Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे क्रांती चौकात एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. नाशिक- सोलापूर एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एसटीने पेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने आणि वाहकाने गाडीतील प्रवाशांना उतरवल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली आहे.
नंदुरबार : मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत.नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी निर्दशने केली आहेत. प्रशिक्षणार्थींचा कालावधी वाढून देण्याच्या मागणीसाठी 1500 हून अधिक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 11 महिन्यांची कंत्राटी नियुक्ती देण्यात यावी. प्रशिक्षण घेतलेल्या शाळांमध्येच पुढील कार्यासाठी नियुक्ती आदेश देण्यात यावे. ज्याप्रमाणे निवृत्त शिक्षकांना 5 ते 10 कंत्राटी तत्त्वावर सेवा दिली जाते, त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थींना सेवा देण्यात यावी, यासह विविध मागण्यासाठी विद्यार्थी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
भंडारा : जवाहरनगर ऑडनस फॅक्टरीमध्ये सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटातील दोन कामगारांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या इमारतीत एकूण 14 कामगार काम करीत असल्याची माहिती आहे. पाच गंभीर जखमी कामगारांना उपचारासाठी भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित सात कामगारांचा मलब्याखाली दबून असल्याची भीती वर्तविण्यात येत आहेत.
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झाले आहेत. अमित शाह यांच्यासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, मुरलीधर मोहोळ उपस्थित आहेत. अमित शहा मंदिरात दर्शन घेऊन संकल्प पूजा करणार आहेत.
भंडारा : जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा ब्लॉस्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत काही जीवितहानी झाली का? अद्याप याबाबत माहिती कळू शकलेली नाही.
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मालेगाव दौऱ्यावर येत असून माजी सैनिक व शेतकरी यांनी अजंग येथे उभारलेल्या 538 एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला भेट देणार आहेत. तसेच येथे सुरु करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र व अगरबत्ती कारखान्याचे उद्घाटन त्यांच्या हातून होणार आहे. तसेच या ठिकाणी आयोजित सहकार परिषदेच्या माध्यमातून अमित शाह शेतकऱ्यांशी संवाद साधाणार आहे. अमित शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार आहेत. सहकार परिषदेसाठी देशभरातील 20 हजारापेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. व्यंकटेश्वरा को ऑप. सोसायटीचे व्यवस्थापक शिवाजीराव डोळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
पालघर- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडा ते वसईपर्यंत मोठी वाहतूक कोंडी
वाहतूकदार आणि प्रवासी त्रस्त,, गेल्या तीन तासापासून ही वाहतूक कोंडी असल्याची माहिती
या महामार्गाचे सिमेंट काँक्रीट काम सुरू असून ठेकेदार आणि संबंधित यंत्रणा यांचं वाहतूक नियंत्रण आणण्यासाठी नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी
मुंबई- ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न तळमळीने मांडले. पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारणाला दिशा देण्याचे काम केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुंबईतून धक्कादायक घटना समोर
राम मंदिर स्टेशनजवळ एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार
सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला
एका अज्ञात रिक्षाचालकाने पीडितेवर हल्ला केल्याचा आरोप
मुंबई पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू
पीडित मुलगी मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत आढळली.
नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) बैठकीत १४.९५ टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली असून त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत निर्णय झालेला असला तरी त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही.
मालेगाव बांगलादेशी रोहिंग्या व जन्म दाखला घोटाळा प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मालेगाव दौऱ्याच्या पूर्व संध्येला मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे व नायब तहसील संदीप धारणकर यांचे निलंबन करण्यात आले. शहा यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणाला महत्व प्राप्त झाले आहे.
नाफेडद्वारे खरेदी केले जाणारे सोयाबीनची खरेदी आता सुरळीत सुरू झालेली आहे ...बारदाना उपलब्ध झाल्याने आता थांबलेली खरेदी सुरू झालेली आहे ..जवळपास 40% नाफेड ने सोयाबीनची खरेदी केली असून 60 टक्के खरेदी अवघ्या सहा दिवसात मोजणी करायची आहे.. मात्र , साथ दिवसात मोजणी होण्याची शक्यता कमी असल्याने मोजणीची मुदत वाढ खरीददाराकडून करण्यात आली आहे ..त्यामुळे त्या मुदतीपर्यंत जर खरेदी नाही झाली तर मुद्दत वाढ नाही मिळाली तर उर्वरित शेतकऱ्यांचा प्रश्न कायम असू शकतो
शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक आज बोलण्यात आली आहे... दुपारी बारा वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे... उद्धव ठाकरे हे या जिल्हाप्रमुखांचे बैठकीला उपस्थित राहणार असून राज्यभरातील जिल्हाप्रमुखांकडून आढावा घेणार असल्याची माहिती आहे... काल उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचे संकेत दिल्यानंतर जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत काय नेमक्या सूचना केल्या जातात हे पाहावं लागेल...
