार नाही..


बडनेरा मतदार संघात सध्या रवी राणा आहेत आमदार...

Anil Gote to Join Uddhav Thackeray Shivsena : ठाकरेंच्या गळाला मोठा मासा, अनिल गोटे भाजपाविरोधात निवडणूक लढवणार

धुळे : माजी आमदार अनिल गोटे हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश करणार असून सकाळी दहा वाजता मुंबई येथे मातोश्रीवर त्यांचा प्रवेश होणार आहे अनिल गोटे यांना महाविकास आघाडी कडून धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे, यामुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान अनिल गोटे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून नाराजी व्यक्त होत असून जिल्हाध्यक्ष असलेले रणजीत भोसले हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत, रणजीत भोसले यांच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे..

Chandrakant Patil : महायुतीचे कोथरुडचे उमेदवार चंद्रकांत पाटील, आज उमेदवारी अर्ज भरणार

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे मात्र त्यापूर्वी ते पुण्यातील अनेक मंदिरांमध्ये दर्शन घ्यायला जाणार आहेत. शंकर महाराज मठाचे दर्शन घेऊन ते सुरुवात करणार आहे त्यानंतर कसबा गणपती दर्शन, मोदीबाग कार्यालय, छत्रपती संभाजी महाराज पुतळाला अभिवादन स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा अभिवादन, मृत्युंजय मंदिर, कर्वे पुतळ्याला अभिवादन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन  करतील त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करतील

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) धूम चालू असून राजकीय वारे जोमाने वाहू लागत आहेत. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांनी काही जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तर आपल्या उमेदवारांची पहिली यादी 23 ऑक्टोबर रोजीच जाहीर केली आहे. दरम्यान, आजदेखील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्याचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.