Maharashtra breaking News Live Updates : संभाजी ब्रिगेड-शिवसेनेची युती तुटणार, संभाजी ब्रिगेड 50 पेक्षा अधिक उमेदवार जाहीर करणार
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
प्रज्वल ढगे Last Updated: 23 Oct 2024 01:43 PM
पार्श्वभूमी
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात स्वतंत्रपणे जागावाटप चालू आहे. आतापर्यंत भाजपाने...More
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात स्वतंत्रपणे जागावाटप चालू आहे. आतापर्यंत भाजपाने (BJP) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवार आहेत. तर वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षानेदेखील आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. 22 ऑक्टोबरच्या रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षानेदेखील आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तुलनेने सुरक्षित आणि कोणताही वाद नसेलेल्या मतदारंसघांचा समावेश आहे. दरम्यान आज महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Boisar Vidhan Sabha Election : बोईसर विधानसभेसाठी शिवसेनेच्या शिंदे गटात असंतोष, कार्यकर्ते नाराज
पालघर -
बोईसर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटात असंतोष .
बोईसर विधानसभेसाठी भाजपकडून दावा करण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज .
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि सध्याचे शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटक जगदीश धोडी यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी .
जगदीश धोडी बोईसर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटातून इच्छुक उमेदवार .
उमेदवारी न दिल्यास जगदीश धोडी यांनी वेगळा विचार करण्याच कार्यकर्त्यांचा आवाहन .