रत्नागिरी- उद्योगमंत्री उदय सामंत आज रत्नागिरीतून पहिला ट्रेलर दाखवणार
रत्नागिरीतून आज उद्योग मंत्री उदय सामंत उद्धव ठाकरे सेनेला खिंडार पडणार
उद्धव ठाकरे सेनेतील जवळपास साडेचारशे कार्यकर्ते उद्धव ठाकरे सेनेला रामराम करणार
तालुकाप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच अशांचा आज बारा वाजता पक्षप्रवेश
उद्धव ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपविभाग प्रमुख दत्ता तांबे, विभाग प्रमुख अप्पा घाणेकर, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर आज शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार
श्रीवर्धन मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
दहा हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेचा उपअभियंता एनसीबीच्या जाळ्यात
एका सभागृहाचे देयक काढण्यासाठी करण्यात आली होती दहा हजार रुपयांची मागणी
डॉ प्रवीण पंढरीनाथ मोरे अस लाच स्वीकारणाऱ्या रायगड जिल्हा परिषद उपअभियंता याच नाव
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण वाढले
59 वरून रुग्णांचा आकडा 67 वर
यापैकी 39 रुग्ण पुणे ग्रामीण, 13 रुग्ण महानगरपालिका आणि 12 रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि तीन रुग्ण इतर जिल्ह्यात असल्याची माहिती
13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत
नालासोपारा : नालासोपाऱ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई होणार आहे. काल तुलसी अपार्टमेंट वर झालेल्या कारवाईत काही रहिवाशांना भाड्याने रुम न मिळाल्यामुळे त्यांनी इमारती च्या समोरच चादरी आणि बांबूच्या साहाय्याने घर उभारलं आणि त्या घरात त्यांनी संपूर्ण रात्र काढली.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागताच्या निमित्ताने धाराशिव शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी, बॅनरवरून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो गायब
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज सोळुंके यांच्याकडून पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहरभर बॅनरबाजी
माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे बॅनर वर फोटो, मात्र तानाजी सावंत यांचा फोटो गायब
मुंबईतील शिवसेना मेळाव्याला तानाजी सावंत यांची गैरहजेरी, आता जिल्ह्यात अंतर्गत वाद समोर
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) पुढील आठवड्यात दादर येथील छत्रपत्री शिवाजी महाराज मैदानातील धूळीबाबत आढावा घेणार आहे.
मैदानावर धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई आयआयटीने दिलेल्या अहवालानुसार अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
नालासोपारा:- नालासोपाऱ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी होणार अनाधिकृत इमारतीवर तोडक
डम्पिंग आणि मलनिस्सारण च्या राखीव जागेवर 41 इमारती भूमाफियांनी अनधिकृत बांधल्या आहेत..
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने यापैकी 8 इमारती वसई विरार महापालिकेने मोठ्या फोजफाटा सह भुईसपाट केल्या आहेत
आज दुसऱ्या दिवशी च्या कारवाहित तीन इमारती वर पोकलंड चालवणार आहेत..
पालिकेच्या तोडक कारवाही ने शेकडो कुटुंब बेघर होत आहेत
क्लेरियन औषध निर्मिती कारखान्यात मध्यरात्रीच्या सुमारास अमोनिया द्रव्य अंगावर पडल्यानं त्यात कंपनीचा सुपरवायझर गंभीररीत्या भाजलां. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसरच्या देव्हाडी येथील क्लेरियन कंपनीत घडली. गंभीर जखमीवर सध्या नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जखमी सुपरवायझरचे नाव सुनील दमाहे (३२) असं आहे.
विदर्भाचे आराध्य दैवत शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप, अमरावती येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. हा सोहळा उन्मेष 2025 या सांस्कृतिक महोत्सवाच्या शुभारंभाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याचा मुख्य आकर्षण विद्यार्थ्यांनी सादर केलेले ढोल पथक आणि लेझीमच्या माध्यमातून दाखवलेला उत्साह होता. संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रविण पोटे पाटील आणि उपाध्यक्ष श्रेयश पोटे पाटील यांनीही टाळ, मृदुंग व ढोल वाजवत विद्यार्थ्यांसोबत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल’ (एनसीसीआरपी) आणि मदत 'क्रमांक 1930' वर गेल्या तीन महिन्यांत 64 हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
मुंबई वगळता संपूर्ण राज्यातून या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींसंदर्भात तात्काळ कारवाई करून सायबर फसवणूकीतील 119 कोटी रुपये वाचविण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात पाळण्यास बंदी असलेल्या पिटबूल प्रजातीच्या श्वानाने दुसऱ्या गरोदर श्वानावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. या प्रकारास त्याच्या मालकाला कारणीभूत ठरवत जवाहरनगर पोलिस ठाण्यात अमरनाथ देवकर आणि राेहणी अमरनाथ देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.20 जानेवारी रोजी सोशल माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात पिटबूल प्रजातीच्या आक्रमक झालेल्या श्वानाने दुसऱ्या छपाक नावाच्या भटक्या श्वानावर हल्ला केला.
- अमित शहा आज साधणार शेतकऱ्यांशी संवाद..
- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती राहणार..
- अजंग येथील शेतकऱ्यांसाठी असलेले माती परीक्षण केंद्र व अगरबत्ती कारखान्याचे करणार उद्घाटन...
- अजंग येथील व्यंकटेशा फॉर्मवर सभेतून करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन..
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात विविध घटना घडत आहे. तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडबाबत विविध माहिती समोर येत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -